HEALTHBUSS

मासिक पाळी न आल्यास काय करावे ? लगेच या 4 गोष्टी करा. (masik paali chuklyas kaay karave)

Last updated on May 15th, 2024 at 12:07 am

Contents

मासिक पाळी न आल्यास काय करावे हा अनेक स्त्रियांना प्रश्न पडत असतो. मासिक पाळी चुकणे किंवा न येणे हे अनेक स्त्रीयांसाठी एक चिंतेचे कारण असू शकते. याबद्दल त्यांना विश्वासात घेऊन योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे काही स्त्रिया या समस्या विषयी घाबरून जातात.

पण याबाबतीत घाबरण्यासारखे काही नाही. कारण अभ्यासानुसार 14 ते 25 टक्के महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी सारखी समस्या आढळून येते. काही वेळा अनियमित मासिक पाळी हे नैसर्गिक असू शकते. पण अजिबात मासिक पाळी न येणे किंवा मासिक पाळी चुकणे हे आरोग्य समस्याचे लक्षण असू शकते.

पण यासाठी घाबरून न जाता, योग्य मार्गदर्शन, वैद्यकीय सल्ला आणि तणाव व्यवस्थापन केल्यास तुमची याबद्दलची चिंता कमी होऊ शकते.

या ब्लॉग मध्ये आपण मासिक पाळी न आल्यास काय करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळवून घेऊया.

पण मासिक पाळी येण्याचे लक्षण आणि मासिक पाळी किती दिवस उशिराने येऊ शकते या बद्दल तुम्हाला मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

महिलांच्या मासिक पाळी च्या कोणत्याही समस्या साठी उपयुक्त असे शतावरी च्या टॅबलेट्स खरेदी करा.

जाणून घ्या मासिक पाळी न आल्यास काय करावे ?

१. गर्भधारणा चाचणी (pregnancy टेस्ट करा)

जर तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय (sexually active) आहात किंवा नुकतेच तुम्ही लैंगिक संबंध स्थापित केलेले असतील आणि तुमच्या मासिक पाळीची तारीख देखील आलेली असेल पण ति येत नसेल तर मासिक पाळी चुकल्याचे गर्भधारणा हे एक कारण असू शकते.

आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही तर गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या किंवा इतर उपाय वापरले होते तर गर्भधारणा कशी राहील. तुमचे म्हणणे खरे आहे पण अर्धे खरे आहे. कोणतेही गर्भनिरोधक उपाय १०० टक्के सुरक्षित आणि अचूक नाहीत. हे उपाय वापरुन देखील गर्भधारणा होण्याची शक्यता कायम राहते.

त्यामुळे तुम्हाला गर्भधारणा झाली किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्ही घरीच गर्भधारणे ची तपासणी (pregnancy test) करावी. मासिक पाळी न आल्यास दूसरा उपाय म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याप्रमाणे गर्भधारणा निश्चित करू शकता.

तुम्ही घरीच गर्भधारणे ची तपासणी करण्यासाठी pregnancy kit वापरू शकता जी मेडिकल मध्ये सहज उपलब्ध असते.

याबद्दलची प्रक्रिया आपण बघूया.

संबंधित वाचा- मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे

गर्भधारणा  किट टेस्ट रिजल्ट
  • मेडिकल मधून आणलेली pregnancy kit बाहेर काढून त्यातील जो कागद (leaflet) असतो त्यावरची सर्व माहिती अगोदर वाचून घ्या.
  • गर्भधारणे ची तपासणी करण्यासाठी सकाळची वेळ चांगली समजली जाते. यावेळी तुम्हाला अचूक टेस्ट चे रिजल्ट मिळू शकतात. तुम्ही दिवसातील इतर वेळ ही निवडू शकता.
  • यानंतर तुम्ही तुमच्या सकाळच्या लगवी चा नमूना छोट्या बाटलीमध्ये काढून घ्यायचा आहे.
  • Pregnancy kit मधील स्ट्रिप बाहेर काढून त्या स्ट्रिपवर दर्शवलेल्या भागात लगवीचे २ किंवा ३ थेंब टाकायचे आहेत.
  • यानंतर तुम्हाला त्या स्ट्रिपच्या दोन रेषांवर किंवा एक रेषावर काही बदल झालेले दिसतील. तो तुमच्या pregnancy टेस्ट चा रिजल्ट असेल.

