HEALTHBUSS

काय आहेत उचकी लागण्याची कारणे ? | Top Reasons for Hiccups

Last updated on May 14th, 2024 at 03:06 pm

सतत उचकी लागणे हे काही लोकांना खूप त्रासदायक ठरू शकते. पण उचकी लागण्याचे कारणे (Reasons for Hiccups) कोणती आहेत आणि उचकी का लागते या दोन गोष्टींची माहिती असेल तर तुम्ही नक्कीच सतत लागत असलेल्या उचकीबद्दल आराम मिळवू शकता.

तर आपण आता बघूया उचकी लागण्याची कारणे आणि उचकी का लागते याबद्दल थोडक्यात, पण तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत माहिती.

उचकी लागण्याची कारणे बरीच असू शकतात. हे सर्व कारण घडत असताना वेगवेगळे घटक ही यासाठी कारणीभूत असू शकतात. याच कारणांची आणि त्या संबंधित इतर घटकांची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत.

पण मला वाटते खालील सर्व कारणे समजून येण्यासाठी तुम्हाला आधी उचकी का लागते आणि उचकी लागण्याची प्रक्रिया हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

उचकी का लागते ?

उचकी साठी कोणतेही कारण असो, ते कारण घडण्यापासून ते उचकी निर्माण होईपर्यंत diaphragm महत्वाची भूमिका बाजवते. Diaphragm काय आहे आणि उचकी लागेपर्यंत कोणती क्रिया घडते ते बघूया.

उचकी लागण्यासाठी कारणीभूत रचना
  • Diaphragm हा एक मोठा स्नायू आहे जो छातीच्या पोकळीला उदर पोकळीपासून वेगळा करतो. हा स्नायू श्वास घेणे आणि सोडण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतो.
  • उत्तेजन– सर्वात आधी खालील पैकी कोणत्याही कारणामुळे हा स्नायू उत्तेजित होतो. ते कारण कोणतेही असू शकते.
  • Reflex– diaphragm उत्तेजित झाल्यावर एक reflex response सक्रिय होतो. या यामध्ये diaphragm च्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या phrenic nerve आणि vagus nerve पण सहभागी होतात.
  • आकुंचन– जेव्हा हा reflex सक्रिय होतो तेव्हा diaphragm मध्ये अचानक अनैच्छिक आकुंचन (contraction) निर्माण होते. हे आकुंचन एवढे स्ट्रॉंग असते की पोटातील हवा वरती फफ्फुसात फेकल्या जाते.
  • Glottis बंद– स्वरयंत्राचा एक भाग म्हणजे glottis, फफ्फुसातील हवा बाहेर जाऊ नये म्हणून त्वरित बंद होते. हे glottis बंद होताना “हिक” असा आवाज येतो. त्यालाच आपण उचकी म्हणतो.

अशा पद्धतीने आपल्या शरीरात उचकी लागण्यासाठी प्रक्रिया घडत असते.

१. पाचन संबंधित उचकी लागण्याचे कारणे

१. जास्त खाणे

उचकी लागण्याची कारणे याबद्दल बोलताना हा घटक सोडला तर चुकीचे ठरेल.

जास्त प्रमाणात खाणे किंवा भुकेपेक्षा जास्त खाणे हे उचकी लागण्याचे एक सामान्य कारण आहे. बऱ्याच लोकांना हे माहीत असेलही. या धावपळीच्या आयुष्यात आणि मोबाइल बघून जेवण करणे, जेवत असताना इतर गोष्टी करत राहणे यामुळे आपण कधी कळत तर कधी नकळतपणे मोठे घास घेतो आणि पोट भरले तरी त्याकडे लक्ष न देता आपण जेवण चालूच ठेवतो.

आपण गरजेपेक्षा जास्त किंवा अधिकचे जेवल्यावर आपले पोट पसरते आणि ताणले जाते. या अशा परिस्थिति मध्ये पचन संबंधी इतर अवयवांची आंतरिक जागा बिघडते. याचाच एक भाग म्हणून diaphragm स्नायू जी आपल्या दोन्ही फफ्फुस यांच्या खाली असते ते involuntary पद्धतीने आकुंचन पावते. यामुळे तुम्हाला उचकी लागते.

