HEALTHBUSS

‘हे’ 7 गजकर्ण घरगुती उपाय ठरतील प्रभावी (gajkaran gharguti upay)

Last updated on November 7th, 2023 at 01:14 pm

गजकर्ण घरगुती उपाय,गजकर्ण कशामुळे होते,गजकर्ण साबण,खरूज वर घरगुती उपाय,गजकर्ण,क्रीम,गजकर्ण बेस्ट क्रीम,गजकर्ण खाज यावर उपाय,खरूज वर घरगुती उपाय,नायटा कशामुळे होतो,गजकर्ण उपाय,गजकर्ण औषध मलम,गजकर्ण आयुर्वेदिक औषध,गजकर्ण औषध,गजकर्ण म्हणजे काय,गजकर्ण ची माहिती,गजकर्ण होण्याची कारणे.(gajkarn upay,gajkarn,gajkarn upay marathi,gajkarn gharguti upay,gajkarn cream,gajkarn upay in marathi,gajkarn in marathi,gajkaran,gajkaran cream,gajkaran bbest cream,gajkaran treatment,gajkaran medicine,gajkaran upay,gajakaran upay in marathi,gajkaran gharguti upay)

गजकर्ण, नायटा किंवा खरूज हा अत्यंत संसर्गजन्य आणि बुरशीजन्य असा आजार आहे. या ब्लॉग मध्ये आपण गजकर्ण घरगुती उपाय (Home remedies for ringworm) (gajkaran var gharguti upaay) काय आहेत आणि ते कसे करता येतील याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

संबंधित वाचा- स्वागत तोडकर आणि त्यांचे घरगुती उपाय.

त्या आधी, जसे की मी प्रत्येक ब्लॉग मध्ये सांगत असतो की आपण एक रुग्ण म्हणून डॉक्टरांच्या एवढी नाही पण कोणत्या ही आजाराची एक सामान्य माहिती जाणून घेतली पाहिजे. तोच विचार लक्षात घेत आपण गजकर्ण, खाज यांची थोडक्यात माहिती घेऊ या.

सामान्यता आपल्या मराठी बोली भाषेत या समस्यासाठी गजकर्ण, खरूज किंवा नायटा म्हटले जाते. त्यामुळे यानंतर मी यापैकी कोणताही शब्द बापरला तर confuse होऊ नका. या सर्वांचा अर्थ गजकर्ण आजार हाच आहे.

चला तर मग ब्लॉग चालू करूया.

गजकर्ण म्हणजे काय ?

गजकर्ण हा एक त्वचविकार असून तो बुरशीजन्य आहे. हा आजार अत्यंत संसर्गजन्य असतो. गजकर्ण किंवा खरूज हा कोणत्या ही भागेतील त्वचेवर मुख्यतह कंबरेच्या, जंगेच्या आणि हात पायांच्या बोटांच्या मध्ये होऊ शकतो.

त्वचेचा भाग सोडला तर गजकर्ण हे नखे आणि टाळू च्या भागी पण होऊ शकतो. जसा covid -19 हा आजार corona virus मुळे होतो तसा गजकर्ण हा आजार बुरशीमुळे होतो. याला आपण फंगस म्हणतो. ज्यामुळे गजकर्ण (ringworm) आजार होतो त्यासाठी ट्रायकोफिटन (Trichophyton), मायक्रोस्पोरम (Microsporu) आणि एपिडर्मोफिटन (Epidermophyton) ही बुरशीचे प्रकार कारणीभूत असतात.

गजकर्ण लक्षणे

जर तुम्हाला शरीराच्या कोणत्या ही भागाच्या त्वचेवर लाल खवले किंवा खाज सुटणे, पुरळ सूज आणि जळजळ द्रवाने भरलेल्या फोडासारख्या जखमा असतील तर ती गजकर्णाची लक्षणे असू शकतात.

त्याच बरोबर केस गळणे, केसांचा कोंडा होणे किंवा नखे ठिसूळ होणे, यांसारखे लक्षणे ही त्या जागेवर गजकर्ण झाल्याची लक्षणे असू शकतात.

