HEALTHBUSS

पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय: 5 उपाय -healthbuss

Last updated on May 14th, 2024 at 02:06 pm

बऱ्याच लोकांना पोटातील गॅस होण्यासंदर्भात समस्या त्यांच्या आयुष्यात कधी न कधी तर येतच असते. पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय शोधत असताना, त्यापासून आराम मिळवण्याकरता डॉक्टरांकडे चकरा, आयुर्वेदिक औषध, होमएओपॅथीची औषधे वापरणे या सर्व गोष्टी चालूच असतात.

पोटात गॅस होणे याला पोट फुगणे या घटनेशी सुद्धा जोडले जाता. काही लोकांना पोट फुगणे आणि पोटात गॅस होणे हे एकच लक्षण वाटते आणि ते काही अंशी खरे देखील आहे.

खरे सांगायचे झाले तर तुम्ही सवयी मध्ये आणि इतर काही गोष्टींमध्ये सकारात्मक बदल केला तर यावर वेगळा उपचार करण्याची गरजच नाही.

ढेकर येणे, डोक दुखणे, पोट फुगणे, पोटातून आवाज येणे अशा तक्रारी घेऊन जेव्हा रुग्ण येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक तणाव दिसून येतो. जस काय संपूर्ण जगाचे दुखणे यांच्या मागे आहेत.

असो.

वरील सांगितलेल्या सर्व तक्रारी या पोटातील गॅस मुळेच होतात. हा त्रास खूप त्रासदायक, अस्वस्थ आणि कधीकधी लाजिरवाणा ही ठरू शकतो. खासकरून त्यांच्यासाठी ज्यांना कामासाठी बाहेर जावे लागते.

पोटात गॅस होण्याची लक्षणे

तुमच्या पोटात गॅस झाला आहे हे तुम्ही कसे ओळखता. पोटात गॅस झाल्यावर तुम्हाला खालील सर्व किंवा त्यातील काही लक्षणे जाणवू शकतात:

 • करपट ढेकर येणे
 • अॅसिडिटी चा त्रास होणे
 • पोटात आग होणे
 • पोट फुगणे
 • पोटातून आवाज येणे
 • डोके दुखणे
 • करपट ढेकर येणे
 • सकाळी लवकर पोट साफ न होणे

अशा या पोटातील गॅसला बाहेर पडण्यासाठी उपाय आपण जर केलेत तर त्याचा एक चांगलाच परिणाम आपल्याला बघायला मिळेल. या ब्लॉग मध्ये आपण पोटातील जमलेला गॅस बाहेर काढण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय तसेच काही दैनंदिन दिनचर्या आणि आहार यामध्ये बदल करून हा त्रास कसा कमी करता येईल याबद्दल माहिती बघणार आहोत.

पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय

तुमच्या पोटात झालेला गॅस कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय अत्यंत उपयोगी ठरतात. यामधे तुम्हाला वेळ लागू शकतो. पण सातत्याने केलेले हे उपाय तुम्हाला दीर्घ काळासाठी आणि कायमच पोटातील गॅस पासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.

मी खाली सांगेल तेवढे सर्वच उपाय हे अगदी शास्त्रोक्त आहेत आणि फायदेशीर आहेत. यापैकी सर्व उपाय करायची तुम्हाला गरज नाही. खाली सांगितलेल्या उपायांपैकी तुम्ही २-३ उपाय करून बघितले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा बघायला मिळेल.

चला तर मग.

१. गॅस उत्पन्न करणारे अन्न पदार्थ टाळणे

पोटात गॅस होण्यासंदर्भात तुम्हाला हा मुद्दा सर्वात अगोदर लक्षात घेणे महत्वाचे आहे. तुमच्या पोटात गॅस उत्पन्न होण्यासाठी तुम्ही घेत असलेला आहार जबाबदार ठरू शकतो.

त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारातील गॅस उत्पन्न करणाऱ्या काही आहार घटकांना तुमच्या आहारातून वगळायचे आहे. मी तुम्हाला खाली काही अन्न पदार्थांची यादी दिलेली आहे. हे सर्व पदार्थ तुमच्या पोटात गॅस उत्पन्न होणाऱ्या परिस्थिति निर्माण करतात आणि त्यामुळे पोटात गॅस उत्पन्न होतो.

