शुगर कमी करण्यासाठी घरगुती उपाय-नैसर्गिक पद्धतीने साखर नियंत्रण कसे मिळवावे?

तुमच्या बाबतीत कधी असं होतं का की तुम्ही जेवायला बसता आणि विचार करता की खरंच “हे जे मी खातोय ते माझ्या शुगर साठी चांगलं तर आहे ना ??”..

Contents

तुम्ही जर शुगर म्हणजे डायबेटिस पासून त्रस्त झालेला असाल तर नक्कीच असा विचार करत असाल आणि शुगर कमी करण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल.

तुम्हीच नाहीत तर जगात कित्येक लोक सामान्य औषधोपचार सोडून घरगुती उपाय काही उपयोगी पडतात का असा विचार करतात.

पण तुम्हाला असं वाटतं का, की आपल्या स्वयंपाकघरातल्या काही साध्या गोष्टींनी रक्तातील साखर कमी होऊ शकते ?

तुम्हाला आश्चर्य वाटेल हे की एक साधी दालचिनी सुद्धा तुमची शुगर कमी करू शकते. या एका अभ्यासादरम्यान असे आढळले की ४० दिवसांसाठी प्रत्येक दिवशी १-६ ग्रॉम एवढी दालचीनी खालली असता, टाइप 2 मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची उपाशी पोटी तपासलेल्या शुगर ची पातळी कमी होऊ शकते.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटत असेल तरच नवल.

आता तुम्ही विचार करत असाल की, “शुगर कमी होण्यासाठी उपाय म्हणून हे घरगुती किंवा स्वयंपाक घरातले उपाय खरंच उपयोगी ठरतात का?” तर याचं उत्तर आहे, होय ! याचं उत्तर ‘हो’ का नसावं. यावर अनेक संशोधन झाले आहेत आणि या विषयी अनेक पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत.

वर्षानुवर्षे आणि अनेक अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की काही विशिष्ट मसाले, औषधी वनस्पती, आणि अन्नपदार्थ हे सर्व नैसर्गिक गोष्टी मध्ये तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याची क्षमता आणि गुण आहेत. आणि महत्वाचं म्हणजे, हे उपाय पारंपारिक उपचारांमध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून वापरले जात आहेत.

पण इथे अजून एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल. शुगर किंवा मधुमेह हा आजार फक्त औषधे किंवा घरगुती उपाय करून बरा होणारा नाहीये. म्हणजे फक्त रोज दालचीनी आणि औषध घेतले आणि मोकळे झाले असे करता येणार नाही. मधुमेह पूर्णपणे घालवण्यासाठी याहून अधिक गोष्टींची गरज लागणार आहे.

आणि हा प्रवास घेऊन जाणार तुम्हाला माझ्या दुसऱ्या दृष्टिकोणाकडे. तो म्हणजे जीवनशैली. हो .. यासाठी गरज आहे काही निर्णय घेण्याची आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करण्याची जसे की आहार आणि व्यायाम.

आणि हो, या सर्व गोष्टींना शास्त्रीय आधार आहे आणि याचे वेगळे विज्ञान सुद्धा आहे.

एक डॉक्टर म्हणून मला नेहमी मधुमेह किंवा वाढलेली शुगर मॅनेज करण्यासाठी घरगुती उपाय विचारले जातात. तर आज या या ब्लॉग मी तुमच्याशी काही शास्त्रीय आधार असणारे घरगुती उपाय आणि काही सामान्य उपाय यांची माहिती माहिती शेअर करणार आहे.

या ब्लॉगमध्ये आपण घरगुती उपायांवर चर्चा करणार असलो तरी, त्याआधी या विषयाची थोडी पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला पुढील मुद्दे समजायला सोपे जाईल.

चला तर मग , तयार आहात का ?

मधुमेह किंवा शुगर होणे म्हणजे काय ?

याचा थोडक्यात अर्थ असा होतो की, आपल्या शरीरात इन्सुलिनची योग्य निर्मिती होत नसल्याने किंवा शरीरातील पेशी इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नसल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात अडचण येते किंवा ती नियंत्रित राहू शकत नाही.

संबंधीत वाचा- इंसुलिन काय आहे ?

या स्थितीत रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. आणि याचाच परिणाम म्हणजे तुम्हाला शुगर किंवा मधुमेह होणे.

शुगर किंवा मधुमेह म्हणजे काय याचे सविस्तर विश्लेषण जाणून घ्यायचे असेल तर हा ब्लॉग बघू शकता.

शुगर चे प्रकार कोणते ?

