HEALTHBUSS

उच्च रक्तदाब कमी करण्याचे उपाय जाणून घ्या | Blood pressure kami karnyache upay

Last updated on November 18th, 2023 at 05:23 pm

(उच्च रक्तदाब कमी करण्याचे उपाय, नोरमल बीपी किती पाहिजे, उच्च रक्तदाब आहार, ५ घरगुती उपायांनी करा ब्लड प्रेशर नॉर्मल, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी करा ५ उपाय, सामान्य रक्तदाब काय आहे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम, रक्तदाबावर आराम मिळवा, औषधाविना रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे उपाय, बीपी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, नॉर्मल बीपी, ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी उपाय, ब्लड प्रेशर कमी करण्याचे घरगुती उपाय, bp kami karnyache upay, bp kami karnyache gharguti upay, bp kami karnyache upay, bp kami karnyasathi kay karave, blood pressure kami karnyache upay)

आज जगातील लोक मृत्यू पडण्यासाठी सर्वात मोठे कारण आहे ते ह्रदयविकार किंवा ह्रदयरोग. यामध्ये ५ पैकी ४ व्यक्ति हे ह्रदयविकार म्हणजेच हार्ट अटॅक मुळे मृत्यू पावतात.

ह्रदयविकार म्हणजेच हार्ट अटॅक साठी सर्वात जास्त मोठे कारण ठरते ते उच्च रक्तदाब चे. हायपरटेंशन म्हणजेच उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असतो. ५४ टक्के उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याच्या घटना घडतात.

जर जगाचा विचार केला तर १.५ बिलियन लोकांना उच्च रक्तदाब समस्येचा त्रास आहे. म्हणजेच जगात ५ पैकी १ व्यक्ति मध्ये हायपरटेंशन असल्याचे आढळते.

यानंतर सुद्धा ज्या पद्धतीची जीवनशैली, खाण्या पिण्याच्या सवयी चालू आहे, हा आकडा वाढतच जाणार आहे.

जर्नल ऑफ हायपरटेंशन मध्ये प्रकाशित या अहवालानुसार नुसार भारतामध्ये ह्रदयविकार मुळे झालेले ५७ टक्के मृत्यू हे उच्च रक्तदाब संबंधित आहेत किंवा उच्च रक्तदाब असल्यामुळे झालेले आहेत.

हाच विषय घेऊन हा ब्लॉग बनवला आहे.

या ब्लॉग मध्ये आपण उच्च रक्तदाब उपाय आणि त्या संबंधित इतर महत्वाची माहिती बघणार आहोत.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि त्याची पातळी सामान्य वर आणण्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि शास्त्रोक्त असे हे उपाय असणार आहेत.

चला तर मग.

हे आहेत उच्च रक्तदाब कमी करण्याचे उपाय

उच्च रक्तदाब कमी करण्याचे उपाय जाणून घेण्यागोदार त्या संबंधित इतर मूलभूत माहिती जाणून घेणे महत्वाचे ठरते.

रक्तदाब किती असावा ?

रक्तदाबाची नॉर्मल वॅल्यू ही १२०/८० असते. म्हणजे नॉर्मल बीपी हा १२०/८० असतो. पण जर खोल जाऊन विचार केला तर ही वॅल्यू खूप ढोबळ मनाने झाली. म्हणजे चूक आहे असे नाही . ही वॅल्यू बरोबर आहे. पण यापुढेही जाऊन विचार केला पाहिजे.

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी ने काही निकष आणि त्या निकष नुसार रक्तदाबाचे वर्गीकरण केलेले आहे.

 • नॉर्मल बीपी- १२०/८०
 • वाढलेला बीपी (elevated blood pressure)- १२९/८४
 • स्टेज १ हायपरटेंशन- १४०-९०
 • स्टेज २ हायपरटेंशन- १४०/९० पेक्षा जास्त
रक्तदाबाचे वर्गीकरण

आता वरील प्रत्येक स्टेज मध्ये वेगवेगळे उपचार आणि मार्गदर्शन करावे लागते. उच्च रक्तदाबाचा उपचार घेत असताना या स्टेज चा विचार करूनच उपचार ठरवता येतात.

१. वजन कमी करा

रक्तदाब कमी करण्याचे उपाय-वजन कमी करा

रक्तदाब कमी करण्याचा हा उपाय लठ्ठ किंवा जास्त वजन असणाऱ्या व्यक्तींसाठी एक रामबाण म्हणून ठरू शकतो.

