HEALTHBUSS

हार्ट अटॅक कशामुळे येतो ? खरंच आपल्याला खरी कारणे माहीत आहेत का ?

Last updated on October 7th, 2024 at 04:30 pm

ह्रदयासंबंधी आजार किंवा ह्रदय विकारांमद्धे जास्त प्रमाणात आढळणारा किंवा जीवघेणा आजार म्हणजे हार्ट अटॅक. हा हार्ट अटॅक आजच्या दिवसांमध्ये एवढा सामान्य झाला आहे की कुणाला ही कोणत्या क्षणी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे नेमका हार्ट अटॅक कशामुळे येतो याची साधारण माहिती ही प्रत्येकाला असणे गरजेचे आहे.

तरुण, वृद्ध, महिला किंवा पुरुष सर्व वर्गामध्ये हार्ट अटॅक येणे ही खूप सामान्य बाब झाली आहे. एवढेच नव्हे तर आपण या दिवसा मध्ये जिम मध्ये जाऊन वर्कआउट करणारे, तब्येतीची काळजी घेणारे यांना सुद्धा ह्रदयविकार किंवा हार्ट अटॅक येत असतो. यामधे हार्ट अटॅक किंवा ह्रदयविकार येऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अनेक औषध घेणारे लोक सुद्धा आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जागतिक स्तरावर सर्वाधिक मृत्यू होण्याचे प्रमुख कारण हे ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार हे आहे. दरवर्षी सुमारे १७.९ दशलक्ष मृत्यू या आजारांमुळे होतात.

अधिक गंभीर बाब म्हणजे याच १७.९ दशलक्ष लोकांमध्ये ५ पैकी ४ मृत्यू हे ह्रदयविकार आल्यामुळे होतात.

हा लेख नक्कीच महत्वाचा आहे आणि यामध्यमातून मला काही माहिती आणि निष्कर्ष मांडायला संधि मिळणार आहे.

याचे कारण असे आहे की वैद्यकीय क्षेत्रातील लोकांमध्ये सुद्धा याचे प्रमाण खूप वाढत आहे. जेव्हा की डॉक्टर्स लोक याबद्दल अधिक काळजी घेत असतात.

चांगली तरुण लोक जे आरोग्याच्या बाबतीत conscious असतात. त्यांच्यामध्ये सुद्धा याचे प्रमाण अधिक वाढत आहे. याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी चुकत आहे.

आजकाल ह्रदयविकार किंवा हार्ट अटॅक होऊ नये म्हणून किंवा टाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या सर्व गोष्टी लोक करत आहेत. तरी देखील हार्ट अटॅक चे प्रमाण का वाढत आहे याचा विचार करण्याची गरज आता नक्कीच आहे.

हा लेख मी याच काही कारणांचा विचार करण्यासाठी लिहिला आहे.

हा एकंदर सर्व मुद्दा जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर काही मूलभूत गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

हार्ट अटॅक येतो म्हणजे नेमके काय होते ?

आपले ह्रदय हे चोवीस तास काम करत असते. संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याचे काम हे ह्रदयाचे असते. अर्थातच ह्रदय हे कार्य स्वतःकडे आलेले अशुद्ध रक्त शुद्ध करून जोराने शरीराकडे ढकळून करते. संपूर्ण शरीरात रक्त ढकळून पुरवायचे म्हंटल्यावर ह्रदयात तेवढी ताकत पाहिजे आणि स्वतः ह्रदय देखील आरोग्यदायी असले पाहिजे.

आपल्याला काम करायला जसे ह्रदयाकडून रक्तपुरवठा लागतो, चांगले muscles लागतात, अन्नातून चांगले पोषक घटक लागतात, तसेच ह्रदयाला देखील या सर्व गोष्टी लागतात.

ह्रदयाला रक्तपुरावठा हा ह्रदयाच्या स्वतःच्या रक्तवाहिन्या ज्याला coronary arteries म्हणतात त्यातून होतो. त्यातूनच ह्रदयाला सर्व पोषण मिळते आणि ह्रदयाचे स्नायू म्हणजेच muscles स्ट्रॉंग आणि मजबूत होतात.

