Last updated on November 7th, 2023 at 11:53 am
स्वागत तोडकर,स्वागत तोडकर आयुर्वेदिक उपचार,मूळव्याध वर घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर,कफ खोकला घरगुती उपाय स्वागत तोडकर,स्वागत तोडकर सर्दी वर उपाय,उष्णता कमी करण्याचे उपाय स्वागत तोडकर,पित्तावर घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर,डॉक्टर स्वागत तोडकर,खोकल्यावर उपाय स्वागत तोडकर,स्वागत तोडकर घरगुती उपाय,स्वागत तोडकर आयुर्वेदिक उपचार माहिती,डॉ स्वागत तोडकर घरगुती उपचार माहिती,तोडकर यांची माहिती,स्वागत तोडकर उपाय.
(swagat todkar,dr swagat todkar,doctor swagat todkar,swagat todkar kolhapur,mulvyadh upay swagat todkar,swagat todkar mulvyadh upay,swagat todkar gharguti upay,swagat todkar upay,doctor todkar,who is dr swagat todkar)
महाराष्ट्रात स्वागत तोडकर (Swagat Todkar) एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. ते अनेक जीर्ण आणि असाध्य आजारांवर उपचार आणि घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी ओळखले जातात.
मी जालना येथील तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. तेथील येणारे अनुभव जसे की रुग्णांचे आजार, त्यावर प्रभावी ठरणारे डॉ. तोडकर यांचे औषधे आणि काही घरगुती उपाय यावरून मला भरपूर काही शिकण्यासाठी मिळाले.

