HEALTHBUSS

दररोज किमान किती तास व्यायाम करावा ? तज्ञांचे मत काय

Last updated on January 30th, 2024 at 10:11 pm

Contents

(व्यायाम करण्यासाठी सर्वोत्तम वेळ, मध्यम एरोबिक क्रियाकलाप, आठवड्यातून किती दिवस कसरत करावी, मध्यम तीव्रतेचा व्यायाम, डब्ल्यूएचओने शारीरिक हालचाली, शारीरिक क्रियालाप मार्गदर्शक तत्वे, दररोज किमान किती व्यायाम करावा, दररोज किती तास व्यायाम करावा, व्यायाम किती वेळ करावा, एक्झरसाइज, kiti vel exercise karavi for weight loss, darroj kiti tas vyayam karava)

निरोगी आणि शारीरिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी व्यायाम करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. पण नेमके दररोज किमान किती तास व्यायाम करावा हा अनेक जणांना प्रश्न पडतो. याचे उत्तर देखील तेवढे सोपे नाही. या ब्लॉग च्या माध्यमातून आपण निरोगी आयुष्य जगण्यासाठी तसेच इतर काही कारणांसाठी दररोज किमान किती तास व्यायाम करणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती, याबद्दल मतमतांतर आणि झालेले संशोधन या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

व्यायाम केल्यामुळे शरीर आणि मनाला अनेक आरोग्य विषयक फायदे मिळतात. विशेष करून ह्रदयविकार आणि मधुमेह या रोगांवर व्यायाम करणे हा एक चांगला आणि प्रभावी उपचार घटक ठरतो.

अनेक जण व्यायामाच्या आरोग्य विषयक फायद्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपले आरोग्य धोक्यात घालत असतात.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात ८० टक्के किशोरवयीन लोकसंख्या ही पुरेसा व्यायाम किंवा शारीरिक हालचाली करत नाही. मग याच ८० टक्के लोकांमध्ये मृत्यू चा धोका २० ते ३० टक्क्यांनी वाढतो.

व्यायाम करत असताना तो किती वेळ करावा आणि किती प्रमाणात करावा हे देखील लक्षात घ्यावे लागेल. अलिकडील दिवसांमध्ये व्यायाम करताना किंवा जिम मध्ये वर्कआउट करत असताना ह्रदयविकार होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. याचे कारण हेच आहे की अशा वेळी क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केला जातो. यामुळे व्यायाम करत असताना त्याचा कालावधी आपले वय, स्टॅमिना यांचा विचार करून निश्चित करणे अत्यंत महत्वाचे ठरते.

आता नेमके दररोज किमान किती तास व्यायाम करावा या प्रश्नाचे उत्तर किंवा स्पष्टीकरण हे अनेक घटकांवर अवलंबून असू शकते. जसे की वय, तुमचे व्यायाम करण्याचे उद्दिष्ट, तुमची सध्याची शारीरिक रचना.

या सर्व घटकांबद्दल आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत.

तुमच्या वयानुसार दररोज किमान किती तास व्यायाम करावा ?

ठराविक वयात असताना विशिष्ट वेळेसाठीच व्यायाम करावा असे तज्ञ आणि संशोधन सांगते. जागतिक आरोग्य संघटना देखील याचीच शिफारस करतात. कारण प्रत्येक विशिष्ट वयात असताना तुमच्या शरीराच्या गरजा आणि शारीरिक क्षमता या वेगवेगळ्या असतात.

वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यात कशामुळे आपण व्यायाम आणि त्याचा विशिष्ठ कालावधी याचा विचार केला पाहिजे याचे काही कारणे बघू.

 • तरुण व्यक्तिमध्ये व्यायाम करण्यासाठी अधिक स्टॅमिना असतो. तोच स्टॅमिना वृद्ध लोकांमध्ये कमी असतो. तसेच त्या वयामध्ये व्यायाम करत असताना दुखापत होण्याचा धोका जास्त असतो.
 • अधिक वय असलेल्यांमध्ये स्नायू आणि हाडे ही कमजोर झालेली असतात. त्यामुळे त्यांच्या व्यायाम करण्याच्या क्षमतेवर आणि किती वेळ व्यायाम करू शकतात यावर देखील परिणाम होतो.
 • तरुण व्यक्ति व्यायाम केल्यावर थकल्यानंतर लवकर रीकवर होतात (recover) ज्यामुळे पुढच्या व्यायामाच्या सत्राला लवकर तयार राहतात. पण जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना रीकवर होण्यासाठी अधिकचा वेळ लागतो. यामुळे त्यांना व्यायाम करण्यासाठी जो वेळ द्यायचा असतो त्यावर त्याचा परिणाम होतो.
 • वयानुसार चयापचय (metabolic rate) दर कमी होतो ज्यामुळे जास्त वयातील लोकांच्या कॅलरी (calories) लवकर बर्न होत नाहीत. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी काही वेळा या वयात व्यायाम करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो.
 • प्रत्येक वयात व्यायाम करण्याचे वेगवेगळे उद्दिष्टे असू शकतात. उदाहरण, तरुण मुल स्ट्रॉंग मसल्स करण्यासाठी तसेच आकर्षक शरीरयष्टी मिळवण्यासाठी व्यायाम करतात तर जास्त वय असणारी मंडळी ही निरोगी आयुष्य जगण्याच्या दृष्टीने व्यायाम करत असतात.

याच गोष्टींचा विचार करून जागतिक आरोग्य संघटनेने ठराविक वयात निरोगी राहण्यासाठी किती वेळ आणि कसा व्यायाम करावा या बद्दल मार्गदर्शक सूचना बनवल्या आहेत. याची माहिती आता आपण बघूया.

५ वर्ष वयापर्यंत असलेली लहान मुले

१ वर्षापर्यंत चे बाळ

 • २४ तासांतून अनेक वेळा, अनेक पद्धतीने या वयातील बाळांना खेळामध्ये सक्रिय (active) ठेवा.
 • कोणत्याही ठिकाणी एक तासापेक्षा जास्त वेळ एका जागेवर बाळाला ठेवू नका.
 • मोबईल किंवा टीव्ही अजिबात दाखवू नका.
 • बाळ जेव्हा बसले असेल तेव्हा गोष्टी सांगून किंवा गाणे म्हणून बाळाचे मन गुंतवून ठेवा.
 • १४ ते १७ तास चांगली झोप या वयातील बाळांना आवश्यक असते.

१-२ वर्षापर्यंत चे बाळ

 • या वयातील लेकरांना २४ तासांतून १८० मिनीटे मध्यम पद्धतीच्या हालचाली मध्ये सक्रिय (active) ठेवावे.
 • कोणत्याही एकाच ठिकाणी एक तासापेक्षा जास्त वेळ बसू देवू नका.
 • मोबाईल किंवा टीव्ही अजिबात दाखवू नका.
 • गोष्टी आणि गाणे ऐकवून बाळाचे मन गुंतवून ठेवावे.
 • या वयातील बाळांना ११ ते १४ तास चांगली झोपे मिळणे आवश्यक आहे.

३-४ वर्षांचे मुलं

 • १८० मिनीटे मध्यम प्रकारच्या हालचाली या मुलांनी कराव्यात ज्यामध्ये ६० मिनीटे तीव्र हालचाली करण्यासाठी द्यावे.
 • कोणत्याही एकाच ठिकाणी एक तासापेक्षा जास्त वेळ या वयातील मुलांना बसू देऊ नका.
 • मोबईल किंवा टीव्ही अजिबात दाखवू नका.
 • वाचन आणि गोष्टी ऐकवून मुलांना गुंतवून ठेवा.
 • या वयातील मुलांना १० ते १३ तास झोप घेणे गरजेचे आहे.

