(संत्री खाल्ल्याने काय होते, संत्र्याचा रस उच्च रक्तदाबसाठी चांगला, वजन कमी करण्यासाठी संत्र्याचा रस, संत्र्याची साल, संत्र्याच्या साली, santri jati in marathi,santri in marathi, santri khanyache fayde, santri khanyache fayde in marathi, orange khane ke fayde in marathi, santri khane ke fayde in marathi)
संत्री हे फळ सर्वांचेच आवडते आहे. चविष्ट आणि पोषक तत्व यांनी भरलेले असे हे फळ सर्वांना सर्वकाळ उपलब्ध असते. तरी ही जर तुम्ही संत्री खाण्याचे टाळत असाल तर तुम्ही चूक करत आहात. कारण संत्री खाण्याचे फायदे अनेक आहेत. तुम्हाला जर संत्री आवडत नसेल आणि जर तुम्ही संत्री आवडीने खाणारे आहात तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्यासाठी आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला संत्री खाण्याचे फायदे काय आहेत, त्याच बरोबर त्या संबंधी होणारे नुकसान आणि त्या अनुषंगाने इतर महत्वाची माहिती जाणून घेता येणार आहे.
संत्री विषयी माहिती
संत्री फळ हे सिट्रस प्रजातीतील (लिंबूवर्गीय) फळांपैकी एक आहे. सिट्रस प्रजातीतील इतर फळांमध्ये मोसंबी आणि लिंबू येतात. पण संत्री हे लिंबूवर्गीय मध्ये सर्वाधिक लोकप्रिय असे फळ आहे. किंबहुना जगात लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनमद्धे ७० टक्के उत्पादन हे संत्री चे होते.
संत्री चे झाड हे शंकू आकाराचे, बिनकाटेरी आणि मध्यम आकाराचे असते. पाने ही गडद हिरवी आणि फुले पांढऱ्या रंगाचे पण छोटी असतात.
संत्री चे प्रकार
संत्री चे अनेक प्रकार आहेत. सर्व प्रकारांचे कमी अधिक प्रमाणात सारखेच आरोग्य फायदे आहेत. साधारण सर्वच संत्री हे विटामीन सी ने भरपूर असतात आणि त्याच सोबत त्यात असतात बरेच अँटिऑक्सिडंट्स (antioxidants). याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती बघणार आहोत.
भारतामध्ये संत्री चे काही प्रकार लोकप्रिय आहेत. तेच काही प्रकार आपण इथे बघणार आहोत.
- नागपुरी संत्री – जगामध्ये सर्वात लोकप्रिय असा हा प्रकार आहे. महाराष्ट्रात विदर्भ या भागात या संत्री ची लागवड अधिक होते.
- खासी– नागपुरी संत्री जेवढी आंबट आणि गोड असतात त्यापेक्षा थोडी कमी आंबट, गोड असणारी ही खासी संत्री. याची लागवड आसाम राज्यात जास्त केली जाते.
- कुर्ग – कुर्ग संत्री चा प्रकार दक्षिण भारतात जास्त आढळतो. विशेषकरून कर्नाटक मध्ये. याचे झाड काटेरी असतात. या प्रकारच्या झाडाला सर्वाधिक फळे येतात.
- देशी – पंजाब राज्यात या प्रकारची लागवड अधिक होते. पंजाब येथील पठाणकोट भागात याची जास्त लागवड आढळते.
- कमला– हा बंगाली लोकांचा आवडता प्रकार आहे. त्यामुळे कोलकाता शहरात जास्त प्रमाणात याचा व्यापार होतो. चवीला अत्यंत गोड पण कमी आंबट अशी ही संत्री आहे.
हे महत्वाचे ५ प्रकार भारतामध्ये लोकप्रिय आहेत.
संत्री खाण्याचे फायदे
संत्री बद्दल सर्वांना माहीत असणारी एक माहिती म्हणजे त्या मध्ये असणाऱ्या विटामीन-सी (vitamin C) चे प्रमाण. संत्री मध्ये भरपूर प्रमाणात विटामीन सी (vitamin C) आढळते. त्याचबरोबर इतर पोशाक घटक जसे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स (antioxidants) सुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात.