अशा पद्धतीने तुम्ही घरी राहून गर्भधारणा चाचणी करू शकता.

टीप : या टेस्ट अचूक असतीलच असे नाही. म्हणून तुम्हाला गर्भधारणा निश्चित करण्यासाठी योग्य ती वैद्यकीय चाचणी आणि वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

२. तणाव व्यवस्थापन

तणाव, चिंता किंवा तणावपूर्ण परिस्थिती या गोष्टी तुमच्या मासिक पाळीवर कमालीचा नकारात्मक परिणाम करतात. त्याहून अधिक म्हणजे मासिक पाळी अनियमित येत असल्यास किंवा मासिक पाळी चुकली असेल तर ती व्यक्ति अधिकच तणावाखाली जाते.

मासिक पाळी चुकल्यास तणाव, चिंता अशा परिस्थिति तुमच्या समस्या अधिकच तीव्र करतात. त्यामुळे मासिक पाळी न आल्यास तुमचे मानसिक आरोग्य चांगले ठेवणे हे महत्वाचे ठरते.

या काळात तुम्ही तणाव व्यवस्थापन करण्यासाठी काही गोष्टी करू शकता.

१. विश्रांती (relaxation)

यामध्ये तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला एक दीर्घ आणि खोलवर विश्रांती देऊ शकता. यासाठी तुम्हाला खोल श्वास घेणे (deep breathing), हलका व्यायाम करणे (stretching), ध्यान करणे अशा गोष्टी करू शकता. याचा तुम्हाला मासिक पाळी येण्यासाठी आवश्यक हॉरमोन बॅलेन्स साठी उपयोग होईल.

२. पोषक आहार

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पोषक घटक समाविष्ट करायचे आहेत. यामुळे तुम्हाला आवश्यक असे पोषक घटक मिळतील आणि हॉरमोन बॅलेन्स मध्ये देखील मदत होईल. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फळे, हिरव्या भाज्या, डाळी, प्रथिने (protein) युक्त धान्य यांचा वापर करायचा आहे.

३. झोप

या काळामध्ये तुम्हाला पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. ७ ते ८ तास झोप तुम्ही या दिवसांमध्ये घेतलीच पाहिजे. तणाव कमी करण्यासाठी झोप महत्वाची भूमिका बजावत असते.

४. मार्गदर्शन

तणाव कमी करण्यासाठी तुम्ही तज्ञांचे मार्गदर्शन म्हणजे कौंसेलिंग घेऊ शकता. तसेच योग्य वैद्यकीय सल्ला घेतल्याने सुद्धा तुमचा तणाव नक्कीच कमी होईल.

३. मासिक पाळीचा तपशील ठेवा

मासिक पाळी चुकल्यानंतर योग्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार यानंतर ती नियमित होईलच. पण पुन्हा अशी मासिक पाळी संदर्भात जर समस्या तुम्हाला उद्भवली तर नंतर उपचार करण्यासाठी सोपे जावे यासाठी तुम्ही काही गोष्टी करायच्या आहेत.

त्याबद्दलची माहिती आपण बघूया.

What to do if i miss my period?

१. मासिक पाळीचे कॅलेंडर

तुमची मासिक पाळीची तारीख कोणती आहे, ती किती दिवस राहते या माहितीसाठी तुम्ही तुमचे मासिक पाळीचे कॅलेंडर तयार करायचे आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या मासिक पाळीची नियमितता, अनियमितता याबद्दलचा तपशील तुमच्याकडे राहील. भविष्यात जर मासिक पाळी च्या संबंधी काही तक्रारींसाठी उपचार घ्यायचे असल्यास डॉक्टर तुम्हाला याबद्दल माहिती विचारतील तेव्हा ती तुमच्याकडे असली पाहिजे.

मासिक पाळीच्या घटना नोंदवण्यासाठी मोबाइल अॅप उपलब्ध असतात. त्याचाही उपयोग तुम्ही करू शकता.

