Last updated on November 13th, 2023 at 01:14 pm
डोकेदुखी वर स्वागत तोडकर उपाय, डोकेदुखी वर उपाय स्वागत तोडकर, डोकेदुखी वर घरगुती उपाय, डोकेदुखी वर उपाय, डोकेदुखीवर रामबाण उपाय, डोकेदुखीची समस्या वर घरगुती उपाय, डोकेदुखी वर इलाज, डोकेदुखीवर उपाय सांगा, तीव्र डोकेदुखी वर घरगुती उपाय, डोकेदुखी साठी घरगुती उपाय (Dokedukhi var gharguti upay, Dokedukhi upay, Dokedukhi marathi upay, dokedukhi upay in marathi, dpkedukhi upay marathi, dokedukhi sathi upay, dokedukhi sathi gharguti upay, doekdukhi var gharguti upay in marathi, dokedukhi upay swagat todkar)
अत्यंत सामान्य अशी डोकेदुखी ही समस्या अनेक जणांना डोकेदुखी ठरत राहते. खूप मोठ्या आजाराचे स्वरूप नसणाऱ्या अशा बऱ्याच तक्रारी असतात ज्यामुळे आपले रूटीन बिघडते. डोकेदुखी त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी आणि सामान्यपणे आढळणारी समस्या आहे.
डोकेदुखीही सामान्य जरी असली तरी काही वेळा आजाराचे लक्षण असू शकते. किंबहुना डोकेदुखी हाच आजार असू शकतो.
पण वाचकांनो, ८० टक्के होणाऱ्या डोकेदुखी च्या घटना यांची कारणे वैद्यकीय नसून सामान्य म्हणजे functional आहेत.
उदाहरण म्हणजे खूप जास्त कामे केली, जास्त थंड पदार्थ किंवा तिखट पदार्थ खाल्ले, मोबाइल किंवा स्क्रीन असणाऱ्या उपकरणे जास्त वेळ वापरणे यामुळे सामान्यता डोकेदुखी जी होते ही खूप सामान्य राहते. याला कुठलेही मोठ्या आजाराचे कारण किंवा वैद्यकीय कारण नसते.
अशा वेळेला जेव्हा डोकेदुखी होते तेव्हा प्रत्येक वेळेला आपण मेडिकल वर जाऊन डोकेदुखी थांबवण्यासाठी गोळी घेत राहतो. जरा विचार करा की आपल्याला कित्येक वेळा ही डोकेदुखी होते जे की ८० टक्के वेळा सामान्य असते. या प्रत्येक वेळेला जर का आपण गोळी घेत राहिलो तर त्याचे किती दुष्परिणाम आपल्याला नंतर च्या आयुष्यात होतील.
असो.
जेव्हा सामान्य डोकेदुखी असते अशा वेळी आपण काही घरगुती उपाय करून ती डोकेदुखी दूर केली पाहिजे.
या ब्लॉग मध्ये डोकेदुखी वर काही प्रभावी असे घरगुती उपाय बघणार आहोत.
‘हे’ डोकेदुखी वर घरगुती उपाय ठरणार तुम्हाला फायदेशीर
१. पाणी पिणे
अत्यंत सोपा असा हा घरगुती उपाय आहे. डोकेदुखी साठी घरगुती उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर हा करून बघा. मी जेव्हा लोकांना हा उपाय सांगत असतो बऱ्याच जणांना हा पटत नाही. म्हणतात पाणी आणि डोके दुखण्याचा काय संबंध आहे.यासाठी शास्त्रोक्त संबंध आहे.
डोकेदुखी आणि शरीरात पाणी या दोन गोष्टींना धरून जर या मागचे विज्ञान बघितले तर यासाठी दोन कारणे आहेत.
पहिले कारण समजून घेऊया.
आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपल्या शरीरात आवश्यक त्या प्रमाणात पाणी असणे आवश्यक आहे. पण असे का. जसे आपल्याला काम करण्यासाठी किंवा आरोग्यदायी राहण्यासाठी पाणी आवश्यक असते तसेच शरीरामधील अवयवांना देखील तेच लागू आहे. शरीरातील प्रत्येक अवयव चांगल्या रीतीने त्याचे कार्य करून आपले एकंदर आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक पद्धतीने पाण्याचा वापर करत असतात.
मेंदू हा देखील एक अवयव आहे. शरीरात मुबलक प्रमाणात पाणी नसेल तर डिहायड्रेशन ची स्थिति निर्माण होते. पाणी नसल्या कारणाने मेंदुमधील देखील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामधे मेंदूला पाण्याच्या माध्यमातून मिळणारे पोषक घटक मिळू शकत नाही. परिणामी मेंदू व्यवस्थित काम करू शकत नाही.
यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे वगैरे या सारख्या समस्या आपल्याला जाणवू शकतात.
दुसरे कारण असे आहे की डिहायड्रेशन झाल्यामुळे मेंदूला पुरेसा पाण्याचा पुरवठा होत नाही. मेंदुमध्ये पाण्याची कमतरता झाल्यामुळे मेंदू आकुंचन पावतो. मेंदू आकुंचन पावत असताना काहीसा भाग मेंदूच्या कवटीपासून दूर होतो. अशा वेळेला मेंदूच्या सभोवताली असणारे बाह्य आवरण ठिकाणी असणाऱ्या मेंदूच्या काही भागांना धक्का बसतो. हा मेंदूचा भाग शरीरात वेदना निर्माण करत असतो.

थोडक्यात सांगायचे म्हणजे मेंदूचे pain receptors ट्रिगर झाल्यामुळे डोकेदुखी चा प्रॉब्लेम होतो.
याच संबंधी अभ्यास European Journal of Neurology मध्ये २००५ साली प्रकाशित करण्यात आला होता. त्याचा संदर्भ खाली दिलेला आहे.
“Increasing daily water intake by 1.5 l reduced total hours of headache in 2 weeks by 21h and mean headache intensity decreased by 13mm, suggesting larger scaled research on the effectiveness of increased water intake in headache patients is justified.”
-Spigt, M., Kuijper, E., Schayck, C., Troost, J., Knipschild, P., Linssen, V., & Knottnerus, J. (2005). Increasing the daily water intake for the prophylactic treatment of headache: a pilot trial *. European Journal of Neurology, 12.
वरील संशोधनाचा अर्थ मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो.
“दैनंदिन पाणी पिण्याचे प्रमाण १.५ लीटर ने वाढवले तर २ आठवड्यामद्धे २१ तास तुमचे डोकेदुखी होण्याचा त्रास कमी होईल”
वरील संशोधन लेख सविस्तर वाचायचा असेल तर त्याखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
थोडक्यात सांगायचे म्हणजे मेंदूचे pain receptors ट्रिगर झाल्यामुळे डोकेदुखी चा प्रॉब्लेम होतो.
म्हणून डोकेदुखी वर घरगुती उपाय म्हणून दोररोज, दिवसभरात पुरेसे पाणी पिताय न याची खात्री करा. माझे कधी अचानक डोके दुखले तर मला माहीत होते की मी आज पुरेसे पाणीच पिलेले नाही.अ शा पद्धतीने तुमच्या डोकेदुखी साठी देखील कमी पानी पिणे हे कारण असू शकते.
त्यामुळे डोके दुखत असेल तर लगेच एक ग्लास पाणी घेऊन ते प्यावे. तसेच दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पित रहा. या व्यतिरिक्त रसाळ फळे ज्यामध्ये रस म्हणजेच पाण्याचे प्रमाण अधिक असते अशा फळांचे सेवन करा.
२. एक्यूप्रेशर
एक्यूप्रेशर ही एक उपचार पद्धती आहे. एक पारंपरिक, चीन या देशामध्ये प्रख्यात अशी ही उपचार पद्धती आहे. यामधे तुमच्या वेदना शरीरातील विशिष्ठ बिंदुनवर दबाव देऊन कमी केल्या जातात. असो. आपल्याला त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची गरज नाही.
या पद्धतीचा विचार आपण फक्त डोकेदुखी या अनुषंगानेच करणार आहोत.
डोकेदुखी वर घरगुती उपाय म्हणून आपण एक्यूप्रेशर चा उपयोग करू शकतो. खूप कठीण किंवा अवघड यामधे काही नाही. तुम्हाला फक्त तुमच्या डोक्याच्या समोरच्या भागाला म्हणजेच कपाळाला तुमच्या हाताच्या दोन बोटांनी गोलाकार पद्धतीने मालीश करायची आहे. मालीश केल्यानंतर त्याच बोटांच्या समोरच्या भागांनी म्हणजेच बोटाच्या टोकांनी काही बिंदुनवर दबाव द्यायचा आहे. आता तो दबाव कुठे द्यायचा ते पुढे बघूया.
हा दबाव तुम्ही दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी आणि भुवयांच्या वरच्या भागावर द्यायचा आहे. लक्षात असू द्या की हा दबाव हळुवार आणि सावकाशपणे द्यायचा आहे.
या मागील विज्ञान असे आहे की आपल्या शरीरात काही नैसर्गिक वेदनाशमक द्रव किंवा हॉर्मोन्स असतात. त्यापैकीच एक म्हणजे एंडोरफीन (endorphin) हॉरमोन. डोक्याच्या या विशिष्ठ बिंदुवर दाब दिल्यास एंडोरफीन हॉरमोन सीक्रेट होतात.
