HEALTHBUSS

मूळव्याध आयुर्वेदिक उपाय शोधताय ? ही औषधी घालवतील तुमचा मूळव्याध

Last updated on May 10th, 2024 at 08:08 pm

मूळव्याध (मूळव्याध कोंब) हा आजार बऱ्याच जणांना अक्षरशः वैताग आणणारा आजार आहे. पण मूळव्याध वर आयुर्वेदिक उपाय तसेच काही घरगुती उपाय जर आपण वापरले तर याचा फायदा नक्कीच होतो. जर मूळव्याध कोंब उपचार तुम्ही शोधत असाल तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

पण त्यापूर्वी जास्त नाही, पण थोडी मूळव्याध बद्दल माहिती घेऊ. ही माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. एक रुग्ण म्हणून तुम्ही देखील आपले कर्तव्य पार पाडून नेहमीच जागरूक रहायला हवं.

पुढे मी नेमके मूळव्याध म्हणजे काय, ते कशामुळे होते आणि त्याची लक्षणे किंवा आपल्याला जो त्रास होत आहे तो मूळव्याध असल्यामुळेच तर होत नाही ना हे कळून घेऊयात.

मूळव्याध म्हणजे काय ?

आपल्या पूर्ण शरीरभर रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. त्याचनुसार आपल्या गुदभागी किंवा गुदद्वार या ठिकाणी सुद्धा त्या असतात.

जेव्हा गुदद्वार किंवा गुदभागातील रक्तवाहिन्या सुजतात तेव्हा मूळव्याध (मूळव्याध कोंब) आजाराची स्थिती निर्माण होते. थोडक्यात काय तर तुम्हाला मूळव्याध आजार होतो आणि त्याचा त्रास व्हायला लागतो.

याबद्दल ची अधिक माहिती जसे कि रक्तवाहिन्या का सुजतात वगैरे, याची संप्रापती कशी घडते, याबद्दल ची माहिती आपण बघणार नाही आहोत. कारण ब्लॉग खूप मोठा होईल.

मूळव्याध कसा ओळखावा ?

मूळव्याध कोंब फोटो

mulvyadh ayurvedic upaay2

मूळव्याध वर आयुर्वेदिक उपाय चा उपयोग करत असताना जाणवणाऱ्या लक्षणांचा विचार करून हे उपाय करावे लागतात. या मध्ये आपण बघूया कि मूळव्याध चे लक्षण काय आहेत किंवा तुम्हाला जो त्रास होत आहे तो मूळव्याध आहे हे कसे ओळखावे याबद्दल माहिती जाणून घेऊया.

1. वेदना आणि अस्वस्थता

मूळव्याध झालेल्या लोकांना गुदभागी भयंकर वेदना होतात आणि अस्वस्थ वाटायला लागते. शौचास गेल्यावर किंवा एखाद्या जागेवर अधिक वेळ जास्त बसून राहिल्यावर या वेदना जास्त होतात.

2. रक्तस्त्राव

मूळव्याध च्या लक्षणांमद्धे अनेक जणांमध्ये दिसून येणारे हे लक्षण आहे. शौचास गेल्यावर गुदभागवरून रक्त पडते. हे रक्त अधिक गडद आणि लाल रंगाचे असते.

3. खाज आणि चिडचिड

मूळव्याध असलेल्या व्यक्तींना गुदभागी सतत खाज येत असते. यामुळे त्यांची चिडचिड होते.

4. सूज /कोंब

काही लोकांना गुद भागातून मास बाहेर आल्यासारखे वाटते, त्याला मूळव्याध कोंब म्हणतात. रक्तावाहिन्या सुजल्या मुळे आतील मास हे देखील सुजते. शौचास गेल्यावर जोर लावल्यामुळे हे कोंब बाहेर येतात.

हे आहेत मूळव्याध आयुर्वेदिक उपाय

मूळव्याध झालेले व्यक्ती हे अनेक डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. काही जणांना यामधून आराम मिळतो तर काहीजण निराश होतात. हे पूर्ण उपचार Allopathy औषधी वापरून केलेले असतात.

