HEALTHBUSS

मासिक पाळी मध्ये संबंध ठेवायचे का नाही ?

Last updated on December 9th, 2023 at 04:03 pm

Contents

(masik pali madhe sambandh, period sex, पीरियड सेक्स, मासिक पाळी मध्ये सेक्स)

मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. पण या मासिक पाळी मध्ये संबंध ठेवायचे का नाही याबद्दल अनेक जणांना योग्य अशी माहिती नसते. ही गोष्ट स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीत आहे. दोघेही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उत्सुक असतात पण मासिक पाळी चालू असेल तर ते संबंध ठेवावे की नाही याबद्दल दोघांच्या मनात भीती आणि संशय असतो.

याशिवाय मासिक पाळी मध्ये संबंध ठेवणे किंवा मासिक पाळी मध्ये सेक्स करणे हे अनेकांच्या नुसार एक संदिग्ध विषय म्हणजे ‘टॅबू’ चा मानला जातो. काही स्त्रियांना हा विषय लाजिरवाणा वाटतो तर काहीजणांचे पुरूष जोडीदार मासिक पाळी विषयी सहानुभूति बाळगत नाहीत. याच आणि अशा इतर कारणांमुळे मासिक पाळी मध्ये सेक्सचा अनुभाव तुमचा खराब होतो.

तांत्रिक दृष्ट्या, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर मासिक पाळी मध्ये सेक्स करायला काहीही नुकसान नाही आणि हे एकदम सुरक्षित आहे. जर जोडीदार मध्ये दोघेही संबंध ठेवायला तयार असतील तर ‘या’ काळात शारीरिक संबंध ठेवायला काहीच हरकत नाही. कारण असे कोणतेही पुरावे सांगत नाहीत की या दरम्यान संबंध ठेवणे नुकसानकारक किंवा अपायकारक आहे. उलट या दरम्यान शारीरिक संबंध सुखकर होऊ शकतात.

पण जेव्हा मी म्हणतो की मासिक पाळी मध्ये संबंध ठेवणे चुकीचे नाही, तेव्हा याबाबतीत काही गोष्टी विचारात घेणे अपेक्षित आहे. मासिक पाळी मध्ये शारीरिक संबंध ठेवण्याबतीत काही गैरसमज आहेत, त्यांना दूर करणे महत्वाचे आहे. म्हणूनच इतर काही बाबी लक्षात घेणे गरजेचे ठरते. जसे की.

  • मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्यास गर्भधारणा होईल की नाही.
  • तसेच या दरम्यान संबंध ठेवल्यास लैंगिक संक्रमित रोग (sexually transmitted diseases) जसे की HIV, हेपटायटिस बी होण्याची शक्यता.
  • मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना होणारा स्वाभाविक त्रास जसे पोटदुखी, डोकेदुखी हे त्रास संबंध ठेवल्यावर वाढतील का ?

या आणि अशा अनेक मुद्यांचा विचार या प्रश्नाचे उत्तर जाणून घेताना करावा लागणार आहे.

तरी या विषयाची सविस्तर आणि योग्य अशी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला या संबंधीच्या दोन्ही बाजू लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणूनच या सर्व विषयाची माहिती आपण मासिक पाळी मध्ये संबंध ठेवण्याचे फायदे आणि त्याचे नुकसान या दोन मुद्या खाली बघणार आहोत.

मासिक पाळी च्या काळात सेक्स करण्याचे फायदे

१. या दरम्यान स्त्रियांची कामेच्छा वाढते

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांची कामेच्छा वाढत असते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये संबंध ठेवणे योग्य चांगले आणि सुखकर होऊ शकते.

बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान त्यांची कामेच्छा वाढत असल्याचे जाणवते. या दिवसांमध्ये हॉरमोन मध्ये होणारे चढउतार यामुळे शरीराच्या फिजियोलॉजिल क्रियांमध्ये काही बदल होत असतात. हे बदल पुन्हा कामेच्छा निर्माण करण्यासाठी हॉरमोन शरीरात सोडतात. यामुळे या काळात महिलांमध्ये कामवासना वाढण्याची शक्यता राहते.

