HEALTHBUSS

हाताला मुंग्या येणे उपचार | hatala mungya yene upchaar

Last updated on April 16th, 2024 at 12:42 pm

हाताला मुंग्या येणे, हाताला मुंग्या येणे कारण, हाताला मुंग्या येणे उपाय इन मराठी, हाताला मुंग्या येणे घरगुती उपाय, मुंग्या घालवण्यासाठी उपाय, hatala mungya yene, hatala mungya yene in marathi, hatala mungya yene gharguti upay, hatala mungya yene upchar, hatala mungya yene upay in marathi.

तुम्हाला सतत हातात मुंग्या आल्याचे जाणवत आहेत का? जर असा त्रास तुम्हाला होत असेल तर हाताला ‘मुंग्या येणे उपचार’ या ब्लॉग मध्ये (hatala mungya yene upchaar) आपण याची आणि यासंबंधीची इतर महत्वाची माहिती बघणार आहोत.

हाताला मुंग्या येणे ही एक साधारण समस्या असू शकते तसेच हे गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. यामुळे या लक्षणाची आणि कारणांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

या ब्लॉग मध्ये आपण हातावर मुंग्या येण्यावर रामबाण उपचार तर बघणारच आहोतच, पण त्या का येतात, त्याची कारणे कोणती आहेत आणि कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण ते असू शकते हे ही बघणार आहोत.

हाताला मुंग्या येण्यावर रामबाण उपचार

पुढे आपण हाताला मुंग्या येणे यासाठी अनेक प्रभावी असणारे असे उपचार बघणार आहोत.

डॉक्टर आणि रुग्ण या नात्याने याचा उद्देश फक्त तुम्हाला योग्य माहिती पुरवणे, वाचकांना एक जबाबदार आणि जागरूक रुग्ण करणे आणि वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या भाषेत सांगणे एवढेच आहे.

हाताला मुंग्या आल्यावर त्यासाठी आपण वैद्यकीय सल्ल्याने उपचार, घरगुती किंवा आयुर्वेदिक उपचार आणि जीवनशैलीत बदल या तीन स्तरावर उपचाराची माहिती जाणून घेणार आहोत.

संबंधित वाचा-स्वागत तोडकर यांचे घरगुती उपचार

१. आयुर्वेदिक घरगुती उपचार

हाताला मुंग्या येण्यावर रामबाण उपचार म्हणून काही घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक उपचार हे फायदेशीर ठरू शकतात. आपण जे घरगुती उपाय बघणार आहोत ते पारंपरिक पद्धतीने वापरले जातात आणि शास्त्रीय आधार या पद्धतींना आहे.

hatala  mungya yene

A. हर्बल सप्लिमेंट्स

१. अल्फा-लिपोइक ऍसिड (Alpha-Lipoic Acid (ALA))

अल्फा-लिपोइक ऍसिड Alpha-Lipoic Acid एक प्रभावी अँटिऑक्सिडेंट (antioxidant) म्हणून काम करते. हे antioxidant मज्जातंतूचे झालेले नुकसान कमी करते आणि त्याचे कार्य सुधारते. याबद्दलच्या संशोधनात देखील हे सिद्ध झाले आहे की अल्फा-लिपोइक ऍसिड हे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये neuropathy चा त्रास कमी करते.

hatala  mungya yene

फुलगोबी, अक्रोड, मासे, सोयाबीन, राजमा अशा भाजी फळांमद्धे अल्फा-लिपोइक ऍसिड चे प्रमाण अधिक असते.

तसेच बाजारात याचे सप्लिमेंट्स देखील मिळतात.

२. ईवनिंग प्राइमरोज तेल

मेडिकल दुकानांमध्ये मिळणारे ईवनिंग प्राइमरोज ऑइल मध्ये गॅमा-लिनोलेनिक ऍसिड (gla) नावाचे एक अॅसिड असते. हे अॅसिड दाहविरोधी गुणधर्माचे असते ज्यामुळे शरीरात होणारा दाह कमी होतो.

पण अजून एक फायदा म्हणजे ही अॅसिड चेतना पेशींचे निर्माण करून त्यांचे nerve conductivity चे कार्य सुधारते. यामुळे मज्जा तंतु आणि त्यामुळे येणाऱ्या हातांना मुंग्या या नाहीशा होतात. त्यामुळे हाताला मुंग्या येण्यावर रामबाण उपचार म्हणून याचा उपयोग तुम्ही नक्की करू शकता.