त्यामुळे नेहमी तुमच्या त्वचेवर आणि शरीर यावर होणाऱ्या बदलांवर लक्ष्य असू द्या.

गजकर्ण कसे ओळखावे ?

बरीच लोक गजकर्ण कसे असते याबद्दल कन्फ्युज होतात. कारण आपल्या शरीरावर अनेक पुरळ, फोड किंवा त्वचेवर विकार येत जात राहतात. त्यामुळे लोक ते गजकर्ण असू शकते याचा विचारच करत नाही. काही लोक ते ओळखू न शकल्यामुळे त्यावर उपचारच घेत नाही.

त्यामुळे गजकर्ण किंवा खरूज कसे असते आणि ते कसे ओळखावे याबद्दल थोडे जाणून घेऊ या.

पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला पुरळ किंवा चट्टे आलेले दिसतील. ही पुरळ किंवा चट्टे वर्तुळाकार असतात (ring shape) आणि त्याच्या कडा लाल झालेल्या असतात. तसेच त्या जागेवर खाज सुटते, सूज आणि जळजळ होते .

अशा प्रकारचे वर्णन बघून तुम्हाला कळेल की तुमच्या शरीरावर असलेला चट्टा हा गजकर्णाचा आहे.

गजकर्ण कशामुळे होते ? (गजकर्ण होण्याची कारणे)

याचे सोप्पे उत्तर आहे की बुरशी. गजकर्ण हा बुरशीजन्य आजार असल्यामुळे बुरशीमुळे होतो. याचे काही प्रकार आपण बघितले आहेत. पण ही बुरशी आपल्या शरीरात येते कुठून आणि कशी येते ते ही महत्वाचे आहे. याच बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.

शरीरात बुरशी चे इन्फेक्शन होण्याचे पुढील काही करणे आहेत.

  • संक्रमित व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूशी थेट संपर्क येणे.
  • खराब राहणीमान आणि योग्य स्वच्छता नसणे.
  • जास्त घाम येणे.
  • घट्ट किंवा श्वास न घेता येणारे कपडे घालणे.
  • कंगवा, ब्रश किंवा टॉवेल यासारख्या वैयक्तिक वस्तू इतर अनोळखी लोकांसोबत शेअर करणे.

वरील सर्व गोष्टींमुळे बुरशी आपल्या शरीरामध्ये संक्रमित होते ज्यामुळे आपल्याला गजकर्ण होऊ शकते.

चला तर बघूया आता ब्लॉग चा महत्वाचा भाग.

गजकर्ण घरगुती उपाय आणि उपचार

1. चहाच्या झाडाचे तेल

गजकर्ण साठी चहाच्या झाडाचे तेल घरगुती उपाय

चहाच्या झाडाच्या तेलामध्ये नैसर्गिक Antifungal म्हणजेच बुरशी विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे याचा उपयोग बुरशीजन्य त्वचा विकारांवर होतो. त्यामुळे याचा उपयोग तुम्ही गजकर्ण कमी करण्यासाठी करू शकता. यासाठी पुढील प्रक्रिया करा.

  • वाटीभर चहाच्या झाडाचे तेल घ्या.
  • त्या तेलामध्ये थोडे चमचाभर नारळाचे पानी टाकून मिक्स करा.
  • मिक्स करून तयार झालेले ही द्रव कापसाच्या बोळयाने गजकर्ण झालेल्या ठिकाणी लावा.

असे तुम्हाला दिवसातून दोन वेळ गजकर्ण जाई पर्यन्त करायचे आहे.

बेस्ट टी ट्री ऑइल

2. लसूण

गजकर्ण साठी लसनाचा उपयोग

लसणामध्ये Allicin नावाचे एक घटक द्रव्य असते. या घटक द्रव्यामुळे लसूण हे Antifungal म्हणून काम करते. गजकर्ण घरगुती उपाय मध्ये हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.