एका संत्री मध्ये कोणते पोषक तत्व किती असतात याची माहिती बघायची झाल्यास खालील तक्ता तुम्हाला बघावा लागणार आहे.
कॅलरीज | 66 |
पाणी | वजनाने 86% |
प्रथिने | 1.3 ग्रॅम |
कर्बोदके | 14.8 ग्रॅम |
साखर (शुगर) | 12 ग्रॅम |
फायबर | 2.8 ग्रॅम |
फॅट | 0.2 ग्रॅम |
व्हिटॅमिन सी (Vitamin C) | दैनंदिन गरजेच्या 92% |
फॉलिक अॅसिड | दैनंदिन गरजेच्या 9% |
कॅल्शियम | दैनंदिन गरजेच्या 5% |
पोटॅशियम | दैनंदिन गरजेच्या 5% |
यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की एक संत्री खाल्ल्यावर साधारण कोणते आणि किती पोषक मूल्य तुम्हाला भेटत असतात.
संत्री मधील पोषक तत्व यांची माहिती बघितली. जसे की विटामीन सी किती आहे, फायबर किती आहे वगैरे. आता पुढील भागामध्ये आपण त्या पोषण तत्वानुसार संत्री खाण्याचे फायदे काय आहेत आणि त्या पोषक घटकांचा आपल्याला शरीराला कसा उपयोग होतो.
१. पचन विकार कमी होतात
संत्री मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते हे आपण जाणून घेतले. आपल्याला दिवसभर जेवढ्या फायबर ची आवश्यकता आहे त्या पैकी 10 टक्के फायबर आपल्याला संत्री मधून मिळत असते असते. या फायबर चा सर्वाधिक उपयोग होतो तो तुमच्या पचन संबंधी तक्रारी मध्ये.
तुमच्या पचन संबंधी समस्या जसे की पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता), मूळव्याध, सतत करपट ढेकर येणे ढेकर येणे, अॅसिडिटी होणे, जास्त भूक लागणे ज्यामुळे तुमचे वजन वाढायला सुरुवात होते, या सर्व समस्यांमध्ये संत्री मधील फायबर घटक उपयोगी ठरतो.
याला थोडं अजून सविस्तर पण समजून घेऊया.
- जेव्हा कचरा म्हणजेच खराब अन्न आणि जास्त वेळ बाहेर न पडणार अन्न पचनाच्या सिस्टीममध्ये बराच काळ टिकून राहते तेव्हा तुमच्या पंचनसंस्थे मध्ये एक प्रकारची अस्वस्थता येते. आपुढे चालून किंवा काही वेळा लागेच यामुळे पचनसंस्थेच्या गंभीर समस्या देखील उद्भवत असतात.
- फायबर तुमच्या स्टूलमध्ये (मल, विष्ठा) मोठ्या प्रमाणात जलयांश जोडते, ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेतून कचरा बाहेर पडणे सोपे होते. हे तुमच्या आतड्याची हालचाल नियमित आणि सोपी ठेवून मल लवकर बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे तुमचे पोट लवकर साफ होते.
- आपल्या पंचनसंस्थे मध्ये काही चांगले बॅक्टीरिया काम करत असतात. यांना गट बॅक्टीरिया (gut bacteria) म्हणतात. तुमच्या पचन संस्थेचे काम व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी हे बॅक्टीरिया महत्वाचे असतात. संत्री मधील फायबर हा घटक तुमच्या गट बॅक्टीरिया साठी खाद्य पुरवण्याच काम करतो. जेवढे खाद्य तुम्ही गट बॅक्टीरिया ला पुरवताल, तेवढे त्यांची वाढ होऊन तुमची पंचनसंस्था आणि त्याचे कार्य चांगले राहील.