३. Acetyl-L-Carnitine (ALC)

Acetyl-L-Carnitine (ALC) हे एक प्रकारचे अमिनो अॅसिड आहे जे चेतना पेशींमद्धे ऊर्जा निर्माण करण्यास महत्वाची भूमिका बजावत असते. शास्त्रज्ञ असे सांगतात की Acetyl-L-Carnitine चे सेवन केल्याने neuropathy चे लक्षणे कमी होण्यास मदत होते ज्यामुळे हातापायांना मुंग्या येणे हे लक्षण देखील कमी होते.

४. हळद

हळदी मध्ये curcumin नावाचे एक कंपाऊंड असते. या कुरकुमईन मध्ये दाह विरोधी गुणधर्म असतात तसेच ते antioxidant म्हणून ही काम करतात. हे कंपाऊंड मज्जा तंतु येथे होणारी जळजळ कमी करते परिणामी यामुळे उत्पन्न हाताला मुंग्या येणे वगैरे अशी लक्षणे सुद्धा कमी होतात.

B. विविध प्रकारचे तेल

१. लॅव्हेंडर तेल (Lavendar oil)

लॅव्हेंडर तेल त्याच्या आराम देण्याच्या गुणधर्मासाठी ओळखले जाते. लॅव्हेंडर एक अतिशय चांगला सुवास असणाऱ्या फुलांची एक वनस्पति आहे. याचा सुगंध विश्रांती देतो, तसेच शरीर अंतर्गत असणाऱ्या दाह संवेदना नष्ट करतो. याच गुणामुळे हे तेल हाताला मुंग्या येण्याच्या संवेदना कमी करून त्यापासून बचाव करते.

२. कॅमोमाइल तेल (Chamomile oil)

या तेलामध्ये वेदनाशमक गुणधर्म असल्यामुळे ते excite आणि triggered झालेल्या मज्जा तंतु यांना शांत करते आणि विश्रांती देते. कॅमोमाइल एक पांढऱ्या रंगाचे फूल असते ज्यापासून हे तेल काढले जाते. याचा सौम्य सुगंध आणि नैसर्गिक स्थायी भाव हाताला मुंग्या येणे वगैरे लक्षणांपासून आराम देते.

३. पेपरमिंट ऑइल (Peppermint oil)

पेपरमिंट म्हणजेच पुदिना. या वनस्पती मध्ये शीत गुण असतो. या वनस्पति चे तेल काढल्यास त्याचा शीत गुण excited झालेले मज्जा तंतु यांना आराम देऊन मुंग्या येण्यासारख्या लक्षणांना कमी करते. तसेच या वनस्पति तेलाचा सौम्य आणि स्फूर्तिदायक सुगंध चेतना पेशींना आराम देऊन हाताला येणाऱ्या मुंग्या थांबवते.

2. जीवनशैलीत बदल

आपली दररोजची जीवनशैली यामध्ये थोडासा सकारात्मक बदल केल्यास हाताला मुंग्या येण्याची समस्या नक्कीच कमी होऊ शकते. त्यामुळे हाताला मुंग्या येण्यावर रामबाण उपचार बघत असताना आपण या दृष्टिकोनातून देखील विचार करणार आहोत.

याबद्दलची थोडी माहिती बघूया.

A. दैनंदिन हालचालमद्धे बदल

आपण आपल्या मनगटाची सतत हालचाल करत असतो. आपण ती हालचाल कशी करतो आणि आपले मनगट कसे ठेवत असतो याचा परिणाम देखील हातावर येणाऱ्या मुंग्यांवर होतो.

आपल्या मनगटाच्या मधोमध एक median nerve जात असते. आपल्या मनगटाची हालचाल झाली की ती median nerve देखील उत्तेजित होते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने केलेल्या हालचाली median nerve वर परिणाम करू शकतात.

यासाठी Neutral Wrist Position चा उपयोग करावा. यासाठी टायपिंग करत असताना, मोबाइल वापरत असताना किंवा इतर कोणतीही गोष्ट हॅंडल करत असताना, आपले मनगट हे तटस्थ आणि सरळ अशा स्थिति मध्ये असले पाहिजे. यामुळे median nerve वर येणारा ताण कमी होतो आणि त्यावर दाब आणि मुंग्या येण्याचा धोका देखील कमी होतो.

hatala  mungya yene vyayam upchaar

जर्नल ऑफ अप्लाइड एर्गोनॉमिक्समध्ये (Journal of Applied Ergonomics) प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की एर्गोनॉमिक ऍडजस्टमेंट्स, जसे की मनगटाचा आधार वापरणे आणि योग्य कोनात कीबोर्ड लावणे, कार्पल टनल सिंड्रोमशी संबंधित अस्वस्थता आणि हाताला मुंग्या येणे या संवेदना लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.