रक्तदाब कमी करण्याचे उपाय बघत असताना शरीराच्या वजना बद्दल बोलणे हे क्रमप्राप्त ठरते.

तुमचे जर वजन जास्त असेल म्हणजेच जर तुम्ही लठ्ठ असाल आणि तुम्हाला उच्च रक्तदाब ची समस्या असेल तर सर्वात पहिले तुम्ही वजन कमी करायला हवे. लठ्ठपणा आणि हायपरटेंशन चा प्रत्यक्ष संबंध आहे असे अनेक अभ्यासात सिद्ध झाले आहे.

अमेरिकन हार्ट असोसिएशन मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार ७८ टक्के पुरुष आणि ६५ टक्के महिलांमध्ये उच्च रक्तदाब हा लठ्ठपणा शी संबंधित आहे असे आढळते.

यामुळे हायपरटेंशन कमी करण्यासाठी लठ्ठ व्यक्तींमध्ये वजन कमी करणे हा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी उपाय ठरतो.

सामान्यपणे प्रत्येक एक किलोग्राम वजन कमी झाल्यास तुमचा बीपी १ mmHg ने कमी होतो.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार प्रयोग झालेल्या लोकांचे १ किलो ने वजन कमी झाल्यावर त्यांचा रक्तदाब १ ते १.२ mm Hg ने कमी झाला आहे.

या आणि अशा अनेक प्रयोगात वजन कमी झाल्यावर लोकांचा रक्तदाब कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

असे काय होते की वजन कमी केल्यावर रक्तदाब कमी होण्यास सुरुवात होते याची माहिती बघूया.

 • तुमच्या शरीरात लठ्ठपणा आणि चरबी जास्त असेल तर त्यामुळे ह्रदयावर जोर पडतो. याचा अर्थ असा की चरबी एवढे वाढते की सर्व बाजूंनी ह्रदयावर प्रेशर येते. यामुळे ह्रदयाला रक्तपुरवठा करण्यासाठी अधिक जोर लावावा लागतो. वजन कमी झाल्यास ह्रदयावर आलेले प्रेशर कमी होऊन ह्रदय योग्य कार्यक्षमतेने आपले कार्य पूर्ण करते.
 • दुसरे म्हणजे वजन जास्त असेल तर तुमच्या शरीराला नॉर्मल पेक्षा जास्त रक्तपूरवठा करावा लागतो. हे जास्तीचे काम करण्यासाठी ह्रदयावर एक प्रकाराचा लोड येतो आणि ह्रदयाला तीव्र आणि अधिक गतीने रक्तपुरवठा करावा लागतो. ही तीव्र गती आपल्याला ब्लड प्रेशर मोजत असताना फील होते. त्यालाच वाढलेले ब्लड प्रेशर म्हणतात.
 • अजून एक मुद्दा म्हणजे की लठ्ठपणा मुळे एकंदरच शरीरात पूर्ण सूज आलेली असते. यामध्ये इतर अवयव आणि रक्तवाहिन्या यांच्या ठिकाणी सुद्धा सूज येते. ही जेव्हा सूज येते त्यावेळेस रक्तवाहिन्या बारीक आणि कडक होतात. परिणामी त्यामधून कमी रक्तप्रवाह होतो. यामुळे कमी जागेवरून अधिक रक्तप्रवाह करावा लागत असल्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो त्यालाच ब्लड प्रेशर म्हणतात. वजन कमी झाल्यावर आपोआप हा दबाव कमी होतो.

संबंधित वाचा-ह्रदयविकार येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात ?

नेचर या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित या आर्टिकल च्या निष्कर्षानुसार उच्च रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी वजन कमी करणे हा एक उत्तम उपाय आहे.

तज्ञांच्या मते ह्रदय आणि रक्तवाहिन्या संबंधित आजारांमुळे होणारे मृत्यू चे प्रमाण हे उच्च रक्तदाब नसणाऱ्या व्यक्तींच्यापेक्षा उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांमध्ये काही पटीने जास्त जास्त आहे.

यासंबंधी अमेरिका मध्ये उच्च रक्तदाब आणि वजन नियंत्रण यांचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी पहिल्यांदाच प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग एक वर्षासाठी काही लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींवर करण्यात आला होता.