२. रक्तप्रवाह

मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तप्रवाह हे देखील एक विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीचे लक्षण असू शकते. जसे होणारा रक्तप्रवाह पातळ आहे, घट्ट आहे की मध्यम आहे. या प्रत्येक होणाऱ्या रक्तप्रवाह च्या स्थितीचा काही वैद्यकीय अर्थ असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रक्तप्रवाह कडे लक्ष ठेवून त्याचा देखील तपशील ठेवायचा आहे.

३. वेदना

रक्तप्रवाह या सोबतच तुम्हाला मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांचा देखील तपशील ठेवायचा आहे. मासिक पाळीमध्ये येणारे cramps आणि होणाऱ्या तीव्र आणि सौम्य वेदना या सर्व गोष्टींचा देखील एक विशिष्ट अर्थ असतो. यामुळे तुम्हाला होणाऱ्या वेदनांवर लक्ष ठेवून त्याची माहिती ठेवायची आहे.

४. इतर लक्षणे

मासिक पाळी च्या संबंधित लक्षणा व्यतिरिक्त इतर कोणता त्रास, आरोग्य समस्या तुम्हाला जाणवत आहेत का याचा तपशील देखील तुमच्याकडे असला पाहिजे. थकवा, अंगावर जाणे, चक्कर येणे किंवा इतर लक्षणे ही विशिष्ट आजाराचे संकेत असू शकतात.

संबंधित वाचा – Effects of lemon juice in menstrual period

४.वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन, उपचार

मासिक पाळी न आल्यास काय करावे

मासिक पाळी न आल्यास काय करावे असा जर प्रश्न पडला तर त्यावेळेस पहिला पर्याय म्हणून हा पर्याय तुमच्या लक्षात यायला हवा. मासिक पाळी नियमित न येणे किंवा ती चुकणे हे खूप गुंतागुंतीचे असू शकते आणि तसेच याचे कारण सुद्धा गुंतागुंतीचे असू शकतात.

यामुळे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, याबद्दल मार्गदर्शन आणि त्यावरील योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या जवळच्या स्त्रीरोग तज्ञ किंवा प्रसूती तज्ञ यांची भेट घ्या. शिवाय तुम्ही तज्ञ लोकांच्या देखरेखीखाली आहात आणि योग्य उपचार चालू आहे अशी भावना निर्माण होऊन तुमचा तणाव कमी होण्यास मदत देखील होते.

लक्षात असू द्या तज्ञ डॉक्टरांशी संवाद करत असताना तुमच्या पाळी संबंधित, प्रजनन संबंधित समस्या किंवा इतर कोणत्याही खाजगी आरोग्य समस्या सांगण्यास संकोच करू नका.

तेव्हा पूर्ण पणे सविस्तर आणि अचूक माहिती तुमच्या डॉक्टरांना पुरवा. ज्यामुळे ते तुम्हाला योग्य आणि प्रभावी असे उपचार सुचवतील.

वरील सर्व घटकांचा विचार तुम्ही तुमची मासिक पाळी चुकली तर करायचा आहे.

आता याच अनुषंगाने तुम्हाला काही ज्ञात हवी अशा काही गोष्टींची माहिती घेऊया.

मासिक पाळी न येण्याचे कारण

यामध्ये आपण थोडक्यात पण महत्वाचे काही मासिक पाळी न येण्याचे कारणे बघणार आहोत.

१. गर्भधारणा( pregnancy)

मासिक पाळी न येणे किंवा जर ती चुकली तर त्यासाठी सर्वात महत्वाचे आणि सामान्य कारण म्हणजे गर्भधारणा होणे. अलीकडील च्या काळात लैंगिक संबंध ठेवले असतील तर ते मासिक पाळी न येण्याचे कारण असू शकते.

२. तणाव

तणाव, नैराश्य आणि चिंता हे घटक तुमच्या मासिक पाळीसाठी आवश्यक असणारे काही हॉर्मोन्स यांना डिस्टर्ब करून त्यांना असमतोल करू शकतात. हॉरमोन असमतोल झाल्यास मासिक पाळी संबंधित अनेक अडचणी निर्माण होत असतात.

३. PCOD/PCOS

होरमोनल असमतोल झाल्यामुळे PCOD किंवा PCOS (polycystic ovarian syndrome) सारखे आजार होऊ शकतात. यामुळे मासिक पाळीसाठी आवश्यक घटक तयार होत नाहीत ज्यामुळे तुमची मासिक पाळी चुकू शकते. या अत्यंत गुंतागुंतीच्या घटना असतात.

