Last updated on November 8th, 2023 at 05:23 pm
मासिक पाळी न येण्याचे कारण, मासिक पाळी उशिरा का येते, मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याचे कारण, अनियमित मासिक पाळी कशामुळे येते, मासिक पाळीचा विलंब किती दिवस सामान्य आहे, गर्भधारणा झाल्याशिवाय मासिक पाळी किती दिवस उशिरा येते. (masik pali marathi,masik pali kiti divas aste, masik pali 15 divsanni yete, masik pali kiti divsanni yete, masik pali velevar ka yet nahi, masik pali n yenyache kaaran, masik pali late ka yete in marathi, masik pali Kiti Divas late hou Shakte)
नेमके मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते याबद्दल स्त्रियांना माहिती असणे गरजेचे आहे. ही माहिती असेल तरच स्त्रिया मासिक पाळी विषयी समस्यांना सकारात्मक पद्धतीने सामोरे जातील. हाच विषय घेऊन याबद्दलचे उत्तर या ब्लॉग मध्ये मी देणार आहे.
मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक महत्वाची जैविक प्रक्रिया आहे. पण या मासिक पाळी विषयी अनेक स्त्रियांना त्यांच्या आयुष्याच्या काळात एकदा तरी कोणत्या न कोणत्या तरी समस्यांना तोंड द्यावे लागते. असे अनेक प्रश्न या मासिक पाळी विषयी स्त्रियांच्या मनामध्ये असतात. असाच एक प्रश्न म्हणजे आहे तो म्हणजे मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते ?
याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर आणि त्याबद्दलचे गैरसमज याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत.
तसेच या ब्लॉग मध्ये मासिक पाळी वेळेवर न येण्यासाठी कारणीभूत घटक आणि मासिक पाळीच्या अनियमिततेवर परिणाम करणाऱ्या काही घटकांची थोडक्यात माहिती बघणार आहोत.
महिलांच्या एकंदर मासिक पाळी च्या कोणत्याही समस्या साठी उपयुक्त असे शतावरी च्या टॅबलेट्स खरेदी करा.
चुकलेली किंवा लांबलेली मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते ?
मासिक पाळी चुकणे किंवा मासिक पाळी लांबणे यासाठी बरेच घटक कारणीभूत असतात. पण जर इतर काही आरोग्य समस्या उद्भवली नसेल (सर्व काही नॉर्मल असेल ) तर नेमके मासिक पाळी किती दिवस लांबू शकते ही माहिती बघूया.
या संबंधीची माहिती आणि काही कारणे समजून घेण्यासाठी मासिक पाळी प्राकृत कशी असते याबद्दल माहिती बघूया.
प्राकृत,नॉर्मल किंवा नैसर्गिक मासिक पाळी
मासिक पाळी ही संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन्स (HORMONES) यांची एक क्लिष्ट पाळी आहे. म्हणजेच यामध्ये बरेच हॉर्मोन्स असतात ज्यांच्या स्थितीमुळे स्त्रियांना मासिक पाळी येते. प्रत्येक पाळीदरम्यान चार प्रमुख phases असतात. या प्रत्येक phase मध्ये विशिष्ट एक किंवा त्यापेक्षा जास्त हॉरमोन शरीरामधून तयार आणि secret होत असतात.
प्रत्येक मासिक पाळीमध्ये चार महत्वाचे phase म्हणजेच टप्पे असतात.
- मासिक पाळी (menstrual phase)
- फॉलिक्युलर फेज (follicular phase)
- ओव्हुलेशन (ovulation phase)
- ल्यूटियल फेज (luteal phase)
या प्रत्येक टप्प्यामद्धे एक किंवा दोन हॉर्मोन्स सक्रिय होतात किंवा कमी होऊन त्या टप्प्याला सुरुवात करत असतात.

या संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गुंतगुंतीच्या असतात.
ही मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते ?
याचे उत्तर एका वाक्यात देणे अवघड आहे.
पण या संबंधीचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी काढलेला आहे. त्याचाच आधार घेऊन आपण इथे माहिती बघणार आहोत.