  • तुम्हाला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत.
  • निवडलेल्या लसणाच्या पाकळ्या स्वछ पाण्याने धुवून घ्या.
  • त्यानंतर त्या कुस्करून त्याचा रस काढून गजकर्ण असलेल्या ठिकाणी लावा.
  • ३० मिनीटे झाल्यानंतर ती जागा स्वछ कोमट पाण्याने धुवून घ्या.

ही पद्धत तुम्हाला दिवसातून २ वेळ, गजकर्ण नष्ट होईपर्यंत वापरायची आहे. गजकर्ण खाज यावर घरगुती उपाय मध्ये हा एक उत्तम असा पर्याय आहे.

3. कोरफड

कोरफड कहा उपयोग गजकर्ण साठी

कोरफड मध्ये शीत आणि Antibacterial गुण असतात. या कोरफड च्या गुणांमुळे गजकर्ण चे संक्रमण आणि दाह थांबते.

  • चार ते पाच कोरफडीचे तुकडे घेऊन त्याला स्वछ पाण्यात धुवून स्वछ करा.
  • त्या कोरफडीचा एक वाटीत गर काढून घ्या.
  • काढलेला गर गजकर्ण झालेल्या जागेवर लावून अर्धा तास तसच ठेवा.
  • अर्धा तास झाल्यानंतर तो गर काढून ती जागा कोमट पाण्याने स्वछ धुवून घ्या.

असे दुपारी आणि रात्री झोपताने करायचे आहे.

4. हळद

गजकर्ण साठी हळदी चा उपयोग

हळद आपण कित्येक वर्षांपासून औषधी म्हणून वापरत आलेलो आहे. आज च्या दिवसांमध्ये हळदीचा वापर कमी जरी होत चालला असेल तरी त्याचे महत्व तेवढेच आहेत. हीच हळद तुम्हाला गजकरणापासून देखील आराम देते. हळदी मध्ये Antibacterial, Antifungal आणि Anti-inflammatory गुणधर्म असल्यामुळे हळद गजकर्णमध्ये सुद्धा वापरली जाते.

  • एक वाटी घेऊन त्यात हळद आणि पाणी टाका.
  • हे हळद आणि पानी मिक्स करून त्याचे पेस्ट तयार करा आणि गजकर्ण झालेल्या ठिकाणी लावा.
  • तीस मिनीटे झाल्यानंतर ती जागा कोमट पाण्याने धुवून काढा.

हा उपाय दहा ते पंधरा दिवस करा.

5. खारे पाणी आणि लिंबाचे पान

खारे पाणी आणि लिंबाचे पान गजकर्ण साठी

खाऱ्या पाण्यामध्ये रुक्ष गुणधर्म असल्यामुळे ते गजकर्णाच्या ठिकाणी असलेला द्रवपणा कमी करते आणि लिंबाचे पान हे antifungal म्हणून काम करते.

  • पातेल्यात एक ग्लास पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ आणि दहा ते बारा लिंबाची पाने टाका.
  • ते पाणी उकळल्यावर बाहेर काढून कोमट करून घ्या.
  • पाणी कोमट झाल्यावर त्या पाण्याने गजकर्ण झालेली जागा धुवून काढा.

6. गजकर्ण बेस्ट क्रीम (गजकर्ण औषध मलम)

यामध्ये आपण बघूयात गजकर्ण साठी वापरली जाऊ शकणारी उत्तम, प्रभावी आणि कोणता ही साइड इफेक्ट नसणारी क्रीम.

यामध्ये काही वेगळे घटक आपण वापरणार नाही आहोत. वरील सांगितलेली घटक या क्रीम साठी वापरली जातात.

घटक :

  • नारळाचे तेल – एक चमचा.
  • चहाच्या झाडाचे तेल – एक चमचा.
  • कडू लिंबाचे तेल – एक चमचा.
  • सुगंधी तेल 5 थेंब ( गरज असल्यास ).