शुगर चे प्रकार कोणते

तसे शुगर चे अनेक प्रकार आहेत. पण फक्त तुम्हाला त्याची बेसिक माहिती असावी याउद्देशाने तुम्हाला महत्वाची दोन प्रकार सांगणार आहे. हे प्रकार कदाचित तुम्हाला माहीत सुद्धा असतील.

  • टाइप १ डायबेटिस– यामधे तुमचे शरीर ग्लुकोज ला वाढवण्यापासून थांबवणारे इंसुलिन च तयार करत नाही किंवा खूप कमी प्रमाणात तयार करते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज नेहमी वाढलेले राहते.
  • टाइप २ डायबेटिस– या स्थितिमध्ये इंसुलिन तर तयार होते पण काही कारणांमुळे तुमचे शरीर त्या इंसुलिन चा वापर करू शकत नाही. दुसऱ्या पद्धतीने सांगायचे तर तुमचे शरीर त्या इंसुलिन ला योग्य प्रतिक्रिया देत नाही.

तुम्हाला मधुमेह विषयी ही थोडक्यात माहिती जाणून घेणे का महत्वाचे आहे?

महत्वाचं कारण म्हणजे मधुमेह आजार हा आहार, जीवनशैली, आणि नैसर्गिक उपाय या गोष्टींना अधिक प्रभाविण पणे response देत असतो. त्यामुळे हे कसे होते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मधुमेहाचं बेसिक ज्ञान असणं फायदेशीर ठरणार आहे.

शुगर कमी करण्यासाठी घरगुती उपाय

मधुमेह विषयी तुम्हाला बसिक माहिती समजली असेल. आता सरळ विषयाला हात घालूयात. ब्लॉग मध्ये पुढे आपण शुगर किंवा मधुमेह हा आजार, आजाराची गंभीरता आणि परिणामकारकता कमी करण्यासाठी उपयोगी असे काही घरगुती बघणार आहोत.

१. मेथीची दाणे

मेथीची दाणे

सुरुवात करुयात मेथीच्या दाणे यापासून. सामान्यता भारतीयांच्या स्वयंपाक घरात आढळणाऱ्या या बारीक सुद्धा तुमची शुगर कमी करण्याची क्षमता ठेवतात. त्या अनुषंगाने यावर बरेच अभ्यास सुद्धा झाले आहे.

पहिली गोष्ट म्हणजे मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे (Soluble) फायबर भरपूर असतात. हे फायबर कार्बोहायड्रेट्सचे पचन आणि शोषण कमी करते. परिणामी रक्तातील ग्लुकोज कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज कमी राहते आणि ग्लुकोज स्पाइक होत नाही.

कार्बोहायड्रेट हा एक पोषक घटक आहे जो तुम्हाला तुमच्या जेवणातून मिळत असतो. पुढे या कार्बोहायड्रेट चे पचन,शोषण आणि विघटन होऊन ग्लुकोज तयार होते. तुम्हाला मिळणारी ऊर्जा ही या ग्लुकोज मधून मिळत असते. पण रक्तातील ग्लुकोज चे अतिरिक्त प्रमाण कधी कधी घातक ठरत असते. यातूनच मधुमेह सारखा आजार तयार होत असतो.

शिवाय मेथी मध्ये ट्रायगोनेलिन (trigonelline) आणि 4-हायड्रॉक्सीआयसोल्युसिन (4-hydroxyisoleucine) हे संयुग घटक आढळली आहेत. हे दोन घटक तुमचे इंसुलिन रेसिसटन्स कमी करतात आणि ग्लुकोज चे पचन नियंत्रित करण्यासाठी मदत करत असल्याचे आढळले आहे.

संबंधित वाचा- इंसुलिन रेसिसटन्स म्हणजे काय ?

नुकत्याच एका अभ्यासात मेथी दाणे supplement म्हणून जर वापरले तर त्याने टाइप 2 डायबिटीज आणि प्रीडायबिटीज असलेल्या रुग्णांना फायदा होतो असे दिसून आले आहे. हा अभ्यास इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलीक्युलर सायन्स (International Journal of Molecular Sciences) मध्ये प्रकाशित केलेला आहे.

मेथी दाणे आणि मधुमेह मध्ये होणाऱ्या त्याचा संभाव्य परिणाम तपासण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला आहे.

या अभ्यासामध्ये किम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेथीच्या बीयांची पूरक मात्रा टाइप 2 मधुमेह आणि प्री-डायबेटीस मॅनेज करण्यासाठी कशी मदत करू शकतात याबद्दलचे पुरावे सादर केले आहे. अभ्यासात अनेक randomized controlled trials म्हणजे अनेक छोट्या अभ्यासांच्या परिणामांचे आकलन करण्यात आले. त्या सर्व अभ्यासांचा मिळून एक निष्कर्ष काढण्यात आला.

