Last updated on November 7th, 2023 at 04:26 pm
वजन वाढवण्यासाठी उपाय| वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध| वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय| वजन वाढवण्यासाठी अश्वगंधा| वजन वाढवण्यासाठी शतावरी| vajan vadhavnyasathi ayurvedic upay| vajan vadhavnyasathi gharguti upay| vajan vadhavnyasathi kay karave| vajan vadhavnyasathi kay khave.
या दिवसांमध्ये लोक वजन कमी करण्यासाठी (weight loss) जेवढे प्रयत्न करत आहेत तेवढीच लोक आपले वजन वाढवण्यासाठी ही करत आहेत. या ब्लॉग मध्ये आपण वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध बघणार आहोत. तसेच वजन वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय यांची देखील माहिती बघणार आहोत.
तसे वजन कमी करण्यासाठी आपल्याकडे बरीच साधने आहे, मार्गदर्शन आहे, व्यवस्था आहे. तेवढी व्यवस्था मात्र वजन वाढवण्यासाठी नाहीये. वजन वाढवण्यासाठी काही गोष्टी आहेत जसे की प्रोटीन पाऊडर, Steroids आणि इतर बरीच. पण ही असुरक्षितअशी साधने आहेत. म्हणजे यामुळे इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जसे की किडनी खराब होणे,ह्रदयाच्या कार्यावर परिणाम होणे. शिवाय याचे साइड इफेक्ट देखील असू शकतात.
अशा वेळी आयुर्वेदकडे एक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून बघितले जाते. म्हणूनच या ब्लॉग मध्ये आपण सुरक्षित आणि प्रभावी असे वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध आणि काही घरगुती उपाय बघणार आहोत.
पण त्या पूर्वी, याच विषयाच्या अनुषंगाने काही तुम्हाला माहीत असाव्यात अशा गोष्टी जाणून घेऊया.
आयुर्वेद चे सिद्धांत हे ‘दोष‘ या संकल्पनेवर वर अवलंबून असतात. ते दोष म्हणजे वात,पित्त आणि कफ. आपल्या शरीरात होणारे आजार हे या तीन दोषांच्या असमतोल (imbalance) असण्यामुळे होतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी या शरीरात तीन दोषांचे साम्य (balance) असणे आवश्यक आहे.
वजन वाढवण्यासंदर्भात या तीन दोषांची भूमिका काय असते ते समजून घेऊया.
- वात दोष बिघडल्यामुळे किंवा त्याच्या असंतुलनामुळे वजन वाढण्यासाठी समस्या उद्भवू शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीच्या हालचाल यामुळे वात दोष वाढू शकतो.
- पित्त दोष हा तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे पचन करते आणि शरीराचे पोषण करते. पित्त दोषाचा असमतोल झाल्यास अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीराच्या पोषणावर होतो. पित्त दोष हा उष्णता, राग, तणाव आदि कारणांमुळे वाढतो.
- कफ दोष वाढल्यास अन्न पचनाची प्रक्रिया मंदावते आणि वजन ही वाढू शकते. कफ दोष हा अधिक गोड अन्न सेवन करणे, शरीर हालचाल न करणे या सारख्या इतर सवयीमुळे वाढतो.
थोडक्यात सांगायचे तात्पर्य ही की वजन वाढवण्याकरता तुमच्या शरीरात इतर उपाय योजनांसोबतच वात ,पित्त आणि कफ हे तिन्ही दोष सम प्रमाणात असणे आवश्यक आहे.
चला तर मग वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध आणि काही घरगुती उपाय बघू.
ही वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध आहेत प्रभावी
1. अश्वगंधा


अश्वगंधा ही पारंपारिक आयुर्वेदिक औषध म्हणून वापरली जाणारी एक अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली वनस्पति आहे. अश्वगंधा चे शास्त्रीय नाव हे Withania somnifera असे आहे.अ श्वगंधा चे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
अश्वगंधा वनस्पति ही वजन वाढवण्यासाठी उपाय म्हणून सर्वात प्रभावी असा पर्याय आहे.