हाच अनुभव आणि माहिती लोकांपर्यंत पोहचावी या दृष्टीने मी हा ब्लॉग बनवला आहे. डॉ. तोडकर सरांचे घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचा फक्त एक प्रामाणिक प्रयत्न या यामधून मी करत आहे.
चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही मूलभूत माहिती आणि त्याचे काही प्रभावी घरगुती उपाय.
जवळपास सर्व आरोग्य समस्यांवर प्रभावी असे तोडकर सरांचे सुजीवनीय लीक्विड घ्या
स्वागत तोडकर यांची माहिती
- स्वागत तोडकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
- ते तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आहे.
- २०१२ साली त्यांनी कोल्हापूर येथे पहिले निसर्गोपचार केंद्र सुरू केले.
- त्यानंतर त्यांनी गगनबावडा, पुणे, नवी मुंबई, जालना येथे त्यांनी निसर्गोपचार केंद्रे सुरू केली.
- ते संपूर्ण महाराष्ट्रात घरगुती उपचार आणि उपचारांबद्दल मोफत व्याख्यान आणि चर्चासत्रे घेत असतात.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना 2022 मध्ये अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
तोडकर सर (Swagat Todkar) हे त्यांच्या घरगुती उपचारांसाठी ओळखले जातात आणि त्यांचा दावा आहे की हे उपाय निसर्गोपचारावर आधारित आहेत, याचा अर्थ ते त्यांच्या उपचारांमध्ये निसर्गोपचाराच्या तत्त्वांचा वापर करतात.
आता निसर्गोपचार बद्दल काही मूलभूत माहिती पाहू या जसे की याचा अर्थ काय आहे, ती खरोखर प्रभावी आहे का, ती आधुनिक उपचारांपेक्षा कशी वेगळी आहे.
निसर्गोपचार म्हणजे काय ?
निसर्गोपचार हा संमिश्र दृष्टीकोन आहे. हे हर्बल औषध, पोषण, जीवनशैली समुपदेशन, होमिओपॅथी, शारीरिक उपचार आणि यासह विविध नैसर्गिक उपचार घटक एकत्र करते.
शरीरात स्व-उपचार (Self-Healing Process) प्रक्रिया विकसित करणे आणि शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य राखणे हे निसर्गोपचार चे मुख्य तत्व आहे.
तोडकर संजीवनी यांचे निसर्गोपचार प्रभावी आहे का ?
तोडकर सर यांच्या तोडकर संजीवनी निसर्गोपचाराची परिणामकारकता त्याच्या सर्वांगीण आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनामध्ये आहे. येथील निसर्गोपचार चिकित्सक प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य प्रोफाइल समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि आजारपणाची मूळ कारणे दूर करण्यावर लक्ष केंद्रित करतात.
शरीरातील नैसर्गिक उपचार प्रक्रिया (self-healing) विकसित करून, निसर्गोपचाराचा उद्देश संतुलन (Balance) आणि आरोग्य राखणे आहे.
निसर्गोपचारावरील पुराव्यावर आधारित संशोधन अजूनही विकसित होत आहे .तसेच, लोक निसर्गोपचाराने बरे होण्याचे त्यांचे अनुभव देखील शेअर करतात.
निसर्गोपचार आणि आधुनिक उपचारांमध्ये काय फरक आहे ?
1. दृष्टीकोन
निसर्गोपचार आरोग्यामधील शारीरिक, मानसिक आणि भावनिक घटकांमधील परस्पर क्रिया लक्षात घेऊन सर्वांगीण दृष्टीकोन घेते.स्वागत तोडकर (swagat todkar) यांचे सर्व घरगुती उपचार हे निसर्ग नियम आणि सिद्धांत यांचा उपयोग करून आरोग्यासाठी याचा फायदा करून घेणे या अनुषंगाने आहेत.
आधुनिक उपचार अनेकदा विशिष्ट लक्षणांवर किंवा रोगांवर लक्ष केंद्रित करते, कधीकधी मूळ कारणांकडे दुर्लक्ष करते.
2. उपचार पद्धती
निसर्गोपचार हे नैसर्गिक उपचारांवर भर देते, जसे की हर्बल औषध, पौष्टिक आहार आणि जीवनशैलीतील बदल.
आधुनिक उपचारांमध्ये प्रामुख्याने फार्मास्युटिकल्स (Chemicals) आणि सर्जिकल घटकांचा वापर केला जातो.
3. प्रतिबंध (precaution)
निसर्गोपचार मध्ये जीवनशैलीत बदल, तणाव व्यवस्थापन (Stress Management) तसेच वैयक्तिक पोषण आणि रोगप्रतिकारक शक्ती या घटकांवर लक्ष केंद्रित करून आजार प्रतिबंध (Precaution) करण्यावर भर दिला जातो.
तसेच आधुनिक उपचार पद्धतीमध्ये अनेकदा रोग उद्भवल्यावर उपचार केला जातो, तो ही रासायनिक किंवा chemicals ने भरपूर असेलेले औषधी वापरून.
4. सहयोग
निसर्गोपचार करताना चिकित्सक हे एकंदर उपलब्ध असलेल्या उपचार पद्धती आणि ते करत असलेले वैद्यकीय व्यावसायिक यांची सांगड घालून आणि सहयोग घेऊन चिकित्सा करत असतात.
यामुळे रुग्णाला एकंदर विविध उपचार पद्धती दृष्टिकोनाचा उपयोग होतो.
यामध्ये आपण नेमके निसर्गोपचार म्हणजे काय आणि त्या संबंधी काही महत्वाच्या प्रश्नांचा उलगडा केला.
यानंतर आपण बघूया या लेखाचा महत्वपूर्ण भाग.
स्वागत तोडकर यांचे काही प्रभावी घरगुती उपाय
1. पित्त आणि उष्णता कमी करण्याचे उपाय

घटक
- बेलपान
प्रक्रिया
- बेलपानाची देठे काढून घ्या
- त्यानंतर ती पाण्याने धुवून घ्या.
- त्यानंतर पानांवर मीठ टाकून पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
- स्वच्छ धुतलेली पाने वाटून किंवा मिक्सर ने काढून त्याचा रस काढा.
हा रस पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ प्यायचा आहे.
2. डोकेदुखी वर उपाय -स्वागत तोडकर