अभ्यास करणाऱ्या संशोधकांना असे आढळले की मेथीचे बी रक्तातील वाढलेली साखर कमी करून इन्सुलिन रेसिसटन्स सुद्धा सुधारते. आता हे कसे घडते किंवा यामागचे नेमके विज्ञान काय आहे हे जरी समजू शकले नसले तरी टाइप 2 डायबिटीज आणि प्रीडायबिटीज असलेल्या रुग्णांना मात्र याचा फायदा दिसून आला आहे.

यामुळे तुम्ही तुमच्या रोज च्या जीवनशैलीत मेथीचे दाणे समाविष्ट केलेले नक्कीच फायद्याचे ठरेल. हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. यासाठी मेथीच्या दाण्याचे पाऊडर, मेथीच्या बिया जेवणात टाकून किंवा भिजत घालून त्याचे पाणी पिणे असं करू शकता.

२. कडू कारले

कडू कारले किंवा फक्त कारले कुणाला माहीत नाही. सर्वांनाच माहीत आहेत. विशेषकरून मधुमेह आणि कारले यांचा संबंध ही बऱ्याच लोकांना माहीत आहे.

अनेक वर्षांपासून हे कारले औषधी म्हणून वापरतात विशेषकरून मधुमेह मध्ये. पण कडू चव असल्यामुळे क्वचितच तुम्ही कधी कधीच खात असाल. पण कदाचित त्याचे फायदे वाचल्यानंतर कारल्या चे सेवन करायला तुम्ही सेवन करताल.

कारल्या ची असणारी कडू चव आणि त्यात आढळणारे काही अद्वितीय गुणधर्म यामुळे संशोधकांना याबद्दल नेहमी कुतुहुल वाटले आहे. म्हणूनच यावर अनेक अभ्यास करण्यात आले आहे. विशेषकरून याचे मधुमेह नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने तर बरेच अभ्यास झाले आहेत.

कडू असणाऱ्या या कारल्यामाधे अनेक प्रभावी आणि गुणी असणारे घटक आढळले आहेत. याबद्दल क्वचितच तुम्हाला माहिती असणार आहे. यात आढळून येणारे प्रमुख घटक आहेत चरांटिन (Charantin), विसीन (Vicine), आणि पॉलीपेप्टाइड-पी (Polypeptide-P).

हे सर्व घटक या न त्या मार्गाने तुमच्या रक्तातील वाढलेले ग्लुकोज म्हणजेच साखर कमी करतात. यातला पॉलीपेप्टाइड-पी हा घटक तर इन्सुलिनसारखाच कार्य करतो. म्हणून याला इंसुलिन लाइक हायपोग्लाइसेमिक प्रोटीन म्हटले जाते. हा अगदी तुमच्या वाढलेल्या ग्लुकोज ला खाली आणण्याचे काम करतो. यामुळे एक तर रक्तातील ग्लुकोज पातळी कमी होते आणि दुसरे म्हणजे इंसुलिन ची तेवढी गरज पडत नाही.

कारल्याच्या या उपयोगविषयी अनेक संशोधन,अभ्यास झाले आहेत. त्यामुळे याचे अनेक पुरावे तुम्हाला सापडतील. एशियन पॅसिफिक जर्नल ऑफ ट्रॉपीकल डिसीज यात एक अभ्यास प्रकाशित झालेला आहे. यानुसार तर यात असलेले चरांटिन हा घटक सुद्धा इंसुलिन सारखेच काम करतो असे सांगितले आहे.

याबाबतीत मी अजून एक रिसर्च बघितला. जर्नल ऑफ इंटेग्रेटिव न्यूरोसायन्स मध्ये प्रकाशित झालेला आहे. यामधे निघालेल्या निष्कर्षानुसार कडू कारले हे मधुमेह मध्ये तर उपयोगी आहेच शिवाय अल्झायमर, डिमेंशिया आणि ग्लिओमा सारख्या कर्क रोगांवर सुद्धा उपयोगी आहे असे सांगितले आहे.

असे भरपूर अभ्यास झाले आहे. शेवटी सर्व अभ्यासानुसार, नियमितपणे कारल्याचं सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, आणि यामुळे मधुमेह मॅनेज करण्याच्या दृष्टीने हे एक प्रभावी नैसर्गिक उपाय ठरू शकतं असच सांगितलं आहे.

तर मग थोडं चवीकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमच्या आहारात कारल्याचा समावेश करून त्याचे हे नैसर्गिक फायदे कसे मिळवू शकतो, याचा विचार करा.