५-१७ वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन

 • जागतिक आरोग्य संघटनेनुसार या वयोगटातील मुलांनी निरोगी राहण्यासाठी किमान ६० मिनीटे मध्यम ते जोरदार प्रकारचा व्यायाम करावा. यामध्ये काही एरोबिक एक्झरसाइज आणि इतर एक्झरसाइज असावी.
 • तसेच आठवड्यातून किमान ३ दिवस जोरदार प्रकारचा व्यायाम आणि स्ट्रॉंग एक्झरसाइज कराव्यात.
 • निरोगी राहण्यासाठी मनोरंजन साठी घालवलेला वेळ शक्यतो या मुलांनी कमी करावा. जसे की घरी बसून टीव्ही बघणे, एका जागेवर बसून मोबाइल किंवा विडियो गेम खेळणे.

१८-६४ वर्ष वयातील तरुण आणि ज्येष्ठ लोक

 • जागतिक आरोग्य संघटनेनुसार या वर्षातील व्यक्तींची शारीरिक आणि मानसिक वाढ पूर्णता झालेली असते आणि नंतर त्याची झीज होण्यास देखील सुरुवात होते. म्हणून या वयातील व्यक्तींना आजार जडण्याची शक्यता जास्त असते.
 • या मुळे या लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते. याचसंबंधी डब्ल्यूएचओने शारीरिक हालचालींची शिफारस केली आहे.
 • जागतिक आरोग्य संघटनेनुसार या वयोगटातील व्यक्तींनी आठवड्याला किमान १५० ते ३०० मिनीटे मध्यम गतीचा एरोबिक व्यायाम (मध्यम एरोबिक क्रियाकलाप) करावा किंवा ७५ ते १५० मिनीटे जोरदार गतीचा एरोबिक व्यायाम (जोरदार एरोबिक क्रियाकलाप) करावा.
 • आठवड्यातून दोन किंवा त्याहून अधिक दिवस स्ट्रॉंग एक्झरसाइज (स्ट्रेन्थ ट्रेनिंग) कराव्यात जसे की वेट लिफ्टिंग वगैरे.

एरोबिक व्यायाम– व्यायाम प्रकार ज्यामध्ये ह्रदयाचे ठोके तीव्र होऊन ह्रदयाची ताकत वाढवण्याचे काम होते.
मध्यम गतीचा एरोबिक व्यायाम किंवा मध्यम तीव्रतेचा व्यायाम– वेगाने चालणे, बाइक चालवणे, पोहणे, नाचणे.
जोरदार गतीचा एरोबिक व्यायाम– धावणे, पोहणे, दोरीने उड्या मारणे.

६४ वर्षांपेक्षा जास्त वय असणारी लोक

 • शक्यतो या वयातील लोकांनी १८ वर्षावरील व्यक्ति एवढा व्यायाम करावा असे जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केलेले आहे.

वरील सर्व माहिती आपण वयानुसार किमान किती वेळ व्यायाम करावा या दृष्टीने बघितली आहे. या मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वच निकष हे जशास तसे नक्कीच पाळता येणे शक्य नाही. पण निरोगी राहण्यासाठी यातील काही गोष्टी लक्षात ठेवून जर आपण आपली दिनचर्या ठरवली तर त्याचा फायदा नक्कीच होईल.

व्यायाम करण्याच्या उद्दिष्टानुसार दररोज व्यायाम किमान किती वेळ करावा ?

दररोज किमान किती तास व्यायाम करावा किंवा केला पाहिजे हे तुमच्या व्यायाम करण्याच्या उद्दिष्टानुसार सुद्धा अवलंबून असते. जसे की काही जण व्यायाम वजन कमी करण्यासाठी करतात, काही जण फक्त निरोगी, फिट आणि जसे आहोत तसे म्हणजे वजन वाढू नये किंवा कमी होऊ नये यासाठी करतात. काही जण आपल्याला असणारा मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कॉलेस्ट्रॉल कमी करणे यासाठी व्यायाम करत असतात.

याच गोष्टींचा विचार करून आपण पुढे व्यायाम किती वेळ करावा याची माहिती बघणार आहोत.

निरोगी, फिट राहण्यासाठी किती तास व्यायाम करावा ?