भूक वाढवणे, स्नायू बळकट करणे, तणाव कमी करणे, उर्जा वाढवणे आणि हार्मोनल समतोल ठेवणे यासारखे गुण असल्यामुळे अश्वगंधा औषधी वनस्पति ही वजन वाढवण्यासाठी वापरली जाते. अश्वगंधा याचे फायदे आणि कसे ते वजन वाढवण्यास मदत करतात याची माहिती घेऊ या.
A. भूक वाढवणे
वजन वाढवण्यासाठी अगोदर भूक वाढवणे सर्वात महत्वाचा घटक आहे. अश्वगंधा ही औषधी भूक वाढवते. यामुळे रुग्णाला जास्त जेवण करण्याची इच्छा निर्माण होते. जास्त पोष्टीक अन्न सेवन केल्यास त्याचा उपयोग स्नायू आणि इतर शारीरिक घटक वाढवण्यासाठी होतो.
B. स्नायू बळकट करणे
अश्वगंधा हे औषध स्नायू बळकट करते आणि त्याचे आकारमान (साइज) वाढवते. अश्वगंधा मध्ये Withanaloids नावाचे प्रोटीन असते. हे प्रोटीन स्नायूंना बळकट करण्यासाठी उत्तेजित करतात. यामुळे एकूणच शरीराचे आकारमान वाढून वजन वाढण्यास सुरुवात होते.
C. तणाव कमी करणे
जर तुम्हाला कोणताही तणाव असेल तर यामुळे तुमचे वजन वाढण्यास समस्या येऊ शकते. थोडक्यात काय तर मानसिक तणाव हे वजन वाढवण्यास अडचण ठरते. आपल्याला जेव्हा तणाव जाणवतो तेव्हा Cortisol नावाचे हॉरमोन तयार होते आणि यामुळे आपले नैराश्य आणि तणाव अजून वाढते.
अश्वगंधा हे तुमचा मानसिक तणाव कमी करून Cortisol hormone चे प्रमाण कमी ठेवण्यास मदत करते. यामुळे तुमचा तणाव कमी होऊन वजन वाढण्यास वाव मिळतो.
D. शारीरिक ऊर्जा वाढवणे
थकवा, ताणतणाव, नैराश्य यासोबतच तुमच्या शरीरात असणारी कमी प्रमाणात ऊर्जा, हे देखील वजन वाढण्यासाठी बाधा ठरत असते. थकवा आणि तणाव यामुळे तुमची Metabolism ची क्रिया कमी होते. परिणामी तुमचे स्नायू आणि इतर शारीरिक घटक यांचा विकास आणि वाढ होऊ शकत नाही.
अश्वगंधा यासाठी एक संजीवनी म्हणून काम करते ज्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि Metabolism ची प्रक्रिया तीव्र गतीने होते.
थोडक्यात काय तर वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध या मध्ये अश्वगंधा ही एक अत्यंत प्रभावी औषध आहे जे तुम्ही घेऊ शकता.
आयुर्वेदिक मेडिकल स्टोर मध्ये तुम्हाला ही अश्वगंधा चूर्ण, कॅप्सुल, अरिष्ट किंवा दुसऱ्या घटकांबरोबर मिश्र स्वरूपात मिळेल
2. शतावरी

शतकानुशतके वापरली जाणारी शतावरी ही एक प्रभावी आणि अनेक आरोग्य फायदे असणारी आयुर्वेदिक वनस्पति आहे. या वनस्पति चे शास्त्रोक्त नाव Asparagus racemosus असे आहे.
ही वनस्पति विशेष करून स्त्रियांच्या आरोग्य संबंधी समस्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे. याचसोबत जीवनाला एक स्फूर्ति प्रदान करणारी अशी ही आयुर्वेदिक वनस्पति आहे मानली जाते.
संबंधित वाचा-शतावरी चे फायदे
शतावरी ही वजन वाढवण्यासाठी देखील गुणकारी वनस्पति आहे. चला तर बघूया वजन वाढवण्यासाठी शतावरी कशी मदत करते.
A. पोषक द्रव्यांचे शोषण करणे.
शतावरी ही आपण सेवन केलेल्या पोषक द्रव्यांचे व्यवस्थित आणि पूर्णपणे शोषण करून घेण्यास मदत करते.