यामुळे तुम्हाला या संबंधित तक्रारी जसे की पोट फुगल्यासारखे वाटणे, सतत ढेकर येणे, पित्ताचा त्रास होणे, पोट साफ न होणे, सतत मूळव्याध होणे अशा इतर तक्रारी उद्भवतात.

संबंधित वाचा-मूळव्याध साठी आयुर्वेदिक औषधे

जर तुम्हाला सतत पोटात गॅस होण्याचा त्रास होत असेल आणि तो कमी करायचा असेल तर त्या यादीतील अन्न पदार्थ सेवन करण्याचे टाळा.

पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय

१. कांदा आणि लसूण

आपल्या आहारात हमखास समाविष्ट असणारे हे दोन पदार्थ आहेत. चवीसाठी किंवा मसालेदार बनवण्यासाठी यांचा उपयोग करत असताना, यांच्यामुळे होणारे अपाय याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो.

या दोन्ही पदार्थांमध्ये मध्ये fructans नावाचे रासायनिक घटक असतात. हे एक प्रकारचे carbohydrate आहे. यामुळे तुम्हाला पोटात काहीतरी भरल्यासारखी भावना येते. म्हणून काही लोक डॉक्टरांकडे पोट गच्च भरल्यासारखे वाटते अशा तक्रारी घेऊन येतात.

त्यामुळे तुम्हाला आहारात या दोन पदार्थांना टाळायचे आहे किंवा कमी प्रमाण ठेवायचे आहे.

२. तळलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे

हे धावपळीचे आयुष्य जगत असताना तळलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि वाढत असणारे जंक फूड कल्चर हे अगदी सामान्य होत चाललं आहे. पण यामुळे आपली पचन संस्था खराब होते याचे थोडेही भान आजच्या पिढीला नाहीये.

हे तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ हे तुम्ही इतर सेवन केलेल्या पौष्टिक अन्नाचे पचन मंदावते आणि यामुळे गॅस मग उत्पन्न होतात. यामध्ये चिप्स, केक, आइसक्रीम, ब्रेड, चॉकलेट, बर्गर, वडापाव अशा पदार्थांचा समावेश असतो. याव्यतिरिक्त यामध्ये इतर दुग्धजन्य पदार्थ ज्यावर प्रक्रिया केळी जाते ही सर्व अन्न पदार्थ तुम्हाला टाळायची आहेत.

३. मसालेदार पदार्थ

आपल्या भारतामध्ये मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यात महाराष्ट्रात झणझणीत मिसळ, वडापाव सोबत मिरच्या आणि तडका दिलेल्या भाज्या खालल्याशिवाय आपले पोट भरत नाही.

ठीक आहे, लोकांची आवड असते. खाऊ शकता. पण लोक अति तिथे माती करतात. तुम्ही या सर्व गोष्टी नियंत्रित ठेवून करू शकता.

या मसालेदार पदार्थांचे पुन्हा पुन्हा सेवन केल्यास याचे नक्कीच अपाय होणार. या मसालेदार पदार्थांमध्ये जे preservatives मिसळलेले असतात त्यामुळे पोटात अस्वस्थता किंवा पचन संबंधित अस्वस्थता वाढते. त्याला आपण पोट बिघडणे म्हणतो.

त्यामुळे पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय शोधत असताल तर मसालेदार पदार्थ कमी करा.

४. कार्बोनेटेड ड्रिंक्स (Carbonated drinks)

आता कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे काय. तुम्ही ओळखलं असेल पण याच त्या कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत हे माहिती नसेल. सोपं आहे. तुम्ही ज्या कोल्ड ड्रिंक्स, सोडा ड्रिंक्स आणि बीयर पितात ही सर्व पेय तयार करण्यासाठी carbonation प्रक्रिया वापरली जाते ज्यामध्ये या ड्रिंक्स मध्ये कार्बन मिक्स केले जाते जे पोटामध्ये गेल्यावर गॅस उत्पन्न करते.

या सर्व ड्रिंक्स च्या बाटल्या बघा, त्यामध्ये स्पष्ट कार्बोनेटेड ड्रिंक्स असे लिहिलेले असते. या सर्व ड्रिंक्स टाळून तुम्ही घरी थंड पाणी आणि सोडा टाकून काही थंड पेय तयार करू शकतात.