इथिओपियन जर्नल ऑफ हेल्थ सायन्सेस मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार मासिक पाळी मध्ये संबंध ठेवल्याने महिलांमध्ये इतर लक्षणाव्यातीरिक्त कामेच्छा वाढल्याचे लक्षण देखील समोर आले आहे.

यामुळे मासिक पाळी मध्ये तुमच्या सेक्स चा आनंद द्विगुणित होऊ शकतो.

संबंधित वाचा- स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय

२. ल्युबरीकेशन पुरवते

सेक्षुयल अॅक्टिविटी चांगली पार पडण्यासाठी ल्युबरीकेशन महत्वाचा घटक आहे. ल्युबरीकेशन म्हणजे योनिमध्ये असणारी पुरेशी स्निग्धता आणि ओलसरपणा.

टेलर आणि फ्रान्सिस ऑनलाइन मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार लैंगिक आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टिकोणातून एक सविस्तर अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासानुसार ल्युबरीकेशन प्रदान करणारे लुब्रीकंट हे लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी तसेच लैंगिक संबंधावेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते असे सांगितले आहे.

त्यामुळे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी योनिमध्ये पुरेशी स्निग्धता आणि ओलसरपणा हवा असतो. यामुळे तुमची सेक्स अॅक्टिविटी अधिक आनंदायक होते.

मासिक पाळीदरम्यान योनीतून जो रक्तस्त्राव होतो त्यामुळे तेथील जागेवर थोडी स्निग्धता तयार होते ज्यामुळे समागम अधिक सोपा आणि सुखकर होतो. हा विचार पुरुषांना कदाचित अवघडल्यासारख वाटेल. कारण अशा वेळेला स्त्रियांच्या योनीतून वाहणारे रक्त आणि इतर घटक या गोष्टी अस्वच्छ वाटेल. पण पुरुषांना मी या ठिकाणी सांगेल की यात असे घाण किंवा अस्वच्छ काहीही नाही.

या दिवसांमध्ये योनीतून येणारे रक्त देखील खूप कमी प्रमाणात येत असते. त्यामुळे या गोष्टींचा जास्त विचार करून तुम्ही तुमच्या सेक्स चा आनंद घालवू नका.

३. पोटदुखी कमी करते

मासिक पाळी मध्ये पोटदुखी म्हणजे क्रॅम्प हे लक्षण अनेक महिलांना खूप त्रासदायक ठरते. पण मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे तुमचा हा पोटदुखी चा त्रास कमी करू शकते.

मासिक पाळी दरम्यान भावनोत्कटतेच्या (orgasm) वेळी गर्भाशयाचे आकुंचन आणि प्रसवण (contractions and relaxations) होते. गर्भाशयाच्या या आकुंचन आणि प्रसवण क्रियेमुळे क्रॅम्प चा त्रास कमी होण्यास मदत होते.

तसेच भावनोत्कटतेच्या वेळी तुमच्या शरीरात फील गुड हॉरमोन एंडोरफीने (endorphin) आणि डोपामाइन (dopamine) सेक्रेट होत असतात. या हॉरमोन मुळे देखील पोटदुखी चा त्रास कमी होण्यास मदत होते.

ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी असू शकते. काही स्त्रिया आणि पुरुषांना मासिक पाळी चालू असताना शारीरिक संबंध ठेवायला घृणा वाटते. अशा परिस्थितीत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यास कदाचित त्रास वाढू शकतो. त्यामुळे जोडीदरापैकी दोघांनी याबद्दल सामंजस्यपणाने चर्चा करून, याबद्दल कुठलीही घृणा उत्पन्न होत नसेल तरच या दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यास तयारी दाखवावी.

४. डोकेदुखी कमी होते

मासिक पाळी मध्ये पोटदुखी नंतर सर्वात जास्त आणि तीव्र प्रमाणात जाणवणारा त्रास म्हणजे डोकेदुखीचा. या दिवसांमध्ये होणारी डोकेदुखी हे तुमच्या हॉर्मोन्स च्या चढ उतारांमुळे होत असते.