२. लवकर लवकर खाणे

अत्यंत चुकीच्या अशा घाई मध्ये जेवण करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते. काही लोक नेहमी जेवत असताना कोणत्या तरी घाई मध्ये असतातच आणि यामुळे पट पट घास तोंडात टाकतात.

असे घाई मध्ये जेवल्यावर आणि जेव्हा आपण पटपट जेवतो तेव्हा घेतलेल्या घासाबरोबर आपण नकळत बाहेरील हवा (gas) सुद्धा पोटात घेतो.

संबंधित वाचा-पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी उपाय

पोटात घेतलेली ही हवा पोटात अडकून diaphragm वर दबाव आणते आणि उचकी लागते.

३. GERD

अॅसिडिटी

GERD म्हणजे Gastro Esophageal Reflux Disorder. हा एक पचन संबंधी आजार आहे. यामध्ये तुम्हाला acidity, जळजळ होणे आणि इतर लक्षणे दिसतात. या आजारात पचन प्रक्रियेचा एक भाग म्हणून जेव्हा पोटात अॅसिड तयार होते तेव्हा काही कारणामुळे ते अॅसिड तुमच्या अन्न नलिकेमध्ये वरच्या दिशेने ढकलले जाते.

या परिस्थिति मध्ये तुम्हाला छातीमद्धे जळजळ होणे वगैरे सारख्या समस्या जाणवतात.

तसेच हे अॅसिड diaphragm ठिकाणी जावून जळजळ करते ज्यामुळे तुम्हाला उचकी लागू शकते. GERD असलेल्या व्यक्तींना जास्त वेळा उचकी लागू शकते. विशेषता जेवण झाल्यावर उचकी येण्याची समस्या या व्यक्तींमधे जास्त असते.

४. Carbonated शीत पेय

Carbonated पेय म्हणजे कोल्ड ड्रिंक्स. या कोल्ड ड्रिंक्स मध्ये तुम्ही उन्हाळ्यात जेवढे Coldrinks घेतात तेवढ्या प्रकारचे शीतपेय येतात.

या शीत पेय मध्ये कार्बन या गॅसचा समावेश असतो. हा कार्बन गॅस पोटात गेल्यावर हवा निर्माण करतो ज्यामुळे उचकी लागत असते. तसेच आपण ज्यूस वगैरे थंड पेय पित असताना जो straw वापरतो, त्या straw द्वारे देखील हवा पोटात जाऊन उचकी लागते असते.

५. मसालेदार किंवा गरम पदार्थ

उचकी लागण्याची कारणे समजून घेत असताना मसालेदार किंवा तिखट आणि गरम पदार्थ हे सर्वाधिक कारण ठरणारे घटक आहेत.

बऱ्याच लोकांना मसालेदार किंवा तिखट आणि गरम खाणे आवडते. या मसालेदार आणि गरम अन्न पदार्थ जेव्हा पोटात जातात तेव्हा पोटाच्या layers च्या संपर्कात येतात आणि तिथे उत्तेजन करून irritation निर्माण करतात.

या irritation चा परिणाम diaphragm वर होतो ज्यामुळे उचकी लागते.

२. मज्जा संस्था (NERVOUS SYSTEM) संबंधित उचकी लागण्याची कारणे

१. फ्रेनिक नस (Phrenic nerve)

उचकी लागण्याची कारणे

Phrenic nerve ही diaphragm ची हालचाल नियंत्रित करते. जेव्हा या नर्व ला काही कारणामुळे धक्का लागला, उत्तेजित होते किंवा क्षती पोचते तेव्हा याचा परिणाम diaphragm च्या हालचालींवर होतो.

या घटनेमुळे diaphragm आकुंचन पावते आणि उचकी लागू शकते. मोठ्याने बोलणे, पटपट जेवण करणे तसेच इतर काही कारणामुळे ही फ्रेनिक नर्व उत्तेजित होते.

