HEALTHBUSS

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय- Tips to increase sex stamina.

Last updated on April 16th, 2024 at 12:14 pm

(ताकद वाढवण्यासाठी उपाय, कामेच्छा वाढवण्याचे उपाय, स्टॅमिना वाढवण्याची उपाय, लैंगिक शक्ति वाढवण्यासाठी उपाय, कीगल एक्झरसाइज, कीगल व्यायाम, लैंगिक शक्ति स्टॅमिना वाढवण्यासाठी अश्वगंधा पावडर, स्टॅमिना वाढवण्याची गोळी, जास्त वेळ करण्यासाठी घरगुती उपाय stamina vadhavane upay in marathi, stamina vadhavnyasathi upay in marathi, sex power vadhavnyasathi upay in marathi, sex power vadhavnyasathi upay, sex stamina vadhavnyasathi upay in marathi, linga tatharta in marathi, jast vel sex karnyasathi upay)

टीप – लैंगिक ताकत किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय हे मदत करतात असे तज्ञवर्ग आणि अनेक संशोधनात मान्य झाले आहे.

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपले एकंदर आरोग्य धोक्यात आले आहे. चुकीच्या सवयी, आहार आणि नको ती धावपळ यामुळे शरीरीकच नाही तर मानसिक आरोग्य देखील खराब होत चालले आहे.

या दोन्ही आरोग्यांचा झालेला परिणाम हा आपल्या लैंगिक आरोग्यावर देखील होतो. शीघ्र पतन, वंध्यत्व वगैरे अशा प्रकारच्या बऱ्याच लैंगिक समस्या या साधारण होत चालल्या आहेत.

शीघ्रपतन ही महत्वाची समस्या आहे आणि यामुळे अनेक पुरुष त्रस्त आहेत. यानंतर पुरुषांच्या स्टॅमिना विषयी म्हटलं तर तो ही कमीच होत चालला आहे. आता यामधे स्टॅमिना म्हणजे तुम्ही पुरुषांची पॉवर, सेक्स पॉवर, लैंगिक शक्ति किंवा सेक्स ची वेळ असं म्हणून सुद्धा संबोधू शकता. शेवटी या सर्व परिस्थितीचा एकच अर्थ होतो आणि एकच आरोग्य समस्या म्हणून याकडे आपण बघू शकतो.

अनेक रिसर्च नुसार भारतातील २० ते ३० टक्के पुरुष हे शीघ्र पतन समस्यापासून परेशान आहेत.

हे सर्व पुरुष त्यांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे उपचार, उपाय करून बघत असतात.

हाच विषय घेऊन मी हा ब्लॉग बनवायचे ठरवले.

या ब्लॉग मध्ये स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय बघणार आहोत. यासाठी आपण काही वैज्ञानिक पुरावे आणि तथ्य बघणार आहे.

पण लक्षात असू द्या की स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय यांचा विचार करत असताना आपण फक्त यावर काही घरीच करता येतील असे काही उपाय बघणार आहोत जे शास्त्रीय दृष्ट्या प्रभावी आहेत.

पुरुषांची पॉवर म्हणजे सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय

१. अल्कोहोल (एकच पेग)

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय

इथे मी अल्कोहोल पिण्यास अजिबात प्रवृत्त करत नाही. त्याहून अधिक सांगायचं म्हणजे अल्कोहोल किंवा दारू पिणे हे आरोग्यासाठी वाईटच आहे असे ही सांगेल.

पण असे बरेच रिसर्च आणि अभ्यास झाले आहेत ज्यातून हे सिद्ध झाले आहे की कमी आणि नियंत्रित प्रमाणात अल्कोहोल तुमचा sexual स्टॅमिना वाढवू शकते.

आता या पूर्ण अभ्यासात कमी प्रमाणात अल्कोहोल म्हणजे नेमके किती याचे प्रमाणं दिलेल नाही.

याच काही तथ्य विषयी अजून खोलवर माहिती घेऊया.

हेल्थलाइन नुसार एक ग्लास वाईन घेतल्यावर तुमच्यामध्ये जवळीकता आणि सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते.