इंटरनॅशनल हेडेक सोसायटी नुसार सेक्षुयल अॅक्टिविटी तुमची डोकेदुखी थांबवू शकते. तसेच वर संगीतल्याप्रमाने लैंगिक संबंधांच्या वेळी शरीरात सीक्रेट होणारे एंडोरफीने आणि डोपामाइन हॉरमोन तुमची डोकेदुखी कमी करतात.

संबंधित वाचा- डोकेदुखीवर घरगुती उपाय

५. मासिक पाळी कमी होते

मासिक पाळी च्या वेळी तुमच्या गर्भाशयाच्या अंतर्गत अस्तर (internal lining) चे आकुंचन होऊन त्यातून रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव योनिमार्गातून बाहेर पडून योनिस्त्राव होतो.

मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवताना या गर्भाशयाच्या अंतर्गत अस्तराचे (internal lining) अधिक आकुंचन होते ज्यामुळे अधिकचा रक्तस्त्राव होतो. यामुळे कमी वेळेत अधिक चा रक्तस्त्राव होऊन मासिक पाळी चे दिवस कमी होतात.

संबंधित वाचा- मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते ?

मासिक पाळी च्या दिवसात संबंध ठेवण्याचे नुकसान किंवा संभाव्य दुष्परिणाम

मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवत असताना अनेक जणांना गोंधळल्यासारखे होते. पुरुष या बाबतीत तर ते अधिकच conscious होतात. यामध्ये मासिक पाळीमध्ये येणारा विशिष्ट प्रकारचा वास आणि योनीतून बाहेर पडणारे रक्त आणि इतर स्त्राव यासाठी कारणीभूत ठरतात. यामुळे अशा वेळेला स्त्री आणि पुरुष दोघेही या दरम्यान शरीरक संबंध ठेवण्यास उत्सुक असताना सुद्धा ‘ते’ ठेवण्याचे टाळतात.

असे आणि इतर नुकसान आणि दुष्परिणाम आपल्याला मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवताना जाणवतात. याचबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती बघणार आहोत.

१. गर्भधारणा होण्याचा धोका (risk of conceiving)

मासिक पाळी मध्ये सेक्स केल्यास गर्भधारणेचा धोका राहतो

मासिक पाळी चालू झाल्यानंतर १४ व्या (तुमच्या मासिक पाळीचा पहिला दिवस यासाठी गृहीत धरावा) दिवशी स्त्रीबीज हे बीजकोशातून बाहेर येते आणि पुढे ते १२ ते २४ तास शरीरात कार्यशील (जीवंत) राहते. म्हणजे या दरम्यान जर शरीरक संबंध प्रस्थापित झाले तर शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भधारणा राहु शकते.

पण गर्भधारणा होण्यासाठी मासिक पाळी चे दिवस हे अजिबात पूरक आणि अनुकूल नसतात. म्हणजे या दिवसांमध्ये तुम्हाला गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वात कमी असते. पण शक्यता ही राहतेच.

आता हे बऱ्याच अंशी तुमच्या मासिक पाळीच्या लांबीवर देखील अवलंबून आहे. मासिक पाळी ही साधारण २८ ते ३१ दिवसांची मानले जाते. मासिक पाळी साठी हा कालावधी एक साधारणपणे झाला. काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी २१ दिवसांपासून चालू होते तर काहींना अगदी ३१ व्या दिवसापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे अशा वेळेला स्त्रीबीज बाहेर पडण्याचा कालावधी देखील कमी अधिक होऊ शकतो.

पण या कालावधीत देखील जर तुम्हाला गर्भधारणा होण्याचा धोका टाळायचा असेल तर तुम्ही गर्भनिरोधक पद्धती म्हणून कंडोम वापरू शकता. मासिक पाळीचा कोणताही दिवस असो गर्भनिरोधक पद्धती वापरल्याने तुमचा गर्भधारणा होण्याचा धोका अनेक पटीने कमी होतो.

तसेच कंडोम चा वापर केल्याने तुमच्यामध्ये लैंगिक संक्रमित रोग (sexually transmitted diseases) पसरण्याचा धोका देखील कमी होतो. या विषयी आपण पुढील भागात सविस्तर माहिती बघणार आहोत.