२. केंद्रीय मज्जा संस्था

केंद्रीय मज्जा संस्था किंवा central nervous system एक प्रकारे उचकी उत्पन्न करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. काही आजार जसे की multiple sclerosis यामध्ये मेंदुवर परिणाम झाल्यास किंवा मेंदूला झालेली दुखापत झाल्यास, मेंदूचे ट्यूमर यामुळे ब्रेनस्टेम चे कार्य बिघडते.

ब्रेनस्टेम हा एक मेंदूचा भाग असतो. मेंदू मध्ये असणाऱ्या या भागाचे काम म्हणजे श्वास आणि diaphragm हालचाल या गोष्टींचे नियमन आणि नियंत्रण करणे. त्यामुळे या भागाला क्षती झाल्यास diaphragm आणि श्वास गतीवर परिणाम होऊन उचकी लागण्याची शक्यता असते.

३. स्ट्रोक

स्ट्रोक ह्याला आपण अर्धांगवायू किंवा पक्षाघात म्हणतो. या स्ट्रोक मुळे सुद्धा उचकी लागण्याची समस्या होऊ शकते. स्ट्रोक दोन प्रकारचे असतात एक म्हणजे इस्केमिक स्ट्रोक (ischemic stroke) आणि दूसरा म्हणजे रक्तस्रावी स्ट्रोक (hemorrhagic stroke).

जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे तेथील भागाला क्षती होते तेव्हा इस्केमिक स्ट्रोक आहे असे म्हणतो.

जेव्हा काही कारणामुळे मेंदुमद्धे रक्त धमन्यांच्या बाहेर येऊन मेंदूच्या एखाद्या भागामध्ये साचते म्हणजे त्या ठिकाणी ब्लीडिंग (रक्तस्त्राव) होते तेव्हा त्याला hemorrhagic स्ट्रोक म्हणतात.

दोन्ही परिस्थिति मध्ये मेंदूच्या काही विशिष्ठ भागाला इजा होते आणि त्या भागातील कार्य बिघडते.

यामुळे श्वसन आणि diaphragm हालचाल यांचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूच्या भागात क्षती झाल्यास त्यांचे जे श्वसन आणि diaphragm च्या हालचालींचे कार्य आहे त्यामध्ये व्यत्यय येतो. ज्यामुळे उचकी लागण्याची सुद्धा शक्यता असते.

४. औषधी

काही औषधी तुमच्या मज्जा संस्थेवर परिणाम करून उचकी उत्पन्न करू शकतात. तसेच काही औषधांचे दुष्परिणाम किंवासाइड इफेक्ट म्हणून ही तुम्हाला उचकी लागते.

उदाहरण, एनेस्थीशिया म्हणजेच भूल देण्यासाठी आणि केमोथेरेपी करण्यासाठी वापरण्यात येणारी काही औषधी मज्जा संस्थेच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतात ज्यामुळे उचकी लागण्याची प्रक्रिया घडू शकते.

३. तापमान

उचकी लागण्याची कारणे तापमानच्या बाबतीत जरा वेगळी आहे.

तुमच्या शरीरात अचानक होणारा तापमान बदल उचकी निर्माण करण्यासाठी परिस्थिति निर्माण करतो.

तुम्ही जेव्हा अति थंड किंवा जास्त गरम पदार्थ सेवन किंवा पेय सेवन करता तेव्हा शरीरातील तापमान देखील बदलायला सुरुवात होते.

हा तापमान बदल अनेक गोष्टींना चालना देऊ शकतो आणि उचकी निर्माण करतो.

