HEALTHBUSS

अश्वगंधा चे फायदे | Benefits of Ashwagandha

Last updated on December 20th, 2023 at 05:41 pm

Contents

(अश्वगंधा चूर्ण मराठी, अश्वगंधा उपयोग मराठी,अश्वगंधा फायदे मराठी, अश्वगंधा मराठी माहिती, अश्वगंधा मराठी, अश्वगंधा चे फायदे मराठी.ashwagandha marathi fayde, ashwagandha marathi meaning, ashwagandha marathi mahiti, ashwagandha marathi, ashwagandha marathi name, ashwagandha benefits in marathi, ashwagandha information in marathi.)

अश्वगंधा ही एक प्रभावी आयुर्वेदिक वनस्पति आहे. या वनस्पतीचा उपयोग (Benefits of Ashwagandha) प्राचीन काळापासून अनेक व्याधी आणि आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी केला जात आहे.

या ब्लॉग मध्ये आपण अश्वगंधा चे फायदे (Benefits of Ashwagandha) आणि विविध प्रकारच्या रोगांमध्ये त्याचा कसा उपयोग होतो याची माहिती बघणार आहोत.

ज्या परिस्थिति मध्ये अनेक रासायनांनी भरलेली औषध वापरुन लोकांना त्याचे side effects, reaction किंवा दुष्परिणाम होत आहे अशा वेळेला लोक आयुर्वेदकडे एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय म्हणून बघत आहेत.

अशा या प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धतीमध्ये अश्वगंधा या वनस्पति चे महत्वाचे स्थान आहे. अनेक आजार आणि आरोग्य विषयक समस्यांसाठी या अश्वगंधा वनस्पति चा उपयोग होत आहे. या ब्लॉग मध्ये आपण सविस्तर पद्धतीने अश्वगंधा चे फायदे बघणार आहोत.

पण त्याआधी आपण अश्वगंधा वनस्पति विषयी काही मूलभूत माहिती बघूया, जी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

अश्वगंधाचे झाड कसे असते ?

अश्वगंधाचे झाड हे साधारण १ ते २ मिटर म्हणजेच ३ ते ५ फुट उंचीपर्यंत असू शकते. या वनस्पतीच्या फांद्या बळकट आणि बारीक केसांनी झाकलेल्या असतात.

या वनस्पती चे पाने मंद हिरव्यागार रंगाचे असतात तसेच थोडे गुळगुळीत असतात. ही पाने लंबवर्तुळाकार असतात आणि ४ ते ६ इंच एवढी असू शकतात.

अश्वगंधा वनस्पति,अश्वगंधा चे फायदे मराठी

अश्वगंधा ची फुले बारीक घंटा आकाराची आणि पिवळी पण थोडी हिरव्या रंगाची असतात.

फळांचा विचार केला तर फळे लहान, गोलाकार असतात ज्यामध्ये छोट्या पिवळसर आणि तपकिरी रंगाच्या बिया असतात.

हे आहेत अश्वगंधा चे फायदे (ashwagandha uses in marathi)

या मध्ये आपण आता एकेक करून अश्वगंधा चे फायदे काय आहेत ते बघूया.

१. तणाव व्यवस्थापन

अनेक कारणांमुळे अश्वगंधा तणाव आणि नैराश्य व्यवस्थापन करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी अशी औषधी मानली जाते. या रिसर्च नुसार अश्वगंधा नैराश्य तणाव परिस्थितिमध्ये उपयुक्त अशी औषधी आहे.

आपल्या शरीरात काही हॉर्मोन्स असतात जे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या भावनांना नियंत्रित करत असतात.

त्या हॉर्मोन्स पैकी एक म्हणजे cortisol hormone.

हे cortisol hormone काही कारणांमुळे वाढतात आणि परिणामी या मुळे आपल्या मध्ये तणाव, stress याचे प्रमाण वाढते. यामुळे Cortisol हॉरमोन ला स्ट्रेस हॉरमोन म्हणतात.