अशा वेळी काही लोक आयुर्वेद कडे वळतात आणि मूळव्याध वर आयुर्वेदिक उपाय वापरुन आराम मिळावतात. थोडक्यात काय तर आयुर्वेदिक उपचार त्यांना सुरक्षित आणि प्रभावी उपचार वाटतात.

तर या ठिकाणी आपण आयुर्वेद ग्रंथ आणि इतर संदर्भात सांगितलेली मूळव्याध साठी उपयुक्त अशी आयुर्वेदिक उपाय आणि औषधे बघणार आहोत.

1. त्रिफळा

त्रिफळा हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ ‘तीन फळे’ असा होतो. कारण यामध्ये आमलकी, बिभीतकी आणि हरितकी या तीन आयुर्वेदिक फळांचे मिश्रण असते. मूळव्याध वर आयुर्वेदिक उपाय हवा असेल तर हे एक प्रभावी औषध आहे .

मूळव्याध आयुर्वेदिक उपाय

आपण एक एक करून कसे हे तिन्ही द्रव्य मूळव्याध साठी उपयुक्त आहे ते बघूया.

A. आमलकी

आमलकी चे scientific नाव आहे Emblica Officinalis. याला भारतीय गूसबेरी म्हणून ही ओळखले जाते. आमलकी मध्ये भरपूर प्रमाणात Vitamin C आणि Antioxidants असतात. यामुळे ती पचणास मदत करते.

B. बिभीतकी

Terminalia Bellirica हे याचे scientific नाव आहे. याचे मुख्य कर्म हे शुद्धीकरण आहे (detoxification) म्हणजेच विषारी पदार्थांना शरीराबाहेर फेकण्याचे आहे. पचणास मदत करून अप्रत्यक्ष आताड्यांच्या हालचालींना मदत करते.

C. हरितकी

हरितकी चे scientific नाव आहे Terminalia Chebula. आयुर्वेद मध्ये याला औषधीचा राजा म्हटले आहे.

आपण खाल्लेलं अन्न पचण्यास हरीतकी मदत करते. त्यानंतर खाल्लेलं अन्न अताड्यात जाऊन व्यवस्थित बारीक व्हावे यासाठी आताड्यांची हालचाल करण्यास मदत करते. असे झाल्यास मूळव्याध असलेल्या व्यक्तींचा शौचास गेल्यावर होणारा त्रास कमी होतो.

ही तिन्ही फळे एकत्र केलीत तर प्रभावी असे त्रिफळा औषध तयार होते. या तिन्ही फळांचे एकत्रितपणे फायदे सांगायचे झाल्यास, पाचक, रक्तशुद्धी, Detoxifications आणि आताड्यांची हालचाल हे आहेत.

रुग्णास वरील सर्व औषधी गुणांचा फायदा झाल्यास नक्कीच मूळव्याध बरा होण्यास मदत होते.

त्रिफळा बाजारात त्रिफळा चूर्ण (powder), त्रिफळा कॅप्सुल आणि त्रिफळा अर्क अशा स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे.

बेस्ट त्रिफळा उत्पादने- त्रिफळा चूर्ण, त्रिफळा कॅप्सुल

2. अर्शोघनी वटी

हा देखील प्रभावी असा मूळव्याध वर आयुर्वेदिक उपाय आहे. अर्शघ्न हा शब्द संस्कृत मधून आलेला असून ज्याचा अर्थ आहे piles remover म्हणजे मूळव्याध नष्ट करणारा.

अर्शोघनी वटी याचा उपयोग मुख्य म्हणजे मूळव्याध नंतर उद्भवणारे लक्षण दूर करण्यासाठी होतो. जसे कि खाज येणे, सूज येणे,रक्तस्त्राव होणे. यामध्ये हरितकी, कडुनिंब आणि कुटकी या वनस्पतींचा समावेश असतो. या तिन्ही घटक द्रव्य बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.

हरितकी बद्दल जाणून घेतलेले असल्यामुळे त्याला वगळून इतर दोन घटकांची माहिती घेऊ.