३. दालचीनी

दालचीनी

आता मी तुम्हाला दालचीनी बद्दल सांगणार आहे. चवदार जेवण बनवण्यासाठी वापरली जाणारी ही दालचीनी तुम्हाला वाढलेल्या शुगर पासून सुद्धा आराम मिळवून देऊ शकते. ही दालचिनी सुद्धा आयुर्वेदात हजारो वर्षांपासून वापरली जात आहे.

दालचीनी तुमचा इंसुलिन रेसिसटन्स वाढवते आणि फास्टिंग (उपाशीपोटी) ब्लड शुगर लेवल सुधारते. संशोधनातून सुद्धा यासाठी पुरावा आहे.

नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की जेवणात दालचीनी चा वापर केला तर तुमचा टाइप २ डायबेटिस मॅनेज होऊ शकतो.

डायबिटीज रिसर्च एंड क्लीनिकल प्रैक्टिस मध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात निष्कर्षानुसार दालचीनी मुळे रक्तातील साखर लक्षणीयरीत्या कमी होऊन, इंसुलिन रेसिसटन्स सुधारते आणि त्याचसोबत कोलेस्टेरॉल सुद्धा कमी होते.

अभ्यासात असे आढळले आहे की दालचिनी पूरक म्हणजेच दालचीनी असणाऱ्या आहारामुळे टाइप २ डायबेटिस आणि प्रीडायबिटीज असलेल्या व्यक्तींमध्ये उपाशी पोटी रक्तातील साखर (FBG), जेवणानंतरची रक्तातील साखर (PPG), आणि हेमोग्लोबिन A1c (HbA1c) पातळ्यांमध्ये लक्षणीय घट झाली.

यासोबतच लिपिड प्रोफाइलमध्येही सुधारणा झालेली आढळली. यामधे एकूण कोलेस्टेरॉल, कमी घनतेचे लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी झाले, तर उच्च घनतेचे लिपोप्रोटीन (HDL) कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याचे दिसले.

खरंच हे किती भारी. सहज उपलब्ध असणारी आणि दररोज आपण स्वयंपाक घरात बघतो अशी ही दालचीनी एवढ्या फायद्याची असेल असे तुम्हाला कधीच वाटलं नसेल. म्हणूनच मला वाटते यावर अजून संशोधन होणे अपेक्षित आहे.

आता तुमच्या स्वयंपाकघरातली ही साधी दालचिनी आता एक छोटं आरोग्याचं गुपित समजा!

तुम्हाला काय वाटतं? आजपासून आपल्या आहारात थोडी दालचिनी समाविष्ट करून पाहायला हरकत नाही ना? शेवटी, काही छोटे बदलच आपल्याला मोठ्या परिणामांकडे नेतात, बरोबर ना?

त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात दालचिनीचा समावेश करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला शुभेच्छा.

४. कोरफड

कोरफड म्हंटलं की तुमच्या मनात पहिला विचार येत असेल की त्वचा आणि कोरफड चा त्वचासंबंधी उपयोगा बद्दल. नक्कीच कोरफड चा त्वचे साठी चांगला उपयोग आहे आणि कोरफड मध्ये त्यासंबंधी इतर गुणधर्म सुद्धा बरेच आहेत.

पण आज तुम्हाला मी कोरफड चा अजून एक उपयोग सांगणार आहे ज्याबद्दल तुम्हाला कल्पना आलीच असेल. कोरफड चा तुमचा मधुमेह कमी करण्यासाठी चा उपयोग.

वैज्ञानिकांनी अभ्यासांद्वारे हे सिद्ध केले आहे की कोरफड तुमच्या साखरेचे म्हणजेच वाढलेल्या शुगर चे नियंत्रण करू शकते.

२०१६ मध्ये संशोधकांच्या एका टीम ने कोरफड आणि त्याचा मधुमेह मध्ये होणाऱ्या अशा अनेक छोट्या संशोधनांचा आढावा घेतला. अशा अनेक संशोधनांचा आढावा घेतल्यानंतर काही अभ्यासातून त्यांना याबद्दल चे पुरावे मिळाले. हे सर्व जर्नल ऑफ अल्टरनेटिव एंड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन यामधे प्रकाशित करण्यात आले आहे.

या अभ्यासातून असे स्पष्ट झाले की कोरफड ही मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आराम मिळवून देऊ शकते. या अभ्यासानुसार मधुमेह असणाऱ्या लोकांमध्ये मध्ये काही घटक विशेष करून रक्तातील साखरेचे प्रमाण, इन्सुलिन रेसिसटन्स, आणि हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

शुगर मध्ये उपाशी पोटी साखरेचे प्रमाण याचे खुप महत्व आहे. कोरफड तुमच्या फस्टिंग च्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. यासंबंधी २०१५ मध्ये एक संशोधन झाले होते. या अभ्यासात असं दिसून आलं की, दररोज एलोवेरा जेल घेतल्याने फक्त रक्तातील साखरच कमी होत नाही, तर शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते.

संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे ?
संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी कोणते आयुर्वेदिक औषध वापरावी ?

तुम्ही विचार करत असाल कोरफड चा एवढा फायदा कसा काय ? यामधे महत्वाचा वाटा आहे तो कोरफड मध्ये असणाऱ्या अँटी-इंफ्लेमेटरी (दाहक-विरोधी) आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म यांचा. ते कसं कामी करतात याची माहिती पुढे दिलेली आहे.

आणि पुन्हा वजन नियंत्रित ठेवणे हे काम सुद्धा कोरफड करू शकते. त्यामुळे परिणामी शुगर चे प्रमाण सुद्धा कमी राहते.

कोरफड मध्ये अनेक उपयोगी असे घटक असतात. या अभ्यासानुसार एकट्या कोरफड मध्ये जवळपास ७५ सक्रिय घटक असतात जे वेगवेगळ्या आजारात उपयोगी पडतात.

मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरात कायमस्वरूपी इंफ्लेमेशन (सूज) होण्याची शक्यता असते. ही सूज तुमच्या रक्तवाहिन्यांवर नकारात्मक परिणाम करते आणि त्यामुळे अनेकदा मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत होऊ शकतात.

पण मग इथेच कोरफड उपयोगी ठरते!

वर सांगितलं तसं यात असलेल्या दाहक-विरोधी (anti-inflammatory) घटकांमुळे शरीरातील ही सूज कमी होण्यास मदत होते.

दूसरा गुण जो आहे तो आहे अँटीऑक्सिडंट गुणधर्म. मधुमेहाशी संबंधित अनेक गुंतागुंतींमध्ये (complications) ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा एक महत्त्वाचा घटक आहे. हा स्ट्रेस शरीरात असलेल्या free radicals मुळे होतो, जे हानिकारक रसायनांसारखे काम करतात.

आता कोरफड मध्ये या free radicals ना निष्प्रभ करण्याची क्षमता असते. म्हणजेच, कोरफड शरीरातील या हानिकारक घटकांवर नियंत्रण मिळवून शरीराला होणारे नुकसान कमी करते.

कोरफड कशी वापरावी ?

तुम्ही विचार करत असाल, “पण ही कोरफड कशी वापरायची?”

तर यासाठी अगदी सोपा उपाय आहे! फ्रेश असा अलोवेरा ज्यूस रोज सकाळी उपाशीपोटी प्यायचा. हा ज्यूस तुम्ही घरी सहज बनवू शकता किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या quality चा ज्यूसचा वापर करू शकता. ज्यांना ज्यूस आवडत नाही, त्यांच्यासाठी अलोवेरा सप्लिमेंट्स सुद्धा उपलब्ध आहेत, म्हणजे कॅप्सूल्सच्या स्वरूपात घेण्याचा पर्याय आहे.

५. आवळा

आवळा

आवळा हे फळ भारतीय संस्कृतीतले आणि आयुर्वेद उपचार पद्धतीमधले एक महत्वाचे फळ आहे. आवळा ओळखलं जातं ते त्यामध्ये असणाऱ्या भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे.

वर संगीतल्याप्रमाणे अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीरात असणाऱ्या फ्री रॅडिकल ना बाहेर काढतात आणि त्याचा उपयोग शुगर मध्ये कसा होतो ही तुम्ही जाणून घेतले.

पण आवळ्याचं महत्त्व फक्त याच पुरतं नाही. एका अभ्यासानुसार आवळ्याचा उपयोग तुमच्या स्वादुपिंड च्या आजारात सुद्धा होतो. विषय असा आहे की इंसुलिन हे स्वादुपिंड मध्ये तयार होत असते. पण जर का या स्वादुपिंडा मध्येच काही बिघाड झाला तर इंसुलिन तयार होण्याची प्रक्रिया डिस्टर्ब होते.

पॅन्क्रीयाटिक आजारांमध्ये तुमच्या स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी होते, ज्यामुळे इन्सुलिन चे उत्पादन सुद्धा कमी होते. आवळ्यामध्ये असणारे घटक स्वादुपिंडच्या पेशींना संरक्षण देतात आणि त्याच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात. यामुळे इन्सुलिनचे उत्पादन सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत मिळते.

आता या बाबतीत अजून सविस्तर पुरावा बघायचा असेल तर तो इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्सेस अँड न्यूट्रिशन मध्ये सापडतो. यामध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.