शतावरी वनस्पति तुमच्या मध्ये उत्पन्न या cortisol hormones चे प्रमाण कमी करते. या hormones चे शरीरात कमी प्रमाण झाल्यास आपल्यामध्ये शांती आणि आराम यांसारख्या भावनांची उत्पत्ति होते. या मुळे आपल्याला तणाव, चिंता, नैराश्य किंवा stress या गोष्टींवर नियंत्रण ठेवायला मदत होते.

तसेच तणाव संबंधित इतर आजार ज्यामुळे वंध्यत्व वगैरे परिस्थिति उद्भवू शकते, अशा आजारांवर सुद्धा अश्वगंधा चे फायदे बघायला मिळतात.

२. स्मरणशक्ती वाढवणे

अश्वगंधा वनस्पति स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढवण्यास मदत करते. अनेक संशोधन आणि अभ्यासातून असे दिसून आले की अश्वगंधा वनस्पति मुळे मज्जातंतुची वाढ होते आणि मेंदूपेशी यांची झीज होण्यापासून थांबते. या सर्व अभ्यासाचे निष्कर्ष हेच सांगतात की अश्वगंधा चे सेवन ही व्यक्तींची संज्ञानात्मक शक्ति आणि परिणामी त्यामुळे स्मरणशक्ती वाढवते.

या अभ्यासानुसार स्किझोफ्रेनिया असलेलेल्या रुग्णांमध्ये संज्ञानात्मक आणि स्मरणशक्ती वाढवते वाढल्याचे निष्पन्न झाले आहे

त्याचबरोबर एका अभ्यासानुसार 50 व्यक्तींनी आठ आठवड्यासाठी दररोज 600 मिलीग्राम अश्वगंधा अर्क घेतल्याने त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेमद्धे वाढ झाल्याचे दिसून आले होते. या व्यक्तींमध्ये ध्यान, माहिती प्रक्रिया करणूयाची गती सुधारल्याचे दिसून आले.

३. रोगप्रतिकारक शक्ति वाढवणे

आपल्या शरीरात कोणतेही आजार उद्भवू नये यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ति (immunity) चा उपयोग होतो. आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल तर अनेक आजार ,व्याधी आपल्याला सहज होतात. रोगप्रतिकार शक्ति आजारांसाठी कारणीभूत घटकांना आपल्या शरीराबाहेर फेकते आणि त्या आजारांपासून आपले संरक्षण करते.

अश्वगंधा मुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक अनुकूल स्थिति निर्माण होते आणि प्रतिकार शक्ति वाढते. यामुळे वारंवार होणारे आजार जसे की सर्दी, खोकला, ताप तसेच इतर सामान्य आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळत राहते.

४. ऊर्जा वाढवणे

अश्वगंधा चे फायदे बघत असताना त्याचा ऊर्जा उत्पन्न करण्यासंबंधी उल्लेख नाही केला तर चुकीचे ठरेल.

अश्वगंधामुळे शरीरातील ऊर्जा वाढते. यामुळे विविध कारणांमुळे येणारा थकवा दूर होतो.

या गुणामुळे अनेक क्रीडापटू, athletes, व्यायामाची आवड असणारे लोक या अश्वगंधा वनस्पतीचा उपयोग करतात. यामुळे ही वनस्पति वजन वाढवण्यासाठी (weight gain) ही खूप प्रभावी अशी आयुर्वेदिक औषधी आहे.

५. साखरेचे प्रमाण कमी करणे

अश्वगंधा वनस्पति तुमच्या शरीरातील अतिरिक्त साखरेचे नियंत्रण करू शकते. अश्वगंधा वनस्पति वरील अभ्यासात असे दिसून आले की ही वनस्पति मधुमेह असणाऱ्या लोकांच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यामध्ये मदत करते.