२. लैंगिक संक्रमित रोग पसरण्याचा धोका (STI’s)

मासिक पाळी मध्ये संबंध ठेवल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो

मासिक पाळी च्या दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास लैंगिक संक्रमित रोग पसरण्याची भीती सर्वाधिक असते. यामध्ये हिपॅटायटीस बी (hepatitis B), एचआयव्ही (HIV), क्लॅमिडीया (Chlamydia), गोनोरिया (gonorrhea) हे लैंगिक संक्रमित रोग पसरण्याची शक्यता अधिक राहते. कारण मासिक पाळी मध्ये वाहणाऱ्या रक्तात या आजारासंबंधीत किंवा इतर विषाणू असण्याची शक्यता असते.

याच आजारा संबंधीत नाहीतर ‘या’ दिवसांमध्ये साधारणपणे कोणताही संसर्ग होण्याचा धोका वाढतो. विशेष करून जेव्हा तुम्ही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवता तेव्हा हा धोका काही प्रमाणात अधिक वाढतो. त्यामुळे अशा वेळी वर सांगितल्याप्रमाणे कंडोम चा वापर करून संसर्ग होण्याचा धोका कमी करता येऊ शकतो.

कंडोम एक प्रकारे तुमचे जननेंद्रिय आणि योनिमधील त्वचा आणि स्त्राव यांच्यामध्ये भिंतीचे काम करते. त्यामुळे यांच्यामध्ये होणारा कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो.

३. एंडोमेट्रिओसिस चा धोका वाढतो (increased risk of endometriosis)

मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवण्याचा अजून एक दुष्परिणाम म्हणजे एंडोमेट्रिओसिस (endometriosis) चा धोका वाढणे. एंडोमेट्रिओसिस या आजारामध्ये गर्भाशयाचा एंडोमेट्रियल हा टिशू शरीरामध्ये इतर ठिकाणी वाढतो जसे की अंडाशय (ovaries), फैलोपियन ट्यूब (fallopian tube), पेरिटोनियम (peritoneum).

मासिक पाळी मध्ये सेक्स केल्यास या एंडोमेट्रिओसिस आजाराचा धोका वाढू शकतो.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार वैज्ञानिक फाइलर आणि वू यांना असे आढळले की मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांमध्ये एंडोमेट्रिओसिस चा धोका हा दुपटीने वाढतो. या अभ्यासानुसार भावनोत्कटतेच्या वेळी गर्भाशयामध्ये जे आकुंचन आणि इंट्रायूटरिन प्रेशर (intrauterine pressure) निर्माण होते त्यामुळे गर्भाशयाचा काही भाग हा इतरत्र ठिकाणी ढकलला जातो.

४. अतिरिक्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते

मासिक पाळी मध्ये संबंध ठेवत असताना तुम्हाला साधारण पेक्षा जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.

या दिवसांमध्ये शरीरक संबंध ठेवत असताना गर्भाशय आकुंचन पावते. या आकुंचन प्रक्रियेमुळे गर्भाशयातील नसांवर अधिकचा ताण येऊन त्या फुटण्याची शक्यता वाढते. यामुळे तुम्हाला अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होण्याचा धोका निर्माण होतो.

आता पर्यन्त आपण मासिक पाळी च्या काळात सेक्स करावा की नाही याबद्दल यांच्या फायदे आणि नुकसान या दोन्ही बाबत सविस्तर माहिती बघितली. तरी देखील जर मासिक पाळी मध्ये संबंध ठेवायचे का नाही हा प्रश्न सतावत असेल तर खाली मी काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्ही वापरू शकता.

मासिक पाळी च्या काळात सेक्स करण्यासाठी उपयुक्त टिप्स

  • शारीरिक संबंध ठेवत असताना बेडवर गडद रंगाचे बेडशीट वापरा. यामुळे मासिक पाळीमुळे होणाऱ्या रक्तस्त्रावा चे डाग प्रखरपणे दिसणार नाही. यामुळे तुम्हाला मासिक पाळी विषयी वाटणारी घृणा एक प्रकारे कमी होईल.
  • जर तुम्हाला मासिक पाळी मध्ये संबंध ठेवण्यासाठी कोणतेही कारण थांबवत असेल तर तुम्ही शॉवर मध्ये जाऊन संबंध ठेवू शकता.
  • गर्भधारणा किंवा कोणत्याही आजाराचा संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी कंडोम चा वापर करा. शक्यतो लेटेक्स कंडोम (latex condom) चा वापर केला तर अधिक सुरक्षित राहील.
  • लैंगिक संबंध ठेवत असताना तुमच्या जवळ wipes असू द्या. जेणेकरून रक्तस्राव झालाच तर स्वच्छ पुसून पुन्हा तुम्ही सेक्स चा आनंद घेऊ शकता.