A. कडुनिंब

कडू लिंब याचे Scientific नाव Azadirachta Indica असे आहे. हे Antibacterial आणि Antiviral म्हणून काम करते. गुदभागात सूज असल्यामुळे तिथे जखम झाल्यास Bacteria growth हाऊन Infection होण्याची शक्यता असते जे नंतर खूप त्रास देऊ शकते.

यासाठी कडुनिंब हे infection थांबवून, कमी करून, सूज कमी करण्यास मदत करते.

B. कुटकी

Picrorhiza Kurroa असे Scientific नाव या द्रव्याचे आहे. ही एक कडू वनस्पती आहे. ही वनस्पति Detoxification आणि यकृत सुदृढ ठेवून पचणास मदत करते. तसेच या वनस्पती मध्ये दाह विरोधी गुणधर्म असल्यामुळे मूळव्याध मुळे होणाऱ्या वेदना यामुळे कमी होतात.

थोडक्यात काय तर वरील दोन्ही आयुर्वेद वनस्पतींचा उपयोग करून अर्शोघनी वटी तयार केली जाते. मूळव्याध च्या वेदना, दाह, खाज आणि सूज या अर्शोघनी वटी मुळे कमी होते.

अर्शोघनी वटी सामान्यता फक्त Tablet स्वरूपत उपलब्ध असते.

घरी मागवा बेस्ट अर्शोघनी वटी

3.अभयारिष्ठ

अभयारिष्ठ त्याच्या पाचन आणि रेचक (पोट साफ करण्याची प्रक्रिया ) गुणधर्मामुळे ओळखले जाते. मूळव्याध असणाऱ्या व्यक्तींना गुदभागी वेदना होत असल्यामुळे सहजतेने पोट साफ होत नाही. त्या साठी अभयारिष्ठ काम करते.

पाचन आणि रेचक गुणधर्म असल्यामुळे मूळव्याध वर आयुर्वेदिक उपाय म्हणून याचा उपयोग केला जाऊ शकतो. यामध्ये मुख्य द्रव्य म्हणून हरितकी वापरली जाती जी बाकी घटक द्रव्यबरोबर मिक्स केली जाते. आपण ती द्रव्य एक एक करून बघूयात.

A. धाटकी

धाटकी वनस्पतीची फुले वापरली जातात. ही पाचक आणि तुरट गुणांसाठी ओळखली जाते. पाचन सुधारून अन्न आणि गुदमार्ग साफ ठेवण्यास ही वनस्पति मदत करते.

B. विडंग

ही वनस्पती पचन आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. शिवाय रेचक असल्यामुळे विषारी पदार्थ बाहेर टाकते.

C. मुस्ता

ही वनस्पती पोट फुगणे, सूज येणे, पोटातील अस्वस्थता सारख्या लक्षणांना कमी करते.

D. अजवाईन

याचे प्रमुख कार्य हे पाचन असून पोटाची अस्वस्थता दूर करते.

वरील सर्व घटक पाणी आणि गूळ यांच्या मिश्राणात आंबवून अभयारिष्ठ तयार केले जाते.

नैसर्गिक वनस्पतींनी बनलेले अभयारिष्ठ खरेदी करा

4. गुग्गुलू

आयुर्वेद मध्ये गुग्गुलू ही प्राचीन काळापासून वापरण्यात येणारी एक महत्वाची वनस्पति आहे. मूळव्याध वर आयुर्वेदिक उपाय म्हणून याचा उपयोग दाह तसेच सूज कमी करण्यासाठी होतो .

आयुर्वेद नुसार मूळव्याध हा शरीरात वात आणि पित्त या दोन दोषांच्या असमतोल असल्यामुळे होतो. ही वनस्पति या दोषांना समान आणून दाह आणि सूज यांसारखी लक्षणे कमी करण्यास मदत करते.

याव्यतिरिक्त गुग्गुलू Antibiotic म्हणून देखील काम करते. गुद भागी आलेले कोंब येथील Infection कमी करून ते कोंब आतमध्ये ढकळण्यास मदत करते.

गुग्गुलू विविध स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यामध्ये राळ, कॅप्सूल, गोळ्या असे उत्पादने आहेत. तसेच अनेक आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनमध्ये घटक म्हणून या वनस्पतिचा समावेश असतो.