- फायबर घटक इतर पोषक घटकांपेक्षा उशिरा पचतो. म्हणजे फायबर पचवायला इतर विटामीन, प्रोटीन वगैरे पचवण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो. यामुळे तुमचे पोट जास्त वेळेसाठी भरलेले राहते. यामुळे तुमचे वजन नियंत्रण होण्यास मदत होते. त्यामुळे जर तुमचे वजन जास्त असेल तर संत्री तुमचे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
फायबर च्या या गुणांमुळे संत्री तुमच्या पचन संबंधित बऱ्याच समस्यांना कमी करण्यासाठी एक चांगल आणि प्रभावी फळ आहे.
२. संत्री ह्रदयाचे आरोग्य सुधारतात
जगभरात ह्रदय विकार किंवा ह्रदय संबंधित आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढतच आहे. पुढे काही दिवसांत हे प्रमाण अजून वाढण्याची शक्यता आहे. पण तुम्ही जर संत्री खात असाल तर तुमची ह्रदयसंबंधित आजार होण्याचे शक्यता कमी होते. अनेक अभ्यासात असे दिसून आले की संत्री मधील अनेक घटकांमुळे तुमचे ह्रदय विकार (हार्ट अटॅक)आणि त्या साठी जबाबदार इतर घटक वाढण्याची शक्यता कमी होते.
शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉल, साखरेचे प्रमाण आणि सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन (CRP) हे तीन घटक ह्रदय संबंधित आजाराचे मुख्य कारणीभूत घटक मानले जाते. या रिसर्च आर्टिकल नुसार संत्री चे ज्यूस पिण्यामुळे हे तीनही कमी होण्यास मदत होते.
संत्री मध्ये असणारे व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड्स (flavonoids) आणि कॅरोटीनॉइड्ससह (carotenoids) हे घटक तुमच्या ह्रदयाचे आरोग्य निरोगी ठेवून ह्रदय संबंधित आजाराचा धोका कमी करतात.
एका रिव्यू स्टडी नुसार फायबर घटक हे वाढलेले कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे संत्री मध्ये असणारे भरपूर प्रमाणात फायबर हे ह्रदयांचे आजार कमी करण्यास मदत करते.
संत्री ज्यासाठी ओळखली जाते, ते विटामीन सी एक अँटीऑक्सिडंट (antioxidant) म्हणून काम करते. एका अभ्यासानुसार अँटीऑक्सिडंट ह्रदयसंबंधी आजार तर कमी करतातच पण कोणत्याही कारणांमुळे येणाऱ्या मृत्यू चा धोका सुद्धा कमी करतात.
यामधे असणारे लायकोपीन (lycopene) हे सुद्धा ह्रदयाचे कार्य सुरळीत ठेवतात.
३. उच्च रक्तदाब कमी करते
संत्री हे उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्या संबंधित विकरांना कमी करण्यास मदत करतात आणि ते होण्याचा धोका सुद्धा कमी करते.
पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये असणारे पोटाशियम (potassium) हे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या रीलॅक्स होतात आणि त्यांच्यावरील येणार दबाव कमी होऊन उच्च रक्तदाब सारखी स्थिति निर्माण होत नाही. तसेच संत्री मध्ये सोडियम नसल्यामुळे उच्च रक्तदाब होण्याचा धोका सुद्धा कमी होतो. अर्थात जर तुम्हाला उच्च रक्तदाब (हाय बीपी) ची समस्या असेल आणि त्यासाठी औषधोपचार चालू असतील संत्री तूच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
दूसरा गोष्ट अशी आहे की यामध्ये असणारे विशेष प्रकारचे अँटीऑक्सिडंट. हेस्पेरिडिन (Hesperidin) आणि नारिंजेनिन (Naringenin) हे विशेष प्रकारचे अॅंटीआक्सिडेंट संत्री मध्ये आढळतात.
- एका अभ्यासानुसार हेस्पेरिडिन (hesperidin) संत्र्यांमधील मुख्य अँटिऑक्सिडंट्सपैकी एक आहे. त्यामुळे हे शरीरात रक्तदाब कमी करण्याचे काम करते.