B. स्नायूंना आधार (Muscle Support and Nerve Protection)

हात आणि मनगटाच्या आजूबाजूच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी व्यायाम करावा. यामुळे मज्जा तंतु यांना आधार मिळतो.

जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक अँड स्पोर्ट्स फिजिकल थेरपीमध्ये (Journal of Orthopedic and Sports Therapy) प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे सूचित केले आहे की हात आणि मनगटाचे व्यायाम पकड मजबूत करू शकतात आणि मज्जातंतूंच्या कम्प्रेशनची (nerve compression) लक्षणे कमी करू शकतात, ज्यामुळे हाताला मुंग्या येणे अशी लक्षणे कमी होतात.

हाताला मुंग्या येण्यावर रामबाण उपचार
  • यासाठी हातांची घट्ट मूठ करून नंतर हाताला मोकळे सोडणे असे वारंवार करा.
  • त्याचसोबत हातांची बोटे ताणणे (finger stretching) आणि हाताची मनगटे गोल गोल पद्धतीने फिरवणे असे काही व्यायाम ही करू शकता.

यामुळे स्नायू मजबूत होतात, त्यात बॅलेन्स येते आणि मज्जा तंतु यांवर देखील दबाव कमी होतो.

C. आहार

मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी विशिष्ट जीवनसत्वे (vitamins) आणि पोषक आहार हे दोन अत्यंत महत्वाचे घटक आहेत. तज्ञ सांगतात की शरीरावर कुठल्याही भागावर येणाऱ्या मुंग्या घालवण्यासाठी जीवनसत्वे आणि पोषक आहार महत्वाची भूमिका बजावतात.

जर्नल ऑफ न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी आणि मानसोपचार मध्ये प्रकाशित झालेले संशोधन असे सूचित करते की व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) कमतरतेमुळे मज्जातंतूंचे नुकसान आणि न्यूरोपॅथी होऊ शकते, ज्यामुळे मुंग्या येणे अशी लक्षणे जाणवतात.

संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने, शेंगदाणे आणि पालेभाज्या यांसारख्या ब जीवनसत्त्वांनी भरपूर अशा संतुलित आहाराचा समावेश केल्याने मज्जातंतूंच्या विकासासाठी आवश्यक पोषक घटक मिळू शकतात.

तर हे काही जीवनशैलीत करायचे बदल जर तुम्ही अमलात आणले तर तुम्हाला हाताला मुंग्या येणे या समस्या पासून नक्कीच आराम मिळेल.

३. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार

हाताला मुंग्या येण्यावर रामबाण उपचार औषधोपचार म्हणजे काही औषध देखील महत्वाची भूमिका बजावतात. विशेषता जेव्हा हाताला मुंग्या येण्याचे कारण हे मज्जातंतु संबंधित असेल. ही औषधे मज्जातंतु यांना आराम देतात आणि मज्जातंतु संबंधित अनेक पैलू वर काम करून त्यांचे कार्य सुधारतात.

हाताला मुंग्या येणे औषधी उपचार

ही औषधोपचार तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची आहेत म्हणून याबद्दल फक्त एक संक्षिप्त माहिती बघूया.

A. दाह शामक (Pain killers)

वेदना कमी करणारे, जसे की नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs) आणि अॅसिटामिनोफेन (Acetaminophen), अनेकदा हाताला मुंग्या येण्याशी संबंधित अस्वस्थता कमी करण्यासाठी दिले जातात.

ही पेन किलर्स सरळ मज्जातंतु संबंधित समस्या पासून आराम देऊ शकत नाही पण मुंग्या येण्याच्या संवेदना तुमच्या मेंदुपर्यंत पोचण्यापासून थांबवण्याचे काम नक्कीच करू शकतात.

जर्नल ऑफ पेन रिसर्चमध्ये याबद्दल एक संशोधन प्रकाशित झाले होते. त्यामध्ये असा दावा आहे की नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स neuropathy संबंधित काही लक्षण कमी करण्यास मदत करू शकतात ज्यामध्ये हाताला मुंग्या येणे, पायाला मुंग्या अशा तक्रारी सुद्धा असू शकतात.

पण यासाठी तुम्ही या औषधांचा अतिवापर करणार नाहीत याची विशेष खबरदारी घ्यावी लागते.