एका अभ्यासानुसार कमी प्रमाणात अल्कोहोल घेतल्याने पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन (testosterone) हॉरमोन ची लेवल वाढते असे सिद्ध झाले आहे.

टेस्टोस्टेरॉन (testosterone) हे पुरुषांमध्ये उत्पन्न होणारे महत्वाचे आणि प्रमुख सेक्स हॉरमोन आहे. टेस्टोस्टेरॉन मुळे पुरुषांमध्ये लैंगिक शक्ति ची वाढ होते.

स्टॅमिना वाढवण्या बाबतीत टेस्टोस्टेरॉन ची काय भूमिका आहे ते बघूया.

 • पुरुषांमध्ये सेक्स ची इच्छा म्हणजेच कामवासना उत्पन्न करण्यामध्ये टेस्टोस्टेरॉन महत्वाची भूमिका बजावते.
 • टेस्टोस्टेरॉन तुमच्या लैंगिक अवयवांची वाढ व्यवस्थित करते ज्यामुळे लिंगामध्ये ताठरता येण्यास मदत होते.
 • टेस्टोस्टेरॉन हॉरमोन पुरुषांमध्ये स्नायू बळकट आणि ताकतवान करते ज्यामुळे एकंदर स्टॅमिना आणि सेक्स पॉवर वाढतो.
 • टेस्टोस्टेरॉन हॉरमोन मुळे नैराश्य, चिंता कमी होते जे तुमच्या कमी स्टॅमिना साठी जबाबदार असू शकतात.

कमी प्रमाणात अल्कोहोल चा फायदा हा महिलांमध्ये सुद्धा बघायला मिळतो.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (Pub-Med central) मध्ये २००६ साली ऑनलाइन प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात सांगितले आहे की अल्कोहोल हे महिलांना वासनाधीन (horny) बनवते. पण तेच अल्कोहोल जर जास्त प्रमाणात घेतले तर त्याचा लैंगिक क्षमतेवर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो.

तसेच मेडिकल न्यूज टूडे नुसार महिलांनी कमी प्रमाणात अल्कोहोल घेतल्यास त्यांना जोडीदारविषयी आकर्षक असल्याची भावना निर्माण होते. ज्यामुळे महिलांना पुरुष अधिक आकर्षक वाटतात आणि त्यांच्यासोबत सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते.

सेक्स स्टॅमिना याबाबत बोलत असताना इरेक्टाइल डिसफंक्शन (erectile dysfunction) चा उल्लेख करणे महत्वाचे ठरते. इरेक्टाइल डिसफंक्शन ही एक लैंगिक समस्या आहे. याला आपण स्तंभण दोष सुद्धा म्हणतो.

इरेक्टाइल डिसफंक्शन मध्ये पुरुषांमध्ये सेक्स करण्यासाठी आवश्यक असणारी लिंगामध्ये ताठरता येत नाही. यामुळे एक प्रकारे स्टॅमिना कमी करण्यासाठी ही परिस्थिति जबाबदार असू शकते.

जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन या शोध कालिकेमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन विषयी एक अभ्यास प्रकाशित झालेला आहे. या अभ्यासाच्या प्रयोगामध्ये एकूण १५८० व्यक्तींचा, ज्यांना इरेक्टाइल डिसफंक्शन आहे आणि दारू ची सवय आहे, यांचा अभ्यास करण्यात आला.

या अभ्यासाच्या निष्कर्षात असे आढळले की कमी प्रमाणात अल्कोहोल चे सेवन करणाऱ्या पुरुषांमध्ये, अल्कोहोल चे अजिबात सेवन न करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत ३० टक्के कमी प्रमाणात इरेक्टाइल डिसफंक्शन ची समस्या आढळली.

अल्कोहोल स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयोगी ठरते हा निष्कर्ष काढण्यासाठी वैज्ञानिकांनी काही तथ्य सांगितलेली आहे.

 • काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की पुरुषांच्या जननेंद्रिये च्या glans penis या भागाची संवेदना म्हणजेच सेनसीटीविटी कमी होते ज्यामुळे सेक्स क्रिया जास्त वेळ चालते.
 • काहींचे म्हणणे असे आहे की काही प्रमाणात अल्कोहोल घेतल्यावर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो ज्यामुळे ते अधिक परफॉर्मेंस देऊ शकतात.
 • अजून एक मत म्हणजे अल्कोहोल सेवन केल्यावर वीर्यस्खलन चा कालावधी वाढतो.

 • वरील सर्व रिसर्च आणि त्यांचे निष्कर्ष यामधे कमी प्रमाणात अल्कोहोल हे सेक्स स्टॅमिना वाढवण्यास फायदेशीर ठरते असेच सांगितले आहे.

थोडक्यात काय तर वरील सर्व तथ्याच्या आधारावर स्टॅमिना वाढवण्यासाठी कमी प्रमाणात अल्कोहोल सेवन मदत करू शकते असा दुजोरा देतात.

पण कमी प्रमाण हे अनेकांच्या बाबतीत वेगवेगळे असू शकते. कमी प्रमाण म्हणजे किती प्रमाण याची कुठेही व्याख्या नाही.

तरी देखील यासाठी अजून रिसर्च होण्याची आवश्यकता आहे.

2. कॅफिन (चॉकलेट)

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय

कॅफिन हे मज्जा संस्थेवर उत्तेजनात्मक परिणाम करणारा एक पदार्थ आहे. साधारणता आपण जे चॉकलेट, कॉफी, चहा सेवन करतो, त्यात महत्वाचा घटक हा कॅफिन असतो.

त्यामुळे हे कॅफिन आपण रोज पोटात टाकतो असे म्हटले तरी चालेल.

रोज घेणारे हे कॅफिन स्टॅमिना वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल. यावर देखील स्टॅमिना वाढवण्यासंबंधी बरेच अभ्यास झाले आहे.

पण जर साधारण आपण या कॅफिन चे गुणधर्म जरी बघितले तरी आपल्याला कळून येईल का हे सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

 • कॅफिन हे एक उत्तेजक म्हणून मेंदूवर काम करते. यामुळे सतर्कता आणि सकारात्मक मूड तयार होतो. तसेच उत्तेजक म्हणून काम करत असल्याने अप्रत्यक्षपणे सेक्स करण्यासाठी ची उत्सुकता जास्त वेळ राहते.
 • कॅफिन हे ह्रदयाचे ठोके वाढवून संपूर्ण शरीराचा रक्तपुरवठा वाढवते. सेक्स विषयीचा स्टॅमिना मध्ये सातत्य राहावे यासाठी शरीराला योग्य आणि अधिक प्रमाणात रक्तपुरवठा होणे आवश्यक आहे. काही अभ्यासात असे ही सिद्ध झाले आहे की कॅफिन हे पुरुष जननेंद्रिय ठिकाणी रक्तपुरवठा वाढवते. (यामुळे त्या ठिकाणी जास्त वेळ ताठरता राहते)
 • काही लोकांनी कॅफिन घेतल्यानंतर कामवासना आणि लैंगिक इच्छा वाढल्याचे सांगितले आहे.
 • कॅफिन मुळे शरीरातील थकवा आणि नैराश्य दूर होते. याच थकवा आणि नैराश्य यामुळे सेक्स स्टॅमिना कमी होण्याची भीती राहते.

राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षण (एनएचएएनईएस) मध्ये ३७२४ लोकांनी सहभाग घेतला होता. या लोकांवर इरेक्टाइल डिसफंक्शन आणि कॅफिन यांचा संबंध काय याचा अभ्यास करायचा होता. या अभ्यासात असे आढळले की ८५ ते ३०३ मीग्रॉम एवढी एका दिवसात कॅफिन सेवन करणाऱ्यांना इरेक्टाइल डिसफंक्शन ची समस्या कमी आढळली.