सामान्यपणे प्रत्येक मासिक पाळी ही 21 ते 25 दिवसांच्या दरम्यान येत असते. या मासिक पाळीची सरासरी लांबी किंवा सरासरी काळ हा 28 दिवसांचा असतो आणि नैसर्गिक पद्धतीने तो 28 दिवसांचा असायला हवा.
पण या 28 दिवसांच्या नंतर देखील काही दिवस असतात ज्या दिवसांमध्ये मासिक पाळी येणे नैसर्गिक मानले जाते.
हे दिवस 4 ते 6 दिवस असू शकतात.
म्हणजे पुढची पाळी येण्यासाठी जर 28 दिवस गेले असतील आणि त्यानंतर 4 ते 6 दिवस तुम्हाला पाळी उशिरा येत असेल तर त्याला नॉर्मल समजावे.
म्हणजेच सामान्यता किरकोळ फरक पूर्णपणे नैसर्गिक आहे.
या 4 ते 6 उशिरा येणाऱ्या दिवसांसाठी काही घटक कारणीभूत असू शकतात. या घटकांची माहिती असणे ही तेवढेच आवश्यक आहे.
तणाव, जीवनशैली (lifestyle) आणि इतर बरेच घटक आहे ज्यामुळे मासिक पाळी सामान्यता उशिरा येऊ शकते.
हे सुद्धा वाचा –मासिक पाळी न आल्यास काय करावे?
मासिक पाळी उशिरा येण्याचे कारण
यामध्ये आपण मासिक पाळी उशिरा का येते आणि यासाठी कोणते घटक जबाबदार असू शकतात याची माहिती बघूया.

1.तणाव/नैराश्य
तुमच्या आयुष्यात कोणताही तणाव किंवा नैराश्य असेल तर यामुळे तुमच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये फरक येऊ शकतो.
चिंता, मग ती भावनिक असो किंवा शारीरिक, यामुळे तुमच्या शरीरात हॉर्मोन्स चे प्रमाण बिघडते आणि यामुळे तुमची मासिक पाळी लांबू शकते.
2.PCOD
तुमची मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते या साठी अनेक इतर आजार जसे की PCOD किंवा PCOS हे घटक लक्षात घेणे गरजेचे आहे.
PCOD किंवा PCOS मध्ये तुमची मासिक पाळी नियंत्रित करणारे काही हॉर्मोन्स यांचे समतोल असणारे प्रमाण बिघडते. याच मुळे मासिक पाळीची नियमितता सुद्धा बिघडते.
तसेच या आजारामध्ये प्रजनन आणि मासिक पाळी या प्रक्रियेसाठी आवश्यक अवयवांना क्षती पोचल्या कारणाने त्यांचे कार्य व्यवस्थित पार पडू शकत नाही.
या सर्व गोष्टींचा परिणाम मासिक पाळी वर होत असतो.
3. शारीरिक थकवा
शारीरिक थकवा, मग तो कोणत्याही कारणामुळे आलेला असेल ,त्याचा परिणाम देखील मासिक पाळी वर होत असतो.
व्यायामाचा अतिरेक, तीव्र शारीरिक हालचाली, कामाची दगदग होणे यामुळे estrogen हॉरमोन चे संतुलन बिघडते ज्यामुळे मासिक पाळी वर परिणाम होऊन मासिक पाळी उशिरा येऊ शकते किंवा चुकू शकते.
त्यामुळे मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते हे बऱ्याच अंशी आपल्या दैनंदिन हालचाल, क्रिया आणि सवयींवर देखील अवलंबून असेल.
4. आहार आणि वजन
पौष्टिक आहार सेवन करत नसाल आणि यामुळे वजन अचानक कमी होणे किंवा अचानक वाढणे यामुळे देखील अनेक स्त्रियांची मासिक पाळी लांबू शकते.