संशोधनात Emblica officinalis म्हणजेच आवळा या फळाच्या एंटी-हायपरग्लायसेमिक (रक्तातील साखर कमी करणाऱ्या) आणि लिपिड-लोअरिंग (चरबी कमी करणाऱ्या) गुणधर्मांची चाचणी करण्यात आली. यामध्ये सामान्य आणि शुगर असलेल्या व्यक्तींवर या फळाच्या गुणधर्मांचे परिणाम तपासले गेले.

अभ्यासात असं आढळलं की, ज्यांनी १, २ किंवा ३ ग्रॅम आवळा पावडर घेतली, त्यांच्या उपाशी पोटी असणाऱ्या साखरेचे प्रमाण (fasting blood sugar) आणि खाण्यानंतरच्या २ तासांतील साखरेचं प्रमाण लक्षणीय घटलं. इतकंच नाही, तर एकूण कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स (शरीरातील चरबीचे प्रकार) मध्ये सुद्धा लक्षणीय घट आढळली.

संबंधित वाचा- कॉलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि त्यावर करण्याचे उपाय

विशेष म्हणजे वरचा परिणाम हा २ किंवा ३ ग्रॅम आवळा पावडर घेतलेल्या व्यक्तींमध्ये दिसून आला. म्हणजे एवढा ठराविक आणि विशिष्ठ हा परिणाम आहे.

असा हा आवळा फक्त फळ नसून शुगर मध्ये अत्यंत उपयोगी अस हे औषध आहे. रोज एक आवळा जरी तुम्ही खालला तर शुगर मध्ये तुम्हाला मोठा फरक दिसेल. तर मग आजपासूनच तुमच्या आहारात आवळा समाविष्ट करा.

हे घरगुती उपाय कसे वापरायचे ?

तुम्हाला आता शूगर साठी उपयोगी घरगुती उपाय माहिती झाले. पण हे कसे वापरायचे, याचा उपयोग कसा आणि किती करावा याची माहिती सुद्धा तुम्हाला असणे गरजेचे आहे. ही सर्व उपाय तुमच्या रूटीन मध्ये सहज समाविष्ट करता येईल हा विचार करणे सुद्धा आवश्यक आहे.

तर वर सांगितलेला प्रत्येक उपाय हा सहजपणे तुमच्या जेवणात किंवा आहारात समाविष्ट करता येणार आहे. ते कसं हे बघूया.

उदाहरणार्थ,

  • मेथीचे दाणे: सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे भिजवलेले दाणे खा किंवा मग पाण्यात उकळवून त्याचा काढा बनवा.
  • आवळा: ताज्या आवळ्यांचा रस किंवा आवळा पावडर घ्या. याला तुम्ही एखाद्या स्मूदी किंवा लिंबूपाणी यासारख्या पेयांमध्ये सुद्धा मिसळू शकता.
  • कारले : कारल्याचा रस काढून त्यात थोडा गोड रस किंवा आल्याचा रस मिसळून सकाळ च्या वेळेला पिऊ शकता.
  • दालचीनी : दालचिनी पावडर तुम्ही दूध, चहा किंवा स्मूदीमध्ये मिसळून घेऊ शकता, किंवा मग जेवणात मसाला म्हणून तर तुम्ही वापरतच असाल.
  • कोरफड : ताज्या कोरफडीचा रस पिणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यानंतर याच्या कॅप्सुल सुद्धा भेटतात.

अशा पद्धतीने हे उपाय तुम्ही तुमच्या दररोज च्या सवयींमध्ये अॅड करून उपयोग करू शकता.

किती वापर करावा ?

तुम्हाला घरगुती उपाय माहीत झाले , ते कसे घ्यावे याची सुद्धा माहिती कळाली. शेवटचा मुद्दा राहतो तो महत्वाचा आहे. हे सर्व उपाय किती प्रमाणात वापरावे. हा विषय थोडा गंभीर आहे.

ही सगळे घरगुती उपाय योग्य प्रमाणात वापरणं अत्यावश्यक आहे कारण जर जास्त प्रमाणात सेवन करण्यात आले तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठी तुम्ही खाली फक्त खाली दिलेले नियम लक्षात ठेवा.

  • मेथीचे दाणे दररोज २-३ ग्रॅम एवढ्या प्रमाणातच खाल्ले जावेत.
  • आवळ्याचा रस हा १०-२० मिली पर्यन्त दररोज घेणं पुरेसं आणि सुरक्षित आहे.
  • ५०-१०० मिली कारल्याचा रस दररोज.
  • १०-३० मिली (२-३ चमचे) ताज्या कोरफडीचा रस.
  • दररोज १-३ ग्रॅम (साधारणपणे १/२ चमचा) दालचिनी पावडर.

वर सांगितलेले उपायांचे प्रमाण हे साधारण सुरक्षित आहेत. तरी पण काही लोकांना ही याचे प्रमाण निश्चित करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहील.