यावर झालेल्या अनेक अभ्यासाच्या समूहानुसार मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये अश्वगंधा चा उपचार केल्यास त्यांची रक्ताची शुगर पातळी, हिमोग्लोबिन A1c (HbA1c), इन्सुलिन, रक्तातील लिपिड आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आढळून आले.

त्यामुळे अश्वगंधा ही वनस्पति मधुमेह (diabetes) असणाऱ्या लोकांसाठी देखील उपयुक्त आहे.

६. ह्रदयाचे आरोग्य राखणे

अश्वगंधा वनस्पति ही हृदयाला चांगले आरोग्य प्रदान करते. या वनस्पति मध्ये असलेले antioxidant हृदयावरील तणाव आणि सूज कमी कमी करण्यास मदत करतात.

त्याचबरोबर रक्ताभिसरण करणाऱ्या रक्तवाहिन्यांमद्धे असलेले cholesterol (fat) चे प्रमाण अश्वगंधा कमी करते.

यामुळे रस आणि रक्तवह स्त्रोतसे यांचे एकंदर आरोग्य या अश्वगंधा वनस्पति मुळे चांगले राहते.

७. पुरुष प्रजनन क्षमता वाढवणे

अश्वगंधा चे फायदे बघत असताना पुरुषांना मिळणारे फायदे या विषयी माहिती घेणे गरजेचे ठरते.

अश्वगंधा वनस्पति ही पुरुष संबंधी प्रजनन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी देखील उपयुक्त अशी वनस्पति आहे. पूर्वीपासूनच अश्वगंधा वनस्पति ही वंध्यत्व सारख्या पूरूष संबंधी प्रजनन समस्यासाठी एक प्रभावी आयुर्वेदिक औषधी म्हणून वापरली जात आहे.

या अभ्यासानुसार अश्वगंधा चा केल्यास पुरुषांमध्ये शुक्राणूंची एकाग्रता (sperm concentration), वीर्य मात्रा (semen volume) आणि शुक्राणूंची गतिशीलता (sperm motility) वाढल्याचे दिसून आले आहे.

या विषयी एका संशोधनात ही वनस्पति शुक्राणु गुणवत्ता आणि प्रमाण वाढवण्यास मदत करते असे दिसून आले आहे.

संबंधित वाचा –सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय

८. हॉरमोन समतोल ठेवणे

महिलांच्या आयुष्याच्या ठराविक टप्प्यांवर येणाऱ्या वेगवेगळ्या जैविक घटना यांमुळे महिलांचे शरीर ही अनेक शारीरिक जैविक प्रक्रियांना सामोरे जात असते. जसे की मासिक पाळी चालू होणे, गर्भधारणा, स्तनपान व अशा इतर घटना यांमुळे महिलांच्या शारीरिक प्रक्रिया या खूप गुंतागुंतीच्या असतात.

या सर्व गुंतागुंतीच्या प्रक्रियांमुळे विविध प्रकारचे hormones कमी जास्त प्रमाणात होत राहतात. या hormones मध्ये काही abnormal झाल्यास महिलांना अनेक वेळ आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते.

संबंधित वाचा-मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय

संबंधित वाचा-मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते?

अश्वगंधा वनस्पति या सर्व hormones ना समतोल प्रमाणात ठेवून महिलांना प्रजनन संबंधित आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

९. त्वचेचे आरोग्य राखणे

अश्वगंधा वनस्पति मुळे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत होते. यामध्ये असणारे antioxidants आणि दाहविरोधी गुणधर्म वृद्धत्व टाळण्यास मदत करतात. या गुणांमुळे अश्वगंधा ही अनेक सौन्दर्य प्रसाधनांमद्धे वापरली जाते.

एकंदर आपण अश्वगंधा चे फायदे आणि त्या संबंधित इतर आवश्यक माहिती बघितली.

आता अश्वगंधा कसे सेवन करावे याबद्दल माहिती घेऊ या.

अश्वगंधा कसे घ्यावे ?