या सर्व गोष्टी जेव्हा ह्रदयाला आवश्यक त्या प्रमाणात आणि योग्य त्या वेळी भेटल्या तरच ह्रदय चांगले राहून त्याचे संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याचे कार्य योग्य पार पडत असते.

पण काही कारणांमुळे ह्रदयाला हा रक्तपुरवठा होऊ शकत नाही. ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमद्धे blockages तयार होतात आणि ह्रदयाला होणारा रक्तपुरवठा यासाठी हे blockages अवरोध निर्माण करतात. परिणामी ह्रदयाला रक्तपुरवठा होत नाही, ह्रदयाचे पोषण होत नाही, ह्रदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा होत नसल्याने त्या स्नायू मारतात किंवा त्यांना इजा पोचते आणि आणि तुम्हाला हार्ट अटॅक येतो.

आता ह्रदयाला हा रक्तपुरवठा का होत नाही, कशामुळे थांबतो, blockages का निर्माण होतात याचाच ऊहापोह पुढे आपण लेखात घेऊया.

खरंच तंबाखू आणि दारुमुळे हार्ट अटॅक येतो का ?

हार्ट अटॅक कशामुळे येतो ?

खरंच तंबाखू सेवन आणि दारू चे व्यसन असेल तर तुम्हाला हार्ट येतो का किंवा या गोष्टी नाही केल्या तर हार्ट अटॅक तुम्ही टाळू शकता का?

या संबंधी हे दोन्हीही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे.

या दोन्ही प्रश्नांचे उत्तर सरळ सरळ ‘हो’ किंवा ‘नाही’ असे असूच शकत नाही.

असे असेल तर आपण आजकाल बघतच आहोत की ज्या व्यक्तीला कोणतेही व्यसन नाही, सर्व काही चांगल्या सवयी आहेत, पोषक आहार घेतात, व्यायाम करतात, जिम ला जातात त्या व्यक्तींना देखील हार्ट अटॅक येतो.

असे का ?

दुसऱ्या बाजूला असे चित्र देखील बघतो की एखाद्या व्यक्तीला सर्व प्रकारचे वाईट व्यसन आहेत, कोणत्याही हेल्थ विषयी सकारात्मक सवयी नाहीत, रूटीन नाही, ती व्यक्ति चांगली आरोग्यदायी राहते, हार्ट अटॅक येत नाही, किंवा कोणताही ह्रदयविकार संबंधी आजार होत नाही. जरी त्याचा मृत्यू झाला तर तो हार्ट अटॅक किंवा ह्रदयविकार मुळे न होता बाकी कारणांमुळे होतो.

इथे मी कोणत्या ही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नाही. फक्त एक missing गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय की सर्व खबरदारी घेऊन देखील हार्ट अटॅक कशामुळे येतो.

जागतिक आरोग्य संघटना म्हणते की “तंबाखू सेवन, अतिरिक्त मिठाचे सेवन आणि दारूचे सेवन कमी करणे तसेच दैनंदिन व्यायाम आणि पालेभाज्या किंवा फळे खाणे यामुळे ह्रदयसंबंधीत आजार (हार्ट अटॅक) होण्याची शक्यता कमी होते”

यामधे स्पष्टच आहे की फक्त शक्यता कमी होते. पण शक्यता ही राहतेच.

तंबाखू किंवा दारू सेवन या मुळे फक्त तुमची हार्ट अटॅक या आजाराला सामोरे जाण्याची शक्यता कमी होऊ शकते. याचा अर्थ असा नसतो की हार्ट अटॅक तुम्हाला होणारच नाही. ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे.

पण मी म्हणेल आपल्याला शक्यता कमी करायची असेल तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार पालेभाज्या आणि फळे सेवन करणे,नियमित व्यायाम करणे,तंबाखू किंवा दारूचे सेवन टाळणे या गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.कारण या पलीकडे आपण दुसरा कोणताही पर्याय अवलांबवू शकत नाही.

तर यामधे मी सांगू इच्छितो की हार्ट अटॅक होण्याचे एकमेव नाही पण जे कारण ठरू शकते ते आहे दारू सेवन आणि तंबाखू सेवन मग ते कोणत्याही स्वरूपात असो.

