HEALTHBUSS

पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार | PCOD sathi ayurvedic upchaar

Last updated on January 10th, 2024 at 11:19 am

Contents

(पीसीओडी आयुर्वेदिक उपचार मराठी)

महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत पीसीओडी ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही समस्या होण्यामागे कारणे ही तशीच आहेत. अनेक प्रसंगी आपण या कारणांच्या नकळत संपर्कात येत असतो म्हणून ही समस्या एवढी सामान्य झाली असे मी म्हणेल. हा विषय वेगळा आहे. मी त्याच्या खोलवर जाणार नाही.

या ब्लॉग च्या निमित्ताने आपण पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार बद्दल सविस्तर अशी माहिती बघणार आहोत. पीसीओडी साठी आधुनिक वैद्यकीय उपचार देखील प्रभावी आहेत. पण काही लोकांचा कल फक्त आयुर्वेदिक उपचाराकडेच असतो. त्या दृष्टीने या ब्लॉग मध्ये तुम्हाला प्रभावी आणि सुरक्षित असे पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार बद्दल माहिती या ठिकाणी मिळणार आहे.

पीसीओडी बद्दल थोडक्यात

पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचाराबद्दल माहिती जाणून घेण्याआधी नेमकं पीसीओडी म्हणजे काय हे जाणून घेतले तर त्यासाठी लागणाऱ्या उपचारांबद्दल तुम्हाला लवकर समजून येईल.

पीसीओडी किंवा पीसीओएस म्हणजे काय ?

पीसीओडी हा मुळात महिलांच्या हॉरमोन इमबॅलेंस संबंधित आजार आहे. पण याचा परिणाम महिलांच्या अंडकोष, मासिक पाळी आणि इतर प्रजनन घटकांवर अधिक होतो त्यामुळे महिलांच्या अंडकोष (ovary) च्या बाबतीत आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

त्यामुळे पीसीओडी हा महिलांच्या अंडकोष संबंधित आजार आहे. पीसीओडी (PCOD) चा अर्थ पॉली सिस्टिक ओव्हरी डिसीज (Poly Cystic Ovary Disease) असा होतो. ज्यामध्ये नावातच पॉली सिस्टिक ओव्हरी असा उल्लेख आहे ज्याचा अर्थ पुढील प्रमाणे होतो, पॉली म्हणजे अनेक, सिस्ट म्हणजे गाठी आणि ओवरी म्हणजे स्त्री अंडकोष.

तेव्हा या आजाराच्या नावानुसार पीसीओडी म्हणजे असा आजार ज्यामध्ये स्त्रियांच्या स्त्री अंडकोष (ovaries) मध्ये एक किंवा एका पेक्षा जास्त गाठी येतात. स्त्री अंडकोष हे पुनरुत्पादक प्रक्रिया आणि एकंदरीतच स्त्री आरोग्य घटक जसे मासिक पाळी, स्तनपान आणि गर्भधारणा यांना नियंत्रित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. या अंडकोष मध्ये उत्पन्न हॉर्मोन्स या सर्व घटकांवर परिणाम करत असतात. विशेषकरून मासिक पाळी आणि गर्भधारणा हे दोन्ही या अंडकोष द्वारे उत्पन्न हॉर्मोन्स द्वारे प्रभावित होत असतात.

पण आता पीसीओडी मध्ये या स्त्री बीजाशय (अंडकोष) मध्येच गाठी आल्या म्हणजे एक प्रकारे बिघाड झाला, तर त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांवर देखील त्याचा परिणाम होणारच. विशेषकरून मासिक पाळी आणि संबंधित घटकांवर त्याचा अधिक परिणाम बघायला मिळतो.

पीसीओडी म्हणजे काय

पीसीओडी मध्ये

  • प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स चे संतुलन बीघडते ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते.
  • स्त्री बीजाशय मध्ये परिणाम झाल्यामुळे एंड्रोजन नावाचे पुरुष हार्मोन्स स्त्री बीजाशय तयार करायला लागते.
  • या एंड्रोजन (testosterone) हॉरमोन मुळे हर्सुटिझम सारखे लक्षणे दिसायला लागतात. हर्सुटिझम मध्ये तोंड आणि हनुवटीभोवती केस येतात.

या सर्व गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला नेमक पीसीओडी म्हणजे काय, हे थोडक्यात कळलेच असेल असं ग्राहित धरून पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार या महितीकडे वळूया.

पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार

तुम्हाला पीसीओडी असल्याचे निदान झाल्यावर संबंधित तज्ञ डॉक्टरांकडे भेट देऊन त्या संबंधीचा योग्य उपचार घ्यावा यासाठी तुम्हाला आग्रह करतो. तुमच्या आरोग्य समस्यावर चालू असलेला उपचार ही माहिती वाचून थांबवू नका किंवा बदलू नका. तसे केल्यास त्याचे दुष्परिणाम तुम्हाला होऊ शकतात.

तरी देखील पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार बद्दल माहिती जाणून घेत असताना ती फक्त माहिती करिता आहे असे समजून त्याबद्दल चे सविस्तर विश्लेषण आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

१. शतावरी

पीसीओडी मध्ये शतावरी चा उपयोग

शतावरी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पति आहे. अनेक आरोग्य समस्यांवर या वनस्पति चा उपयोग होतो. विशेष करून महिलांच्या प्रजनन, मासिक पाळी आणि इतर आरोग्य समस्यांवर शतावरी चा अधिक फायदा दिसून येतो.

आता पीसीओडी हा आजार देखील मासिक पाळी आणि प्रजनन अवयव जसे स्त्री बीजाशय संबंधित असल्यामुळे शतावरी चा उपयोग पीसीओडी मध्ये सुद्धा केला जातो. किंबहुना अनेक रिसर्च नुसार शतावरी पीसीओडी आजार आणि पीसीओडी मधील काही लक्षणांना कमी करण्यास मदत करते असे सिद्ध झाले आहे.

  • शतावरी अंडकोष मध्ये दर महिन्याला स्त्रीबीज (oocyte) उत्पन्न करण्यासाठी मदत करते. यामुळे प्रत्येक महिन्याला स्त्रीबीज बाहेर पडून मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.
  • शतावरी एकंदर स्त्री प्रजनन अवयव आणि मासिक पाळी विषयी समस्यांमध्ये टॉनिक म्हणून काम करते ज्यामुळे संबंधित विकार कमी होतात.
  • आयुर्वेद नुसार मासिक पाळी नियमित आणि अंडकोष निरोगी राहण्यासाठी आर्तव धातू महत्वाची भूमिका बजावत असतो. शतावरी या आर्तव धातू ला प्राकृत स्थितीवर आणण्याचे काम करते.

२०२३ साली रिसर्च जर्नल ऑफ फार्मसी आणि टेक्नॉलॉजी मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार शतावरी चा अर्क हा हायपरग्लेसेमिया आणि हायपरंड्रोजेनिझम ची लक्षणे कमी करून पीसीओडी सारख्या समस्यांवर उपयोगी ठरते.

याचे महत्वाचे कारण insulin resistance आणि हायपरग्लेसेमिया या दोन्ही स्थिति पीसीओडी उत्पन्न करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. या रिसर्च नुसार पीसीओडी असणाऱ्या ७० टक्के महिलांमध्ये insulin resistance असल्याचे आढळले. यावरुण हे उघड होते की पीसीओडी आणि insulin resistance हे घटक किती एकमेकांवर प्रभाव पाडत असतात.

  • Insulin resistance मध्ये इंसुलिन रक्तातील वाढलेल्या ग्लुकोस चे व्यवस्थित नियंत्रण करू शकत नाही. त्यामुळे वाढलेले हे ग्लुकोस अंडकोष मधून androgen हॉर्मोन्स तयार करायला लागतात.

एका रिव्यू आर्टिकल नुसार शतावरी चे पाऊडर पीसीओडी मध्ये होणाऱ्या सिस्ट म्हणजे गाठी यांचे विघटन करून नवीन गाठी तयार होण्यापासून थांबवते. त्यामुळे पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार समजून घेत असताना शतावरीचे महत्व आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.

शतावरी कसे घ्यावे ?

  • शतावरी पाऊडर- २ चमचे २ वेळा, कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेणे.
  • शतावरी टॅब्लेट- १ ते २ गोळी दोन वेळा, त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे.

बेस्ट शतावरी ऑन amazon

संबंधित वाचा- शतावरी चे इतर फायदे

२. कांचणार गुग्गुल

कांचणार गुगगूळ एक आयुर्वेदिक औषधी आहे. यामध्ये एकूण ११ आयुर्वेदिक वनस्पति चे मिश्रण असते. महत्वाचे दोन आयुर्वेदिक वनस्पति घटक यामध्ये म्हणजे कांचनार आणि गुग्गुल.