आता आपण निरोगी आणि फिट राहण्याच्या दृष्टीने दररोज किमान किती तास व्यायाम करावा याची माहिती बघणार आहोत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे आणि ते म्हणजे व्यायाम करण्याचे ध्येय किंवा उद्दिष्ट.

ज्या व्यक्तींना कोणताही ह्रदयाचा आजार नाही विशेष करून हाय बीपी चा त्रास, वजन वाढलेले नाही आणि इतर सर्व आरोग्याच्या दृष्टीने नॉर्मल आहे पण भविष्यात कोणतीही आरोग्य समस्या उद्भवू नये, ह्रदयाचे आजार होऊ नये किंवा वजन वाढू नये यासाठी जेवढा वेळ व्यायाम करावा लागेल त्याबाबत माहिती आपण आता बघणार आहोत. म्हणजे काय तर इथे फक्त निरोगी राहण्यासाठी किती वेळ व्यायाम करावा लागेल या दृष्टीने त्याची माहिती बघणार आहोत.

सिडिसी (centers for disease control and prevention) नुसार तरुण व्यक्तींना निरोगी राहण्यासाठी ३ पद्धतीने व्यायाम करण्यासाठी वेळ निश्चित करावा (शारीरिक क्रियालाप मार्गदर्शक तत्वे).

 • प्रत्येक आठवड्यात १५० मिनीटे मध्यम गतीचा एरोबिक व्यायाम आणि २ दिवस स्नायू मजबूत करण्यासाठी स्ट्रॉंग एक्झरसाइज करावी. म्हणजे यामध्ये तुम्हाला दर आठवड्याला किती कार्डिओ आणि ताकद प्रशिक्षण घेतले पाहिजे याबद्दल सूचित केले आहे.
प्रत्येक आठवड्यात १५० मिनीटे मध्यम गतीचा एरोबिक व्यायाम आणि २ दिवस स्नायू मजबूत करण्यासाठी स्ट्रॉंग एक्झरसाइज करावी

या ठिकाणी आठवड्याला १५० मिनीटे म्हटल्यावर अनेक जणांना हे अवघड वाटत असेल. पण एका दिवसात १५० मिनीटे व्यायाम करावा असे काही नाही. तुम्ही आठवड्यातील ५ दिवस ३० मिनीटे व्यायाम केला तरी याचा फायदा तुम्हाला मिळेल. उर्वरित दोन दिवस सूचित केल्याप्रमाणे स्नायू मजबूत करणाऱ्या एक्झरसाइज कराव्यात.

 • दुसरी एक पद्धत म्हणजे प्रत्येक आठवड्याला ७५ मिनीटे जोरदार गतीचा एरोबिक व्यायाम करावा आणि उर्वरित दोन दिवस स्नायू मजबूत करण्याच्या दृष्टीने स्ट्रॉंग मसल्स एक्झरसाइज कराव्यात.
प्रत्येक आठवड्याला ७५ मिनीटे जोरदार गतीचा एरोबिक व्यायाम करावा

 • तीसरी एक पद्धत आहे ती म्हणजे वरील दोन्ही पद्धतींचे समप्रमाणात एकत्रित पणे व्यायाम करावा.
तीसरी एक पद्धत आहे ती म्हणजे वरील दोन्ही पद्धतींचे समप्रमाणात एकत्रित पणे व्यायाम करावा.

जी लोक व्यायाम करण्यासाठी नवीन आहेत किंवा आतापर्यंत खूप आरामात आयुष्य घालवले आहेत अशा व्यक्तींना एवढा वेळ व्यायाम करणे खूप अवघड जाते. अशा वेळी या लोकांनी निराश न होता हळू हळू पद्धतीने या सर्व गोष्टी चालू कराव्यात. एकदम सुरुवातीला हा सूचित केलेला वेळ लक्षात घेऊ नका. सुरुवातीला तुम्ही फक्त चालत रहा, चालण्याचा वेग वाढवा, त्यानानंतर चालण्याचा वेळ वाढवा. यामुळे एकंदर हळू हळू तुमचा स्टॅमिना देखील वाढेल.