- दुसऱ्या एका अभ्यासानुसार यामध्ये असणारे नारिंजेनिन (naringenin) चे सुद्धा अनेक आरोग्य फायदे आहेत. हे सुद्धा तुमचा वाढलेला रक्तदाब कमी करतात.
४. ग्लोविंग स्कीन साठी उपाय म्हणून संत्री चा वापर
संत्री हे फळ त्या मध्ये असणारे भरपूर प्रमाणात विटामीन सी साठी ओळखले जाते. यूएसडीए नुसार शरीराला दैनंदिन विटामीन सी ची जेवढी गरज असते तेवढे विटामीन सी एक संत्रीमधून मिळत असते.
या विटामीन सी चे अनेक आरोग्य फायदे आहेत.
2017 मध्ये NUTRIENTS जर्नल मध्ये प्रकाशित आर्टिकल नुसार विटामीन सी हे त्वचचेचे आरोग्य राखते तसेच त्वचेचे स्वरूप चांगले ठेवते. विटामीन सी चे त्वचेच्या आरोग्याच्या उपयोगाच्या बाबतीत बरेच संशोधन झाले आहे. विटामीन सी तुमच्या त्वचेमध्ये कोलेजन (collagen) ची निर्मिती करते. कोलेजन हे एक प्रकाराचे स्कीन प्रोटीन आहे. हे कोलेजन तुमच्या त्वचेला एक प्रकारे आधार देते, त्वचा निरोगी ठेवते, त्वचा फाटली असेल तर दुरुस्त करते.
जर तुम्हाला एखादी जखम झाली असेल तर ती भरून काढण्यासाठी विटामीन सी ची आवश्यकता असते. त्यामुळे संत्री तुमची जखम भरून काढण्यामद्धे सुद्धा मदत करतात.
2015 च्या एक रिव्यू स्टडी नुसार आहारात विटामीन सी चा समावेश केल्याने तुमच्या त्वचेच्या समस्या जसे की सुरकुत्या, खडबडीतपणा कमी होतो, त्वचेची लवचिकता वाढते तसेच एकंदर तुमची त्वचा निरोगि आणि ताजी दिसते.
त्यामुळे जर तुम्हाला तुमची त्वचा चांगली, निरोगी आणि फ्रेश दिसावी असे वाटत असेल तर नक्कीच तुम्ही संत्री खालली पाहिजे.
५. शुगर साठी घरगुती उपाय म्हणून संत्री वापरू शकता
डायबेटिस मध्ये सुद्धा संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमचा डायबेटिस जाणार तर नाही पण नक्कीच त्याची गंभीरता आणि त्यामुळे इतर गुंतागुंती (complications) कमी होतील.
संत्री मध्ये आपल्याला लागणाऱ्या फायबर पैकी 10 टक्के फायबर असते. हे फायबर शुगर असलेल्या रुग्णांना खूप फायदेशीर ठरते.
ऑस्ट्रेलिया मध्ये एक अभ्यास करण्यात आला होता. या मध्ये 7000 लोकांना संत्री सहित इतर फळ खाण्याच्या सूचना दिल्या होत्या.शेवटी याचा असा निष्कर्ष निघाला की या लोकांमध्ये शुगर होण्याचे प्रमाण 36 टक्क्याने कमी झाले. त्यामुळे फक्त संत्रीच नाही तर इतर फळे सुद्धा डायबेटिस साठी उपयोगी ठरतात. पण या ब्लॉग मध्ये आपण फक्त संत्री विषयी बोलणार आहोत.