याचसोबत थायरॉईड किंवा इतर जीर्ण आजार असतील तर त्यामुळे हॉरमोन बिघडून मासिक पाळी चुकू शकते.

संबंधित वाचा- PCOD साठी आयुर्वेदिक उपचार

४. वजन

मासिक पाळीची नियमित्ता ठेवण्यामध्ये तुमचे वजन महत्वाची भूमिका बजावतात. कमालीचे वजन कमी होणे किंवा वजन वाढणे यामुळे तुमचे हॉरमोन बिघडू शकतात. ज्यामुळे मासिक पाळी वर देखील परिणाम होतो.

५. औषधी

काही औषधी जसे की सतत गर्भ निरोधक गोळ्यांचा वापर केल्याने होरमोन च्या प्रमाणात बिघाड होऊन मासिक पाळी चुकू शकते.

६. पेरीमेनोप्वाज

स्त्रियांचा जेव्हा राजोनिवृत्तीचा काळ येतो त्या अगोदर च्या काही काळाला पेरीमेनोप्वाज (perimenopause) म्हणतात. या काळात काही स्त्रीयांची मासिक पाळी चुकू शकते.

मासिक पाळी येण्याचे लक्षण

टीप: हा मुद्दा तुम्ही जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास प्रत्येक स्त्री मध्ये वेगळा असू शकतो. या मध्ये काही स्त्रियांना मी सांगितलेली सर्व लक्षणे जाणवेलच असे नाही. काही महिलांमध्ये कमी लक्षणे दिसतील तर काही स्त्रिया मध्ये अजिबात लक्षणे दिसत नाही. तेव्हा अशा परिस्थिति मध्ये आपल्याला पाळी येत नाही असा विचार करून घाबरून जाण्याचे कारण नाही.

ओटीपोटात दुखणे आणि अस्वस्थता, स्तनाची कोमलता आणि सूज, मूड स्विंग आणि चिडचिड, थकवा किंवा कमी ऊर्जा, डोकेदुखी किंवा मायग्रेन, नाकाची किंवा जीभेची वाढलेली संवेदनशीलता अशा प्रकारची सर्व लक्षणे मासिक पाळी दरम्यान जाणवू शकतात.

याव्यतिरिक्त तणाव, आहार, जीवनशैली आणि हार्मोनल असंतुलन यासारखे घटक मासिक पाळीच्या लक्षणांची तीव्रता आणि स्वरूप प्रभावित करू शकतात.

मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते ?

काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी खूप लांबते आणि अशा वेळी त्यांना वाटते की आपली मासिक पाळी चुकली. असा विचार करून त्या घाबरतात. पण हे ही लक्षात घ्यायला हवे की मासिक पाळी लांबू शकते. मासिक पाळी अनेक दिवस उशिरा येऊ शकते.

हे वाचा –मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते?

प्रत्येक स्त्रीमध्ये मासिक पाळीची लांबी बदलू शकते. साधारणता २४ दिवस ते ३५ दिवस असा कालावधी आपण मासिक पाळी येण्यासाठी मानतो. पण सरासरी २८ दिवस मासिक पाळीसाठी ग्राह्य धरले जातात. यामध्ये एखाद्या स्त्रीला काही आजार, तणाव, नैराश्य असेल तर त्याचा ही परिणाम मासिक पाळीच्या लांबी मध्ये होत असतो.

त्यामुळे तुमच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये थोडेफार होणारे हे बदल नैसर्गिक समजावे आणि चिंतेचे कारण नाही असे समजून घ्यावे.

तरी पण जर सतत मासिक पाळी चुकणे, सतत उशिरा किंवा लवकर येणे, जास्त अंगावरून जाणे असे होत असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरते.

मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय (मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय करावे?)

मासिक पाळी चुकली किंवा आली नाही तर यासाठी डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बरेच जण मासिक पाळी न आल्यास काय करावे, टॅब्लेट घ्यावी का असा विचार करत असतील. अशी कोणतीही टॅब्लेट नाही जी तुम्हाला लगेच घेतल्यावर मासिक पाळी उत्तेजित करेल. यासाठी अचूक निदान आणि त्यावर पुरेपूर सर्व गोष्टींचा विचार करून उपचार ठरवून त्या समस्येवर काम करावे लागते.