वर सांगितलेल्या काही टिप्स तुम्ही मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवताना उपयोगात आणल्या तर या विषयी तुमचे अवघडलेपण कमी होऊ शकेल.

मासिक पाळी दरम्यान लैंगिक संबंध ठेवण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुमच्या पार्टनर शी त्याविषयी बोलणे आणि त्यांची संमती घेणे अत्यंत महत्वाचे ठरते. शेवटी जोडीदार आणि तुम्ही या विषयी जोवर तुमचे आपापसातले आणि इतर गैरसमज दूर करत नाही तोवर हा अनुभव तुमच्यासाठी सुखकर होणार नाही.

संबंधित वाचा- नियमित मासिक पाळी न आल्यास काय करावे ?

थोडक्यात

मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवायचे की नाही या प्रश्नाबद्दल भीती आणि संभ्रम असणे अगदी योग्य आहे. या विषयी गर्भधारणा, आजार पसरण्याची भीती आणि पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये एक प्रकारचे अवघडलेपण या काळात असणे सहाजिक आहे.

पण तांत्रिक आणि सुरक्षितेतेच्या दृष्टिकोणाने मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे योग्य आहे. किंबहुना तुमच्यासाठी इतर दिवसांच्या पेक्षा अधिक आनंददायी आणि सुखकर हा अनुभाव असणार आहे.

काही गोष्टी जसे गर्भधारणा राहणे, लैंगिक संक्रमित रोग पसरणे, अतिरिक्त रक्तस्त्राव होणे यांची काळजी घेणे नक्कीच अपेक्षित आहे. हे सर्व धोके कसे टाळता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन आपण बघितलेले आहे.

शेवटी, हा सर्व अनुभव तुमच्यासाठी एक चांगला आणि कोणतेही व्यत्यय न आणणारा असावा यासाठी मी वरील सांगितलेल्या टिप्स वापरणे योग्य ठरेल.

ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरली असेल तर कमेन्ट द्वारे नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ’s

मासिक पाळीत संबंध ठेवल्याने काय होते?

मासिक पाळीत संबंध ठेवल्याने तुम्हाला स्त्रावमुळे ल्युबरीकेशन मिळते ज्यामुळे तुमचा सेक्स चा अनुभव अधिक आनंददायी होतो.

मासिक पाळीच्या किती दिवसांनी तुम्ही ओव्हुलेशन करता?

साधारणपणे मासिक पाळीच्या १२ ते १४ दिवस आधी ओव्हुलेशन ची प्रक्रिया होते. पण हे तुमच्या मासिक पाळीच्या लांबी वर देखील अवलंबून राहते.

मासिक पाळी किती दिवस असते

मासिक पाळी ही साधारणपणे २८ ते ३२ दिवस असते. तरी प्रत्येक स्त्रीमध्ये मासिक पाळीचा कालावधी या दरम्यानच असावा, जे की एकदम नॉर्मल आहे.

मासिक पाळीच्या काळात सेक्स करावा की नाही ?

मासिक पाळीच्या काळात सेक्स करण्यास काहीही चुकीचे किंवा असुरक्षित असे नाही. तरी या दरम्यान सेक्स करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

मासिक पाळी नंतर गर्भधारणा कधी होते

मासिक पाळी नंतर गर्भधारणा कधीही होऊ शकते. पण अधिक शक्यता आणि त्यासाठी पूरक अशी परिस्थित ही मासिक पाळीनंतर १० ते १७ दिवसांपर्यंत राहते. याला मोस्ट फरटाईल पीरियड असे म्हणतात.

Leave a Comment