तुमची बारीक शरीरयष्टी आणि इतर अपायकारक घटक हे शरीराला संकेत देतात की तुमचे शरीर गर्भधारणेसाठी तयार नाही आणि यामुळे मासिक पाळी चा ovulation हा टप्पा लांबू शकतो. परिणामी यामुळे पूर्ण मासिक पाळी वर परिणाम होऊन मासिक पाळी अनियमितता आणि ती वेळेवर न येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
5. गर्भधारणा
जर तुम्हाला प्रश्न पडला असले की तुमची मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते तर त्या संदर्भात तुमच्या मनामध्ये सर्वात आधी गर्भधारणा या विषयी नक्कीच विचार आला पाहिजे.
कारण पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते यापेक्षा आपली मासिक पाळी आली नाही आणि आता काय करावे हा प्रश्न तुमच्यासाठी अधिक महत्वाचा ठरणार आहे.
जर तुमची मासिक पाळी चुकली असेल तर सर्वप्रथम तुम्हाला गर्भधारणा चाचणी करायची आहे.
गर्भधारणा चाचणी कशी करावी याबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत मी दूसरा ब्लॉग बनवला आहे.
6. इतर आजार
वरील सर्व घटकांबरोबर अजून एक महत्वाचा घटक ज्यावर तुमची मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते हे अवलंबून असते ते म्हणजे इतर वैद्यकीय परिस्थित किंवा आजार.
जीर्ण आजार जसे की थायरॉईड, मधुमेह आणि इतर काही घटक हे मासिक पाळी साठी आवश्यक हॉर्मोन्स यांचे मोठे प्रमाणात संतुलन बिघडवतात. यामुळे मासिक पाळी संबंधी अनेक समस्या उद्भवतात.
शेवटी, “मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते?” याचे सरळ सरळ उत्तर असू शकत नाही. थोडेफार सामान्यता या दिवसांमध्ये चढ उतार असू शकतो. हा चढ उतार देखील समान्यतेच्या कक्षेतच (4-6 दिवस) असायला हवा.
तरी नियमित मासिक पाळी आणि ठराविक काळाने यावी यासाठी तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल, सकारात्मक सवयी आणि इतर सकारात्मक आणि पोषक आहार घटकांची आवश्यकता असणार आहे.
FAQ’s
पाळी लवकर येण्याचे कारण काय आहे?
पाळी लवकर येण्याचे कारण हे विशेष करून तुमच्यामध्ये झालेले हॉरमोन इमबॅलेंस असू शकते.
या महिन्यात माझी मासिक पाळी जास्त का आहे?
या महिन्यात तुमची मासिक पाळी जास्त होण्याचे अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये सर्वसामान्य कारण म्हणजे गर्भधारणा आहे. इतर कारणे हे गर्भाशय आजार,हॉरमोन इमबॅलेंस संदर्भात असू शकतात.
मासिक पाळी दरम्यान मोठ्या रक्ताच्या गुठळ्या म्हणजे काय?
मासिक पाळी दरम्यान मोठ्या रक्ताच्या गुठळ्या या सामान्य असू शकतात. यामध्ये गर्भाशय अस्तर यामध्ये रक्त जमून ते रक्त बाहेर पडते असे समजावे. यामध्ये काही वेळा जास्त रक्तस्त्राव होऊन धोका होऊ शकतो.
माझा गर्भपात झाला आहे किंवा मासिक पाळी झाली आहे हे मला कसे कळेल?
गर्भपात मध्ये मासिक पाळी पेक्षा जास्त रक्तस्त्राव होतो आणि कही वेळा त्यासोबत रक्ताच्या गुठल्या पडू शकतात. मासिक पाळी मध्ये रक्तस्त्राव सामान्य असतो.
तुमच्या मासिक पाळीचे रक्त तपकिरी असते तेव्हा याचा काय अर्थ होतो?
तुमच्या मासिक पाळीचे रक्त तपकिरी सहसा मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसांमध्ये होऊ शकते जे की रक्ताच्या ऑक्सिडेशन प्रोसेस मुळे असते. यामध्ये ऑक्सिजन हे रक्ताच्या लाल पेशीमद्धे मिसळून त्याचे विघटन होते.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Working as Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747