आपण जे अन्न खातो, त्यात काही पोषक तत्वे असतात. या पोषक तत्वांचे व्यवस्थित शोषण होऊन त्याचा शरीरातील अनेक घटकांच्या वाढीसाठी उपयोग केला जातो. शतावरी मुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे पचन होऊन पोषक द्रव्यांचे शोषण होण्यास मदत होते.
परिणामी ती पोषक घटक वजन वाढवण्यासाठी वापरली जातात.
B. भावनिक समतोल राखणे
याआधी जसे आपण बघितले की तणाव हे वजन न वाढण्यामागचे एक महत्वाचे कारण आहे. चिंता, परेशानी किंवा इतर भावनिक तणावाचा समतोल राखण्यास शतावरी मदत करते.
C. ऊर्जा निर्माण करणे
शरीरात ऊर्जा असणे हा वजन वाढवण्यासाठी आवश्यक असा घटक आहे. या आधी आपण बघितले की कशा प्रमाणे ऊर्जा ही वजन वाढवण्यासाठी मदत करू शकते. शतावरी मुळे शारीरिक ऊर्जा वाढण्यास मदत होते.
शेवटी, शतावरी एक मौल्यवान आणि प्रभावी अशी वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधी आहे.
शतावरी हे शतावरी चूर्ण, कॅप्सुल आणि liquid स्वरूपात उपलब्ध आहे.
3. गोक्षुरा

गोक्षुरा ही वनस्पति पारंपरिक आयुर्वेदिक औषध मध्ये एक महत्वाचे स्थान घेऊन आहे. या वनस्पति चे शास्त्रीय नाव Tribulus terrestris हे आहे.
ही आयुर्वेद वनस्पति तिच्या मासपेशी वाढवण्यासाठी (muscles) आणि ताकत प्रदान करण्यासाठी ओळखली जाते. यामुळे वजन वाढण्यासाठी देखील या वनस्पतीचा उपयोग केला जातो. या विषयीच अजून थोडी माहिती बघूया.
A. स्नायू वाढवणे
गोक्षुरा मुळे स्नायू आणि मांसपेशी यांचा झपाट्याने विकास होतो. या वनस्पति मध्ये विशिष्ट अशी प्रथिने असतात ज्यामुळे स्नायूंचा विकास आणि आकारमान वाढण्यास चालना मिळते. याचाच एक परिणाम म्हणून ही वनस्पति पूर्ण शरीरभर समतोल प्रमाणात मांसपेशींचा विकास करून वजन वाढवते.
B. सहनशक्ति आणि स्टॅमिना वाढवणे
व्यायाम हा फक्त वजन कमी (weight loss) करण्यासाठीच नाही तर काही विशिष्ट व्यायाम प्रकार हे वजन वाढवण्यास मदत करतात. अशा वेळी गोक्षुरा ही वनस्पति महत्वाची ठरते. कारण ही वनस्पति अधिक व्यायाम करण्यासाठी सहनशक्ति आणि stamina प्रदान करते. ज्यामुळे अधिक व्यायाम करता येईल आणि वजन वाढू शकेल.
संबंधित वाचा –स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय
C. Testosterone वाढवणे
Testosterone हे एक male sexual hormone आहे .या हॉरमोन मुळे तुमच्या मध्ये एक पुरुष तत्व बनते. या वनस्पतिमुळे शरीरातील testosterone हे हॉरमोन वाढते आणि यामुळे स्नायू विकसित होतात आणि त्यांची वाढ होते.
D. Recovery करणे
अतिव्यायाम केल्यामुळे स्नायू ठिकाणी क्षती (injury) आणि minor damage होतात. ही झालेली क्षती गोक्षुरा मुळे भरून निघते. यामुळे अधिक व्यायाम करण्यासाठी स्टॅमिना निर्माण होतो.
गोक्षुरा ही वनस्पति चूर्ण,टॅब्लेट आणि अर्क या स्वरूपात उपलब्ध आहे.
बेस्ट गोक्षुरा टॅब्लेट खरेदी करा
इथपर्यंत आपण वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध कोणती याची माहिती बघितली आहे.
यापुढे वजन वाढवण्याससाठी काही घरगुती उपाय बघूया.
वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय
वजन वाढवण्यासाठी उपाय बघत असताना घरगुती उपाय बघणे पण आवश्यक आहे.