५. धान्य टाळा

काही धान्याचे प्रकार तुमच्या पोटात गॅस वाढवून तुम्हाला त्रास देऊ शकतात. धान्य जसे की गहू, ओट्स, बार्ली यामध्ये carbohydrates तसेच fats चे प्रमाण अधिक असते ज्यामुळे तुमच्या पोटामध्ये गॅस तयार होऊ शकतो.

वरील सांगितलेली अन्न पदार्थ तुमच्या आहार मधून पूर्णपणे वगळायची आहेत. ही सर्व अन्न पदार्थ तुमच्या पोटात गॅस तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय करत असताना या गोष्टीचा सुद्धा विचार करणे महत्वाचे ठरते.

२. बारीक चावून आणि मन एकाग्रता ठेवून खाणे

या धावपळीच्या आयुष्यात हे करणे शक्य नाही असे तुम्हाला वाटेल. घाई करून जेवायला बसने, घाई करून जेवत राहणे, जेवत असताना मोबाइल बघून जेवणे अशा घातक सवयी लोकांनी लावून ठेवल्या आहेत. अशा गोष्टी तुमच्या पचन संस्थेला किती नुकसान करून ठेवत आहे याचा विचार तुम्ही करणे आवश्यक आहे.

अशा सवयीमुळे पचन प्रक्रियेमध्ये अनेक प्रतिगामी अशा गुणतागुंती निर्माण करतात, आणि पोटात गॅस तयार तयार करून तुम्हाला त्रास देतात.

थोडेसे जाणून घेऊया की अन्न बारीक चावून आणि मन लावून खाल्ल्याने कसे फायदेशीर ठरते ते.

आपण जे अन्न खातो त्याचे पचन वेगवेगळ्या स्तरावर, अवयवात होत असते. त्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये मी जाणार नाही. पण या संबंधी तुम्हाला समजेल अशा घटकांचा आपण विचार करू.

पोटातील गॅस बाकसा तयार होतो ?

१. पचन पूर्व प्रक्रिया

आपण खात असलेल्या अन्नाची पचन प्रक्रिया चालू होते ते आपल्या तोंडातून आणि संपते ते जठरामद्धे. अन्न जेव्हा जठर आणि पोटापर्यंत जाते तेव्हा ते बारीक आणि विघटित होऊन येईल अशी एक प्रकारे पोट आणि जठर यांना अपेक्षा असते. असे नाही झाले तर या दोन्ही अवयवांवर पचनाचे अधिक काम पडते. म्हणजे अतिरिक्त ताण. पण ते काम जठर आणि पोट करू शकत नाही. याचे कारण की पोट आणि जठर या मध्ये ती यंत्रणा नसते.

पोट आणि जठर मध्ये तेवढेच अन्न पचन होते जेवढे त्यांचे काम आहे.

त्यामुळे आपण अन्नाचा घास तोंडात टाकला की त्यानंतर त्याला होईल तेवढे बारीक करायचे आणि त्यानंतरच ते खाली जठर आणि पोटामध्ये पाठवायचे आहे.

तोंडातील अन्नाचा घास जेव्हा तुम्ही बारीक करता तेव्हा त्याचे बारीक तुकडे, कण तयार होऊन ते विघटीत होतात. तोंडातील अन्न बारीक करून चघळताना अजून एक महत्वाची प्रक्रिया घडते. ती म्हणजे तोंडातील लाळ अन्न घटकांबरोबर मिक्स होते आणि ठराविक एंजाइम (enzymes) त्यात सोडतात जे या अन्नातील स्टार्च आणि कार्बोहायड्रेट (starch, carbohydrate) याचे सूक्ष्म स्तरावर विघटन करते.

या प्रकारे तोंडातील अन्नाचे व्यवस्थित पचन होऊन ते पुढील पचन होण्यासाठी पोटात आणि जठरात पाठवले जाते.

मन, चित्त एकाग्र ठेवून खाण्याचा हा फायदा आहे की तुम्ही जे खात आहात त्याने तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखी भावणे येईल. यामुळे तुम्ही नकळत जास्त जेवण करणार नाही.

२. अन्न घटकांचे विघटन

आपण जे म्हणतो अन्न पदार्थांमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, विटामीन तसेच इतर पोषक घटक असतात, ते पोषक घटक आपल्याला दिसतात का? नाहीत दिसत. कारण ते या अन्न पदार्थ मध्ये खूप सूक्ष्म आणि सुप्त स्वरूपात असतात.