व्यायाम आणि हार्ट अटॅक

तुम्हाला माहीतच असेल की व्यायाम आणि हार्ट अटॅक याचा संबंध काय आहे. अर्थातच व्यायाम केल्याने लवकर अटॅक वगैरे येत नाही असे आपण बऱ्याच मंडळीकडून ऐकत असतो किंवा सर्व जण आपल्याला हा सल्ला देत असतात.

हा सल्ला कानात पडताच मग हळूच आवाजात आपण मनातच बोलतो की व्यायाम करणाऱ्यांनाच अटॅक येतो.

वर सांगितल्याप्रमाणेच व्यायाम च्या बाबतीत ही तसेच आहे की व्यायाम केल्याने देखील हार्ट अटॅक येण्याची फक्त शक्यता कमी होते.

ठीक आहे. आपल्याला शक्यता का होईना कमी करायची आहे. पण व्यायामच्या बाबतीत तुम्हाला अजून एक अधिकचा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे ज्यामुळेच तुम्हाला आणि मला याचे उत्तर मिळू शकेल की व्यायाम तर करतो पण मग अटॅक का येतो.

हार्ट अटॅक कशामुळे येतो ?

आता मी जे सांगणार यावर संशोधन वगैरे काही झालेले नाही पण एक डॉक्टर असल्याकारणाने माझा या बाबतीत अनुभव आहे.

व्यायाम आणि हार्ट अटॅक संबंध कळून घेण्यासाठी तुम्हाला मी वर सांगितलेले हार्ट अटॅक येते म्हणजे नेमके काय होते हा मुद्दा आठवावा लागेल नाहीतर पुन्हा वाचून घ्या.

मुळात व्यायाम करण्याचा एकमेव आणि सर्वात महत्वाचा उद्देश हा आहे की आपल्या ह्रदयाची काळजी घेणे किंवा ह्रदयाचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे. तेव्हा हा उद्देश पूर्ण करण्यासाठी खालील गोष्टी अपेक्षित आहेत.

  • रोज सकाळ, संध्याकाळ मिळून १०००० पावले चालावे.
  • रोज हलक्या शारीरिक हालचाली करणे.
  • थोडेफार पळणे (तुमच्या स्टॅमिना नुसार).
  • एक्झरसाइज (ती ही स्टॅमिना नुसार).
  • योग ,ध्यान.

ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी माझ्या दृष्टीने वरील गोष्टी अपेक्षित आहे. पण काही बरेच लोक म्हणतील की व्यायाम तर लोक करतात, मग तरीही हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का वाढत आहे.

आजच्या दिवसांमध्ये ह्रदयाचे आरोग्य राखण्याच्या उद्देशयाने व्यायाम केला जात नाही. आपण बघत आहोत की आज gym culture किती वाढत आहे. या जिम मध्ये लोक फक्त आणि फक्त स्वतःची शरीरयष्टी कशी आकर्षक होईल, त्या व्यक्ति पेक्षा माझे biceps कसे स्ट्रॉंग दिसतील, चेस्ट किती स्ट्रॉंग दिसेल, याने एवढे pushups मारले तर मी कसा त्यापेक्षा जास्त मारेल या सर्व फालतू गोष्टी करत राहतात.

या सर्व गोष्टी करत असताना ही तरुण मंडळी स्वतःचा स्टॅमिना लक्षात घेत नाही, आपल्याला ह्रदयाला किती प्रमाणात exercise केल्यावर सहन होईल अशा गोष्टींचा अजिबात विचार करत नाही.

व्यायाम करण्याचा एकच उद्देश असतो जो मी सांगितलाय की ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवणे. यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्रदयाला रोज फक्त थोडे जास्त काम देऊन दमवायचे आहे, त्याचा स्टॅमिना वाढवायचा आहे. पण जीम मध्ये वेगळच चालत असतं.

जीम मध्ये एवढा hard, consistent, overload व्यायाम केला जातो की ते ह्रदय अक्षरश: थकते आणि काम करण्याचे सोडून देते. त्यामुळे आपण आजकाल बघतो की जिम मध्ये व्यायाम करत असताना लोकांना हार्ट अटॅक येतो.