  • शरीरातील बदललेले तापमान तोंड, घसा आणि पचन संस्थेतील इतर नसांना उत्तेजित करतात. या उत्तेजित नसा मेंदूला सिग्नल पोचवतात. परिणामी मेंदू diaphragm च्या हालचाल यावर परिणाम घडवून आणतो.
  • अचानक झालेल्या शरीरातील तापमानातील बदल या घटनेला मेंदू संभाव्य धोका म्हणून ओळखतो आणि हा धोका परतवून लावण्यासाठी प्रतिसाद म्हणून diaphragm हालचालींवर परिणाम करून उचकी निर्माण करतो.
  • Diaphragm हा एक प्रकारचा स्नायू असल्यामुळे अचानक थंड पदार्थ किंवा पेय यांच्याशी संबंध आल्यास muscle spasm म्हणजे diaphragm चे आकुंचन होते. यामुळे तुम्हाला उचकी लागते.
  • Phrenic nerve अचानक झालेला तापमान बदल ओळखून उत्तेजित होऊ शकते आणि diaphragm च्या हालचालींवर परिणाम होतो.

४. दारू

मद्य सेवन केल्यामुळे उचकी कशी लागू शकते याबद्दल ची शास्त्रीय कारणे अजून समोर आलेली नसली तरी शास्त्रज्ञ काही गोष्टींचा खुलासा करतात. मद्य सेवन तुम्हाला उचकी लागण्यासाठी कसे जबाबदार असू शकते याबद्दल तर्क लावला जातो.

१. फ्रेनिक नर्व

या आधी आपण phrenic nerve या संबंधी माहिती बघितली आहे. दारू प्यायल्यामुळे दारुतील alcohol घटक या फ्रेनिक नर्व ला उत्तेजित करते .

२. GERD

याबद्दल सुद्धा आपण माहिती बघितली आहे. अल्कोहोल relaxation चे काम करते. या अल्कोहोल मुळे अन्न नालिकेचा शेवटचा भाग म्हणजे esophageal sphincter जे की एक स्नायू आहे ते relax होते आणि त्यामुळे तेथील जमा अॅसिड हे वरच्या दिशेला ढकलले जाते.

GERD मुळे diaphragm ठिकाणी हालचाल बदलल्यामुळे उचकी लागते.

३. निर्जलीकरण (filtration)

अल्कोहोल मुळे पाण्याचे filtration होऊन लघवी तयार होण्याचे प्रमाण अधिक गतीने वाढते आणि लगवी तयार होण्याचे प्रमाण वाढते. ही लघवी तयार होत असताना electrolytes चे देवाण घेवाण चालू असते. ही electrolytes मेंदूला काही सिग्नलस पाठवण्यासाठी कामी येतात.

या electrolytes चे कमी अधिक प्रमाण झाल्यास त्याचा परिणाम मेंदूच्या कार्य क्षमतेवर होऊन diaphragm च्या हालचालींवर देखील परिणाम होतो.

४. पोट फुगणे

अधिक दारू सेवन केल्याने पोट फुगते ज्याला abdominal distention म्हणतात. या पोटाच्या फुगण्यामुळे diaphragm वरती दबाव येऊन त्याची हालचाल बदलून उचकी लागते.

उचकी लागण्याची कारणे ही सामान्य जरी असलीत तरी काही वेळा यासाठी गंभीर कारण ही असू शकते.

तेव्हा जास्त वेळेसाठी सतत उचकी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

FAQ’s

वारंवार उचकी येणे हे कशाचे लक्षण आहे का ?

वारंवार उचकी येणे हे अनेक गोष्टींचे लक्षण असू शकते. असा त्रास तुम्हाला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उचकी थांबत नसेल तर काय करावे ?

उचकी साठी कारणे हे सामान्य असू शकतात पण काही वेळेला कारणे गंभीर असू शकतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हिचकी चांगली की वाईट ?

उचकी चांगली ही नाही वाईट देखील नाही. सामान्य जरी असेल तरी काही वेळा मोठ्या आजारचे लक्षण असू शकते.

हिचकी सतत का येतात ?

हीचकी सतत येणे ही सामान्य बाब आहे. पण जास्त दिवसासाठी असेल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

साखर हिचकी का थांबवते ?

साखर हीचकी थांबवते कारण साखर डायफ्रामला आराम देते. डायफ्राम विषयी अधिक माहितीसाठी पूर्ण ब्लॉग वाचा.

Leave a Comment