या प्रयोगतील निष्कर्ष अमेरिकन जर्नल ऑफ हायपरटेंशन मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या निष्कर्षानुसार प्रयोगातील व्यक्तींनी यशस्वीरीत्या ५.१ किग्रा वजन कमी केल्यावर त्यांचा सिस्टोलिक रक्तदाब 4.44mm Hg आणि डायस्टोलिक रक्तदाब 3.57mm Hg ने कमी झाल्याचे आढळले.

वजन किती असावे ?

उच्च रक्तदाब कमी करायचा असेल तर तुम्ही तुमचे वजन कमी केलेच पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की रक्तदाब वाढू नये यासाठी नेमके किती वजन असावे. यासाठी तुम्हाला किती वजन कमी करावे लागेल यासाठी ध्येय ठरवावे लागणार आहे.

वेब एमडी नुसार तुमची BMI INDEX १८.५ ते २४.९ एवढा येईल यानुसार तुमचे वजन कमी केले पाहिजे. आता प्रश्न पडला असेल की BMI INDEX काय आहे.

BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स (body mass index). हे एक माप आहे असे समजा. या मापा नुसार आपल्याला आपले वजन वाढले की कमी झाले की आपण लठ्ठपणा गाठला की नाही हे कळते. यामध्ये आपल्या ऊंची नुसार आपले वजन किती असावे हे ठरवले जाते.

यासाठी एक सूत्र म्हणजे फॉर्म्युला वापरला जातो.

BMI = तुमचे वजन (किलोग्राम मध्ये)/ ऊंची (मीटर मध्ये )* २

उदाहरण – एखाद्या व्यक्तीचे वजन ७५ किलोग्राम आहे आणि ऊंची १.८० आहे तर त्याचा BMI खालीलप्रमाणे येईल.

७५/१.८०*२=२०.८३

सदर व्यक्तीचा BMI २०.८३ आहे असे समजावे.

हा फॉर्म्युला वापरुन तुम्ही तुमचा BMI १८.५ ते २४.९ या दरम्यानच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे.

वजन कमी करणे हा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींसाठी एक पर्यायी उपाय प्रभावी ठरू शकतो. तरी देखील यासाठी सविस्तर वैयक्तिक मार्गदर्शन आणि माहिती ची गरज आहे.

२. दैनंदिन व्यायाम (regular exercise)

रक्तदाब कमी करण्याचे उपाय म्हणून करा दैनंदिन व्यायाम

दैनंदिन व्यायाम केल्यामुळे उच्च रक्तदाब यावर नियंत्रण राहते आणि काही वेळा तुमचा रक्तदाब कमी देखील होऊ शकतो.

उच्च रक्तदाब आणि दैनंदिन व्यायाम यांचा संबंध समजून घेण्यासाठी अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. याचे कारण असे की आजकाल जिम चा ट्रेंड बनत चालला आहे आणि तो वाढतोच आहे. या जिम मध्ये जलद, हाय इंटेनसीटी व्यायाम केले जातात. मी म्हणेल हे उच्च रक्तदाब कमी करण्याचे दृष्टीने तर चुकीचे आहेच पण सामान्यपणे एकंदर निरोगी राहण्याच्या दृष्टीने पण चुकीचे आहे.

ब्लॉग च्या विषयाला धरूनच आपण याबद्दल पुढे बघणार आहोत.

अनेक अभ्यासानुसार उच्च रक्तदाब कमी किंवा एकंदर ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी एरोबिक एक्झरसाइज ची गरज आहे. एरोबिक एक्झरसाइज ही फक्त ह्रदयाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने केली जाते. यासाठी तुम्हाला हाय इंटेनसीटी वर्कआउट करण्याची काहीही गरज नाही.

साधारण हृदय आणि श्वासोच्छवासाची गती वाढवणाऱ्या ज्या हालचाली किंवा व्यायाम असतात त्यांना एरोबिक एक्झरसाइज म्हणतात.

एरोबिक एक्झरसाइज मध्ये तुमच्या हृदय, फुफ्फुसे, रक्तवाहिन्या आणि स्नायू यांचा व्यायाम होऊन यांची कार्यक्षमता वाढवली जाते. यामध्ये विशेषकरून चालणे, जॉगिंग, पोहणे, पळणे अशा प्रकारचे व्यायाम केले जातात. अशा प्रकारच्या सर्व हालचाली मुळे तुमचे ह्रदय, फफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांची कार्यक्षमता वाढून या संबंधीचे आजार कमी होतात.

