HEALTHBUSS

जननी सुरक्षा योजना बद्दल सर्व काही (JSY Yojana in Marathi)

Last updated on December 14th, 2023 at 11:04 am

Contents

जननी सुरक्षा योजना मराठी माहिती,जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र,जननी सुरक्षा योजना मराठी,जननी सुरक्षा योजना इन मराठी,जननी सुरक्षा योजना 2023,जननी सुरक्षा यपजन फोर्म,जननी सुरक्षा योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन (janani suraksha yojana in marathi,jsy scheme in marathi,jsy yojana in marathi,jsy yojna 2023 in marathi)

केंद्र शासन आणि राज्य शासन वारंवार गर्भवती महिला आणि नवजात बालकांसाठी योजना आणत असते. अशा योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना शासन आर्थिक स्वरूपात मदत करत असते. या आर्थिक हाथभारामुळे या महिला प्रसूती वेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करतात. याचमुळे देशांतर्गत आणि त्यामुळे राज्यामध्ये गर्भवती महिलांचे मृत्यू दर आणि गर्भधारणा वेळी उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या यांना आटोक्यात आणण्यासाठी मदत होते.

आज या ब्लॉग मध्ये अशाच एक योजनेची माहिती बघणार आहोत.

या योजेचे नाव जननी सुरक्षा योजना असे आहे. या जननी सुरक्षा योजना आणि त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती इथे बघणार आहोत.

जननी सुरक्षा योजना काय आहे ?

या योजनेमद्धे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहाय्याने प्रसूती काळात तसेच प्रसूती नंतर रोख रक्कम देऊन गर्भवती स्त्रियांना आर्थिक मदत केली जाते

यामध्ये आपण जननी सुरक्षा योजना काय आहे आणि त्याबद्दल इतर माहिती थोडक्यात बघूयात.

योजनेचे नावजननी सुरक्षा योजना
कधी चालू झाली12 एप्रिल 2005 (सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात,प्रामुख्याने LPS ना प्राधान्य देऊन)
कुणी चालू केलीपंतप्रधान
कोण चालवतेभारत सरकार (केंद्र शासन)
लाभार्थी कोणशहरी आणि ग्रामीण भागातील BPL गर्भवती स्त्रिया (वय 19 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक)
हेल्पलाइन नंबर1800-11-6555
वेबसाइटhttps://nrhm.maharashtra.gov.in/schjsy.htm
*वेबसाइट क्लिक होत नसेल तर कृपया कॉपी पेस्ट करून क्लिक करा.

जननी सुरक्षा योजना कधी सुरू झाली ?

जननी सुरक्षा योजना 12 एप्रिल 2005 रोजी सुरू झाली. ही योजना तेव्हाचे भारताचे प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी सुरू केली होती.

जननी सुरक्षा योजना कोणी सुरू केली ?

वर्ष 2005 साली केंद्र सरकारने जननी सुरक्षा योजना सुरू केली. तेव्हाचे प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंह यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात झाली. तेव्हा भारताच्या केंद्र सरकार द्वारा प्रायोजित हा कार्यक्रम आहे.

जननी सुरक्षा योजनेसाठी कोण पात्र आहे ?

जननी सुरक्षा योजनेंतर्गत कोण लाभार्थी ठरू शकतात याची माहिती बघू.

महत्वाची अट- गर्भवती महिला (शहरी आणि ग्रामीण भाग )

  • वय 19 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • BPL धारक असावे (दारिद्र्य रेषा खालील)
  • महिलाचे 2 जीवंत बाळंतपण असावे (2 live births)
  • जननी सुरक्षा योजनेंतर्गत नोंदणी केलेली असावी.
  • कोणत्याही सरकारी संस्थामध्ये किंवा निवडक खाजगी हॉस्पिटल्स मध्ये प्रसूती झालेली असणे आवश्यक.

हे पण वाचा-मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते?

यामध्ये अजून सविस्तर विभागणी करायची झाल्यास ती अशी होईल.

LPS (Low Performing States)सर्व महिला (शासकीय आरोग्य केंद्रात प्रसूती होणे आवश्यक)
HPS (High Performing States) सर्व बीपीएल/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) महिला (सरकारी आरोग्य केंद्रात प्रसूती होणे आवश्यक)
*LPS (लो परफॉरमिंग स्टेट्स)- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, राजस्थान, ओडिशा आणि आसाम आणि जम्मू आणि काश्मीर.

*HPS (हाय परफॉरमिंग स्टेट्स)- उर्वरित राज्य.

जननी सुरक्षा योजनेंतर्गत किती रक्कम दिली जाते

ज्या गर्भवती महिला जननी सुरक्षा योजना अंतर्गत पात्र होतात,अशा महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत असते. ही रक्कम या योजनेचा लाभ म्हणून मिळत असते.