आता खाली मी काही या बाबतची संशोधने आणि निष्कर्ष देत आहे त्यावर लक्ष देणे महत्वाचे आहे.

पहिला निष्कर्ष सापडला मला कार्डियोलॉजी इन (Cardioloogy in Review) रिव्यू या जर्नल मधला.

या अभ्यासानुसार आठवड्यातील बहुतेक दिवसांमध्ये (शक्य तेवढे जास्त दिवस) किमान 30 मिनिटांची मध्यम शारीरिक हालचाल केल्यामुळे हृदयाच्या धमनी रोग आणि मृत्यूच्या घटनांमध्ये 30% ते 50% घट झाल्याचे आढळून आले आहे.

आता या मध्यम शारीरिक हालचालींमध्ये चालणे, सायकलिंग, स्विमिंग, डान्सिंग, योगा, किंवा इतर कोणत्याही शारीरिक हालचाली ज्यामुळे तुम्हाला थोडासा घाम येतो आणि हृदय गती वाढते या गोष्टी करू शकता.

२००५ साली सुद्धा एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. जर्नल ऑफ एप्लाइड फिजियोलॉजी (journal of applied physiology) मध्ये हा अभ्यास आणि यावर मिळालेले काही निकाल प्रकाशित करण्यात आले आहे. अभ्यासाचा उद्देश्यच हा होता की व्यायामाची तीव्रता आणि वेळ याचा ह्रदय आणि फफ्फुस यांच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.

अभ्यासानुसार हे स्पष्ट झाले की उच्च तीव्रतेचा व्यायाम (हाय इंटेनसीटी एक्झरसाइज) मध्यम तीव्रतेच्या व्यायामापेक्षा हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यात आणि हृदयाच्या धमनी संबंधित रोगाच्या घटकांना कमी करण्यात अधिक प्रभावी आहे.

थोडक्यात काय तर वरील सर्व संशोधन आणि निष्कर्ष हेच सांगतात की मध्यम स्वरूपात केलेला व्यायामच हार्ट अटॅक आणि ह्रदयविकार संबंधित आजार रोखतात. त्या सर्व संशोधनाचे संदर्भ मी त्या वरील लिंक मध्ये दिलेले आहे.

या आणि इतर सर्व संशोधनात आणि अभ्यासातून हे कुठेही सांगितले नाही की हार्ट अटॅक टाळण्यासाठी खूप hardcore, weightlifting आणि consistent प्रकारचा व्यायाम असावा. आणि जिम मध्ये तर हेच सर्व चालू असते.

त्यामुळे एकंदरच मी एक सांगेलकी हाय इंटेनसीटी एक्झरसाइज मुळे हार्ट अटॅक येतो.

इतर महत्वाचे घटक ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.

वरील सर्व माहिती आपण हार्ट अटॅक कशामुळे येतो या गोष्टीचा ऊहापोह घेण्याच्या दृष्टिकोनातून बघितली आहे. विशेष करून अशा परिस्थिति लक्षात घेऊन जेव्हा सर्व लोक हार्ट अटॅक येऊ नये म्हणून खबरदारी घेतात तरी सुद्धा लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.

यानंतर हार्ट अटॅक येण्यासाठी जबाबदार असे काही घटक बघूया जे कोणताही ह्रदयविकार किंवा हार्ट अटॅक सारख्या समस्यांना प्रत्यक्षपणे सर्वात जास्त प्रभावित करतात.

हार्ट अटॅक कशामुळे येतो ?

१. उच्च रक्तदाब (Hypertension)

उच्च रक्तदाब असणे हा कोणत्याही ह्रदयसंबंधी आजार किंवा हार्ट अटॅक साठी प्रत्यक्ष सर्वात जास्त कारणीभूत असा घटक आहे.

याला सामान्य भाषेत बीपी वाढणे असे आपण म्हणतो. पण बीपी वाढला म्हणजे नेमके काय. अजून एक महत्वाची लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे बीपी हा अचानक वाढत जरी असला तरी त्यासाठी शरीरात बदल हे अनेक वर्षांपासून चालू झालेले असतात.

बीपी वाढणे म्हणजे काय ?