B. अँटीकॉन्व्हल्संट्स (Anticonvulsants)

अपस्मार, मिरगी किंवा झटके येणे यासाठी जी औषधे वापरली जातात त्यामध्ये अँटीकॉन्व्हल्संट्स वर्गाचे काही औषधे असतात. हीच औषधे न्यूरोपॅथिक वेदना, मुंग्या येणे अशा लक्षणांवर सुद्धा प्रभावी आहेत. ही औषधे मज्जातंतु (nerve membrane) चे जे आवरण असते त्याला स्थिर करून मुंग्या येण्याच्या संवेदनांना neutral करते.

याच अँटीकॉन्व्हल्संट्स वर्गामधील असणारे प्रीगाबालिन (Pregabalin) नावाचे एक औषध हे हाताच्या मुंग्या आणि neuropathic वेदना कमी करण्यासाठी एक प्रसिद्ध औषध आहे.

जर्नल ऑफ न्यूरोलॉजीमध्ये (Journal of Neurology) मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात, प्रीगाबालिनचा न्यूरोपॅथीची लक्षणे कमी करण्यावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो, ज्यामुळे हाताला मुंग्या येत असलेल्या व्यक्तींसाठी हा पर्याय उपयोगी ठरतो.

C. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसस (Tricyclic Antidepressants)

ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स औषधी जसे की अमिट्रिप्टाइलीन (amitriptyline) आणि नॉर्ट्रिप्टिलाइन (Nortriptyline) बहुतेकदा मुंग्या येणे, न्यूरोपॅथिक वेदनांसह दीर्घकालीन वेदना कमी करण्यासाठी दिली जातात. ही औषधे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरवर प्रभाव पाडतात, ज्यामुळे वेदनांचे signals मेदुपर्यंत जात नाहीत आणि आराम मिळतो.

युरोपियन जर्नल ऑफ न्यूरोलॉजी (European Journal of Neurology) मध्ये प्रकाशित झालेले अभ्यास असे सुचवतात की ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसेंट्स प्रभावीपणे मुंग्या येण्याच्या संवेदना कमी करू शकतात आणि संपूर्ण मज्जातंतू चे कार्य सुधारू शकतात.

तरी पण, त्यांचा वापर काही दुष्परिणाम सोबत घेऊन येऊ शकतो जसे की तोंड आणि घसा कोरडा पडणे, झोप लागणे वगैरे.

हाताला येणाऱ्या मुंग्या घालवण्यासाठी औषधोपचार घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. या मध्ये तुमचा आजार, लक्षणे, तुमचे वय आणि अशी इतर बरेच घटक लक्षात घेऊन त्याचे निदान आणि त्यावर उपचार केले जातात.

हाताला मुंग्या येण्याचे कारणे

जेव्हा तुमच्या हाताकडून मेंदूकडे सिग्नलस वहन करणाऱ्या नसांना म्हणजे मज्जातंतु यांना इजा पोचते, त्यांना नुकसान पोचते किंवा त्यांवर काही प्रकारचा दाब येतो तेव्हा आपल्याला हाताला मुंग्या आल्यासारख्या जाणवत असतात.

आता कोणत्या कोणत्या परिस्थिति मध्ये या नसांना नुकसान होऊ शकते ते बघूया.

१. कार्पल टनल सिंड्रोम (Carpel Tunnel Syndrome)

कार्पल टनल सिंड्रोम या आजारात हाताची बोटे आणि मनगट प्रभावित होतात.

या आजारात median nerve नावाची नस compressed होते. ज्यामुळे मुंग्या येणे आणि हात आणि बोटांना वेदना होणे अशी लक्षणे जाणवतात. ही median nerve मनगट वर कार्पल टनल नावाच्या भागातून जात असते.

यामुळे या नसवर दाब आला असता हात, बोटांना मुंग्या येणे आणि तिथे वेदना होणे अशी लक्षणे दिसतात.

२. मधुमेह (Diabetes)

अनियंत्रित मधुमेह काही मज्जा तंतु यांना क्षतिग्रत करतो आणि त्यांचे नुकसान करत असतो. त्यामुळे या आजारात सुद्धा हातांपायांना मुंग्या येण्यासारखे लक्षणे जाणवू शकतात.

३. खराब पोश्चर

खराब पोश्चर ठेवणे जसे की टायपिंग आणि मोबाइल वापरत असताना चुकीच्या मनगटाच्या हालचाली, यामुळे तेथील नस दबून हाताला मुंग्या येऊ शकतात.

४. दीर्घ हालचाली

दीर्घ हालचाली म्हणजे वाद्य वाजवणे, टायपिंग करणे किंवा इतर हालचाली ज्यामध्ये मनगटाचा वापर अधिक होतो, जर दीर्घ काळासाठी चालू ठेवल्या तर मज्जातंतु compressed होऊ शकतात. यामुळे मुंग्या येणे वगैरे लक्षणे जाणवू शकतात.