कांचनार गुग्गुल ही औषधी देखील पीसीओडी कमी करण्यास मदत करते. विशेषकरून पीसीओडी मध्ये ज्या गाठी आलेल्या असतात, त्या गाठी कमी करून पीसीओडी चे इतर लक्षणे कमी करण्यास सुद्धा ही औषधी मदत करते.

आता यामध्ये प्रामुख्याने दोन घटक द्रव्य असल्यामुळे कांचणार आणि गुग्गुल या दोन घटकांचे गुण या मध्ये मिसळले असल्या कारणाने याचा अधिक परिणाम पीसीओडी मध्ये दिसून येतो.

कांचनार हे

  • सिस्ट कमी करण्यास आणि नवीन सिस्ट तयार होण्यापासून थांबवते.
  • सूज कमी करते.
  • अतिरिक्त जमा कफ आणि द्रव कमी करून तयार झालेल्या गुठल्या कमी करते.
  • वर्ल्ड जर्नल ऑफ फार्मास्युटिकल अँड मेडिकल रिसर्च नुसार कांचनार मध्ये हे दाहविरोधी, मधुमेह विरोधी आणि इंसुलिन नियमन करणारे गुणधर्म असल्यामुळे, कांचनार पीसीओडी कमी करण्यामध्ये मदत करते.

यामध्ये असणारे गुग्गुल हे

  • शरीरशुद्धी करते. यामुळे शरीरातील सर्व स्त्रोतसे उघडण्यास मदत होते.

अशा प्रकारे कांचनार गुग्गुल हे पीसीओडी आणि संबंधित लक्षणे कमी करण्यास मदत करत असते.

कांचनार गुग्गुल कसे घ्यायचे ?

कांचनार गुगगूळ हे टॅब्लेट फोर्म मध्ये उपलब्ध आहे.

  • पीसीओडी साठी एक-एक गोळी सकाळ आणि रात्री घ्यावी. या गोळ्या एक ग्लास कोमट पाणी सोबत घ्यायच्या आहेत.

Buy here kanchnar guggul.

३. गुडूची

पीसीओडी मध्ये गुडूची चा उपयोग

पीसीओडी कमी करण्यामध्ये गुडूची चा अत्यंत उपयोग होतो.

पीसीओडी आणि त्याची लक्षणे कमी करण्यामध्ये गुडूची च्या दोन महत्वाच्या गुणांचा उपयोग होतो. ते महत्वाचे गुण आहेत

  • Anti inflammatory
  • Hypoglycaemic
  • Anti-inflammatory हा शरीरात निर्माण झालेली कोणत्याही प्रकारची सूज आणि तणाव कमी करणारा गुण आहे.
  • Hypoglycemic म्हणजे रक्तातील ग्लुकोस चे प्रमाण कमी करणारा.

गुडूची वनस्पति मधील हे दोन्ही गुण आपल्याला पीसीओडी कमी करण्यामध्ये मदत करत असतात.

Chronic inflammation ला पीसीओडी साठी जबाबदार एक महत्वाचे कारण मानले जाते. Chronic inflammation मुळे insulin resistance वाढतो ज्यामुळे तुमच्या मासिक पाळी आणि अंडकोष वर परिणाम होतो ज्यामुळे पीसीओडी ची लक्षणे दिसायला लागतात.

संबंधी वाचा- मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय

Inflammation म्हणजे काय ?

Inflammation हे शरीरातील धोका आणि कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन बाहेर फेकण्यासाठी शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. ही एक गुंतगुंतीची प्रक्रिया असते ज्यामध्ये आपली रोगप्रतिकार प्रणाली देखील अंतर्भूत असते. थोडक्यात, Inflammation स्थिति ही शरीरासाठी चांगली असते.

पण काही वेळा Inflammation ची प्रक्रिया ही धोका गेल्यानंतर ही चालू असते. दीर्घकाळासाठी Inflammation प्रक्रिया ही अनेक आरोग्य समस्या निर्माण करत असते. त्यापैकीच एक म्हणजे पीसीओडी.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार पीसीओडी ची समस्या असलेल्या महिलांमध्ये विशिष्ट inflammatory markers ची उच्च पातळी आढळली.

  • Inflammatory markers हे कोणत्याही प्रकारच्या inflammation स्थिति मध्ये शरीरात आढळतात.

