HEALTHBUSS

शेवगा औषधी उपयोग: 5 फायदे जाणून घ्या (शेवग्याच्या शेंगाचे फायदे)

Last updated on April 23rd, 2024 at 10:22 pm

(शेवगा भाजी फायदे, शेवगा शेंगा फायदे, शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे, शेवगा खाण्याचे फायदे, shevga, shevga bhaji, shevga shenga, shevga benefits in marathi, shevga bhaji benefits, shevga bhaji benefits in marathi)

हिरव्या पालेभाज्या किंवा इतर भाज्या या आपल्या आहारातील महत्वाचे घटक असतात. आणि तो असला पाहिजे. या बहुतेक भाज्या आणि त्यांच्या इतर रेसीपी यामधे भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आणि औषधी उपयोग असतात.

याच पैकी एक म्हणजे शेवगा भाजी. शेवगा भाजी ही देखील पोषक तत्व यांनी भरपूर आहे आणि शेवगा भाजीचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत.

हाच विषय घेऊन आज आपण ‘शेवगा औषधी उपयोग’ या ब्लॉग मध्ये शेवगा खाण्याचे फायदे काय आहेत आणि का तुम्ही लगेच तुमच्या आहारात शेवगा समाविष्ट केला पाहिजे याचे विश्लेषण करणार आहोत.

थोडक्यात

शेवगा चे झाड तसे दुर्मिळ नाही. अगदी सहज उपलब्ध, भरपूर ठिकाणी दिसणारे आणि लागवड करायला देखील सोपे आहे.

या शेवगा झाडाचे विशेष म्हणजे याचे सर्व भाग हे पोषक घटकांनी भरपूर आहेत आणि औषधी म्हणून उपयोगात आहेत. जसे की या झाडाची साल, पाने, फुले, फळे आणि शेंगा. शेवगा खाण्याचे फायदे इथे थोडक्यात समजून घेऊ

  • शेवगा मध्ये भरपूर प्रमाणात विटामीन (मुख्य करून विटामीन C), minerals, ओलिक ऍसिड (oleic acid) जे ह्रदयासाठी आरोग्यदायी मानले जाते आणि फायबर असतात. या सोबत ह्रदयविकार आणि मधुमेह यांना नियंत्रणात ठेवणारे काही अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीइंफ्लेमेटरी घटक ही शेवगा मध्ये आढळतात.
  • हेल्थलाइन नुसार शेवगा चे विविध प्रकारचे भाग म्हणजे शेंगा, पाने, साल आणि इत्यादि हे ३०० पेक्षा अधिक रोगांवर प्रभावी ठरतात.
  • तज्ञांच्या मते शेवगा वनस्पति मध्ये संत्र्यापेक्षा ७ पट जास्त विटामीन सी, गाजरापेक्षा १० पट जास्त विटामीन ए, दुधापेक्षा १७ पट जास्त कॅल्शियम, दहयापेक्षा ९ पट जास्त प्रोटीन, केळीपेक्षा १५ जास्त पोटॅशियम आणि २५ पट जास्त आयर्न आढळते.

महाराष्ट्रात जास्त करून या झाडाच्या शेंगा वापरल्या जातात. याची भाजी करून अगदी आवडीने खाल्ली जाते. इंग्लिश मध्ये या शेंगांना immature pods असे म्हणतात.

महाराष्ट्रात अनेक जणांची आवडती ही शेवगा शेंगा ची भाजी आहे. याच अनुषंगाने या ब्लॉग मध्ये फक्त शेवगा शेंगाचे औषधी उपयोग बघणार आहोत.

हे आहेत शेवगा औषधी उपयोग

१. लैंगिक आरोग्य (sexual health)

शेवगा औषधी उपयोग STAMINA

शेवगा च्या शेंगा पुरूषांचे लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. त्यामुळे शेवगा औषधी उपयोग बघत असताना त्याचा लैंगिक आरोग्य वर होणारा सकारात्मक परिणाम बघणे आवश्यक ठरते.

लैंगिक आरोग्य संबंधित तक्रारी जसे शुक्राणु कमी असणे, सेक्स स्टॅमिना कमी असणे, शीघ्रपतन किंवा लिंगामध्ये ताठरता नसणे यावर शेवगा उपयुक्त ठरते.