मूळव्याध साठी आयुर्वेदिक उपाय शोधत असताना वरील औषधांचा उपयोग तुम्ही करू शकता. या पेक्षा वेगळी औषध देखील वापरली जातात. पण आयुर्वेद सिद्धांतानुसार आणि मूळव्याध च्या समप्राप्ती नुसार मी सांगितलेली औषधी ही अत्यंत प्रभावी आहेत.

प्रत्येक आजार हा फक्त औषधी घेऊन बरा होत नसतो असे अनेक तज्ञ सांगतात आणि एक आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून माझा ही अनुभव आहे .

औषधी या सोबतच आपल्याला आपला आहार, जीवनशैली आणि काही घरगुती उपाय देखील करावे लागतात. मूळव्याध बरा करण्यासाठी आपल्याला इतर ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याबद्दल थोडक्यात बघू.

घरी आणा शुद्ध त्रिफळा गुग्गुलू

मूळव्याध कोंब घरगुती उपाय

काही आजारांसाठी घरगुती उपाय हे अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच मूळव्याध साठी पण आहे .

यासाठी तुम्हाला अर्धे कापलेले लिंबू घ्यायचे आहे आणि त्या लिंबूवर चिमूटभर सैंधव टाकायचे आहे.

ते लिंबू तुम्ही त्याचा रस संपेपर्यंत चाटायचे आहे. असे तुम्ही सलग 15 दिवस करायचे आहे.

मूळव्याध साठी त्रीसूत्र

जीवनशैली आणि आहारात बदल करण्यासाठी तुम्ही आतड्यांसंबंधी हालचाल, Hydration आणि फायबर युक्त अन्न पदार्थ या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या तिन्ही गोष्टी तुमचा मूळव्याध चा त्रास कमी करण्यास महत्वाची घटक ठरत असतात. म्हणून याला मी मूळव्याध साठी चे त्रीसूत्री म्हणतो.

मूळव्याध साठी Intestines (आतडी) ची हालचाल होणे अत्यंत महत्वाचे आहे. असे झाले तरच तुम्ही जे अन्न पोटात टाकले आहे त्यांची देखील व्यवस्थित हालचाल होऊन योग्य पचन होईल.

आतडी यांची हालचाल होण्यासाठी व्यायाम करत चला. यासाठी सौम्य व्यायाम करा. कठीण व्यायाम करण्याची काही गरज नाही. रात्री जेवल्यानंतर तुम्ही शतपावली करून झोपा.

  • Hydration साठी तुम्ही दिवसभरात शक्य तेवढे जास्त प्रमाणात पाणी प्यायचे आहे.
  • फायबरयुक्त आहार यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे अन्न पचन व्यवस्थित होते.
  • चांगले पचन झाल्यास ते सुलभ आणि सहजतेने शौचवाटे बाहेर पडण्यासाठी मदत होते.
  • यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा तुमच्या जेवणामध्ये समावेश करा. मूळव्याध साठी रसाळ फळे, हिरव्या भाज्या, धान्य, शेंगा अशा प्रकारचा आहार घ्यावा.

मूळव्याध साठी आहार काय घ्यावा ?

मूळव्याध वर आयुर्वेदिक उपाय चालू ठेवत असताना तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे देखील महत्वाचे आहे. कारण मूळव्याध हा आजार होण्यासाठी तसेच तो नष्ट करण्यासाठी तुमचा आहार हा महत्वाचा घटक आहे. तुम्ही काही चुकीच्या गोष्टी खाल्लेल्या आहेत त्याचमुळे तुम्हाला मूळव्याध चा त्रास झाला आहे आणि आता तोच आहार बदलून तुम्हाला मूळव्याध चा त्रास नष्ट करायचा आहे.

  • आतड्यांसंबंधी हालचालींना चालना देण्यासाठी संपूर्ण धान्य, ताजी फळे आणि भाज्या यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा, जसे की मी आधी सांगितले.
  • तुमच्या जेवणात जिरे, धणे, आले आणि हळद यांसारख्या मसाल्यांचा समावेश करा, कारण त्यांच्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
  • प्रक्रिया केलेले पदार्थ, मसालेदार, स्निग्ध पदार्थ आणि जास्त प्रमाणात कॅफिन आणि अल्कोहोल टाळा कारण ते मूळव्याध वाढवू शकतात.