Pushups, dumbbells वगैरे असे तीव्र व्यायाम केल्यावर ह्रदयाला फायदा होण्याच्या एवजी नुकसान होते. आपण आज अनेक प्रकरणे बघत आहोत ज्यामध्ये लोक जिम मध्ये अशा प्रकारचे व्यायाम करून त्यांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढत आहे.

संबंधित वाचा –हार्ट अटॅक कशामुळे येतो ?

मायो क्लिनिक नुसार दैनंदिन शारीरिक हालचाल केल्यामुळे रक्तदाब ५ ते ८ mmHg ने कमी होऊ शकतो.

काही केसेस मध्ये तर व्यायाम औषधांचे काम करते. म्हणजे उच्च रक्तदाब यासाठी औषधी उपचार न घेता, दैनंदिन व्यायाम करून उच्च रक्तदाब कमी झाल्याचे प्रकरणे आहेत.

स्प्रिंगर लिंक जर्नल मध्ये या अभ्यासानुसार व्यायाम केल्यानंतर तब्बल २४ तासपर्यंत तुमचा रक्तदाब कमी राहू शकतो. या जर्नल मध्ये याला पोस्ट एक्झरसाइज हायपोटेन्शन (post-exercise hypotension) असे नाव देण्यात आले आहे. जर कुणी वारंवार आणि सतत दैनंदिन व्यायाम करत असेल तर त्याच्या रक्तदाबामध्ये अजून जास्त घट झालेली बघायला मिळेल.

काही वेळा किंवा बहुतेक वेळा जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तत्काल म्हणजे लगेच तुमचा रक्तदाब वाढत असतो. कारण या परिस्थितिमध्ये ह्रदयाला अधिक तीव्र गतीने शरीराला रक्तपुरवठा करावा लागतो. पण या वेळेस वाढलेला रक्तदाब हा काही वेळाने पुन्हा नॉर्मल स्थिति मध्ये येत असतो.

अशा वेळेस जर रक्तदाब पुन्हा नॉर्मल लेवल ला नाही आला तर मात्र तुम्हाला त्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.

ह्रदय आणि संबंधित अवयव म्हणजे रक्तवाहिन्या यांना शारीरिक हालचाल आणि व्यायाम यांचा फायदा मिळावा यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

 • दररोज थोडासाच व्यायाम करा. गरज पडल्यास हळू हळू व्यायामाची वेळ वाढवू शकता.
 • तीव्र गतीने व्यायाम करायचा असल्यास म्हणजेच तुम्ही खूप जास्त फिटनेस फ्रीक असाल तर त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • अचानक व्यायाम करणे थांबवू नका. हळू हळू थांबवा. यामुळे तुम्हाला एक प्रकारचा कूलिंग पीरियड मिळेल आणि ह्रदय हळू हळू नॉर्मल स्थिति मध्ये येईल.
 • एक्झरसाइज चालू करण्यापूर्वी नेहमी वॉर्म अप करा. यामुळे एक्झरसाइज मुळे होणाऱ्या संभाव्य दुखापत होऊ शकणार नाहीत.
 • उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी नेहमी मध्यम स्वरूपाच्या हालचाली, व्यायाम करा. गरज पडल्यास हळू हळू तीव्रता वाढवू शकता.

व्यायाम किती वेळ करावा ?

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी किती व्यायाम करावा यासाठी काही वैज्ञानिकांनी आपले मत मांडले आहे.

अमेरिकन हार्ट असोसिएशन नुसार उच्च रक्तदाब आणि संबंधित आजार नियंत्रित करण्यासाठी एका आठवड्यात १५० मिनीट म्हणजे २.३० तासांपर्यंत व्यायाम केला पाहिजे. जर प्रत्येक दिवसाचा विचार केला तर दररोज ३० मिनीट शारीरिक हालचाल किंवा व्यायाम केल्यास याचा फायदा होतो.

त्यामुळे साधारणता ३० ते ४५ मिनीटे एवढा वेळ व्यायाम करण्यासाठी निश्चित केला पाहिजे.