तज्ञांच्या नुसार तुम्ही जेवढा वेळ काहीही न करता बसून राहताल तेवढा जास्त तुमचा अकाली मृत्यू होण्याचा, मधुमेह, ह्रदयरोग उच्च रक्तदाब सारखे आजार होण्याचा धोका वाढेल. शिवाय या पद्धतीची तुमची जीवनशैली असेल तर तुमचे वजन देखील वाढेल. त्यामुळे निराश होऊन बसण्यापेक्षा काहीतरी हालचाली करणे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला नक्कीच फायदा मिळवून देईल.

एका अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की ज्या लोकांनी आठवड्याला फक्त १५ मिनीटे तीव्र गतीचा व्यायाम केला आहे अशा लोकांचा काहीही न केलेल्या लोकांच्या तुलनेत कोणत्याही कारणाने मृत्यू होण्याचा धोका १७ टक्क्याने कमी होतो. त्यामुळे निष्क्रिय बसण्यापेक्षा काही क्रिया करून निरोगी आयुष्य मिळवा.

आपण व्यायाम करण्यासाठी सिडिसी नुसार जो वेळ सूचित केला आहे तो जवळपास सर्व वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांनी मान्य केलेला आहे. या सर्वानुमते आठवड्याला १५० मिनीटे व्यायाम केल्यावर आयुष्य सरासरी तीन ते चार वर्षांनी वाढून ह्रदय आणि रक्तवाहिन्या संबंधित आजार दूर राहतात. तसेच यामुळे नैराश्य आणि कर्करोग होण्याचा धोका देखील कमी होतो असे तज्ञ सांगतात.

जर तुम्ही या सूचित केलेल्या वेळ पेक्षा जास्त वेळ व्यायाम करू शकलात तर तुम्हाला त्यापासून मिळणारे फायदे देखील वाढतील. त्यामुळे तज्ञांनी सूचित केलेला वेळ हा संदर्भ म्हणून लक्षात असू द्या. पण जर त्या पेक्षा जास्त वेळ व्यायाम करण्याची तुमची क्षमता असेल तर ते ही नक्कीच उत्तम आहे.

वजन कमी करण्यासाठी दररोज किमान किती तास व्यायाम करावा ?

kiti vel exercise karavi for weight loss

तुम्हाला वजन कमी करायचे आहे आणि तुम्ही त्यासाठी व्यायाम करत आहात?

नक्कीच वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे. पण तुम्हाला हे वजन कमी करण्यासाठी दररोज किमान किती तास व्यायाम करावा आणि कसा व्यायाम करावा लागतो याची माहिती असणे देखील महत्वाचे आहे.

याच अनुषंगाने या बद्दल आपण होईल तेवढी सविस्तर माहिती बघूयात.

सामान्यता वजन कमी करण्यासाठी, निरोगी आणि फिट राहण्यासाठी वरील जी १५० मिनीटे व्यायाम करण्यासाठी वेळ सूचित केलेली आहे त्यापेक्षा जास्त वेळ व्यायाम करावा असे मानले जाते. ही पद्धत अत्यंत प्रभावी आहे असे अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे.

पण एवढं साध आणि सोप उत्तर याचे नक्कीच नाही. कारण वजन कमी करायचे म्हटल्यावर व्यायाम संबंधी अजून एक गोष्टीचा विचार करावा लागतो तो म्हणजे कॅलरीजचा. म्हणजे किती वजन कमी करण्यासाठी एका दिवसात किती कॅलरीज बर्न केल्या पाहिजेत, एका आठवड्यात किती बर्न केल्या पाहिजेत याचा विचार करणे देखील महत्वाचे ठरते. कारण या शिवाय वजन कमी होणे शक्य नाही.

संबंधित वाचा- वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी

मायोकिलिनिक नुसार एक साधारण ७३ किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीने जर एक तासासाठी काही व्यायाम प्रकार केले तर त्यानुसार त्या व्यक्तीच्या काही ठराविक प्रमाणात कॅलरी बर्न होतात.