अनेक दृष्टीने हे फायबर मधुमेह असलेल्या रुग्णांना फायदेशीर ठरते. 2019 मधील या अभ्यासानुसार रोज 4 ग्रॉम फायबर चे सेवन हे तुमची इंसुलिन सेनसीटीविटी सुधारून शरीरात साखरेचे प्रमाण कमी ठेवायला मदत करते. एवढे फायबर तुम्ही नाही खाऊ शकत तर काही हरकत नाही. पण संत्री मध्ये असणाऱ्या फायबर च्या प्रमाण एवढे फायबर जरी तुम्ही दररोज सेवन केले तर दीर्घ काळासाठी याचा फायदा तुम्हाला अनुभवायला मिळेल.
६. वजन कमी करण्यासाठी संत्री खाऊ शकता
संत्री नक्कीच तुमचे वजन कमी करण्यामध्ये मदत करतात. पण तुम्ही झटपट वजन कमी करण्याच्या दृष्टीने विचार करत असाल तर या बाबतीत तुमची निराशा होईल. संत्री काम अस करतात की त्याने तूमचे वजन कमी व्हायला हळू हळू सुरुवात होते आणि त्यामळे संथ गतीने तुमचे वजन कमी होते.
झटपट आणि कही महिन्याच्या कालावधीत वजन कमी करायचे असल्यास वजन कमी करण्यासाठी काय खावे, वजन कमी करण्यासाठी व्यायाम, वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे हे ब्लॉग वाचून मदत घेऊ शकता.
या भागात आपण संत्री वजन कसे कमी करतात या बद्दल तुम्हाला काही माहिती देणार आहे.
इतर पोषक घटकांपेक्षा फायबर घटक शरीरामध्ये जास्त वेळेसाठी पचवला जातो. यामुळे तुमच्या पंचणसंस्थेत फायबर घटक जास्त वेळ मुक्काम करून तुमचे पोट भरलेले ठेवतात. यामुळे तुम्हाला कमी भूक लागते आणि जास्त अन्न खाण्याचे तुम्ही टाळता. यामुळे तुमचे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष जे वजन वाढणार असते ते वाढत नाही.
या संशोधनात संशोधकांना असे आढळून लोकांनी फायबरचे सेवन वाढवल्यास त्यांचे शरीराचे वजन आणि व्हिसेरल फॅट कमी झाले आहे.
तसेच आपण बघितले संत्री मध्ये काही प्रमाणात फ्लेव्होनॉइड्स (flavonoids) सुद्धा आढळतात. हे फ्लेव्होनॉइड्स फॅट्स कमी करण्यास मदत करतात असे या संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळे संत्रीने सुद्धा तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
७. फॉलिक ऍसिड वाढवतात
फॉलिक ऍसिड हे विटामीन बी चे नाव आहे. संत्री मध्ये या फॉलिक अॅसिड चे प्रमाण भरपूर आढळते. तुमच्या पैकी काही जणांना माहीत असेल की डॉक्टर जेव्हा सांगतात तुमचे रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी आहे तेव्हा तुम्हाला फॉलिकअॅसिड चे औषध किंवा गोळ्या दिल्या जातात. याचे कारण असे आहे की हिमोग्लोबिन हा मॉलिक्यूल तयार करण्यासाठी फॉलिक अॅसिड ची गरज असते.
तसे फॉलिक अॅसिड चे फायदे अनेक आहेत.
तुमच्या आहारात पुरेसे विटामीन बी किंवा फॉलिक अॅसिड नसेल तर रक्ताचे आजार, कर्करोग आणि अगदी जन्मजात दोषही होऊ शकतात.
शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अजून एक गोष्ट लागते ते लोह (iron). संत्री मध्ये हे लोह तर नसते पण यावर झालेल्या अभ्यासानुसार यामधील असणारे विटामीन सी हे शरीराची लोह शोषून घेण्याची क्षमता वाढवते.
तेव्हा जर डॉक्टरांनी तुमचे रक्त कमी झाले असल्याचे सांगितले असेल तर संत्री तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
इथपर्यंत आपण संत्री खाण्याचे फायदे बघितले. पण संत्री हे फळ साधारण पणे सर्वांनाच आवडणारे आहे. पण यामधे असणाऱ्या घटकांमुळे संत्री खालल्यामुळे काही जणांना त्रास होऊ शकतो. याच बद्दल पुढे माहिती आपण बघणार आहोत.