तरी माझ्या वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नुसार मी सांगेल की आपण आपला स्टॅमिना आणि कार्यक्षमता ओळखून आणि जर इतर ह्रदयासंबंधी काही आजार असतील तर डॉक्टरांना विचारूनच व्यायामाचा कालावधी निश्चित करावा.

संबंधित वाचा- नेमका किती तास व्यायाम करावा?

३. डॅश डायट (DASH diet in Marathi)

रक्तदाब कमी करण्याचे उपाय मध्ये डॅश डायट

आपला आहार आणि आहारातील घटक हे प्रत्यक्षरीत्या हायपरटेंशन ची स्थिति बनवण्यातमहत्वाची भूमिका पार पाडत असतात. आहार आणि त्याहून महत्वाचे म्हणजे आहारातील समाविष्ट असणारे आहार घटक हे उच्च रक्तदाब आणि ह्रदयासंबंधी इतर गंभीर आजारांसाठी महत्वाचे कारणीभूत घटक असतात.

हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंग नुसार आरोग्यदायी आणि निरोगी (healthy diet) आहार हा उच्च रक्तदाब रोखण्यासाठी सर्वात प्रभावी तसेच प्राथमिक असा उपचार आहे.

याच अनुषंगाने उच्च रक्तदाब आणि ह्रदयासंबंधी आजार कमी करण्यासाठी अमेरिका मध्ये ‘डॅश डायट’ ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे.

डॅश डायट ही एक डायट संकल्पना आहे. याचा मराठी अनुवाद Dietary Approaches to Stop Hypertension (DASH) असा आहे. ज्यात नावातच दिले आहे की उच्च रक्तदाब थांबवण्यासाठीचा आहार.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या या आर्टिकल नुसार डॅश डायट आणि सोडियम चे प्रमाण कमी केल्यावर रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते. महत्वाचे म्हणजे डॅश डायट मध्ये जे अन्न पदार्थ सांगितले आहेत त्या सर्व पदार्थांमध्ये देखील सोडियम चे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळते.

डॅश डायट याबद्दल थोडी माहिती आणि याची वैशिष्टे बघूयात.

 • डॅश डायट ही संकल्पना १९९० च्या दशकात चालू झालेली आहे.
 • १९९२ मध्ये नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ (National Institute of Health) संस्थेने याबद्दल अनेक संशोधन आणि त्यासाठी लागणारा निधी पुरवण्यासाठी मदत केली.
 • डॅश डायट चा प्रभाविपणा तपासण्यासाठी अमेरिकेतील काही लोकांवर प्रयोग करण्यात आले होते ज्यांना फक्त डॅश डायट मधील आहार घ्यायचा होता.
 • या प्रयोगात अनेक महत्वाचे निष्कर्ष काढण्यात आले. ज्या पैकी एक महत्वाचा निष्कर्ष म्हणजे या प्रयोगतील लोकांनी इतर कोणताही उपचार न करता फक्त डॅश डायट घेतल्यामुळे त्यांचा रक्तदाब ६ ते ११ mmHg ने कमी झाल्याचे आढळले.
 • महत्वाचं म्हणजे मध्ये ज्यांना उच्च रक्तदाब चा आजार नव्हता त्यांचे सुद्धा ब्लड प्रेशर कमी झाल्याचे निष्पन्न झाले.

काय आहे डॅश डायट (साधारणपणे )

 • अधिक फळे, भाज्या.
 • कमी चरबी चे दुग्धजन्य पदार्थ (low fat dairy products).
 • सॅच्युरेटेड फॅट, कोलेस्टेरॉल आणि ट्रान्स फॅट्स असणारे सर्व पदार्थ बंद करा.
 • संपूर्ण धान्य.
 • मासे,.poultry.
 • मीठ, गोड. कोल्ड ड्रिंक्स कमी प्रमाणात.

वरील डॅश डायट चे वर्णन हे साधारण पणे केलेले आहे. नेमके डॅश डायट मध्ये काय असते याबद्दल साधी आणि सोपी ही माहिती आहे.

वरील प्रत्येक पदार्थांच्या वर्गात कोणते फळ भाज्या किती प्रमाणात आणि किती भागात घ्याव्या याची सविस्तर माहिती या डॅश डायट मध्ये दिलेली आहे.

डॅश डायट काय करते ?

डॅश डायट असे काय करते ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते ? यासाठी दोनच पण पुरेसे उत्तर आहे.