हे एंडोरफीन हॉर्मोन्स डोकेदुखी कमी करण्यासाठी मदत करतात.
त्यामुळे डोके दुखत असल्यास अशा पद्धतीने प्रॅक्टिस केल्यावर डोकेदुखीवर तत्काळ फरक पडतो.
३. योगा, ध्यान
कोणत्याही प्रकारची डोकेदुखी असो, योगा आणि ध्यान केल्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. डोकेदुखी वर घरगुती उपाय मध्ये सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणजे हाच.
आपल्याला आजकाल खूप खराब सवय लागली ती म्हणजे डोक दुखले की जा मेडिकल वर आणि घ्या गोळी. यासाठी पैसे खर्च करायला तयार आहात पण शरीराच्या हालचाली करायला तयार नाही. जेव्हा की या हालचाली दीर्घ आयुष्यासाठी देखील फायदेशीर आहे.
करून बघितल्याने नक्कीच फरक पडतो. मी तर म्हणतो योग कशाला, तुम्ही फक्त ज्या अवस्थेत तुमचे डोके दुखते ती अवस्था, जागा बदला, थोडे फिरायला लागा, चाला, मानेचा व्यायाम करा, हातपाय फिरवा. एवढे ही केले तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला डोकेदुखीवर बदल झालेला दिसेल.
पण या मध्ये काही विशिष्ठ योगासने बघूयात.
डोके दुखीवर घरगुती उपाय म्हणून तुम्ही काही योगासने देखील करू शकता.
- यामधे पद्मासन, अर्ध मत्स्येंद्रासन, उत्तनसणा, सेतु बंदसना, विपरीत करणी हे आसन डोकेदुखी झाल्यावर केल्यास आराम मिळतो.
या सर्व आसनांमुळे तुमच्या शरीराला आराम मिळतो, शरीरातील सर्व अवयवांना आराम मिळतो. त्यामुळे सर्व शरीरात रक्तपुरावठा सुधारतो. यामुळे मेंदू मध्ये रक्तपुरवठा चांगला होऊन डोकेदुखी देखील थांबते.
तसेच मेडिटेशन करून देखील डोकेदुखी पासून आराम मिळतो.
जर तुमचा सेल्फ हीलिंग वर विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीवर देखील विश्वास असायला हवा की मेडिटेशन ने डोकेदुखी थांबते.फक्त डोकेदुखीच नाहीतर इतर अनेक आजार हे सेल्फ हेंलिंग ने बरे होऊ शकतात.
यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे मेडिटेशन करू शकता. यामधे तुम्ही ॐ चा उच्चार काही वेळेसाठी केला तरी देखील तुमची डोकेदुखी थांबते. करून बघा आणि स्वतः अनुभवा.
४. कॉफी
सर्वांना माहीत असणारा आणि सर्वांच्या आवडता असा हा घरगुती उपाय. डोकेदुखी वर घरगुती उपाय म्हटले की सर्वात आधी आपल्याला कॉफी किंवा चहा आठवणार आणि ते खरे ही आहे.
कॉफी मध्ये caffeine नावाचे आहे घटक असते जे तुमच्या मेंदूच्या हालचाली वाढवते. यामुळे मेंदूला एक प्रकारे ताजेतवाने असल्याची भावना निर्माण होते. पण हीच कॉफी डोकेदुखी साठी कारण ही ठरत असते.
एखादी व्यक्ति जेव्हा सातत्याने कॉफी घ्यायला लागते तेव्हा त्याच्या शरीराला आणि मेंदूला त्याची सवय झालेली असते. नंतर त्या व्यक्तीने कॉफी घेण्याचे टाळले तर मात्र त्याला डोकेदुखी सारख्या समस्येला सामोरे जावे लागते. कारण शरीराला आणि मेंदूला आता त्या कॉफी ची सवय झालेली असते.
कॉफी अजून एक दुष्परिणाम घेऊन येते ते म्हणजे नैराश्य किंवा अति चंचलपणा. कॉफी मुळे cortisol आणि adrenaline हॉर्मोन्स रीलीज होत असतात. या हॉर्मोन्स मुळे तुम्हाला स्ट्रेस आल्यासारखी भावना येते आणि ह्रदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे डोकेदुखी वर घरगुती उपाय किंवा घरगुती उपचार म्हणून कॉफी वापरायची असेल तर संबंधित गोष्टींचा विचार करून वापरा.