ज्या उलट काही लोकांनी कमी प्रमाणात कॅफिन सेवन केल त्यांच्यामध्ये स्तंभण चा त्रास जास्त प्रमाणात आढळला. याचा सविस्तर अभ्यास नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

प्लॉस वन या जर्नल मध्ये प्रकाशित या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो की २ ते ३ कप रोज कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन च्या तक्रारी कमी आढळल्या.

द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन नुसार सुद्धा “दैनंदिन चॉकलेट चे सेवन हे महिलांच्या लैंगिक आरोग्य समस्यांवर सकारात्मक परिणाम दाखवते.”

या सर्व शास्त्रीय स्पष्टीकरणानंतर आपण असे समजू शकतो कॉफी, चहा, किंवा इतर caffeinated drinks यामुळे सेक्स स्टॅमिना वाढवण्यास मदत होते.

तेव्हा तुमच्या पार्टनर बरोबर क्वालिटी वेळ घालवायचा असेल तर त्याआधी भरपूर चॉकलेट खायला विसरू नका.

सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय यांची माहिती बघत असताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. इथे सर्व जे उपाय बघत आहोत ते फक्त घरगुती उपाय म्हणून आहेत.

तुम्हाला जर याची याची तीव्र समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

३. कीगल एक्झरसाइज (kegel exercise)

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय याचा विचार करत असताना किगल व्यायामाचा पर्याय नाही बघितलं तर चुकीचे ठरेल.

कीगल एक्झरसाइज हा एक प्रकारचा व्यायाम आहे. या व्यायाममध्ये मुख्यत्वे पेलविक फ्लोर मधील स्नायूंना लक्ष करून ते स्नायू बळकट केली जातात. पेलविक फ्लोर हा आपल्या शरीरातील असा भाग आहे जिथे मूत्राशय, गर्भाशय, testis, जननेंद्रिय असे अवयव असतात. त्यामुळे किगल व्यायाम केल्यामुळे येथील अवयवांचे आरोग्य चांगले राहते.

किगल एक्झरसाइज अनेक समस्यांवर जसे urinary incontinence, pelvic organ prolapses, erectile dysfunction यावर फायदेशीर ठरते.

स्टॅमिना वाढवण्याबाबतीत सुद्धा किगल व्यायामाचा फायदा होतो.

मेडिकल न्यूज टूडे नुसार किगल एक्झरसाइज ताठरता जास्त वेळ कायम ठेवण्यासाठी आणि शीघ्र पतन समस्येवर प्रभावी ठरू शकते.”

1948 मध्ये युनायटेड स्टेट्सचे स्त्रीरोगतज्ञ डॉ. अरनॉल्ड एच. केगेल यांनी बाळांतपणानंतर आणि महिलांच्या शास्त्रक्रियेनंतर पेलविक फ्लोर चा हा व्यायाम महिलांसाठी कसा फायद्याचा ठरतो याविषयी अभ्यास केला होता. तसे त्यांनी नंतर ते सिद्ध ही केले.

तेव्हापासून या विशिष्ट व्ययामांना किगल एक्झरसाइज असे म्हटले जाते.

कीगल व्यायाम कसा करावा ?

तुमचा सेक्स स्टॅमिना जर कमी असेल तर नियमित किगल व्यायाम तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतो.

यानंतर किगल व्यायाम कसा करावा याबद्दल माहिती घेऊ.

आपण बघितले की किगल एक्झरसाइज मध्ये पेलविक फ्लोर मध्ये विशिष्ट स्नायूंना लक्ष करून व्यायाम केला जातो. लैंगिक संबंध ठेवत असताना ती क्रिया जास्त वेळ चालू राहण्यासाठी वीर्य बाहेर पडण्याची जी क्रिया असते त्या क्रियेला आपल्याला लांबवते आले पहिजे.

यासाठी त्या भागातील विशिष्ठ स्नायू वीर्य बाहेर पडण्यापसून रोखू शकतात. आपल्याला त्या विशिष्ट स्नायू ओळखायच्या आहेत आणि त्यांचा व्यायाम करायचा आहे. यामुळे आपल्याला त्या स्नायू वर नियंत्रण मिळवता येईल आणि आपल्याला मना नुसार आपण वीर्य बाहेर पडण्याच्या वेळेला त्या स्नायूचे आकुंचन करून वीर्य बाहेर पडण्यापसून थांबवता येईल.