 • डॅश डायट मध्ये सर्व पदार्थांमध्ये सोडियम चे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे शरीरात सोडियम मुळे होणारे रक्तवाहिन्यांना नुकसान थांबते.
 • दुसरे म्हणजे या सर्व अन्न पदार्थांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम चे प्रमाण भरपूर आहे. या तिन्ही पोषक घटकांमुळे ह्रदयाचे आणि संबंधित अवयवांचे आरोग्य सुधारून रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

  त्यामुळे डॅश डायट हा तुमचा रक्तदाब कमी करण्यास नक्कीच मदत करू शकतो.

४. लसूण (बघा लसूण खाण्याचे हे फायदे)

लसूण रक्तदाब कमी करण्याचे उपाय

पूर्वीपासूनच स्वयंपाक घरात असलेले लसूण हे अनेक आरोग्य विषयक फायद्यांसाठी वापरले जाते. अलीकडील काळात लसूण आणि त्याच्या औषधी गुणधर्म यांना अनुसरून अनेक संशोधन देखील होत आहेत.

लसूण विशेष करून ह्रदय आणि रक्तवाहिन्या यांच्या आरोग्य साठी अत्यंत फायदेशीर वनस्पति आहे.

या लसूण मध्ये ऍलिसिन (allicin) नावाचे कंपाऊंड हे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते असे तज्ञांचे मत आहे.

हेल्थलाइन नुसार हे ऍलिसिन कंपाऊंड अँजिओटेन्सिन II (angiotensin II) हॉरमोन ची निर्मिती थांबवते. अँजिओटेन्सिन II मुळे रक्तवाहिन्या घट्ट होतात आणि आकुंचन पावतात ज्यामुळे त्यामधील वाहणाऱ्या रक्ताला अवरोध निर्माण होऊन तेथे दाब येतो. ही सर्व प्रक्रिया रक्ततदाब वाढण्यास जबाबदार ठरते.

यामुळे ऍलिसिन हे अँजिओटेन्सिन II ची निर्मिती थांबवून रक्तवाहिन्यामधील रक्ताचा प्रवाह सोपा करते.

जगप्रसिद्ध अशा नेचर या जर्नल मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार लसनाचा अर्क हा उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो आणि उच्च रक्तदाब साठी एक पर्यायी प्रभावी उपचार म्हणून काम करू शकते.

लसनामध्ये असणारे महत्वाचे घटक ऍलिसिन हे गुणकारी असे कंपाऊंड आहे.

 • लसूण चावल्यावर आपल्याला जी कडू चव लागते ती याच ऍलिसिन मुळे लागते.
 • ऍलिसिन रक्तात मिसळताच अँजिओटेन्सिन II ची निर्मिती थांबवते ज्यामुळे नसांमधील दाब कमी होतो.
 • या सोबतच ऍलिसिन नायट्रिक ऑक्साईड (nitric oxide) चे उत्पादन वाढवते. नायट्रिक ऑक्साईड हे रक्तवाहिन्यांना रीलॅक्स (relax) करते. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
 • ऍलिसिन मध्ये दाह विरोधी गुणधर्म असल्यामुळे रक्तवाहिन्यांवर असलेली सूज लसनामुळे कमी होते.

लसनाचा वापर करत असताना फक्त सुक्का लसूण म्हणजेच कच्या लसनाचा वापर करावा. लसनाचा दररोज चा वापर हा कमी प्रमाणात असावा. लसनामुळे अनेक प्रकारचे साइड इफेक्ट सुद्धा होतात. महत्वाचा साइड इफेक्ट म्हणजे रक्त पातळ होऊन ब्लीडिंग होणे.

हा त्रास टाळण्यासाठी सावकाश आणि कमी प्रमाणात लसनाचा वापर करा.

५. पोटाशियम डायट (potassium diet)

रक्तदाब कमी करण्याचे उपाय मध्ये पोटाशियम डायट वापरा

हा माझा वैयक्तिक विशेष करून उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी ठरवलेला डायट आहे.

पोटाशियम डायट मध्ये पोटाशियम चे प्रमाण अधिक असणारे काही अन्न पदार्थ आहेत. ज्यामुळे केळी नंबर एक ला आहे. एका केळी मध्ये जवळपास २५० mg एवढे पोटाशियम असते.