शेवगा यामध्ये कामोत्तेजक गुणधर्म असल्यामुळे स्टॅमिना कमी असणे आणि त्या ठिकाणी ताठरता कमी असणे यावर शेवगा चा उपयोग होतो असे तज्ञ सांगतात.

अमेरिकन जर्नल ऑफ न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित या अभ्यासात सिद्ध झाले की शेवगा वनस्पति ही रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवून पुरुषांमध्ये कामवासना आणि लैंगिक आरोग्य वाढवते.

टेस्टोस्टेरॉन हे पुरूषांचे sexual हॉरमोन आहे ज्यामुळे पुरूषांचे लैंगिक आरोग्य जसे सेक्स स्टॅमिना, कामवासना तसेच प्रायवेट पार्ट्स ची वाढ अवलंबून असते.

हे टेस्टोस्टेरॉन कसे लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करते याची थोडक्यात माहिती बघा.

  • टेस्टोस्टेरॉन पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा आणि कामवासना उत्पन्न करते. म्हणून याला ‘सेक्स होरमोन’ देखील म्हटले जाते.
  • टेस्टोस्टेरॉन तुमच्या खालच्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढवते. यामुळे त्या ठिकाणची ताठरता कायम राहते.
  • टेस्टोस्टेरॉन शुक्राणु ची निर्मिती करते.
  • टेस्टोस्टेरॉन मुळे तुमचे स्नायू (muscles) मजबूत होतात आणि शरीराचा स्टॅमिना वाढतो. यामुळे अप्रत्यक्ष तुमची लैंगिक क्षमता (performance) देखील वाढते.
  • काही अभ्यासकांच्या मते टेस्टोस्टेरॉन हॉरमोन तुमच्या मध्ये आत्मविश्वासची भावना उत्पन्न करते ज्यामुळे अप्रत्यक्षपणे तुमचा सेक्स स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

टेस्टोस्टेरॉन व्यतिकरिक्त शेवगा मध्ये झिंक (zinc) मिनरल असल्याचे देखील आढळले.

  • झिंक हे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन्स च्या निर्मितीसाठी आवश्यक घटक आहे.
  • त्याचसोबत वीर्य निर्मिती आणि शुक्राणु निर्मितीसाठी झिंक पोषक घटक म्हणून काम करते.
  • झिंक हे पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा निर्माण झाल्यावर सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी मदत करते.

उंदरांवर केलेल्या एका प्रयोगात शेवगाच्या बियांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये असे आढळले की उंदराच्या लिंगातील स्नायू (muscles) या बियांचे सेवन केल्यामुळे शिथिल होतात ज्यामुळे तिथे अधिक रक्तप्रवाह होऊन लिंगाची कार्यक्षमता वाढते. पण या संबंधित प्रयोग मानवांवर झालेला नाही त्यामुळे पुरुषांच्या बाबतीत शेवगा चा या उपयोगा विषयी आपळल्याला जास्त माहिती अजून उपलब्ध नाही.

संबंधित वाचा –स्टॅमिना वाढवण्यासाठी घरगुती उपाय

२. ह्रदय संबंधित आजार

शेवगा औषधी उपयोग

लैंगिक क्षमता वाढवण्याबरोबर शेवगा शेंगा या ह्रदयाचे आरोग्य देखील वाढवतात. शेवगा मध्ये विटामीन, प्रोटीन आणि मिनरल हे अधिक प्रमाणात असल्यामुळे सदर पोषक घटक ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवतात.

मेडिकल न्यूज टूडे नुसार शेवगा मध्ये क्वेरसेटिन (quercetin) नावाचे अँटिऑक्सिडंट (antioxidant) ह्रदय आणि रक्तवाहिन्या यांचे रक्षण करते. क्वेरसेटिन (quercetin) हे घटक चरबी तयार (lipid formation) होण्यापासून थांबवतात ज्यामुळे ह्रदय संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

संबंधित वाचा – हार्ट अटॅक येऊ नये म्हणून कोणती औषधे घेतात ?

तसेच यामधे असणारे मिनरल, प्रोटीन आणि विटामीन ह्रदयाचे आरोग्य वाढवतात.