प्रक्रिया :

  • आधी छोटे पातेले घेऊन ते स्वच्छ धुवून कोरडे करा.
  • कोरडे झालेले पातेले गॅस वर ठेवून त्यावर वरील सांगितलेली घटक पदार्थ टाका.
  • सर्व घटक पदार्थ व्यवस्थित मिक्स करून गॅस वर त्याचे पेस्ट तयार करा.
  • पेस्ट चांगली गरम झाल्यावर पातेल्यावरून खाली उतरवून चांगल्या स्वछ निर्जंतुक केलेल्या डब्बी मध्ये ठेवून द्या.

या डब्बी मधील क्रीम चा वापर आपण गजकर्ण साठी करायचा आहे.

क्रीम कशी वापरावी ?

गजकर्ण साठी क्रीम किंवा मलम लावण्यासाठी अगोदर ज्या जागेवर ते लावायचे आहेत ती जागा कोमट पाण्याने स्वछ धुवून घ्या.

नंतर थोड्या प्रमाणात क्रीम घेऊन त्या जागेवर लावा आणि हळुवार मसाज करून तसंच राहू द्या.

सकाळी पुन्हा ती क्रीम काढून स्वछ पाण्याने जागा धुवून काढा .

असे तुम्हाला रोज रात्री करायचे आहे.

7. गजकर्ण साठी साबण

गजकर्ण असलेल्या व्यक्तीने अंघोळीसाठी साधा साबण वापरू नये. तसेच इतरांनी वापरत असलेल्या साबणाचा उपयोग देखील करू नये.

यासाठी medicated साबणीचा उपयोग करावा. खाली सांगितलेली पद्धत वापरुन तुम्ही medicated साबण तयार करू शकता.

घटक :

  • साधारण असुगंधीत साबण.
  • चहाच्या झाडाचे तेल- 10 ते 12 थेंब.
  • सुगंधित तेल- 3 थेंब (आवश्यक असल्यास).

प्रक्रिया :

  • मोठ्या भांड्यामद्धे पाणी गरम करून त्यावर झाकण ठेवा.
  • ते झाकण तापले की असुगंधीत साबण खवणी वापरुन बारीक करून त्या झाकणावर ठेवा.
  • त्यावर बारीक केलेली साबण चांगली वितळू द्या.
  • व्यवस्थित वितळल्यावर खाली उतरवून त्यावर चहाच्या झाडाच्या तेलाचे 10 ते 12 थेंब टाका.
  • त्यानानंतर ते मिक्स करून थंड जागेवर ठेवून द्या.

ही तयार केलेली साबण फक्त तुम्ही वापरायची आहे. इतरांनी वापरल्यास त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

गजकर्ण हा नक्कीच साध्य असा आजार आहे आणि हा लवकर बरा होणारा देखील आहे. फक्त यासाठी काही घरगुती उपाय आणि जीवनशैलेत बदल करणे महत्वाचे आहे.

जर माझा ब्लॉग आणि तुम्हाला मिळालेली माहिती आवडली असेल तर ही इतरांना शेअर करून त्यांना मदत करू शकता.

याशिवाय आरोग्य संबंधित इतर topics ची माहिती मी द्यावी असे वाटत असेल तर मला मेल करून नक्कीच कळवा .

धन्यवाद.

FAQ’s

गजकर्ण झाल्यास काय खावे?

गजकर्ण झाल्यास शरीराची स्वछता ठेवावी,चांगले धुतलेले कपडे घालावे आणि डॉक्टरांना दाखवून योग तो सल्ला,मारदर्शन आणि उपचार घ्यावे.

दादाला खाज येते का?

हो,दादाला खाज येते.


त्वचेवर दादाचा उपचार कसा करावा?

त्वचेवर दादाचा उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे सल्ल्यानुसार antifungal औषधे घ्यावे ,वैयक्तिक स्वछता यांचे पालन करावे.

दाद कशाने मारतात?

Antifungal औषधे दंड मारतात.


प्रायव्हेट पार्ट्समध्ये दादाचा उपचार कसा करावा?

प्रायव्हेट पार्ट्समध्ये दादाचा उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी antifungal क्रीम किंवा लोशन वापरावे


Leave a Comment