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी पोटाशियम महत्वाचा घटक आहे. यासाठी महत्वाच कारण म्हणजे पोटाशियम रक्तातील सोडियम कमी करत करते. यामुळे तुम्ही जेवढे जास्त पोटाशियम घेताल तेवढे सोडियम तुमच्या शरीरातून बाहेर पडेल.

 • पोटाशियम हे आपल्या शरीरासाठी लागणारे महत्वाचे मिनेरल आहे. जसे सोडियम, कॅल्शियम आणि इतर.
 • हे पोटाशियम तुमच्या शरीरातील वाढलेले सोडियम हे लगवी मार्फत शरीराबाहेर फेकण्यास मदत करते. या सोडियम मुळे रक्तदाब वाढत असतो.
 • दुसरे म्हणजे पोटाशियम हे रक्तवाहिन्यांच्या भिंतींना रीलॅक्स करते. ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.
 • पोटाशियम हे किडनी चे कार्य सुधारते. यामुळे किडनी सर्व वेस्ट मटेरियल आणि सोडियम ना लगवी द्वारे बाहेर टाकते ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

यूरोपियन हार्ट जर्नल मध्ये या संशोधनात सांगितले की ज्या व्यक्तींच्या शरीरात पोटाशियम प्रमाण अधिक आढळते अशा लोकांमध्ये ह्रदयविकार आणि संबंधित तक्रारी आढळण्याचे प्रमाण कमी होते. त्या उलट हे पोटाशियम चे प्रमाण कमी असणाऱ्या लोकांमध्ये ह्रदयविकार होण्याचे प्रमाण १३ टक्क्याने जास्त आहे.

अमेरिकन हार्ट असोसिएशन रक्तदाब साठी पोटाशियम हे उपचारा साठी आणि प्रतिबंध घालण्यासाठी रिकमेंड (सूचित ) करते “

पोटाशियम युक्त आहार

केळी हे फळ पोटाशियम साठी उत्तम स्त्रोत मानले जाते. पण त्यासाठी अधिक केळी खावी लागेल ज्यामुळे तुमच्या calories पण वाढतील. कारण केळीमध्ये calories सुद्धा भरपूर असतात.

अशा वेळी एका स्त्रोतवर अवलंबून न राहता पोटाशियम असणारे इतर फळे भाज्या देखील खाल्ल्या पाहिजे.

यामध्ये पूर्ण हिरव्या भाज्या, मशरूम, संत्री, मटार, बटाटे, मनुका, खजूर, टोमॅटो हे अशा प्रकरचे अन्न पदार्थ आहेत ज्यामध्ये पोटाशियम तुलनेने जास्त आढळते.

पोटाशियम हा उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

ब्लॉग च्या शेवटी एवढेच सांगेल की उच्च रक्तदाब हा नक्कीच गंभीर आजार आणि आरोग्य समस्या आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात ह्रदयविकार, किडनी चे आजार, मधुमेह सारख्या इतर बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागू शकते.

तेव्हा माहिती घ्या आणि काळजी घ्या या सोप्या मेसेज सोबत हा ब्लॉग इथेच थांबवतो. धन्यवाद.

FAQ’s

रक्तदाब जलद कसा कमी करायचा?

रक्तदाब जलद कमी करायचा असल्यास आराम करावा,विश्रांती घ्यावी आणि तत्काल डॉक्टरांना सूचित करावे.

उच्च रक्तदाबासाठी बिअर योग्य आहे का ?

नाही, उच्च रक्तदाबासाठी बीयर योग्य नाही कारण यामध्ये अल्कोहोल असते जे रक्तदाब वाढवू शकते.

ब्लॉकमुळे रक्तदाब वाढेल का ?

हो, ब्लॉक मुळे रक्तदाब वाढतो.

रक्तदाब खूप जास्त केव्हा होतो ?

रक्तदाब खूप जास्त केव्हा होतो हे तुमच्या वय आणि तुमच्या सध्याच्या आजारांवर ठरवले जाते. साधारण १५०/११० च्या वरती रक्तदाब असेल तर त्याला जास्त म्हणावे.

बीपी वाढल्यावर काय करावे ?

बीपी वाढल्यावर तुम्ही विश्रांती घ्यावी,आराम करावा आणि डॉक्टरांना बोलवावे.

2 thoughts on “उच्च रक्तदाब कमी करण्याचे उपाय जाणून घ्या | Blood pressure kami karnyache upay”

Leave a Comment