एक तास साठी व्यायाम किती कॅलरी बर्न होतात
सायकलिंग292
हायकिंग438
पळणे606
स्विमिंग423
चालणे314
या पद्धतीचा तुम्ही तुमच्या कॅलरी वर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा बर्न करण्यासाठी उपयोग करू शकता.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नुसार जर आपण वर सांगितलेला आठवड्याला १५० मिनीटे व्यायामाचा फॉर्म्युला जास्त काळासाठी म्हणजे सातत्याने फॉलो केला तर ते वजन कमी करण्यासाठी मदत करू शकते. काही अभ्यासानुसार या फॉर्म्युला च्या दुप्पट वेळ व्यायाम केला तर वजन कमी होण्यासाठी याची मदत होते.

कारण, शेवटी कुठलेही आणि कितीही वजन कमी करण्यासाठी, कॅलरी कमी करणे हाच एक उद्देश ठेवला जातो. त्यामुळे वरील फॉर्म्युला नुसार आठवड्याला ५ दिवस मध्यम गतीचा एरोबिक व्यायाम आणि २ दिवस स्नायू मजबूत करण्यासाठी ठराविक एक्झरसाइज केल्यावर लाक्षणिक प्रमाणात कॅलरी बर्न होण्यास मदत होईल.

संबंधित वाचा- वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे

मेडिसिन सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्झरसाइज मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी आठवड्याला ३०० मिनीटे किंवा त्यापेक्षा जास्त व्यायाम करणे गरजेचे आहे. तरी देखील सातत्यपूर्ण आणि अचूक या प्रकारचे निष्कर्ष आढळण्यासाठी अजून यावर संशोधन होण्याची नक्कीच गरज आहे. अजून एक महत्वाचा निष्कर्ष या अभ्यासातून आढळतो तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी दर आठवड्याला तुम्ही ३००० कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे.

अजून एक महत्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा ठरणार नाही. हे ही तेवढेच खरे आहे की या सर्व संशोधनात फक्त व्यायाम संबंधी वजन कमी करण्याचे फायदे सांगितले आहेत. पण आपल्याला याची दुसरी बाजू देखील जाणून घ्यावी लागेल. ती बाजू म्हणजे डायट.

व्यायाम करण्याबरोबर जर आपण वजन कमी करण्याच्या दृष्टीने आहारात देखील बदल केला तर त्याचा अधिक आणि लवकर फायदा मिळेल.

आपला डायट आणि व्यायाम दोन्ही महत्वाचे आहेत. किंबहुना वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल किंवा व्यायामपेक्षा आहाराचा अधिक प्रभाव पडत असतो. सिडिसी नुसार वजन नियंत्रित करण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी शारीरिक हालचाली आणि योग्य आहार दोन्ही महत्वाचे ठरतात.

वजन कमी करण्यासंदर्भात कॅलरी बर्न करणे ही गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावी लागेल. कारण वजन वाढणे हा खेळ तुम्हाला लागणाऱ्या कॅलरीज आणि तुम्ही घेत असलेल्या कॅलरीज यांचा आहे.

होईल शक्य तेवढ्या जास्त शारीरिक हालचाली, एका जागेवर बसून करावयाच्या कामे कमी करून फिरणारी कामे करणे, आहारात लो कार्ब डायट घेणे या सर्व गोष्टी वजन कमी करण्यास मदत ठरत असतात.

दिवसातून किती वेळा व्यायाम करावा ?

व्यायाम करण्यासंबंधी लोक अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जात असतो तो म्हणजे दिवसातून किती वेळा व्यायाम करावा. काही लोक सकाळी व्यायाम करायला चांगल मानतात आणि काही जण रात्री च्या वेळेला. काही लोक त्यांना मिळत असलेल्या वेळे नुसार दोन्ही वेळेला व्यायाम करत असतात.

पण वैज्ञानिक दृष्ट्या किती वेळा व्यायाम करणे चांगले आहे याची थोडक्यात माहिती घेऊया.