  • शेवगा मध्ये असणारे व्हिटॅमिन सी (vitamin C), पोटॅशियम (potassium) आणि मॅग्नेशियम (magnesium) हे आणि इतर आवश्यक जीवनसत्व एकंदर संपूर्ण ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवतात. यामुळे ह्रदयाची कार्यक्षमता वाढून ह्रदय संबंधित आजार कमी होण्यासाठी मदत होते.
  • विशेषकरून पोटॅशियम हे ह्रदय, रक्तवाहिन्या आणि त्यांचे कार्य यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.
  • वर सांगितल्याप्रमाणे शेवगा मध्ये क्वेरसेटिन (quercetin) नावाचे अँटिऑक्सिडंट (antioxidant) असते. रक्तातील फ्री रॅडिकल्स (free radicals) neutralize करून यापासून ह्रदय आणि रक्तवाहिन्यांना होणारे संभाव्य धोक्यापसून वाचवते.
  • यामधे असणारे पोटॅशियम (potassium) हे उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेंशन सारख्या आजारांना कमी करण्यास मदत करते. हेच हायपरटेंशन ह्रदयविकार आणि ईतर गंभीर ह्रदय संबंधित आजारचे कारण ठरते असते.
  • नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित या संशोधनानुसार नुसार शेवगा शेंगाच्या बियांमद्धे ओलिक ऍसिड (oleic acid) नावाचे अॅसिड असते. हे एक फॅटी ऍसिड चा प्रकार आहे जो ह्रदयसाठी आरोग्यदायी असतो.
  • हेल्थलाइन नुसार शेवगा ची पाने तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात. यामुळे ह्रदयविकार सारखे आजार होण्याचा धोका कमी होतो.

३. मधुमेह साठी शेवगा उपयोगी

शेवगा औषधी उपयोग

मधुमेह आणि ह्रदयसंबंधी कोणताही आजार असो, हे नेहमी एकमेकांसोबतच चालत असतात.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार मधुमेह असणाऱ्या लोकांच्या मृत्यूचे सर्वाधिक कारण हे ह्रदयविकार आहे. त्याउलट ह्रदयविकार येऊन आणि मधुमेह असणाऱ्या मृत्यू झालेल्या लोकांचा दर १.७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे विरुद्ध ज्यांना मधुमेह नाही.

यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी ह्रदय संबंधित आजार होऊ नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि ह्रदयाचे आजार असणाऱ्यांनी मधुमेह होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.

दोन्ही अनुषंगाने शेवगा उपयोगी ठरणारा आहे. शेवगा मधील काही गुण आणि घटक हे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना देखील उपयोगी ठरतात.

बहुतेक मधुमेह असणाऱ्या रुग्णांना ह्रदयसंबंधीत काही तरी आजार असतोच. यामुळे असं म्हणता येईल की मधुमेह साठी ह्रदयातील आजार हे एक कारण ठरू शकते.

वरील भागात आपण बघितले की कसे शेवगा हा ह्रदयाचे आजार थांबण्यास मदत करते. यामुळे काही अंशी मधुमेह टाळण्यासाठी एक पाऊल आपण उचलेले आहेच.

शेवगा आणि मधुमेह संबंध कसा आहे ते बघूया.

  • उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये मधुमेह चे प्रमाण अधिक असते. पण शेवगा मधील पोटॅशियम हे उच्च रक्तदाबचा धोका कमी करून मधुमेह होण्याचा धोका देखील कमी करते.
  • हेल्थलाइन नुसार शेवगा मध्ये क्लोरोजेनिक ऍसिड नावाचा एक घटक असतो. हे क्लोरोजेनिक ऍसिड (chlorogenic acid) मधुमेह रुग्ण मध्ये जेवनांतर रक्तातील वाढलेली साखरेची पातळी कमी करते. त्यामुळे शेवगा एक प्रकारे इनसुलीन सारखे काम करते.
  • तसेच या यामधील क्वेरसेटिन (quercetin) नावाचे घटक फ्री रॅडिकल्स (free radicals) neutralize करून पेशींना मधुमेह पासून होणारे नुकसान थांबवते.
    यामधील अँटिऑक्सिडंट्स मधुमेह मुळे होणाऱ्या पेशींची झीज थांबवतात.
  • शेवगा मध्ये असणारे व्हिटॅमिन सी (vitamin C), पोटॅशियम (potassium) आणि मॅग्नेशियम (magnesium) आणि फायबर हे मधुमेह साठी जबाबदार असणारे घटक कमी करायला मदत करतात.