५. अद्रक
अद्रक हा दूसरा डोकेदुखी वर घरगुती उपाय आहे जो बहुतेक जण वापरतात. काही लोक याला गरम पाण्यामध्ये चहा पत्ती टाकून वापरतात. काही जण ही अद्रक कुटून बारीक करून चहा मध्ये टाकून पितात. हे सर्वांच्याच घरी खूप सामान्य असे चित्र आहे. डोकेदुखी सुरू झाली की आपण घरी अद्रक टाकून चहा करायला सांगतो.
डोकेदुखीवर घरगुती उपाय म्हणून अद्रक वापरण्याचे दोन कारण आहे.
एक म्हणजे अद्रक ही नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते ते.
दुसरे म्हणजे या अद्रक मध्ये gingerol नावाचे एक कंपाऊंड असते ते pain receptors पर्यन्त पोचणाऱ्या वेदनांचे सिग्नलस थांबवतात.
६. डोकेदुखी वर उपाय- स्वागत तोडकर
स्वागत तोडकर यांना महाराष्ट्रातील अनेक व्यक्ति ओळखतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध निसारगोपचार तज्ञ म्हणून ते ओळखले जातात. अनेक असाध्य आजारांवर त्यांचे घरगुती उपाय तसेच आयुर्वेदिक उपचार प्रभावी आहेत. त्यांच्याबद्दलचा एक ब्लॉग आहे माझा तो बघू शकतो.
हे देखील बघा –स्वागत तोंडकार यांचे घरगुती आयुर्वेदिक उपचार.
त्यांनीच सांगितलेला डोकेदुखी वर घरगुती उपचार मी सांगत आहे. तुम्ही प्रयत्न करून बघू शकता.
यासाठी तुम्हाला एक एरंडाचे पान आणि खोबरेल तेल घ्यायचे आहे (ताजे घाण्यावरचे तेल वापरायचे आहे,refined तेल नाही).
खोबरेल तेल घेऊन एरंड पानावर ते लावायचे आहे. त्यानंतर त्या पानाला थोडे गरम करायचे आहे. गरम केल्यावर डोक्याच्या माथ्यावर रात्री झोपताना ते पान बांधून झोपायचे आहे.
असा सोपा हा डोकेदुखी वर घरगुती उपाय आहे.
या ब्लॉग मध्ये आपण अत्यंत प्रभावी आणि उपयोगी असे डोकेदुखी साठी काही घरगुती उपाय बघितले आहे.
इथे मी हा लेख थांबवतो.
माहिती आवडली असेल तर कमेन्ट कळवू शकता. तसेच अजून काही माहिती मी द्यावी असे वाटत असेल तर ते ही सुचवू शकता. काही सल्ला माझ्या मजकूरविषयी किंवा इतर बाबतीत असेल तर तो ही देऊ शकता. धन्यवाद.
FAQ’s
डोकेदुखी का होते ?
मुख्य डोकेदुखीचे कारण आहे मेंदुमधील रक्तवाहिन्या एक तर संकुचित होणे किंवा expand होणे. ज्या ज्या कारणांमुळे हे घडते त्यामुळे डोकेदुखी होते. उदाहरण जास्त थंड किंवा तिखट खाणे पिणे,पुरेशी झोप न घेणे,हवामानात बदल,ताप किंवा असे तत्सम बरेच कारणे.
डोकेदुखीचे प्रकार कोणते आहेत ?
डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत असतात. सामान्य आढळणारे प्रकार आहेत मायग्रेन,क्लस्टर डोकेदुखी,सायनस डोकेदुखी,हार्मोनल डोकेदुखी.
अर्धे डोके कशामुळे दुखते?
अर्धे डोके दुखणे म्हणजे याला प्रकाराला मायग्रेन डोकेदुखी चा प्रकार समजावा. या मध्ये देखील सामान्य डोकेदुखी प्रमाणे मेंदूला होणार रक्तपुरवठा आणि मेंदू मध्ये काही रासायनिक बदल कारणीभूत असतात.
पित्त व डोकेदुखी वर घरगुती उपाय काय आहेत.
यासाठी पित्तावर स्वागत तोडकर यांनी सांगितलेला घरगुती उपचार इथे वाचायला मिळेल आणि डोकेदुखी साठी आपण यावर ब्लॉग बनवला आहे. कृपया तिथे याबद्दल माहिती घ्या.
माझी डोकेदुखी गंभीर आहे हे मला कसे कळेल ?
जर तुमची डोकेदुखी अचानक चालू झाली असेल,वाढत चालली असेल,डोक्याला दुखापत झाल्यानंतर चालू झाली,डोकेदुखीबरोबर इतर मानसिक स्वरूपाचे लक्षण दिसत असेल आणि एकंदर त्या डोकेदुखी मुळे तुमचे दैनंदिन रूटीन बिघडत असेल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Working as Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747
Thanks for giving information कल्याण चार्ट देखे
Thats my pleasure.