यामध्ये आपण तीन पर्याय बघणार आहोत. जो पर्याय तुम्हाला तुमच्या वेळ आणि उपलब्धतेनुसार सोयीस्कर वाटेल तो वापरू शकता.
1. स्मूदिस
घटक
- दूध
- दही
- आवडीनुसार फळे
- काजू
- chia seeds
- बदाम
- आवश्यकतेनुसार थोडे चांगल्या दर्जाचे प्रोटीन पाऊडर
वरील सर्व घटक समप्रमाणात घेऊन mixer मधून काढायचे आहे आणि रोज सकाळी किंवा रात्री प्यायचे आहे.
यामध्ये calories आणि स्नायू बळकट करण्यासाठी लागणारी सर्व पोषक घटका असतात.
2. वेट गेन शेक
घटक
- दूध
- केळी
- काजू
- बदाम
- मध
- आवश्यकता आणि आवडीनुसार चांगल्या दर्जाचे प्रोटीन पाऊडर
वरील सर्व घटक एकत्र करून mixer मधून काढायची आहेत आणि दिवसातून एक वेळ प्यायचे आहे.
3. हेलथी स्नॅक्स
हा एक साधारण स्नॅक्स आहे. या स्नॅक्स मध्ये तुम्ही proteins, fats आणि carbohydrate जास्त असतील अशी खबरदारी घ्या.
यासाठी एक पद्धत तुम्ही वापरू शकता ती म्हणजे केळी,सुकामेवा आणि काही चॉकलेट bars यांचे मिश्रण तयार करून त्यावर मध आणि घट्ट केलेले दूध याचे आवरण टाकून ते स्नॅक्स म्हणून वापरू शकता. नाहीतर वरील सर्व पदार्थ तुम्ही दिवसभरात वेळ भेटेल तेव्हा खाल्ल्याने सुद्धा हेल्थ स्नॅक्स चा फायदा मिळेल.
या ब्लॉग मध्ये आपण वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे आणि त्यासाठी काही घरगुती उपाय बघितले.
FAQ’s
वजन वाढवण्यासाठी काय करावे ?
वजन वाढवण्यासाठी काय खावे याचे उत्तर खूप मोठे होईल. थोडक्यात सांगायचे म्हणजे वजन वाढवण्यासाठी आपण जास्त प्रोटीन,calories आणि carbohydrate असणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत.
वजन वाढवण्यासाठी तूप चांगले आहे का ?
वजन वाढवण्यासाठी तूप हा उत्तम,सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.
वजन वाढवण्यासाठी कोणते दूध चांगले आहे ?
वजन वाढवण्यासाठी कोणत्याही जनावरचे दूध चांगले आहे. फक्त जर अधिक घट्ट दूध वापरले तर वजन वाढवण्यासाठी दूध चांगले ठरू शकते.
चिकन मुळे वजन वाढते का ?
चिकन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि चरबी असते. त्यामुळे चिकन मुळे वजन वाढू शकते.
झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय आहेत का ?
झटपट वजन वाढवण्यासाठी उपाय आहेत. यासाठी तुम्हाला व्यवस्थित आहार आणि विहार यांचे नियोजन करावे लागेल. यासाठी दीर्घ आणि सखोल मार्गदर्शन असण्याची गरज आहे.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Working as Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747
सर छान माहिती दिली .थोड आणखी माहिती हवी आहे
1.वरील औषधांचे प्रमाण किती असावे?
2. बाजारात बरेच प्रोटीन शेक
उपलब्ध आहेत . तुमच्यानुसार त्यापैकी कोणत चांगलं आहे?
3.वरील अश्वगंधा आणि शतावरी एकत्र.घेतलं तर चालेल काय ?
4.वरील औषध काही साईड इफेक्ट वैगेरे नाही ना?
धन्यवाद. बाजारात चांगल्या कंपनी चेच आयुर्वेदिक उत्पादने घेणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही विश्वासू ब्रॅंड चालतील . अओण शतावरी आणि अश्वगंधा एकत्र घेऊ नये . यासाठी आळीपाळीने घेतले तरी चालेल किंवा सकाळ आणि रात्री अशा वेळी घ्यावे . आयुर्वेद औषधांचे काहीही साइड effects नाहीत जोवर तुम्ही चांगले उत्पादन घेत आहात .