पुढे तोंडातून पचन झालेले अन्न हे पोट आणि जठर यामध्ये येते. आता त्या बारीक झालेल्या अन्नाचे पुढील सूक्ष्म स्तरावर पचन करण्याची जबाबदारी ही जठर आणि पोटाची असते. जठर आणि पोट काही विशिष्ठ हॉरमोन, एंजाइम सोडून या अन्न घटकांमधील सर्व पोषक द्रव्य जसे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, विटामीन वगैरे बाहेर काढून त्याचे विघटन करून शोषण करते.

अशा प्रकारे जठर आणि पोटातील अन्न पचनाची सर्व प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होते.

आता वरील प्रकारे जर अन्न पचनाची प्रक्रिया नाही झाली तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. अर्थातच अन्नाचे कण बारीक होणार नाहीत, त्याचे विघटन न होताच ते जठर आणि पोटामध्ये येणार आणि मग जठर आणि पोटात अतिरिक्त ताण पडेल.यामुळे अन्नाचे पचन न होता ते तिथेच पडून राहील. या मुळे सहाजिक तिथे वायु म्हणजे गॅस तयार होईल आणि त्रास जाणवेल.

यामुळे जेवण बारीक चावून आणि मन लावून खाणे ही किती महत्वाचे आहे हे तुम्हाला कळले असेलच.

यासाठी तुम्ही खालील गोष्टी करून बघू शकता.

 • जेवत असताना लहान घास घ्या.
 • तो घास तुमच्या लाळेसोबत पूर्णपणे मिक्स होऊ द्या आणि त्याची पेस्ट तयार झाल्यावरच तो घास पुढे (खाली) ढकला.
 • घास चावत असताना प्रत्येक गोष्ट अनुभवा. म्हणजे त्याची चव, त्यात मिक्स असलेले मसाले बाकी अन्न पदार्थ याविषयी जागरूक रहा.
 • जेवत असताना मोबाइल, टीव्ही बघणे, बातमीपत्र वाचने किंवा जेवण सोडून इतरत्र कोणतेही कार्य करणे टाळा.

३. व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करणे

व्यायाम फक्त हृदय रोग संबंधी आजार जसे उच्च रक्तदाब, वाढलेले कॉलेस्ट्रॉल, ह्रदयविकार आणि वजन कमी (weight loss) करण्यासाठीच उपयोगी आहे असे नाही. व्यायाम आणि इतर शारीरिक हालचाली या गोष्टींचा तुमच्या पूर्ण पचन संस्था, पचन कार्य आणि त्या संबंधित अवयव या सर्वांवर अनुकूल परिणाम सुद्धा होत असतो.

संबंधित वाचा-वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

तुमच्या पोट आणि इतर पचन संबंधित आरोग्य समस्यांसाठी व्यायाम कसा फायदेशीर ठरू शकतो हे जाणून घेऊया.

१. हालचाल उत्तेजित होतात

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल हालचाल (Gastrointestinal motility) याला आपण पचनसंस्था यांची हालचाल म्हणूयात. यामध्ये महत्वाच्या जठर आणि पोटा संबंधी ज्या स्नायू आहेत त्यांच्या हालचाली होतात. व्यायाम आणि इतर शारीरिक हालचाली जसे की धावणे, जॉगिंग करणे, वेगवान चालणे किंवा इतर कुठल्याही हालचाल असूद्या, यामुळे या स्नायूंना बळ मिळते ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते.

या स्नायूंना बळ मिळाल्यावर अर्थातच पोटाचे आणि जठरचे कार्य ही सुधारेल ज्यामुळे तुमची पचन प्रक्रिया ही व्यवस्थित होईल.

२. पचन विकार कमी होतात

व्यायामामुळे तुमचे पचन संदर्भात जे विकार आहेत ते कमी होण्यास मदत होते.

काही पचन विकार जसे की IBS, IBD, GI cancers यांसारखे आजार जे आपल्या चुकीच्या सवयीमुळे झालेले असतात, यामध्ये व्यायामाचा फायदा होतो.

३. तणाव, चिंता कमी होते

तणाव, चिंता आणि मानसिक अस्वस्थता तुमच्या पचन कार्याला बिघडवू शकतात.