यामुळे शरीरातील कोणत्याही प्रकारचे Inflammation हे पीसीओडी समस्या साठी एक महत्वाचा जबाबदार घटक मानला जातो. गुडूची हे Inflammation कमी करण्यामध्ये मदत करते.

अनेक अभ्यासात पीसीओडी आणि टाइप २ डायबेटिस यांचा संबंध स्पष्ट सांगितला आहे. टाइप २ डायबेटिस असणाऱ्या व्यक्तींमध्ये पीसीओडी प्रामुख्याने आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे टाइप २ डायबेटिस का असेना पण पीसीओडी साठी रक्तातील वाढलेले ग्लुकोस चे प्रमाण हे काही अंशी जबाबदार असते.

  • गुडूची हे hypoglycemic असून रक्तातील ग्लुकोस चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात मदत करते. तसेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी गुडूची एक महत्वाची आणि प्रभावी आयुर्वेदिक औषधी वनस्पति ठरते.

त्यामुळे पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार घेत असताना डॉक्टरांच्या सल्ल्याने गुडूची चा उपयोग तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे.

पीसीओडी बरा करण्यासाठी गुडूची कसे घ्यावे ?

  • यासाठी गुडूची टॅब्लेट दिवसातून २ वेळा घ्यायची आहे. या सोबत तुम्ही कोमट पाणी घ्यायचे आहे.

Buy here guduchi tablets

४. शतपुष्पा

शतपुष्पा ही सुद्धा एक आयुर्वेदिक वनस्पति आहे. तुम्ही हे नाव फारसे ऐकले नसेल. कारण क्वचित आजारांमध्येच या वनस्पति चा उपयोग होतो. पीसीओडी मध्ये सुद्धा शतपुष्पा काही लक्षणांना कमी करून आराम मिळवून देण्यास मदत करते.

काही रिसर्च शतपुष्पा वनस्पति चा पीसीओडी उपयोग होतो असे सिद्ध करतात. विशेष करून शतपुष्पा चा इतर आयुर्वेदिक औषधांबरोबर उपयोग केल्यास त्याचा अधिक फायदा दिसून येतो.

रिसर्च नुसार शतपुष्पा आणि शतावरी चा उपयोग हा एकंदर स्त्रियांचे प्रजनन संबंधित अवयवांचे आरोग्य सुधारतात. तसेच अंडकोषाचे पोषण करून स्त्रीबीज निर्मिती करून, त्यांची संख्या वाढवून मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतात.

संबंधित वाचा- मासिक पाळी १५ दिवसांनी येण्याची कारणे

वरील सर्व फायदे हे अप्रत्यक्षरीत्या पीसीओडी चे लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

या व्यतिरिक्त इंटरनॅशनल आयुर्वेदिक मेडिकल जर्नल प्रकाशित आर्टिकल मध्ये शतपुष्पा चा पीसीओडी संबंधित उपयोग स्पष्ट केलेला आहे. या आर्टिकल नुसार

  • शतपुष्पा आणि गौघृत एकत्र घेतल्यास, अंडकोषाचे कार्य सुधारून मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.
  • जस आपण बघितले की insulin resistance हा पीसीओडी साठी एक जबाबदार घटक आहे, शतपुष्पा insulin resistance ला कमी करून पीसीओडी कमी करण्यास मदत करते.
  • शतपुष्पा एंडोमेट्रियम ची जाडी वाढवते ज्यामुळे मासिक पाळी साठी आवश्यक हॉरमोन नियंत्रित होण्यास मदत होते.

शतपुष्पा कसे घ्यावे ?

  • सहा ग्रॅम पावडर सकाळ-संध्याकाळ, कोमट पाणी सोबत.
  • हे तुम्हाला सलग तीन महिन्यांसाठी घ्यायचे आहे.

५. त्रिफळा

पीसीओडी मध्ये त्रिफळा चा उपयोग

त्रिफळा हे आमलकी, हरीतकी आणि बभीतकी या तीन आयुर्वेदिक वनस्पतींना मिळून बनवलेली औषधी आहे. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमध्ये त्रिफळा एक महत्वाचे औषध आहे.

त्रिफळा अनेक आरोग्य फायदे पुरवते. त्यापैकी एक म्हणजे पीसीओडी कमी करण्यामध्ये.