मूळव्याध साठी काय खाऊ नये?

तुम्हाला मूळव्याध असेल तर काही खाण्याच्या गोष्टी तुम्ही टाळणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवायला हवे की कोणत्या ही आजाराचे कारण हे तुमच्या पचनसंस्था पासून चालून होते. त्यात महत्वाचे म्हणजे मूळव्याध हा पचनसंस्था संबंधित आजार आहे.

त्यामुळे तुम्ही पचनसंस्था ला जसे वागवताल तशी प्रतिक्रिये तुमची पचनसंस्था तुम्हाला देईल. त्यामुळे खाण्याच्या बाबतीत काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. खाली सांगितलेले अन्न पदार्थ तुम्ही विशेषकरून टाळायचे आहे.

  • तेलकट पदार्थ
  • तळलेले पदार्थ
  • तिखट असणारे पदार्थ
  • जास्त खारट पदार्थ
  • मद्य
  • मांसाहार
  • carbonated drinks

वरील सर्व पेय आणि अन्न पदार्थ हे तुमच्या पचन प्रक्रिये मध्ये हस्तक्षेप करून मंद करतात आणि मूळव्याध चा त्रास वाढवतात

मूळव्याध साठी योगासन

मूळव्याध चा त्रास कमी करण्यासाठी काही विशिष्ट योगासने उपयोगी ठरतात. यामुळे रक्ताभिसरण (blood circulation) आणि आतडी यांची हालचाल होण्यास मदत होते.

mulvyadh ayurvedic upaay1 1

योगासन मध्ये पवनमुक्तासण, भुजंगासन, मलासन ही मूळव्याध पासून आराम देण्यासाठी उपयुक्त आसने आहेत.

तरी शेवटी एवढंच सांगेन की वरील सांगितलेली सर्व मुद्दे ही तेवढेच महत्वाचे आहेत जेवढे आयुर्वेदिक औषध.

थोडक्यात

या ब्लॉग मध्ये आपण मूळव्याध म्हणजे नेमके काय आणि तो का होतो याबद्दल थोडक्यात माहिती बघितली. त्यानंतर मूळव्याध साठी आयुर्वेदिक औषध यासंबंधी एक विस्तृत माहिती जाणून घेतली आणि त्या सोबत करावयाच्या काही गोष्टी आपण थोडक्यात बघितल्या आहेत.

मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल.तसे असेल तर मला कळवा. हे ही कळवा अजून कोणत्या विषयावर वर मी तुम्हाला माहिती द्यायला आवडेल.

FAQ’s

मुळव्याध होण्याचे मुख्य कारण काय आहे?

मूळव्याध होण्याचे मुख्य कारण हे गुद द्वार या ठिकाणी येणार दबाव आहे ज्यामुळे तेथील रक्तावहिन्यांची आणि त्वचेची सूज होते.

मूळव्याधची सुरुवातीची लक्षणे कोणती?

मूळव्याध ची सुरुवातीची लक्षणे गुदद्वारात जळजळ होणे,रक्तस्त्राव होणे आणि सूज येणे.

मूळव्याध कशामुळे होतो ?

मूळव्याध अनेक कारणांमुळे होतो. वर सांगितल्याप्रमाणे मुख्य कारण म्हणजे गुद द्वार ठिकाणी झालेली सूज. ही सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते. जसे बद्धकोष्ठता, वजन वाढणे, अतिसार, गर्भधारणा, व्यायाम न करणे.

अंतर्गत मूळव्याध किती काळ टिकतात?

अंतर्गत मूळव्याध काही दिवस ते काही आठवडे टिकू शकतात.

मूळव्याध खाज का होते?

मूळव्याध खाज का होते यासाठी वेगळे असे काही कारण नाही. गुदद्वारात सूज आणि जळजळ होत असल्यामुळे मूळव्याध खाज होते.

2 thoughts on “मूळव्याध आयुर्वेदिक उपाय शोधताय ? ही औषधी घालवतील तुमचा मूळव्याध”

Leave a Comment