या स्ट्रेस, तणाव, अस्वस्थता यामुळे तुमच्या जठर आणि पोटाची हालचाल मंदावते आणि परिणामी अन्नाचे पचन सुद्धा व्यवस्थित होत नाही.

 • व्यायाम केल्यामुळे एंडोर्फिन (endorphin) नावाचे हॉरमोन रक्तात मिसळते आणि ते शरीरात पसरून तुमचा मूड पॉजिटिव बनवतात आणि तणाव कमी करतात.

तेव्हा पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय करत असताना व्यायामाचा फायदा तुम्ही नक्की करून घेतला पहिजे.

पचन विकार संबंधी कोणताही त्रास असणाऱ्यांनी व्यायाम करत चला.

४. पोट साफ करते

बद्धकोष्टता म्हणजेच पोट साफ न होणे. या समस्येवर देखील व्यायाम हा एक उत्तम पर्याय आहे.

व्यायामामुळे आतडी यांची हालचाल वाढून तेथील जमा अन्नाचे व्यवस्थित विघटन आणि पचन होऊन ते बारीक होते. परिणामी ते बाहेर पडायला त्रास होत नाही आणि पोट लवकर साफ होते.

५. वजन कमी होते

अर्थातच व्यायामुळे वजन कमी होते. पण वजन आणि अपचन यांचा संबंध आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

वजन वाढलेले किंवा लठ्ठपणा असेल तर अन्नाचे पचन करणाऱ्या अवयवांवर दबाव पडतो. यामुळे जे पोटात अॅसिड तयार झालेले असते जे की नैसर्गिक आहे, ते अॅसिड वर ढकलले जाते आणि तुम्हाला छातीच्या मध्यभागी जळजळ झाल्यासारखे वाटते. यालाच अॅसिडिटी किंवा hyperacidity असे म्हणतात.

या सर्व बदलांमुळे एकंदरच तुमची पचन क्रिया बघडते आणि गॅस तयार होतो.

४. टाईट कपडे घालणे टाळा

घट्ट आणि टाईट कपडे जसे की स्कीनी जीन्स, बेल्ट यामुळे तुमच्या कंबरेच्या आणि पोटाच्या भागामध्ये दबाव निर्माण होतो. परिणामी असे होते की त्या ठिकाणी असलेले अवयव यांना अप्रत्यक्ष पणे क्षती पोचते आणि त्या अवयवांवर दबाव निर्माण होतो.

घट्ट कपडे परिधान केल्यावर पचन संस्थेवर कसा परिणाम होतो याबद्दल माहिती घेऊया.

१. अवयवांना रक्तप्रवाह होत नाही

तुम्ही घट्ट कपडे घातल्यास त्या पोटाच्या भागात दबाव निर्माण होतो, ज्यामुळे तेथील होणारा रक्तप्रवाह देखील कमी होतो. यामुळे होते असे की तेथील अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या सुद्धा दाबल्या जातात आणि यामुळे त्या अवयवांना पाहिजे तेवढा रक्तपुरवठा होत नाही.

कोणत्याही अवयवाला पूर्ण क्षमतेने त्याचे जे कार्य आहे ते करण्यासाठी त्या अवयवाला पूर्णपणे रक्तपुरवठा होणे गरजेचे आहे. जसे आपल्याला खायला अन्न असेल तरच आपण काम करू शकू तसेच आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांबद्दल सुद्धा असते.

२. ऍसिड रिफ्लक्स (Acid reflux)

टाईट कपडे तुमच्या पोटावर दबाव आणते ज्यामुळे पोटात जे पचन प्रक्रिया दरम्यान अॅसिड तयार होते ते वरच्या बाजूला म्हणजे अन्न नलिकेमध्ये ढकलले जाते. ही अन्न नलिका छातीच्या आतमध्ये बाजूस असते. यामुळे तुम्हाला अॅसिडिटी म्हणजेच करपट ढेकर येणे, छातीमध्ये जळजळ होणे अशा समस्या जाणवतात.

३. बद्धकोष्टता

कपडे टाईट असल्यामुळे पोटाच्या भागात प्रेशर येते. यामुळे पचन झालेले अन्न आतडी मध्ये सैल हालचाल करू शकत नाही आणि गुद द्वारपर्यंत येत नाही. ज्यामुळे बद्धकोष्ठता चा त्रास होतो.