पण प्रथमदर्शनी समस्या जर साधारण असेल तर तुम्ही मासिक पाळी येण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करू शकता.

हे सुद्धा वाचा- नियमित मासिक पाळी येण्यासाठी घरगुती उपाय.

१. दालचीनी

अभ्यासात असे दिसून आले की दालचीनी वनस्पति इंसुलिन सेनसीटीविटी सुधारते ज्यामुळे तुमची मासिक पाळी पूर्ववत होऊ शकते.

२. पुरेशी झोप

पुरेशी झोप घेतल्यामुळे होरमोनल समतोल साधण्यास मदत होऊ होते. यामुळे मासिक पाळी येण्यासाठी स्थिति निर्माण होते.

३. व्यायाम

रोज व्यायाम केल्याने तुमचे हॉरमोन पुन्हा समतोल स्थिति मध्ये येऊन मासिक पाळी नियमित होते.

४. संतुलित आहार

संतुलित आहार सेवन केल्याने तुमच्या पोषक घटकांची गरज कमी होते. परिणामी स्त्री प्रजनन संस्था आणि संबंधित अवयव यांचे पोषण होऊन होरमोनल समतोल राखले जाते.

ठोडक्यात

मासिक ही एक क्लिष्ट जैविक आणि शारीरिक प्रक्रिया आहे. मासिक पाळी मध्ये बिघाड होण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात जसे हॉरमोन, तुमचे वजन, वय, आहार शारीरिक स्थिति आणि इतर घटक. त्यामुळे या सर्व घटकांच्या अनुषंगाने मासिक पाळी मागे पुढे होणे काही वेळा नॉर्मल असते. बहुतेक वेळा या सर्व बाबतीत आणि मासिक पाळी न आल्यास काय करावे असे समजून घाबरून जाण्याचे काहीही कारण नसते.

आजच्या ब्लॉग च्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही अजून काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • काही वेळा मासिक पाळी चुकणे एकदम नॉर्मल आहे. (मात्र सतत असे होत असेल तर कारण शोधून उपचार घेणे महत्वाचे आहे).
  • तुम्हाला मासिक पाळी सुरू होण्याच्या काळात (menarche) काही महीने मासिक पाळी चुकू शकते.
  • तसेच तुमच्या रजोनिवृत्तीच्या काही वर्षे आधी सुद्धा मासिक पाळी कमी जास्त होऊ शकते किंवा काही वेळा चुकू शकते.
  • काही वेळा स्तनपान च्या काळात सुद्धा मासिक पाळी चुकू शकते.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन स्वतः मासिक पाळी विषयी संपूर्ण ज्ञान घ्या. त्याचसोबत याबद्दल असणारे गैरसमज आणि धोके समजून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.

जर ब्लॉग मधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेन्ट द्वारे नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ’s

मासिक पाळी न येण्याचे कारण काय आहे ?

मासिक पाळी न येण्याचे कारण गर्भधारणा, वजन कमी जास्त होणे, तणाव आणि इतर अनेक कारणे असू शकतात.

गर्भधारणा झाल्याशिवाय मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते ?

गर्भधारणा झाल्याशिवाय मासिक पाळी २६ ते ३८ दिवसांपर्यंत मासिक पाळी लांबू शकते.

मासिक पाळी महिन्याला का येत नाही ?

मासिक पाळी महिन्याला न येण्याचे कारण गर्भधारणा, वजन कमी जास्त होणे, तणाव आणि या सोबत इतर कारणे असू शकतात. साधारणता ६-७ दिवस पाळी उशिरा झाली तर त्याला नॉर्मल मानले जाते. त्यापेक्षा जास्त उशीर होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मला 3 महिन्यात मासिक पाळी का आली नाही ?

तुम्हाला तीन महिन्यात मासिक पाळी न येण्याचे कारण हे गर्भधारणा होणे, होरमोनल इमबॅलेंस, मानसिक आणि शारीरिक तणाव आणि इतर ही अनेक कारणे असू शकतात.

एका तासात पाळी येण्यासाठी काय करावे ?

यासाठी कोणताही खात्रीशीर उपाय किंवा उपचार नाही.

Leave a Comment