४. पोटाच्या अनेक विकारांवर शेवगा आहे उपयोगी

शेवगा औषधी उपयोग

शेवगा हा पोटाच्या अनेक विकारांवर तसेच एकंदर पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी देखील उपयोगी ठरते.

शेवगा च्या pods म्हणजेच शेंगांवर प्रकाशित या अभ्यासानुसार शेवगा च्या शेंगा मध्ये असणारे फायबर पचन संबंधित आरोग्य सुधारते. एवढेच नव्हे तर कोलन च्या कर्करोगा (colon cancer) वर देखील फायदेशीर ठरते असा दावा या मध्ये केलेला आहे.

तसेच एका अभ्यासानुसार शेवगा मुळे पोटातील अॅसिडिटी ही ८५ टक्क्याने कमी होते असे देखील सिद्ध झाले आहे.

शेवगा मध्ये असणारे फायबर पोटाच्या अनेक समस्यांवर उपयोगी ठरत असते. फक्त शेवगा मधीलच नव्हे तर एकंदरच कोणत्याही भाजी मध्ये असणारा फायबर हा पचन संस्था सुधारण्यासाठी खूप महत्वाचा घटक मानला जातो.

  • शेवगा मध्ये असणारे फायबर अधिक पाणी शोषून मल सॉफ्ट करते ज्यामुळे गुदमार्गवाटे मल सहज बाहेर निघतो. यामुळे मूळव्याध, अपचन सारख्या समस्या कमी होतात.
  • तसेच जुलाब होत असेल तर फायबर त्यातील अधिक पाणी शोषून घेते. यामुळे तो मल घट्ट होतो आणि पुन्हा पुन्हा बाहेर पडण्याचे थांबते.
  • या फायबर मुळे पचन मार्गात, अन्नाचे पचन पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व बॅक्टीरिया (gut bacteria) यांची वाढ होते.
  • या फायबर मुळे पूर्ण पचनसंस्था लवचिक राहते आणि तेथील हालचाली व्यवस्थित होतात.

संबंधित वाचा –पोटातील गॅस बाहेर पाडण्यासाठी उपाय

याच बरोबर शेवगामध्ये असणारे विटामीन जसे की नियासिन (niacin), रिबोफ्लेविन (riboflavin) आणि व्हिटॅमिन बी १२ (vitamin B12) हे आतडी आणि एकंदर अन्नमार्ग निरोगी ठेवते. तसेच यामुळे आतड्याची हालचाल (bowel movements) व्यवस्थित राहून अन्नाचे पूर्णपणे पचन होण्यास मदत होते.

५. डोळे आणि केस

डोळे आणि केस यांच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी कॅरोटीन (carotene) नावाचे प्रोटीन खूप महत्वाचे असते.

शेवगामध्ये हे कॅरोटीन भरपूर प्रमाणात आढळते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित या अहवालानुसार शेवगा मध्ये बीटा-कॅरोटीन (beta-carotene) नावाचे प्रोटीन हे डोळ्याचे आरोग्य राखण्यास आणि डोळ्यासबंधीत आजार दूर करण्यास मदत करते.

शेवगा पाने औषधी उपयोग

शेवगा ची पाने  औषधी उपयोग

शेवग्याच्या शेंगाची भाजी सर्वांना माहीत आहे. तसे महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात इतर राज्यात देखील शेवग्याच्या शेंगांच्या अनेक प्रकारच्या रेसिपी लोकप्रिय आहेत. त्याच अनुषंगाने आपण शेवग्याच्या शेंगांचे औषधी उपयोग याची माहिती बघितली.

पण तुम्हाला महिते आहे का की शेवग्याच्या पानांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. तसे शेवग्याच्या पानांची भाजी सुद्धा अनेकांना आवडते.

शेवगाच्या पानांमध्ये खालील प्रमाणात पोषक तत्वे आढळतात.

शेवगा भाजी पोषक मूल्ये

शेवगाच्या पानांमध्ये कोणते औषधी उपयोग आहेत याबद्दल ची माहिती थोडक्यात बघूया.