५. इतर आजार

इतर आजार जसे की herniated disc, bulging disc यामुळे तेथील नसा दाबून मुंग्या येण्यासारखे लक्षण जाणवू शकतात.

डाव्या हाताला मुंग्या येणे किंवा उजव्या हाताला मुंग्या येणे

तुमच्या हाताला मुंग्या येत असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याची रचना, त्यासाठी कारणे आणि इतर संबंधित माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. जी तुम्ही बघितली आहे.

आता बऱ्याच जणांना फक्त एकच हाताला मुंग्या येत असेल. डाव्या हाताला किंवा उजव्या हाताला. आता इथे कोणत्या हाताला मुंग्या येतात हे महत्वाचे नसून तुमच्या कोणत्या का होईना एक बाजूच्या हाताला मुंग्या येतात हे महत्वाचे आहे. कारण तुमच्या उजवी हाताला मुंग्या येत असतील किंवा डाव्या हाताला मुंग्या येत असतील त्यासाठी कारणे आणि उपचार एकच आहे.

याचे महत्वाचे कारण म्हणजे आपल्या दोन्ही बाजूच्या अवयवांना समान रचना जोडतात, सामान रक्तपुरवठा होतो आणि समान मज्जासंस्था शी त्या जोडलेल्या असतात. म्हणजे डाव्या बाजूच्या हाताचे दुखणे किंवा मुंग्या येणे यासाठी जे कारण आहे टेक कारण उजव्या हाताच्या दुखण्यासाठी आणि मुंग्या येण्यासाठी कारण ठरत असते.

याचमुळे वरील हाताला मुंग्या येण्याचे जे कारण आहे टेक तुमच्या डाव्या किंवा उजव्या हाताला मुंग्या येण्यासाठी सुद्धा जबाबदार ठरते.

शेवट

हाताला मुंग्या येणे ही काही वेळा सामान्य बाब असू शकते तर काही याला गांभीर्याने घेण्याची गरज पडू शकते. यामध्ये तुम्हाला हाताला मुंग्या येण्याचे कारणे व्यवस्थित माहिती असेल तर त्या विषयी तुमचा दृष्टिकोण योग्य असू शकेल. कारं त्यानुसारच पुढील निदान आणि उपचार ठरवले जातात.

पण हाताला मुंग्या येण्याचे कारण सामान्य असो की गंभीर त्यासाठी वरील सांगितलेले घरगुती उपाय तसेच तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल हे त्यामध्ये आराम मिळवून देण्यास नक्कीच मदत करतात.

ब्लॉग वरील माहिती आवडली असेल तर कमेन्ट द्वारे नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ’s

हाताला मुंग्या येणे हे कशाचे लक्षण आहे ?

तुमच्या हाताला मुंग्या येणे हे रक्तपुरवठा संबंधित किंवा मज्जा तंतु संबंधित आजाराचे लक्षण असू शकते.

रात्री संपूर्ण शरीरात मुंग्या येणे हे कशामुळे होते ?

रात्री संपूर्ण शरीरात मुंग्या येण्याचे एक कारण म्हणजे त्यावेळची शारीरिक स्थिति. एकाच वेळेला जेव्हा आपण आपले शरीर जास्त वेळेसाठी एकच पोजिशन वर ठेवतो तेव्हा तिथे होणाऱ्या रक्तप्रवाह साठी अडचण येते. या व्यतिरिक्त दुसरे कारण असू शकते ते म्हणजे मधुमेह,विटामीन B १२ कमतरता तसेच काही माणक्याचे आजार.

हातावर मुंग्या येण्यापासून मुक्त कसे व्हावे ?

हातावर मुंग्या येण्यापासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण माहिती जसे घरगुती उपचार,आयुर्वेदिक उपचार यासाठी वरील मजकूर वाचा.

जेव्हा मी जागे होतो तेव्हा माझे हात सुन्न का होतात ?

जेव्हा तुम्ही जागे होतात त्या आधी दीर्घ काळासाठी झोपेत तुमचे हात एकच पोजिशन ला असतात ज्यामुळे रक्तप्रवाह होण्यास अडचण होते.

हात सुन्न होणे हे कशाचे लक्षण आहे?

हात सुन्न होणे हे diabetes,व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता,कार्पल टनेल सिंड्रोम किंवा कधी कधी पक्षाघात चे लक्षण सुद्धा असू शकतात.

Leave a Comment