त्रिफळा औषधी पीसीओडी अनेक पद्धतीने कमी करण्यामध्ये मदत करते.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ आयुष केस रिपोर्ट मध्ये एका आर्टिकल नुसार त्रिफळा हे इतर घटकांबरोबर वापरल्यास पीसीओडी मध्ये निर्माण समस्या कमी करण्यामध्ये मदत करते.

  • त्रिफळा चूर्ण हे विटामीन सी चा एक चांगला स्त्रोत आहे. हे विटामीन सी अँटिऑक्सिडेंट आणि क्लीनिंग एजंट म्हणून काम करते. ज्यामुळे परिणामकारक पद्धतीने शरीरातील inflammation कमी होते. यामुळे त्रिफळा चूर्ण पीसीओडी साठी निर्माण परिस्थिति कमी करण्यास मदत करते.
  • त्रिफळा DPPH (diphenyl picrylhydrazyl) आणि सुपरऑक्साइड (superoxide) या फ्री रॅडिकल ना शरीराबाहेर फेकण्यास मदत करते. यामुळे विविध प्रकारच्या हॉर्मोन्स वर नियंत्रण येते ज्यामुळे मासिक पाळी नियमित होते.

संबंधित वाचा- मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते ?

या पद्धतीने त्रिफळा संपूर्ण शरीर डिटॉक्सिफाय करून पीसीओडी बरा करण्यास मदत करते.

त्रिफळा कसे घ्यायचे ?

  • त्रिफळा चा जास्त फायदा मिळवण्यासाठी त्रिफळा चूर्ण उपाशी पोटी, दोन जेवणाच्या मध्ये घ्यावे.
  • यासाठी दररोज 500 मिग्रॅ ते एक ग्रॅम एवढ्या प्रमाणात त्रिफळा चूर्ण तुम्ही वापरू शकता.

Buy dabur triphala churna

६. वरुणादि कषाय

वरुणादि कषाय चा उपयोग पीसीओडी आणि संबंधित लक्षणे कमी करण्यास होतो पण याबद्दल निर्णायक पुरावे अजून उपलब्ध नाहीत. म्हणजे याबाबतीत अजून अभ्यास होण्याची गरज आहे.

तरी, वरुणादि कषाय मध्ये असणारे घटक द्रव्य आणि त्यांच्या गुणानुसार, वरुणादि कषाय चा संभाव्य फायदा पीसीओडी मध्ये होतो.

  • वरुणादि कषाय हे diuretic आणि anti-inflammatory (मूत्रवर्धक आणि दाहक-विरोधी गुणधर्म) असल्यामुळे पीसीओडी मधील अंडकोष ला आलेल्या गाठी कमी करते.
  • वरुणादि कषाय मधील काही घटक हे पीसीओडी आणि मासिक पाळी संबंधित हॉरमोन नियंत्रित करतात.
  • वरुणादि कषाय तुमची चयापचय (metabolism) क्रियेचा वेग वाढवतात. यामुळे तुमची इंसुलिन सेनसीटीविटी (insulin sensitivity) वाढते. इंसुलिन सेनसीटीविटी वाढल्यास insulin resistance कमी होतो. ज्यामुळे पीसीओडी चे लक्षणे देखील कमी होण्यास मदत होते.

वरुणादि कषाय आणि पीसीओडी या बाबतीत आणि यांचा संबंध प्रस्थापित करण्यास निर्णायक असा कोणता ही रिसर्च यावर झालेला नाही. त्यामुळे सदर औषधी घेण्या अगोदर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहील.

वरुणादि कषाय कसे घ्यावे ?

  • पीसीओडी साठी वरुणादि कषाय चा उपयोग करण्यासाठी ९० मिलि एक ग्लास कोमट पाण्यात प्रतिदिन या मात्रा मध्ये याचे सेवन करायचे आहे.
  • या व्यतिरिक्त ३० मिलि सकाळ-संध्याकाळ अशा दोन वेळी विभागून घेऊ शकता. यामधे सुद्धा तुम्हाला कोमट पाणीच वापरायचे आहे.

पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार का ?

शेवटी पीसीओडी नक्कीच बरा होणार आजार आहे. आधुनिक उपचार पद्धती आणि आयुर्वेद या दोन्ही उपचार पद्धतीनुसार पीसीओडी आजार कमी होण्यास मदत होते.

पण यामधे पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार घेणे अत्यंत महत्वाचे असे मी मानतो. यासाठी काही मुद्दे मांडून याबाबतचे स्पष्टीकरण देतो.