वेगवेगळ्या वर्गवारीनुसार या गर्भवती स्त्रियांना वेगवेगळी रक्कम दिली जाते. या संबंधीची माहिती आपण सोपी करून बघू.

कोणत्या राज्यात ग्रामीण भागात शहरी भागात
LPSआईसाठी (शासकीय आरोग्य केंद्रात प्रसूती होणे आवश्यक) -1400 रु
आशांना – 600 रु
आईसाठी -1000 रु
आशांना -400 रु
HPSआईसाठी (सर्व बीपीएल/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) महिला,सरकारी आरोग्य केंद्रात प्रसूती होणे आवश्यक))-700 रु
आशांना-600 रु
आईसाठी-600 रु
आशांना-400 रु

जननी सुरक्षा योजेनचे इतर लाभ

  • जननी सुरक्षा योजनेंतर्गत पात्र गर्भवती महिलांना प्रसूतिपूर्व तीन तपासण्या आणि आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती चा लाभ मिळतो.
  • आशा कामगारांना प्रोत्साहन भत्ते दिले जातात.
  • सी-सेक्शन प्रसूतीसाठी, सरकारी तज्ञ डॉक्टर उपस्थित नसल्यास खाजगी डॉक्टर साठी 1500 रु प्रती गर्भवती महिला भत्ता दिला जातो.
  • कुटुंब कल्याण योजनेनुसार लभार्थीला जर ट्यूबेक्टॉमी किंवा लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेची शिफारस केली गेली तर त्यासाठी भरपाई देखील या योजनेंतर्गत दिली जाते.

जननी सुरक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (डॉक्युमेंट्स)

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड किंवा इतर )
  • बँक पासबूक झेरॉक्स
  • 1 पासपोर्ट साइज फोटो
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • जननी सुरक्षा योजना कार्ड (आपल्या जवळच्या कोणत्या सरकारी दवाखान्यात तुमच्या नोंदणी वेळी दिले जाते)
  • प्रसूती प्रमाणपत्र (डिलीवरी सर्टिफिकेट)

जननी सुरक्षा योजनेचा उद्देश काय आहे?

  • सर्व माता आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
  • ग्रामीण भागात तसेच शहरी भागात संस्थात्मक प्रसूती ला प्रवृत्त करणे.
  • विशेष करून आदिवासी भागात होणारे माताबाल मृत्यू प्रमाण कमी करणे.

जननी सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • जननी सुरक्षा योजना ही भारतभर लागू होते. म्हणजे देशातील कोणत्या ही राज्यात आणि राज्यातल्या कोणत्याही सरकारी दवाखान्यात तसेच निवडक खाजगी दवाखान्यात ही योजना लागू आहे.
  • जननी सुरक्षा योजनेची अंमलबाजवणी ही राज्याच्या वर्गीकरणानुसार केली जाते. जसे HPS आणि LPS. याची सविस्तर ,माहिती वर दिलेली आहे.
  • पायाभूत आरोग्य सुविधा नसलेल्या भागातील महिलांना देखील लाभ मिळावा यासाठी काही निवडक खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि दवाखाने सुद्धा या योजनेंतर्गत येतात.
  • या पूर्ण योजनेची अमलबजावणी करिता देखील केंद्राने निधीची तरतूद केलेली आहे. यासाठी 7 टक्के निधी राज्य सरकार आणि 4 टक्के निधी जिल्हाधिकाऱ्यांसाठी आहे. या निधीचा उपयोग या योजनेच्या प्रशासकीय कामांसाठी केला जातो.

FAQ’s

1. जननी सुरक्षा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता का ?

हो नक्कीच,यासाठी official वेबसाइट वर जाऊन फोर्म भरा ऑनलाइन जननी सुरक्षा योजना फोर्म

2. जननी सुरक्षा योजनेची फोर्म चे ऑनलाइन स्टेटस कसे बघावे ?

या संबंधीची माहिती आपण जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियान या वेबसाइट ला भेट देऊन बघावी.

3. 2023 मध्ये JSY ची रक्कम किती आहे ?

2023 मध्ये मिळणारी रक्कम ही पाहिल्याप्रमानेच आहे.

4. जननी सुरक्षा योजनेचा फायदा काय?

या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना प्रसूती काळात शासनाकडून 1000 रु ते 2000 रु एवढे अर्थसाहाय्य मिळते. या संबंधीची सविस्तर माहिती मी वर दिलेली आहे.

5. राष्ट्रीय आरोग्य अभियानात दिलेल्या जननी सुरक्षा योजना JSY ची महत्वाची वैशिष्ठ्य कोणती आहेत?

या योजनेची वैशिष्ठ्ये म्हणजे योजना ही भारतभर लागू होते,अंमलबाजवणी ही राज्याच्या वर्गीकरणानुसार केली जाते आणि काही निवडक खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि दवाखाने सुद्धा या योजनेंतर्गत येतात.

Leave a Comment