दिवसातून दोन वेळा व्यायाम करणे हे जरा रिसकी आहे आणि अवघड देखील आहे. दिवसातून दोन वेळा व्यायाम हे सहसा अॅथ्लीट (athletes) करत असतात. कारण त्यांना दोन्ही वेळ व्यायाम करत असताना बाकी दिवसभर काही काम नसते. या वेळेत शरीराला आणि मनाला आराम मिळतो ज्यामुळे शरीर आणि मन रीकवर किंवा एक प्रकारे रीचार्जे होते.

तुमच्या कडे देखील स्वतःला आराम द्यायला वेळ असेल तर दिवसातून दोन वेळा व्यायाम करू शकता.

तुम्ही फायदे मिळण्याच्या दृष्टीने किती वेळा व्यायाम करावा या पेक्षा किती वेळ व्यायाम करावा हे महत्वाचे ठरते. एकंदर सर्व आरोग्य फायदे मिळण्याच्या दृष्टीने आठवड्यातून ५ दिवस प्रत्येकी ३० मिनीटे प्रमाणे व्यायाम करावा. व्यायाम करण्याचा हा फॉर्म्युला सोपा आणि तेवढाच प्रभावी देखील आहे.

सारांश

या ब्लॉग च्या माध्यमातून आपण दिवसातून किती तास व्यायाम करावा याबद्दल सविस्तर माहिती बघण्याचा प्रयत्न केला. शेवटी ब्लॉग चा थोडक्यात सारांश बघूया.

दररोज किमान किती तास व्यायाम करावा याचे उत्तर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. जसे वय, व्यायाम करण्याचे ध्येय आणि तुमची सध्याची शारीरिक रचना. वयानुसार दररोज किमान किती तास व्यायाम करावा करावा याबद्दल सुद्धा सविस्तर विश्लेषण बघितले. यामध्ये ० ते ६६ वर्ष वय असलेल्या वयोगटातील व्यक्तींनी कसा आणि किती व्यायाम करावा या बद्दल माहिती बघितली.

त्यानंतर काही जणांचे व्यायाम करण्याचे ध्येय हे वजन कमी करणे असते. त्या अनुषंगाने वजन कमी करण्यासाठी किती तास व्यायाम करावा या बद्दल शास्त्रज्ञांचे मत आणि या बद्दल काही माहिती बघितली. तसेच निरोगी किंवा फिट राहण्यासाठी किती वेळ व्यायाम करावा याबद्दल सुद्धा आपण माहिती बघितली.

सर्वानुमते, आठवड्यातील ५ दिवस, प्रत्येक दिवस ३० मिनीटे याप्रमाणे आठवड्यातील १५० मिनीटे व्यायाम करावा असे जवळपास सर्व आरोग्य विषयक संस्था आणि तज्ञांनी मान्य केले आहे.

जर या ब्लॉग वरील माहिती उपयुक्त वाटली असेल तर कमेन्ट द्वारे कळवू शकता. धन्यवाद.

FAQ’s

जेवणानंतर किती वेळाने व्यायाम करावा ?

जेवणानंतर शक्यतो ३ ते ४ तासांनी व्यायाम करावा. शक्यतो अन्न पचन होईपर्यंत वाट बघावी.

दर आठवड्याला किती मिनीटे कार्डिओ करावे ?

दर आठवड्याला १५० ते ३०० मिनीटे कार्डिओ करावे.

मी आठवड्यात किती व्यायाम करावा ?

तुम्ही आठवड्यात १५० ते ३०० मिनीटे व्यायाम करावा.

व्यायामानंतर लगेच खाणे चांगले आहे का ?

अजिबात नाही. व्यायामानंतर लगेच खाणे चांगले नाही.

व्यायाम करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

शक्यतो व्यायाम करण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही सकाळची आहे. या वेळेला व्यायाम केल्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.

1 thought on “दररोज किमान किती तास व्यायाम करावा ? तज्ञांचे मत काय”

Leave a Comment