संत्री कोणी खाऊ नये?
काही जणांना संत्री खाल्ल्यानंतर त्रास होऊ शकतो. तुम्ही संत्री खाण्याचे सुरुवात करणार असाल तर तुम्ही खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
- पहिली गोष्ट अर्थातच, सहाजिक तुम्हाला संत्री किंवा संत्र्याच्या ज्यूस ची एलर्जि असेल तर तुम्हाला संत्री या फळापसून दूर राहावे लागेल. अशा परिस्थिति मध्ये संत्री किंवा संत्रीचे ज्यूस घेणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.
- दुसरे म्हणजे जर तुम्हाला तीव्र प्रकारची अॅसिडिटी ची समस्या असेल तर तुम्हाला संत्री खाण्याचे टाळायचे आहे. कारण संत्री मध्ये असणारे सायट्रिक ऍसिड, एस्कॉर्बिक ऍसिड हे तुमची अॅसिडिटी वाढवतात असे अनेक संशोधनात निष्पन्न झाले आहे.
थोडक्यात निष्कर्ष
नक्कीच, संत्री आपल्या स्वयंपाकघरात असलेली बघताना आपण बऱ्याच गोष्टींकडून दुर्लक्ष करतो. ते खालल्यामुळे किती फायदे आपल्याला मिळतात या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि मग स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे हे संत्री फळ आणि त्याची आरोग्य फायदे आपण घेत नाही.
थोडक्यात सांगायचे झाल्यास संत्री हे फळ चविष्ट आहेच पण भरपूर पौष्टिक सुद्धा आहे. यामधे असणारे भरपूर प्रमाणात विटामीन, फायबर आणि नॅच्युरल शुगर हे तुमच्या दैनंदिन पौष्टिक मूल्यांची पूर्तता करतात. तसेच यामधे असणारे विटामीन सी तुमच्या त्वचेसाठी, ह्रदयासाठी उपयोगी ठरते तर यामधे असणारे फायबर हे तुमच्या पचन संबंधित आजारांना कमी करण्यात उपयोगी ठरतात.
संत्री खाण्याचे हे फायदे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहात असे समजा. संत्री खाण्याचे फायदे तुम्हाला आवडले असतील आणि ब्लॉग वरील माहिती आवडली तर कमेन्ट द्वारे नक्की कळवा. धन्यवाद.
FAQ’s
रोज संत्री खाल्ल्यास काय होते?
नियंत्रित प्रमाणात संत्री खालल्यास नक्कीच त्याचे फायदे आहे. पण अतिरिक्त प्रमाणात आणि सतत संत्री खाणे यामुळे अॅसिडिटी, मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये अतिरिक्त साखरेचे प्रमाण, अतिसार किंवा पोटाच्या समस्या होऊ शकतात.
संत्री कधी खावीत?
कोणत्याही वेळेला संत्री खाणे हे आरोग्यासाठी चांगलेच आहे. त्यामुळे विशिष्ठ वेळीच संत्री खाल्ल्याने आरोग्य फायदे मिळतात हा समज चुकीचा आहे.
संत्र्याची साल आरोग्यदायी आहे का?
संत्र्याची साल सुद्धा आरोग्यदायी आहे. कमी अधिक प्रमाणात त्याचे संत्री सारखेच आरोग्य फायदे आहेत.
संत्री फॅटनिंग करतात का?
संत्री तुमची चरबी प्रत्यक्ष रित्या कमी करत नाही पण चरबी कमी करायला नक्कीच मदत करतात.
संत्री खाल्ल्याने खोकला होतो का?
सामान्यता संत्री खाल्ल्याने खोकला होत नाही. पण जर तुम्हाला संत्री एलर्जि असेल आणि श्वसन मार्गात आजार असताना संत्री खाल्ल्यास तुम्हाला खोकल्याचा त्रास जाणवू शकतो.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Certified Nutritionist.
Experienced Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747