अश्वगंधा वनस्पति ही पाऊडर (चूर्ण), कॅप्सुल, अरिष्ठ आणि आता चहा या स्वरूपात देखील उपलब्ध आहे.

या पैकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि आरोग्य फायद्याच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही एक स्वरूपात अश्वगंधा सेवन करायला सुरुवात करू शकता.

आपण याबद्दल थोडी माहिती घेऊया.

१. अश्वगंधा पाऊडर ( चूर्ण )

अश्वगंधा चूर्ण

अश्वगंधा पाऊडर किंवा चूर्ण हे तुमच्या दैनंदिन आहारात कसे समाविष्ट करू शकता हे बघूया.

यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पाऊडर चे प्रमाण कमी ठेवायचे आहे. साधारण ३०० ते ५०० mg प्रतिदिन पासून सुरुवात करू शकता.

अश्वगंधा चूर्ण कसे घ्यावे ?

जेवनासोबत

यामध्ये तुम्ही जेवत असताना केलेल्या भाजीसोबत किंवा नंतर पित असलेल्या पाण्यासोबत हे चूर्ण मिक्स करून याचे सेवन करू शकता. अशा पद्धतीने सेवन केल्यास तुमचे पचन संबंधित आजारा मध्ये तुम्हाला आराम मिळेल.

चहा मध्ये

तुम्ही अश्वगंधा चूर्ण हे चहा म्हणून सुद्धा घेऊ शकता. थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये अंदाजे अश्वगंधा चूर्ण टाकून त्याला ५-१० मिनीटे उकळवायचे आहे. ते पानी उकळल्यानंतर चवीसाठी त्यात तुम्ही थोडासा मध टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही चहा म्हणून अश्वगंधाचा उपयोग करू शकता.

दुधासोबत

अश्वगंधा चूर्ण हे दुधा सोबत घेणे हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्ही उकळलेल्या कोमट दुधा सोबत अश्वगंधा चूर्ण टाकायचे आहे आणि त्यात थोडी हळद आणि मध टाकून त्याचे सेवन करायचे आहे. दूध आणि अश्वगंधा चूर्ण हे सोबत घेण्याची पद्धत खूप प्राचीन असून खूप आरोग्यदायी अशी recipe आहे.

अश्वगंधा शेक

सकाळी नाश्ता करण्यासाठी तुम्ही अश्वगंधा शेक पिऊ शकता. अश्वगंधा शेक बनवण्यासाठी दही किंवा दूध घेऊन त्यामध्ये तुमचे आवडते फळ आणि थोडे अश्वगंधा चूर्ण टाकून त्याला मिक्सर मधून काढायचे आहे. पोषक घटकांनी भरपूर असा हा शेक सकाळी नाश्ता करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

२. अश्वगंधा अरिष्ट

अश्वगंधा आणि इतर आयुर्वेदिक वनस्पति मिक्स करून बनवलेले हे एक मिश्रण असते. याला अरिष्ट म्हणतात. याचा फायदा मुख्यता तणाव व्यवस्थापन, नैराश्य किंवा इतर मानसिक दौर्बल्य यामध्ये होतो. अश्वगंधा अरिष्ठ तुम्हाला आयुर्वेदिक औषधालय मध्ये मिळेल.

याचे सेवन तुम्ही तुमचे निदान करून तुमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे करायचे आहे. साधारणता १५-२० ml तेवढ्याच पाण्यामध्ये मिक्स करून दिवसातून २ वेळा घेण्याचा सल्ला दिला जातो.

३. अश्वगंधा कॅप्सुल

अश्वगंधा चे टॅब्लेट

अश्वगंधा सेवन करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. अश्वगंधा कॅप्सुल मध्ये बारीक केलेले अश्वगंधा च्या मुळांचे पाऊडर किंवा अर्क असतात.

वरील भागात आपण अश्वगंधाचे वेगवेगळे स्वरूप आणि त्यांची माहिती बघितली. पुढील भागात आपण एक सामान्यपणे अश्वगंधा विषयी काही मूलभूत प्रश्नांची माहिती बघूया.