  • पीसीओडी हा आजार तुमचे होरमोनल इमबॅलेंस, insulin resistance आणि तुमची जीवनशैली हे सर्व जबाबदार घटकांची एक गुंतगुंतीची प्रतिक्रिया आहे. आयुर्वेद मध्ये या तिन्ही गोष्टींचा विचार करून तुमचा पीसीओडी कमी करण्यासाठी विचार केला जातो आणि त्या अनुषंगाने यावर चिकित्सा केली जाते.
  • आयुर्वेद उपचार मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृती नुसार त्याचा उपचार आणि औषधोपचार ठरवले जातात. अ‍ॅलोपॅथी मध्ये प्रकृती या घटकाचा विचार केला जात नाही.
  • काही लोकांना अ‍ॅलोपॅथी नुसार देण्यात येणाऱ्या औषधी यांचा दुष्परिणाम किंवा साइड इफेक्ट अनुभवायला मिळतात. या गोष्टी टाळण्यासाठी लोक आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा विचार करतात. यामधे कमी किंवा अजिबात दुष्परिणाम नसणारे असे नैसर्गिक आयुर्वेदिक औषधे वापरुन उपचार केला जातो.

या सर्व गोष्टींमुळे आयुर्वेद पीसीओडी आजार बरा करण्यासाठी एक उत्तम, प्रभावी आणि सुरक्षित उपाय ठरतो.

शेवट

शेवटी पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार हे सर्वांगीण आणि नैसर्गिक उपायांची तुमची गरज पूर्ण करतात. शतावरी, शतपुष्पा, गुडुची यांसारख्या शक्तिशाली औषधी वनस्पतींचा समावेश, त्याचबरोबर वरुणादि कशाय, त्रिफळा आणि कांचनार गुग्गुल यांसारख्या फॉर्म्युलेशनचा वापर करून पीसीओडी सारख्या गुंतागुंतीच्या स्थिति मध्ये तुम्ही आराम मिळवू शकता.

  • होरमोनल बॅलेन्स करणारे आणि anti-inflammatory गुण असणारे हे आयुर्वेदिक औषधी फक्त लक्षणांना कमी करत नाही तर मूळ कारण असणाऱ्या घटकांना नॉर्मल करून पीसीओडी आजार कमी करतात.

तरी या उपचारांना वैयक्तिक गरजेनुसार उपचार घेण्यासाठी पात्र आयुर्वेद डॉक्टरांना भेट देऊन याविषयी तुम्ही मार्गदर्शन घेऊन उपचार घेऊ शकता.

पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार बद्दल मी दिलेली ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कमेन्ट करून नक्की कळवा, धन्यवाद.

FAQ’s

पीसीओडी कमी होण्यासाठी काय करावे?

पीसीओडी कमी होण्यासाठी त्यावर योग्य उपचार घ्यावे लागतील ज्यामध्ये औषधोपचार, आहार आणि तुमची जीवनशैली यावर भर देऊन तुमचा उपचार निश्चित केला जाईल.

पीसीओडी होण्याचे मुख्य कारण कोणते?

पीसीओडी होण्याचे मुख्य कारण हे insulin resistance हे आहे.

पीसीओडी (PCOD) असलेल्या व्यक्तीने वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे ?

पीसीओडी (PCOD) असलेल्या व्यक्तीने वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी चा आहार, दैनंदिन व्यायाम, योगा करावा. थोडक्यात काय तर कोणत्याही परिस्थितिमध्ये वजन कमी करण्यासाठी सारखेच उपाय असतात.

पीसीओडी काय आहे?

पीसीओडी म्हणजे पॉली सिस्टिक ओव्हरी डिसीज. हा स्त्रियांमध्ये आढळणारा हॉरमोन संबंधित एक आजार आहे.

मला पीसीओडी आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही उपाय सुचवाल का?

पीसीओडी हा गुंतागुंतीचा आजार आहे. यामधे अनेक कारणे आणि त्यावर उपचार असू शकतात. त्यामुळे पीसीओडी आणि त्यामुळे गर्भधारणा होत नसेल पात्र स्त्रीरोग तज्ञ यांना भेटून याबद्दल योग्य मार्गदर्शन आणि उपचार घ्यावा.

1 thought on “पीसीओडी साठी आयुर्वेदिक उपचार | PCOD sathi ayurvedic upchaar”

Leave a Comment