४. गॅस जमा होणे

सहाजिक आहे की घट्ट कपड्यांनी पोटाला बाहेरून दाबले असता आतमधील सर्व वायु हा एक जागेवरच जमा राहतो. त्यामुळे तुम्हाला पोटाचे गॅस वगैरे सारख्या समस्या होतात.

आता आपण शेवटचा पण महत्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत.

यामध्ये काही सोप्या ट्रिक्स, तसेच पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी घरगुती उपाय बघणार आहोत. तुमचा पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.

५. पोटातील गॅस कमी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

१. अद्रक

आलं म्हणजेच अद्रक एक उत्तम आणि प्रभावी अशी नैसर्गिक वायुविरोधी गुणधर्म असलेली वनस्पति आहे. शास्त्रोक्त अद्रकचे फायदे अनेक आहेत पण वायुविरोधी तिचा महत्वाचा गुणधर्म आहे.

स्वयंपाक घरात असलेले ही अद्रक तुम्ही जेवणामध्ये आणि चहा मध्ये तर वापरायचा आहेच पण इन्स्टंट आराम मिळण्यासाठी तुम्ही थोडे अद्रक घेऊन त्याला चावायचे आहे.

२. Papermint चहा

हा चहा शीत गुणात्मक असतो. या चहाचा शीत गुण तूमच्या पोटातील स्नायूंना आराम देतो. जेणेकरून पचन हे पोटाचे कार्य व्यवस्थित पार पडते.

याचा उपयोग तुम्ही जेवण झाल्यानंतर एक कप चहा घेऊन असा करायचा आहे.

३. बडीशेप

बरीच लोक याचा उपयोग करत ही असतील आणि त्यांना फायदे ही मिळत असेल. बडीशेप पूर्वीपासून अन्नाचे पचन आणि त्यांची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी वापरली जाते.

खूप प्रभावी आणि अत्यंत सोपा, सुलभ हा उपाय आहे.

४. दीर्घश्वास

दीर्घश्वास घेतल्याने तुमच्या पोटातील स्नायूंना आराम मिळतो आणि गॅस बाहेर सोडण्यासाठी परिस्थिति निर्माण होते.

थोडक्यात शेवट

पोटात गॅस होणे हे अनेक वेळा त्रासदायक आणि काही वेळा लाजिरवाने ठरू शकते. सुदैवाने पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय हे प्रभावी ठरतात. पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय करत असताना तुमचा आहार, जीवनशैली आणि व्यायाम या तीन महत्वाच्या घटकांचा विचार केला तर पोटाच्या गॅस पासून तुम्हाला आराम मिळणे नक्कीच शक्य आहे.

तुम्हाला हा ब्लॉग उपयुक्त वाटला असेल किंवा आणखी काही प्रश्न असल्यास, कृपया खाली कमेन्ट द्या किंवा मला एक संदेश पाठवू शकता, धन्यवाद.

FAQ’s

पोटात गॅसेस का होतात ?

पोटात गॅसेस होण्याचे काही कारण म्हणजे जेवताना, पिताना आणि बोलताना न कळत हवा पोटात घेणे,वर सांगितलेली गॅस उत्पन्न करणारे पदार्थ. सविस्तर माहितीसाठी वरील मजकूर वाचा.

मला गॅस पासून लवकर आराम कसा मिळेल ?

गॅस पासून लवकर आराम मिळवण्याकरता तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. या ससर्व गोष्टींची सविस्तर माहिती साठी वरील ब्लॉग वाचा.

पोट फुगणे म्हणजे काय ?

पोट फुगणे म्हणजे अशी स्थिति जेव्हा पोटात वायु,काही अन्न पदार्थ किंवा पेय सचून राहतात. यालाच पोटात गॅस होणे असे सुद्धा म्हंटले जाते.

पोटात जास्त एसिड मुळे गॅस होतो का ?

हो,पोटात जास्त एसिड मुळे गॅस होऊ शकतो. अॅसिड मुळे बॅक्टीरिया वाढ होऊन आणि अन्न पचन थांबवून गॅस होऊ शकतो.

पोटात मुरडा येणे म्हणजे काय ?

पोटात मुरडा म्हणजे एक प्रकारची तीव्र पोटात वेदना झाल्याची भावना असते. ही वेदना पोटात विशिष्ट भागातच येते.

1 thought on “पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय: 5 उपाय -healthbuss”

Leave a Comment