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय

इथे महत्वाचा प्रश्न येतो की त्या स्नायू ओलखायच्या कशा ?

 • लगवी करत असताना मध्येच तुमच्या लगवीला ३ सेकंड साठी थांबवा आणि पुन्हा ३ सेकंड साठी सोडा. असे तुम्हाला सतत करायचे आहे.
 • यामधे लगवी थांबवण्यासाठी तुमच्या पेलविक फ्लोर मधील जे स्नायू वापरतात तेच स्नायू वीर्य बाहेर पडण्यापसून थांबवते. लैंगिक संबंध ठेवत असताना, वीर्य बाहेर पडणार असे वाटत असताना लगेच लगवी थांबवता तसे वीर्य थांबवण्याचा प्रयत्न करा.
 • हा व्यायाम चालू ठेवण्याकरता वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बसून देखील हा व्यायाम करू शकता. ३ सेकंड साठी ते स्नायू कॉंट्रॅक्ट करायचे आणि ३ सेकंड साठी रीलॅक्स करायचे.
 • असे सतत केल्यावर तेथी स्नायू स्ट्रॉंग होतात, त्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येते. यामुळे वीर्यस्खलन होत असताना देखील पूर्णपणे त्या स्नायू वर नियंत्रण मिळवून वीर्यस्खलन थांबवू शकता.

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून जर हा व्यायाम चालू करायचा असेल तर तो तुमच्या रुटीन मध्ये समाविष्ट करणे महत्वाचे आहे.

अशा पद्धतीने दर वेळेला वीर्यस्खलन ची वेळ वाढवून तुम्ही हळू हळू स्टॅमिना वाढवताल .

४. अश्वगंधा पाऊडर

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय मध्ये शेवटचा उपाय आहे अश्वगंधा.

अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक वनस्पति. अश्वगंधा वनस्पति तिच्या लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी ओळखली जाते.

अश्वगंधा हे नाव आयुर्वेद मधूनच प्राप्त झालेले आहे. अश्व म्हणजे घोडा. घोडयाप्रमाणे ऊर्जा देणारी ही वनस्पति असल्यामुळे अश्वगंधा असे नाव आहे. तसे अश्वगंधा चे अनेक आरोग्य फायदे आहेत पण महत्वाचा फायदा हाच आहे.

आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये सुद्धा अश्वगंधाच्या या फायद्याविषयी अनेक संशोधन झाले आहेत.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार अश्वगंधाचे वनस्पति चे मुळ हे शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक म्हणून काम करते.

त्यामुळे सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर अश्वगंधा हा सुरक्षित आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.

हे सुद्धा वाचा-अश्वगंधा चे फायदे

अश्वगंधा कसे घ्यावे ?

सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी अश्वगंधा सुरू करण्याचा विचार करत आहेत तर चांगलेच. कारण यामधे तुम्हाला खूप पर्याय मिळतात.

यामध्ये अनेक जण अश्वगंधा चूर्ण म्हणजेच पावडर घेण्याचे पसंद करतात. ते म्हणजे त्याच्या चवीसाठी. त्यामुळे अश्वगंधा चूर्ण याविषयी थोडी माहिती बघूया.

अश्वगंधा चूर्ण कसे घ्यावे ?

मार्केट मध्ये अनेक कंपनी कडून अश्वगंधा पावडर उपलब्ध करून दिले आहेत. चांगल्या दर्जेदार कंपनी कडूनच तुम्हाला अश्वगंधा चे चूर्ण घ्यायचे आहे.

अश्वगंधा चूर्ण तुम्ही सकाळ आणि रात्री अशा दोन्ही वेळेला दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये एक एक चमचा टाकून घेऊ शकता.

अश्वगंधा किती वेळ घ्यावी ?