हे सर्व उपाय तुम्हाला दररोज योग्य प्रमाणात वापरले तरच यांचे परिणाम तुम्हाला दिसणार आहे. हळू हळू याचे प्रमाण तुम्हाला दिसेल.

घरगुती उपाय पुरेसे आहेत का?

शुगर, मधुमेह किंवा डायबेटिस नियंत्रित, किंवा काही अंशी कमी करणारे घरगुती उपाय यांची माहिती घेतली. पण फक्त घरगुती उपाय करूनच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे का ?

तर नाही.

कारण मुळात मधुमेह हा आजारच अनेक गुंतागुंतीचा आहे. मधुमेह उत्पन्न होण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. म्हणूनच तो घालवायला किंवा नियंत्रित ठेवायला सुद्धा तुम्हाला एका पेक्षा जास्त मार्गाने त्यावर आघात करावा लागतो.

म्हणूनच वरचे घरगुती उपाय करत असताना तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष देणे महत्वाचं आहे. म्हणजे हे घरगुती उपाय करत असताना त्याच पद्धतीने त्यासोबत तसा आहार सुद्धा घ्यायला पाहिजे.

उदाहराहणार्थ, जर तुम्ही मेथीचे दाणे किंवा आवळा घ्यायचं ठरवलं, तर त्याचवेळी तुम्ही ताजी फळं, भाज्या, कडधान्यं यांसारखे पोषक घटक असलेला आहारच घेतला पाहिजे.

महत्वाचं आहे की हा संतुलित आहार असला पाहिजे. संतुलीत आहार ज्यामध्ये पुरेशी प्रथिने, फायबर, चांगल्या प्रकारचे फॅट्स आणि कमी साखर असणं महत्त्वाचं आहे.

कारण जर तुम्ही योग्य आहारावर लक्ष केंद्रित केलं नाही तर फक्त घरगुती उपायांना अपेक्षित परिणाम मिळवणं जरा कठीणच आहे. म्हणून तुमच्या आहारात भरपूर हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं आणि प्रथिनं असावी आणि याची खात्री करा, आणि सोबतच हे घरगुती उपाय चालू ठेवा.

ही घरगुती उपाय खरंच काम करतात का ?

ही सर्व वाचून झाल्यावर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ,” ही सर्व ठीक आहे पण खरंच हे घरगुती उपाय काम करत असतात का ?”

याचे उत्तर काहीसे सोपे आणि गुंतगुंतीचे सुद्धा आहे. पण मी इथे सोपे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

एक तर हे सर्व उपाय तोंडी सांगितलेले नाहीत. यावर अभ्यास झालेले आहेत, संशोधन झालेले आहे आणि त्यामध्ये यावर आधारित अनेक पुरावे सुद्धा सापडले आहेत.

दुसरं, तुम्ही या बाबतीत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की एकटे घरगुती उपाय कधीच कोणताही आजार कमी किंवा बरा करायला पुरेसे नसतात. यासोबत साथ लागते ती योग्य आहार, जीवनशैली आणि औषधोपचार यांची.

कारण काही आजारच असे असतात की तो घालवायला या सर्व घटकांची गरज असते, फक्त गरज नाही तर ‘सोबत’ गरज असते.

घरगुती उपायांचे एक महत्वाचे कार्य असते. ते म्हणजे ते तुमच्या शरीरात बिघडलेले किंवा डिस्टर्ब झालेल्या निसर्गिक क्रिया पुनः प्राकृत करायला मदत करतात.

उदाहरणार्थ, मेथीमधील असणारे soluble fiber हे कार्बोहायड्रेटचे (ग्लुकोज) शोषण (absorption) कमी करून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. आता जेवणातून कार्बोहायड्रेट्सचं शोषण मंदावलं की ग्लुकोज कमी तयार होते आणि परिणामी रक्तातील साखर वाढत नाही.

तसंच, आवळा आणि कोरफड यांमधील antioxidants च आहे. ही अँटिऑक्सिडंट्स तुमच्या स्वादुपिंडाच्या (pancreas) पेशींना oxidative damage पासून वाचवतात. यामुळे होते असे की स्वादुपिंडाची कार्यक्षमता सुधारते आणि इन्सुलिन अधिक तयार व्हायला मदत होते.

तुम्ही नेहमी वाचत आला असाल की डायबेटिस हा रक्तातील साखरेवर प्रभाव करणारा आजार आहे. हे खरं आहे. पण त्यामागे पचन, इन्फ्लमेशन (inflammation) आणि शारीरिक, मानसिक स्वास्थ्य यांचा मोठा हात असतो ही सुद्धा तेवढेच खरं आहे. हे घरगुती उपाय याच सर्व गोष्टींना ठीक करण्याचे काम करत असतात.