घटक
- तुळशीची पाने
- मीठ
- पाणी.
प्रक्रिया
- तुळशीच्या पानांची देठ काढून साध्या पाण्याने धुवा.
- 10 मिनिटे झाल्यावर तीच पाने पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने धुवा.
- नंतर ती पाने हातात घेऊन बारीक करा.
- बारीक केलेली तुळशीची पाने वस्त्रवर ठेवून त्याचा रस काढा.
हा रस सकाळ संध्याकाळ 10 ते 15 दिवस घ्यायचा आहे.
3. मूळव्याध वर घरगुती उपाय -डॉक्टर स्वागत तोडकर

घटक
- अर्धे लिंबू
- सेनधव मीठ
प्रक्रिया
- अर्धे लिंबू घेऊन त्यावर चिमूटभर सेनधव मीठ टाका.
- ते मीठ टाकलेले लिंबू तुम्हाला रस संपेपर्यंत चाटायचे आहे.
हे तुम्हाला सकाळी आणि रात्री जेवणानंतर करायचे आहे.
तोडकर यांचा हा घरगुती उपाय अनेकांना फायदेशीर ठरलेला आहे.
4. स्वागत तोडकर यांचा सर्दी वर उपाय

घटक
- सुंठ – दोन तुकडे.
- गूळ – चमचाभर.
प्रक्रिया
- आधी गूळ बारीक करून बाजूला ठेवून द्या.
- नंतर सुंठ घेऊन त्यावर थोडेसे पाणी टाकून त्याची पातळ पेस्ट तयार करा.
- पेस्ट केलेल्या सुंठीवर बारीक केलेला गूळ घेऊन दोन्ही थोडं पाणी टाकून mix करा.
- त्यानंतर हे मिश्रण गॅस वर गरम करून घ्या.
- गरम केलेले हे मिश्रण बाहेर काढून ते वस्त्रगाळ करून त्याचा रस बाहेर काढा.
या रसाचे दोन -दोन थेंब दोन्ही नाकपुड्यात दोन वेळ टाकायचे आहे.
5. खोकला, कफ घरगुती उपाय -स्वागत तोडकर

घटक
- दूध – एक कप.
- दालचिनी पावडर – एक चमचा.
- हळद – एक छोटी वाटी.
- विलायची – एक.
प्रक्रिया
- एक वाटी दूध गॅसवर ठेवून द्या.
- नंतर त्या दुधावर दालचिनी पावडर आणि एक चमचा हळद टाकून उकळून घ्या.
- उकळलेले दूध बाहेर काढून वस्त्रगाळ करा.
वस्त्रगाळ केलेले दूध कोमट झाल्यावर तुम्हाला ते सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपताने घ्यायचे आहे.
दोन्ही वेळेला हे दूध घेतल्यावर एक एक दालचिनी खायची आहे.
6. चेहरा गोरा होण्यासाठी घरगुती उपाय

घटक
- टोमॅटो
- हळद
- लिंबू
- साखर
प्रक्रिया
- अगोदर टोमॅटो चे दोन भाग करा.
- एक भाग घेऊन ते घेऊन हळुवारपणे तोंडावर मसाज करा.
- नंतर मसाज केलेला भाग कोमट पाण्याने धुवून घ्या.
- त्यानंतर उरलेला टोमॅटोचा भाग घेऊन त्यावर साखर आणि लिंबू रस टाका आणि धुतलेला चेहऱ्याचा भाग स्क्रब करा.
वरील पद्धत ही एक महिना चालू ठेवावी.
स्वागत तोडकर (swagat todkar) यांचे हे काही प्रभावी आणि माहित असलेले घरगुती उपाय आहेत.
वरील सर्व घरगुती उपाय हे निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांनी सांगितलेली असून ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
याशिवाय इतर अनेक घरगुती उपाय स्वागत तोडकर हे घेऊन येतात. त्याची माहिती मी वेळोवेळी माझ्या ब्लॉग वर टाकत राहील.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Working as Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747
I want to consult Dr. Todkar for my wife’s Arrhythmia problem
तुम्ही या संदर्भात नक्की डॉ तोडकर यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या त्यांच्या जवळच्या निसर्ग उपचार केंद्रात संपर्क करा. त्यावरील पुढील मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल.