HEALTHBUSS

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे | Vajan kami karnyasathi Ayurvedic Aushadhe

Last updated on July 25th, 2024 at 04:27 pm

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे वापरण्याचा कल अलीकडील काही दिवसांमध्ये वाढला आहे. कमीतकमी दुष्परिणाम असणारे आणि तेवढेच प्रभावी असणारे हे उपचार असतात आणि समजामधील सर्वच वर्गांमध्ये वाढत जाणारे लठ्ठपणा चे प्रमाण हे या मागचे दोन मुख्य कारण आहे असे मला वाटते.

लठ्ठपणा एक आरोग्य विषयक समस्या राहिली नसून एक जागतिक महामारी झालेली आहे. त्यामुळे जगभरात कित्येक लोक या समस्येने ग्रासलेले असताना त्यांना अनेक आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आज अनेक पद्धती, औषधे आणि घरगुती उपचार आहे. ज्याला जो लागू होईल त्याचा उपयोग करून वजन कमी करण्याचे प्रयत्न करत आहे. पण बऱ्याच पद्धती या तुम्हाला अपायकारक ठरू शकतात ज्याचे reactions, साइड इफेक्टस वगैरे असू शकतात.

अशा वेळी आपण आयुर्वेदकडे वजन कमी करण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय म्हणून बघितले पाहिजे. एवढेच नव्हे तर वजन वाढवण्यासाठी देखील आज व्यापक प्रमाणात आयुर्वेद पद्धतीचा वापर केला जातो.

जर तुम्हीही हाच विचार करत असाल तर त्याबद्दल संपूर्ण माहिती या ब्लॉग मध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहे. वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे कोणती, त्या औषधी कशा काम करतात वगैरे बद्दल माहिती या ब्लॉग मध्ये तुम्हाला जाणून घेता येतील.

पण त्या अगोदर तुम्हाला त्या अनुषंगाने काही गोष्टी माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

आयुर्वेद आणि लठ्ठपणा

आयुर्वेद ही भारताची एक प्राचीन परंपरा आणि उपचार पद्धती आहे. या आयुर्वेदाचे संपूर्ण ज्ञान हे अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळते. याच ग्रंथांमधील ज्ञान वापरुन आपल्या देशात आणि जगभरात देखील आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा उपयोग आज केला जात आहे.

संपूर्ण आयुर्वेद उपचार पद्धती ही वात, पित्त आणि कफ या तीन दोषांवर केंद्रित असते. तुमच्या शरीरात किंवा मनामध्ये काहीही विकार किंवा आजार उत्पन्न झालेले असतील तर ते या तीन दोषांच्या दूषित होण्यामुळे किंवा असमतोल होण्यामुळेच झालेले असतात. वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे यांचा विचार करत असताना या दोषांचा विचार करणे सुद्धा गरजेचे ठरते.

तेव्हा आयुर्वेदानुसार, तुमचे आरोग्य चांगले राखण्यासाठी या तिन्ही दोषांचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे.

जेव्हा वजन व्यवस्थापन म्हणजेच वजन कमी करण्याचा विचार केला जातो तेव्हा कफ दोष लक्षात ठेवून त्यावर चिकित्सा करणे महत्वाचे ठरते. कारण कफ दोषाच्या वाढण्यामुळे किंवा कफ दोषाचे प्रमाण बिघडल्यामुळे तुमच्या शरीराचे वजन वाढायला लागते.

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे कोणती आणि त्यांची कार्य कोणती

1. त्रिफळा

आयुर्वेद मध्ये अत्यंत प्रभावी मानली जाणारी ही त्रिफळा औषधी आहे. त्रिफळा ही तीन आयुर्वेदिक वनस्पति यांचे मिश्रण करून तयार केलेली आयुर्वेदिक औषधी आहे. यामधे खालील वनस्पति असतात.

  • आमलकी
    शास्त्रीय नाव –Emblica Officinalis (एंब्लिका ऑफिशिनालिस)
  • बिभिताकी
    शास्त्रीय नाव-Terminalis Bellirica (टर्मिनेलिया बेलिरिका)
  • हरिताकी
    शास्त्रीय नाव- Terminalis Chebula (टर्मिनेलिया चेबुला)
vajanvadhavnyasathi ayurvedik aushadhe

या त्रिफळा औषधीचे मुख्य कर्म आहे पाचन. पाचन क्रिया सुधारणे आणि पाचन वाढणे. हेच पाचन कार्य आपल्या वजन कमी करण्याच्या क्रियेला आधारभूत ठरत असते.

वजन वाढणे किंवा कमी होणे यासाठी अत्यंत महत्वाचा आणि अनिवार्य घटक हा पचन आहे. आपण खाल्लेले अन्न हे अन्न मार्गात जाते आणि तिथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अन्न घटकांचे शोषण होते आणि ते पोषक घटक आपल्याला शरीराच्या वृद्धी आणि विकास यासाठी मदत करतात. आता ही झाली नैसर्गिक क्रिया किंवा नैसर्गिक पचनप्रक्रिया.

पण काय होते जेव्हा हीच पचनप्रक्रिया काही कारणांमुळे बिघडते. पचनक्रिया कशामुळे बिघडते ही माहिती या ब्लॉग मध्ये बघू शकता. जेव्हा ही पचनक्रिया बिघडते तेव्हा पचनाची एकंदर सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडत नाही.

मग होते असे की तुम्ही जे अन्न खाता ते अन्न मार्गवाटे विविध अवयव मध्ये जाऊन तेथील त्यांच्या पचनाची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. परिणामी अन्न जास्त काळासाठी त्या ठराविक अन्न मार्गामध्येच राहते. यामुळे आम दोष तयार होतो आणि ते अन्न शरीरात चरबी वाढवण्याचे काम करत राहते.

याचसाठी पचन हा घटक वजन कमी करणे किंवा वजन वाढणे या संबंधी खूप महत्वाचा घटक ठरतो. तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध मध्ये व्यक्तीची पचन अवस्था हा घटक लक्षात घ्यावा लागतो.

त्रिफळा कसे वजन कमी करण्यास मदत करते याची माहिती थोडक्यात बघूया.

  • त्रिफळा औषध अन्न पाचन करण्यासाठी उपयुक्त काही महत्वाचे enzymes अन्न मार्गात उत्तेजित करते. यामुळे पचन क्रियेला वेग येतो आणि अन्न पचन होण्यास मदत मिळते.
  • प्रक्रिया झालेले अन्न घटक आणि त्यातून विघडीत झालेल पोषक द्रव्य, घटक यांचे पूर्णपणे शोषण करते.
  • उरलेले अन्न घटक यांना मलमूत्र मार्गवाटे व्यवस्थित बाहेर ढकलते.

एकंदरीतच काय तर जेव्हा अन्नाचे व्यवस्थित पचन आणि त्यानंतर शोषण होईल तेव्हा तुमच्या शरीर आणि मनाचा विकास देखील होईल आणि या घटकांना चरबी तयार करण्यापसून प्रतिबंधित करता येईल.

अशा आणि इतर अनेक कार्यामुळे त्रिफळा वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध मध्ये एक उत्तम आयुर्वेदिक पर्याय आहे. या त्रिफळा औषधाचे खालील पर्याय बाजारात भेटतात.

  • त्रिफळा पाऊडर/त्रिफळा चूर्ण.
  • त्रिफळा टॅब्लेट/त्रिफळा कॅप्सुल.
  • त्रिफळा ज्यूस.

त्रिफळा इथे खरेदी करा- त्रिफळा चूर्ण, त्रिफळा टॅब्लेट

2. गुग्गुल

गुग्गुल ही सुद्धा एक प्राचीन आणि प्रभावी अशी आयुर्वेदिक वनस्पति आहे. गुग्गुल चे शास्त्रीय नाव Commiphora wightii असे आहे.

Commiphora wightii या औषधी झाडांपासून नैसर्गिक स्वरूपात एक रेसिन मिळते त्याला गुग्गुल असे म्हणतात. या गुग्गुल मध्ये गुग्गुलस्टेरोन्स (gugglesterones) नावाचे एक सक्रिय असे रासायनिक द्रव घटक असते. याच रासायनिक घटक बद्दल आपण पुढे माहिती बघणार आहोत कारण हे रासायनिक घटक आपल्याला वजन कमी करण्यास मदत करत असते.

शरीरातील वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीरातील चरबीचे म्हणजेच जमा झालेल्या फॅट्स चे पचन होणे गरजेचे आहे. शास्त्रीय भाषेत याला लिपीड म्हणतात. लिपीड हे एक फॅट्स चे स्वरूप असते जे तुमची चरबी वाढवते आणि वजन वाढवण्यास कारणीभूत ठरत असते.

हे गुग्गुलस्टेरोन्स शास्त्रीयदृष्ट्या खूप महत्वाचे एक रासायनिक घटक आहे. गुग्गुलस्टेरोन्स हे या लिपीड चे पचन करण्यास महत्वाची भूमिका बाजावते. हे गुग्गुलस्टेरोन्स अनेक शारीरिक क्रियांवर प्रभाव करू शकते. अभ्यासातून असे आढळले आहे की गुग्गुलस्टेरोन्स हे thyroid ग्रंथीवर देखील अत्यंत प्रभावशाली असा घटक आहे.

आता इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे की जेव्हा गुग्गुलस्टेरोन्स हा घटक thyroid ग्रंथीवर परिणाम करतो तेव्हा thyroid या ग्रंथीचे कार्य सुधारते. परिणामी यामुळे शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच metabolism वाढते. अर्थातच जेव्हा शरीराची metabolism प्रक्रिया वाढेल तेव्हा शरीरातील calories देखील वेगाने कमी होतील.

शेवटी, गुग्गुल आणि त्याचे सक्रिय घटक, गुग्गुलस्टेरोन्स, थायरॉईड कार्यास समर्थन देऊन आणि चयापचय म्हणजेच metabolism वाढवून वजन नियंत्रण करण्यात मदत करते. या आणि अशा अनेक कारणांमुळे गुग्गुल वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध यामध्ये प्रभावी पर्याय म्हणून वापरतात.

वजन नियंत्रण करण्यासाठी गुणकारी असे मेदोहर गुग्गुल इथे खरेदी करा

3.अश्वगंधा

चिंता किंवा नैराश्य हे बऱ्याच आजारांना निमंत्रण देऊ शकते. पण तुम्हाला माहिती आहे का की स्ट्रेस हॉरमोन नावाची एक गोष्ट असते. म्हणजे स्ट्रेस किंवा नैराश्य निर्माण करणारे काही रासायनिक द्रव शरीरात निर्माण होत असतात. जेव्हा जेव्हा हे द्रव पदार्थ शरीरात निर्माण होतात त्या वेळी आपल्याला नैराश्य सारखी भावना येत असते म्हणून यांना स्ट्रेस हॉरमोन म्हणतात.

आता तुम्हाला वाटत असेल या स्ट्रेस हॉरमोन वगैरे गोष्टींचे इथे काय संबंध.

स्ट्रेस हॉरमोन मध्ये cortisol नावाचे हॉरमोन महत्वाचे आहे. वजन कमी करणे म्हणा किंवा वजन वाढवणे म्हणा, या cortisol हॉरमोन ची महत्वाची भूमिका असते. शरीरात अधिक प्रमाणात cortisol हॉरमोन ची पातळी ही तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढवण्यास जबाबदार असा घटक समजली जाते. विशेष करून ज्या व्यक्तिमद्धे पोटाच्या भागामध्ये चरबीचे प्रमाण अधिक असेल तर त्याला cortisol हॉरमोन जबाबदार असू शकते.

अशा परिस्थिति मध्ये अश्वगंधा ही वनस्पति उपयोगी येणारी आहे. या आयुर्वेदिक वनस्पति चे शास्त्रीय नाव Withania Somnifera असे आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी ही वनस्पति आहे.

vajanvadhavnyasathi ayurvedik aushadhe

वजन नियंत्रण करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी ही औषधी वनस्पति प्रत्यक्ष पणे चरबी कमी करत नसली तरी अप्रत्यक्षपणे मदत नक्कीच करते.

ही वनस्पति शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या तणावांशी जुळवून घेण्यास मदत करते. तणाव कमी करून आणि त्याच्याशी संबंधित वाढलेली कोर्टिसोल ची पातळी कमी करून अश्वगंधा वनस्पति वजन नियंत्रण करण्यास मदत करते.

शेवटी, अश्वगंधा जरी थेट चरबी जाळत नसेल तरी कोर्टिसोलची पातळी कमी करण्याची त्याची क्षमता आणि तणाव-कमी करणारे गुणधर्म यामुळे वजन नियंत्रण करण्यासाठी नक्कीच एक प्रभावी आयुर्वेदिक औषधी बनू शकते.

बेस्ट अश्वगंधा खरेदी करा- अश्वगंधा चूर्ण, अश्वगंधा टॅब्लेट

4. त्रिकटू

त्रिफळा प्रमाणेच ही त्रिकटू औषधी देखील तीन आयुर्वेदिक वनस्पति मिळून तयार केलेली असते. प्रथम आपण हे तीन आयुर्वेदिक वनस्पति कोणती ती बघूया.

  • काली मिरच (Black Pepper).
    शास्त्रीय नाव-Piper Nigrum
  • पिपली (Long Pepper).
    शास्त्रीय नाव-Piper Longum
  • सुंठ (Zinger).
    शास्त्रीय नाव-Zingiber Officinale

या औषधी चे नाव ऐकूनच तुम्हाला कळले असेल की हे औषध पचन संबंधित प्रभावी असणार आहे. त्रिकटू ही नक्कीच पचन संबंधित विकारांवर पहिला पर्याय म्हणून बघितले जाते. त्रिफळा च्या वेळी आपण बघितले आहे की पचन हा घटक वजन कमी करणे किंवा वजन वाढणे यासाठी कसा उपयुक्त ठरतो.

याच संबंधी अजून थोडी माहिती घेऊया.

वैज्ञानिक अभ्यास झाला त्यावेळी असे आढळून आले की काळी मिरीमधील सक्रिय संयुग द्रव आहे, ज्याचे नाव पाइपरिन आहे जे थर्मोजेनेसिस क्रिया (thermogenesis) वाढवू शकते. थर्मोजेनेसिस म्हणजे उष्णता निर्माण करण्याची प्रक्रिया. या द्वारे शरीर उष्णता निर्माण होऊन आणि कॅलरी बर्न होत राहते .या वाढलेल्या थर्मोजेनेसिसमुळे calories अधिक प्रमाणात खर्च होतात आणि चरबी कमी होते.

त्याच प्रकारे लांब मिरचीमध्ये पाइपरलोंगुमाइन नावाचे एक रासायनिक घटक असते, ज्याचा चयापचय म्हणजेच metabolism वर परिणाम होऊ शकतो. Metabolism वाढल्यानंतर चरबी कशी कमी होते याबद्दल माहिती आपण वर बघितली आहे. याच त्रिकटू आणि वजन या अनुषंगाने तुम्हाला आयुर्वेद मध्ये अग्नि म्हणजे काय हे देखील माहिती हवे.

आयुर्वेदात “अग्नी” या संकल्पनेचा अर्थ पाचक किंवा अन्नाचे पचन आणि चयापचय करण्याची कार्यक्षमता दर्शवण्यासाठी घेतात. जेवढा अग्नि बलवान असेल तेवढी त्या व्यक्तीची पचनक्रिया मजबूत असेल. त्रिकटू औषधी ही अग्नि वाढवते.

जेव्हा अग्नी मजबूत आणि कार्यक्षम असतो, तेव्हा शरीर अधिक प्रभावीपणे अन्नाचे विघटन करू शकते, आवश्यक पोषक घटक काढू शकते आणि कार्यक्षमतेने कचरा काढून टाकू शकते.

शेवटी आयुर्वेदिक औषधे हे वजन कमी करण्यासाठी एक उत्तम प्रभावी आणि सुरक्षित उपचार पद्धती किंवा पर्याय नक्कीच असू शकतो. पण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की कोणताही एक उपाय जादूचा उपाय नाही. स्थायी परिणाम जर मिळवायचे असतील तर संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणाव व्यवस्थापन वगैरे गोष्टी चालूच ठेवाव्या लागतील.

शेवटाला आपण वजन कमी करण्यासंदर्भात काही अजून गोष्टींचा ऊहापोह घेऊ.

वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय

  • लिंबू पाणी– चयापचय म्हणजेच metabolism वाढविण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी एका ग्लास कोमट पाण्यात लिंबू टाकून आणि ते पिऊन आपल्या दिवसाची सुरुवात करा.
  • ग्रीन टी– साखरयुक्त चहा ग्रीन टीने बदला, जे चरबी जाळण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते.
  • ऍपल सायडर व्हिनेगर– जेवणापूर्वी एक चमचा ACV म्हणजेच ऍपल सायडर व्हिनेगर घ्या. हे भूक नियंत्रित करण्यास आणि रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत करू शकते.
  • मध आणि दालचिनी– कोमट पाण्यात मध आणि दालचिनी मिसळल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • आल्याचा चहा– आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात जे चयापचय वाढवू शकतात आणि भूक कमी करू शकतात.
  • कोरफड (Aloe Vera)– कोरफड चा रस शरीर detoxify करते आणि पचन क्रिया सुधारते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. यासाठी रोज याचे सेवन करा.

संबंधित वाचा – कोरफड खाण्याचे फायदे

पोटाची चरबी किंवा वजन कमी करण्यासाठी काय खावे?

  • प्रथिने (lean protein)– आपल्या आहारात चिकन, मासे, टोफू आणि शेंगा यांसारख्या अन्न घटकांचा समावेश करा. प्रथिने तुम्हाला पोट भरल्याची भावना देतात आणि चयापचय वाढवतात.
  • संपूर्ण धान्य– तपकिरी तांदूळ, क्विनोआ आणि संपूर्ण गव्हाची ब्रेड यांसारखे संपूर्ण धान्य निवडा. ते पोट भरण्यासाठी महत्वाची असतात. तसेच ऊर्जा आणि फायबर देखील देतात.
  • फळे आणि भाज्या– रंगीबेरंगी फळे आणि आणि हिरव्या भाज्या नियमित खात रहा. त्यामध्ये कॅलरी कमी आहेत, पोषक तत्वे जास्त आहेत आणि आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे त्यापासून मिळत राहतात.
  • हेल्दी फॅट्स– अॅव्होकॅडो, नट आणि ऑलिव्ह ऑइल सारख्या स्रोतांचा समावेश करा. हे fats संपूर्ण आरोग्यास समर्थन देतात आणि तुम्हाला जास्त वेळ समाधानी ठेवतात.

थोडक्यात

आयुर्वेद नक्कीच वजन कमी करण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. आयुर्वेद नुसार कोणताही आजार बरा होण्यासाठी जसा वेळ लागतो तसाच वजन कमी करण्यासाठी देखील लागेल. पण यामध्ये तुम्हाला त्याचे कमीत कमी दुष्परिणाम आणि जास्त वेळेसाठी परिणाम बघायला मिळेल. यामध्ये मी तुम्हाला आयुर्वेद मध्ये सर्वाधिक प्रभावी असणारे त्रिकटू, त्रिफळा, गुग्गुल आणि अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधांची माहिती वजन कमी होण्याच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केला.

ही सर्व औषधे स्वतःहून न घेता आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच या औषधांचा वापर करायचा आहे. या संबंधी इतर समस्या आणि काही प्रश्न असतील तर कमेन्ट करून नक्की विचारू शकता. तसेच ब्लॉग आवडला असेल तर कमेन्ट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.

FAQ’s

वजन कमी करण्यासाठी काय खावे

वजन कमी करण्यासाठी कमी calories चे जेवण,पौष्टिक आहार,दैनंदिन व्यायाम करावा.


वजन कमी करण्यासाठी मी धान्य टाळावे का?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही धान्य टाळण्याची गरज नाही. तरी देखील काही धान्य जसे गहू,पांढर भात यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

लवकर वजन कमी करण्यासाठी काय करावे?

लवकर वजन कमी करण्यासाठी तुम्ही शक्य तेवढ्या कमी calories सेवन करा. यामुळे calorie deficit तयार होऊन वजन कमी होण्यास मदत होईल.


एका महिन्यात 10 किलो कसे कमी करावे?

एका महिन्यात 10 किलो वजन कमी करणे मला वाटते सुरक्षित नाही. त्यापेक्षा खूप अवघड अशी ही गोष्ट आहे. यासाठी तुम्हाला किमान रोज 10 ते 15 हजार calories कमी कराव्या लागतील. त्यापेक्षा दर आठवड्याला अर्धा ते एक किलो वजन कमी केल्यास सुरक्षित आणि फायदेशीर आहे.

कोणते अन्न वजन कमी करण्यास मदत करते?

वजन कमी करण्यास मदत करणारे अन्न यामध्ये कमी calories असणारे अन्न पदार्थ घेणे आवश्यक आहे. यामध्ये फळे,हिरव्या पाले भाजी संपूर्ण धान्य (गहू,पांढरा भात वगळता) हे पदार्थ येतात.