म्हणूनच, जेंव्हा आपण शुगर साठी नैसर्गिक किंवा घरगुती उपायांचा विचार करतो, तेव्हा फक्त रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करणं हाच एक फायदा नसतो, तर आपण आपल्या संपूर्ण आरोग्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकत असतो. आपल्या मानसिक स्वास्थ्यासोबतच शारीरिक स्वास्थ्याकडे देखील लक्ष देणं हीच या उपायांची खासियत असते.

थोडक्यात

तुमच्या वाढलेल्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय फक्त मधुमेह बरा करणारे नसून ते तुमच्या एकूणच जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.

शेवटी थोडक्यात उजळणी करायची झाल्यास, या उपायांनी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करणे, इन्सुलिन संवेदनशीलता (सेनसीटीविटी) वाढवणे आणि शरीरातील इन्फ्लमेशन (inflammation) कमी करणे ही कामे होतात. यासाठी मग तुम्ही मेथी, कोरफड, कारला आणि आवळ्याचे सेवन करू शकता.

पण मग घरगुती उपायांसोबतच योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक निरोगी पणा या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात हे सुद्धा विसरून चालणार नाही.

जर तुम्हाला मधुमेहावर अजून जास्त माहिती अधिक जाणून घ्यायचे असतील. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

संबंधित वाचा- शुगर ची नेमकी कारणे
संबंधित वाचा- मधुमेह म्हणजे के आणि तो कसा होतो ?

याशिवाय, मधुमेहावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारायला हव्यात, यावर तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास, मी आणखी काही लेख लवकरच पोस्ट करणार आहे. त्या ब्लॉग्स वर सुद्धा लक्ष असू द्या.

तोपर्यंत आता पुढे तुम्ही काही करणार आहात ? कोणत्या उपायाचा अवलंब करणार आहात? तुमची मतं कळवा आणि आणि याविषयी प्रश्न सुद्धा विचारू शकता. तुमचे अनुभव आणि शंका शेअर करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे!

ब्लॉग कसा वाटला, माहिती कशी वाटली कमेन्ट करून नक्की कळवा.

धन्यवाद !

शुगर लेव्हल किती पाहिजे?

उपाशीपोटी रक्तातील शुगर लेवल सामान्य पातळी 70-100 mg/dL असावी, आणि खाल्ल्यानंतर 140 mg/dL पेक्षा कमी असावी. डायबेटीस असलेल्या लोकांसाठी, उपाशीपोटी 90-130 mg/dL आणि खाण्यानंतर 180 mg/dL ही पातळी योग्य असते.

शुगर वाढू नये म्हणून काय खाऊ नये?

साखरयुक्त पदार्थ (गोड पदार्थ), पांढरे मैद्याचे पदार्थ, साखरयुक्त पेय आणि तळलेले खाद्यपदार्थ टाळा. यामुळे साखर नियंत्रणात राहते.

शुगर झाल्यावर काय काय त्रास होतो?

शुगर झाल्यावर वारंवार लघवी लागणे, थकवा, वजन कमी होणे, दृष्टी धूसर होणे आणि जखमा उशिरा बऱ्या होणे ही काही सामान्य लक्षण दिसून याचा त्रास होऊ शकतो.

जास्त साखर असण्याची लक्षणे कोणती?

सतत तहान लागणे, जास्त लघवी होणे, भूक वाढणे, थकवा आणि वजन कमी होणे ही लक्षणे असू शकतात.

शुगर साठी आयुर्वेदिक औषध काय?

मेथी, कारले, आणि दालचिनी यासारखी आयुर्वेदिक औषधे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात.

शुगर च्या लोकांनी काय खावे?

ओट्स, नाचणी, हिरव्या भाज्या, प्रथिनयुक्त पदार्थ आणि कमी साखर असलेली फळे खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते.

मी माझी साखर 250 पर्यंत कशी कमी करू शकतो?

नियमित व्यायाम, संतुलित आहार, आणि कमी कार्बोहायड्रेट्स व साखरयुक्त पदार्थांचा वापर करून तुम्ही साखर कमी करू शकता.

माझ्या रक्तातील साखर 200 पेक्षा जास्त असल्यास मी रुग्णालयात जावे का?

होय, 200 mg/dL पेक्षा जास्त साखर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, कारण यामुळे इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो आणि गुंतगुंती चे प्रकरण होऊ शकते.

दुधामुळे शुगर वाढते का?

नाही, पण पूर्ण फॅट दूध किंवा साखरयुक्त फ्लेवर्ड दूध घेतल्यास साखर वाढू शकते. कमी फॅट किंवा फॅट-फ्री दूध पिणे योग्य राहील.

Leave a Comment