शरीरातील रक्त हे रक्तवाहिन्यामधून सर्व शरीरभर पसरत असते. पण या रक्तवाहिन्या चुकीच्या सवयी मुळे जसे तंबाखू, दारू मुळे बारीक होतात. जेव्हा रक्त या बारीक झालेल्या रक्तवाहिन्यांमधून वाहते तेव्हा या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जो दबाव किंवा प्रेशर येते तेव्हा त्याला बीपी वाढला किंवा हायपरटेंशन असे म्हणतात.

तर या बारीक झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे जी हायपरटेंशन ची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे पुढे अनेक गुंतागुंतीच्या क्रिया घडून याचा परिणाम अनेक अवयवांवर आणि घटकांवर होतो.

हायपरटेंशन चे कालांतराने काय परिणाम होतात ते बघा.

  • रक्तवाहिन्या/धमन्यांचे नुकसान– खूप काळासाठी उच्चरक्तदाब सारखी स्थिति कायम राहिल्यास धमन्यांच्या भिंतींना नुकसान होऊन त्या अरुंद होतात. अरुंद झाल्यामुळे तिथून रक्तप्रवाह होण्यास अवरोध निर्माण होतो. या अवरोधामुळे जड कण जसे fats, lipids, cholesterol हे तिथेच जमा होतात आणि plaques म्हणजेच blockages निर्माण करतात.
  • ह्रदयाचे नुकसान –अरुंद झालेल्या रक्तवाहिन्यांच्या भिंती यामुळे पूर्णपणे रक्तपुरवठा होऊ शकत नाही. याचमुळे ह्रदयाला नेहमी जास्त रक्त पुढे ढकलण्यासाठी नेहमी परिश्रम करावे लागतात. परिणामी ह्रदयावर अतिरिक्त ताण येतो ज्यामुळे ह्रदयाच्या स्नायूंना आणि त्याच्या इतर रचनांना नुकसान होते.
  • इतर अवयव यांचे नुकसान– दीर्घ काळासाठी उच्च रक्तदाब स्थिति कायम राहिल्यास त्याचा परिणाम डोळे, मूत्रपिंड आणि मेंदू सारख्या अवयवांवर होतो. त्यात विशेषतः मूत्रपिंडावर परिणाम झाल्यास त्यामुळे उच्च रक्तदाब अधिक वाढतो. असे एक चक्र सुरू होते.

संबंधित वाचा- उच्च रक्तदाब कमी करण्याचे उपाय.
संबंधित वाचा- अचानक बीपी म्हणजे उच्च रक्तदाब वाढल्यावर काय करावे ?

२. कोलेस्टरॉल

कोलेस्टरॉल म्हणजे एक प्रकारचे फॅट असते. हे आपल्याला अन्न घटकांमधून मिळत असते. याचे अधिक सेवन केल्यास हेच कोलेस्टरॉल पुढे plaques म्हणजेच blockage तयार करतात. हे ब्लॉक रक्तवाहिन्यांमद्धे जाऊन रक्तपूरवठ्यासाठी अवरोध निर्माण करतात.

संबंधित वाचा- कॉलेस्ट्रॉल कमी करण्या साठी प्रभावी घरगुती उपाय

३. मधुमेह

मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या रक्तामद्धे साखरेचे प्रमाण अधिक असते. जेव्हा हे रक्त शरीरभर प्रवाह करत असते तेव्हा ते रक्तवाहिन्यांच्या संपर्कात येत असते. पण जर मधुमेह अनियंत्रित असेल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक राहिले तर कालांतराने रक्तवाहिन्यांना अतिरिक्त साखरेमुळे इजा पोचते.

परिणामी रक्तवाहिन्या यांच्या कडा म्हणेच भिंती या अरुंद होतात ज्यामुळे हायपरटेंशन सारखी परिस्थिति उद्भवते. जर हेच हायपरटेंशन जास्त दिवसांसाठी राहिले तर पुढे काय होते हे आपण बघितले आहेच.

संबंधित वाचा- मधुमेह किंवा डायबेटिस म्हणजे नेमके काय ?
संबंधित वाचा- मधुमेह किंवा डायबेटिस होण्याची कारणे कोणकोणती ?