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून अश्वगंधाचा उपयोग करायचा असेल तर तुम्हाला हे दैनंदिन घेणे आवश्यक आहे.अश्वगंधा चूर्ण हे तुम्हाला साधारणपणे ३ महिन्यांसाठी घ्यावे लागते. या कालावधी मध्ये तुम्हाला कोणत्याही आरोग्य समस्येविषयी पूर्णपणे फायदा मिळू शकतो.

तरी देखील जर तुम्हाला एलर्जि संबंधित काही तक्रार असेल तर यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

वरील सर्व उपाय हे स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून अत्यंत प्रभावी आहेत. तरी देखील जर तुम्हाला कोणतीही स्टॅमिना विषयी तीव्र तक्रार असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

धन्यवाद..

FAQ’s

लैंगिक शक्ति वाढवण्यासाठी काय खावे ?

लैंगिक शक्ति वाढवण्यासाठी तुम्ही रोज फळे खाललेली कधी ही चांगली राहील. शेवटी जे तुमच्या ह्रदयाला ताकत देईल तेच तुमच्या खाली ही ताकत देईल. शिवाय मी वर सांगितलेली घरगुती उपाय ही करू शकता.

कोणते फळ तुम्हाला अंथरुणावर जास्त काल टिकण्यास मदत करते ?

केळी हे फळ तुम्हाला अंथरुणावर जास्त काल टिकण्यास मदत मदत करू शकते. केळी मध्ये एनर्जि भरपूर प्रमाणात असते ,serotonin होरमोन ची पातळी वाढवते. यात magnesium देखील असते जे तुम्हाला वीर्य बाहेर येण्याचे अगोदर स्नायू नियंत्रित करण्यास मदत करते.

स्टॅमिना वाढवण्याची गोळी मिळते का ?

वाढवण्याची गोळी नक्कीच मिळते.त्पुरत्या स्वरूपात तुमच्या लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी गोळी भेटते. यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.

अश्वगंधा पावडर खाण्याचे फायदे अजून काय आहेत ?

अश्वगंधा पावडर खाण्याचे फायदे अनेक आहेत. तुमची लैंगिक क्षमता वाढवते,झोप चांगली देते,प्रतिकारशक्ति वाढवते एकंदर रसायन म्हणून अश्वगंधा चा उपयोग होतो.

मी रोज अश्वगंधा घेऊ शकतो का ?

नक्कीच. तुम्ही अश्वगंधा रोज घेऊ शकता पण आरोग्य संबंधी इतर समस्या असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.

11 thoughts on “स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय- Tips to increase sex stamina.”

 1. तुम्हाला काय विचारायचे आहे हे मला कळू शकले नाही. कृपया तुमचा प्रश्न सविस्तर विचारा.

  Reply
 2. जास्त वेळ स्टॅमिना टिकवण्यासाठी stud5000 penis वर स्प्रे वापरला तर चालतो का.
  स्प्रे कश्या प्रकारे काम करतो

  Reply
  • वापरू शकता, तुम्ही जेव्हा जेव्हा वापरताल तेव्हा तेव्हा तुम्हाला याचा फायदा मिळेल. पण मग हे उपाय तुम्ही किती दिवस करणार. तुम्ही ज्या स्प्रे किंवा गोळी या गोष्टींचा विचार करत आहात हे उपाय खूपच क्षणिक आणि तात्पुरते आहेत. शिवाय याचे अनेक दुष्परिणाम आहेत, जे की तुम्हाला लगेच जाणवू शकतात. या व्यतिरिक्त हे उपाय सर्व व्यक्तींमध्ये सारख्या पद्धतीने काम करतील असे नाही. त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ साठी विचार करून समस्या पूर्णपणे मुळासकट घालवण्यासाठी विचार करा.

   Reply
 3. स्टॅमिना टिकवण्यासाठी stud5000 penis वर स्प्रे वापरला तर चालतो का. स्प्रे कश्या प्रकारे काम करतो.

  Reply
 4. Megalis 20 ही गोळी सेक्स साठी चांगली आहे का. जर heart beat वाढण्याचा त्रास असेल तर चालेल का?

  Reply

Leave a Comment