१. मधुमेह (शुगर)

शेवगा शेंगा जशा मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगी आहेत तसेच शेवगाची पाने देखील मधुमेह साठी उपयोगी ठरतात.

एक संशोधनात ३० महिलांनी सलग तीन महिन्यांसाठी रोज १.५ चमचा शेवग्याच्या पानाची पाऊडर घेतली. त्यानंतर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण १३.५ टक्क्याने कमी झाल्याचे आढळले.

दुसऱ्या एका अभ्यासात ६ लोकांनी काही दिवसांसाठी त्यांच्या आहारात रोज ५० मीग्रा शेवग्याच्या पानांचा समावेश केला असता त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी २१ टक्क्याने कमी झाल्याचे आढळले.

  • शेवग्याच्या पानांमध्ये आढळणारे आयसोथियोसायनेट (Isothiocyanates) हे घटक मधुमेह विरुद्ध काम करतात तसेच अँटिऑक्सिडेंट म्हणून ही काम करतात.
  • शेवग्याच्या शेंगांमद्धे आढळणारे क्लोरोजेनिक ऍसिड हे शेवग्याच्या पानांमध्ये सुद्धा मिळते. हे सुद्धा मधुमेह विरुद्ध काम करणारे एक कंपाऊंड आहे.

२. पोट साफ करण्यासाठी वापरा शेवगा ची पाने

मेडिकल न्यूज टूडे नुसार शेवग्याची पाने ही मल बाहेर पडण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून काम करते. पानांच्या या गुणाला रेचक म्हणतात.

शेवग्याची पाने विष्ठेचे प्रमाण, त्यातील पाण्याचे प्रमाण आणि आतडी यांची हालचाल निश्चित करून अधिक मल बाहेर पाडण्यासाठी मदत करतात.

संबंधित वाचा- पोटातील गॅस बाहेर कसा काढावा ?

३. वायरल इन्फेक्शन (viral infections)

शेवग्याच्या पानांमध्ये असे काही घटक आहेत जे काही विशिष्ट वायरस संक्रमानांना थांबवते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार शेवग्याची पाने HIV-1 संसर्ग (सुरुवातीचे phases) तसेच हिपॅटायटीस बी व्हायरस यांना वाढवण्यापासून थांबवतात.

अशा या अनेक गुणांनी समृद्ध असणारी शेवगाची भाजी आपण नक्कीच खालली पाहिजे. पण लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे नुकसान देखील होते. त्यामुळे आहारात शेवगा समाविष्ट करत असताना त्याचे प्रमाण नेहमी नियंत्रित असूद्या.

शेवट

शेवटी, शेवगा वनस्पतीमध्ये औषधी उपयोग आणि गुणधर्मांची यादी विस्तृत आहे. शेवग्याचे पौष्टिक मूल्य, त्याच्या अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांपर्यंत, शेवगा शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये वापरली जात आहे.

याव्यतिरिक्त, आधुनिक वैज्ञानिक संशोधनाने त्याच्या अनेक संभाव्य आरोग्य फायद्यांची पुष्टी देखील केली आहे.

तुमच्याकडे शेवगा बद्दल काही अतिरिक्त माहिती किंवा अनुभव असल्यास, कमेन्ट करून कळवू शकता.

तसेच ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ’s

शेवग्यामध्ये कोणकोणते घटक असतात ?

शेवग्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात आढळणारे म्हणजे विटामीन C, मिनरल, प्रोटीन आणि फायबर.

शेवगा आरोग्यदायी कसा आहे ?

शेवगा यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आहेत. ज्यामुळे ह्रदयविकार, मधुमेह, पोटाचे विकार यावर प्रभावी औषध म्हणून शेवगा उपयोगी ठरते.

कडू शेवगा खाल्यास काय होते ?

कडू शेवगा खालल्यास अनेक पोटाचे आजार जसे जुलाब, उलटी, मळमळ होऊ शकते. काही वेळा कडू शेवग्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता राहते.

शेवगा खाण्याचे फायदे काय आहे ?

शेवगा खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की ह्रदयसंबंधीत आजारांसाठी, मधुमेह, लैंगिक समस्या साठी तसेच वजन नियंत्रण.

Leave a Comment