४. लठ्ठपणा

लठ्ठपणा किंवा जास्त वजन असणे हे बऱ्याच घटकांना कारणीभूत ठरते ज्यामुळे ह्रदयसंबंधी आजार उद्भवू शकतात. विशेषता कंबरेभोवती अतिरिक्त चरबी असेल तर याचा धोका अधिक वाढतो.

या लठ्ठपणा मुळे अशा काही परिस्थिति निर्माण होतात की ज्यामुळे तुम्हाला मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या समस्यांना सामोरे जावू लागू शकते. पुढे हेच रक्तदाब आणि मधुमेह हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात.

संबंधित वाचा – वजन किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी

५. आनुवंशिकता

आनुवंशिकता हा घटक ह्रदयासंबंधी आजारांना किंवा हार्ट अटॅक येण्यासाठी लक्षणीयरीत्या कारणीभूत ठरत असतो. ज्या व्यक्तींच्या आई किंवा वाडिलांमद्धेह्रदयासंबंधीत कोणताही आजार असेल तोच आजार मुलांमध्ये देखील असण्याचे प्रमाण अधिक असते.

या पद्धतीने आपण हार्ट अटॅक कशामुळे येतो या शीर्षकाखाली हार्ट अटॅक येण्याचे काही महत्वाचे कारणे आणि त्याबद्दल सविस्तर माहिती बघितली आहे.

शेवट

आता हार्ट अटॅक किंवा तत्सम ह्रदयविकार संबंधित समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. याचे मुख्य कारणे बदलत जाणारी जीवनशैली, तणाव, आहार हे आहेत. याची अनेक कारणे जरी असली तरी त्याविषयी खबरदारी घेतल्यास हे आजार उद्भवण्याचे प्रमाण नक्कीच कमी होते. गरज आहे ती यासाठी पावले उचलण्याची.

शेवटी या ह्रदयाचे आणि शरीराचे आरोग्य आहे तुमच्याच हातात आहे. सोप्या आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही याची काळजी घ्यायला सुरुवात करू शकता. नियमित व्यायाम, संतुलित आहार त्यासोबत सर्वात महत्वाचे आहे ते तणाव व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणी. हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

तेव्हा आजच तुमच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करण्याचा निर्णय घ्या. काही शंका असेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टर शी याबद्दल बोलू शकता. किंवा अगदी मला सुद्धा कमेन्ट करून तुमच्या शमस्या विषयी सांगू शकता आणि इतर बाबी शेअर करू शकता.

माझा हा लेख आवडला असेल किंवा माझ्या मजकूरविषयी काही सल्ला द्यायचा असल्यास माझ्याशी संपर्क करा किंवा कमेन्ट करा. धन्यवाद !

FAQ’s

तरुणांना हार्ट अटॅक येऊ शकतो का ?

नक्कीच, तरुणांना हार्ट अटॅक येऊ शकतो.

छातीत दुखणे हे हार्ट अटॅक चे एकमेव लक्षण आहे का ?

नाही. छातीत दुखणे हे हार्ट अटॅक चे एकमेव लक्षण नाही.हार्ट अटॅक येतो तेव्हा अनेक प्रकारची लक्षणे जाणवू शकतात. जसे उलटी, मळमळ, जबडा दुखणे, डोके दुखणे आणि इतर.

कोलेस्टेरॉलची पातळी कशी कमी करावी ?

कोलेस्टेरॉलची पातळी निरोगी आहार, नियमित व्यायाम, तंबाखू, दारू सेवन टाळून कमी करावी.

हार्ट अटॅक आल्याची शंका असल्यास काय करावे ?

हार्ट अटॅक आल्याची शंका असल्यास अगोदर रुग्णाला बसायला नाहीतर झोपायला सांगावे त्यांनंतर अत्यायिक वैद्यकीय सेवेला कॉल करून अॅम्ब्युलेन्स मागवून रुग्णाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जावे.

हृदयविकाराच्या झटक्याची 4 मूक चिन्हे कोणती आहेत?

हृदयविकाराच्या झटक्याची 4 मूक चिन्हे आहेत छातीत दुखणे, श्वास लागणे, उलटी किंवा मळमळ होणे आणि अचानक घाम सुटणे.