अश्वगंधा कधी घ्यावे ?

सामान्यपणे तुम्ही अश्वगंधा दिवसातून कधीही घेऊ शकता.

उदाहरण,समजा तुम्ही अश्वगंधा दैनंदिन आरोग्य सुधारण्यासाठी supplement म्हणून घेत असाल तर तुम्ही दिवसातून कोणत्याही वेळेला घेऊ शकता.

झोप सुधारण्यासाठी किंवा तणाव व्यवस्थापन करण्यासाठी घेत असाल तर रात्री च्या वेळेला दुधासोबत घेतल्यास अधिक फायदा मिळतो. शेवटी यासाठी असा काही नियम नाही. तुमच्या वेळेनुसार सकाळ किंवा रात्री अशा दोन्ही वेळेला घेऊ शकता.

रोज अश्वगंधा घेणे योग्य आहे का ?

रोज अश्वगंधा घेणे योग्य आहे की नाही याबद्दल अनेक मत आहेत. पण सामान्यपणे बऱ्याच दैनंदिन स्वरूपात अश्वगंधा घेणारे लोकांना कोणत्याही प्रकारचे अपाय किंवा दुष्परिणाम झाल्याचे दिसले नाही. असे कोणतेच पुरावे नाहीत जे की जास्त दिवसांसाठी अश्वगंधा घेतल्यावर अपायकारक सिद्ध झाल्याचे सांगतात. साधारण पणे तीन महिन्यांसाठी घेतलेले सुरक्षित मानले जाते.

दीर्घ काळासाठी अश्वगंधा घ्यायचे असल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लक्षात असू द्या की प्रत्येकाच्या आरोग्य समस्या वेगळ्या असू शकतात तसेच वय आणि इतर आजार यावर अवलंबून तुम्हाला प्रत्यक्ष तपासणी करून डॉक्टर तुम्हाला वेळ आणि या औषधांचा डोस ठरवतील. तुम्हाला त्या प्रमाणेच या औषधांचे सेवन करायचे आहे.

या ब्लॉग मध्ये आपण अश्वगंधा विषयी सामान्य माहिती, फायदे आणि त्याचे सेवन कसे करावे याबद्दल माहिती बघितली आहे.

अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल.

FAQ’s

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून अश्वगंधा घेऊ शकतो का ?

स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून अश्वगंधा घेऊ शकता.

मी रोज अश्वगंधा घेऊ शकतो का ?

नक्कीच,तुम्ही रोज अश्वगंधा घेऊ शकता. हे एकदम सुरक्षित आहे.

रात्री अश्वगंधा घेतल्याने काय होते ?

रात्री अश्वगंधा घेतल्याने तुम्हाला चांगली झोप येते. निद्रनाश वगैरे झोपेच्या समस्या कमी होतात.

अश्वगंधा घेतल्यानंतर तुम्ही खाऊ शकता का ?

हो नक्कीच. अश्वगंधा घेतल्यानंतर तुम्ही खाऊ शकता.

अश्वगंधा किती वेळ घ्यावी ?

अश्वगंधा किती वेळ घ्यावी याचे उत्तर सरळ देता येणार नाही. तुमची आरोग्य स्थिति,आरोग्य समस्या,वय आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून हा कालावधी असतो. साधारण ३ ते ४ महीने एवढा वेळ अश्वगंधा घेण्याचा सल्ला दिल जातो.

अश्वगंधा आणि शतावरी कसे घ्याल ?

अश्वगंधा सकाळी आणि शतावरी संध्याकाळी असे आळीपाळीने घेऊ शकता.

3 thoughts on “अश्वगंधा चे फायदे | Benefits of Ashwagandha”

  1. Very nice and useful information.Doc I congratulate to you for.this information. Please keep it continue.we bless you a lot as student.

    Reply

Leave a Comment