HEALTHBUSS

शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ कोणते आहेत ? | Sharirat Ushnata Vadhavnare Padarth

Last updated on January 1st, 2024 at 10:40 pm

(शरीरात पित्त वाढवणारे पदार्थ, अंगावर पित्त येणे, पोटात आग कशामुळे होते, पोटात आग का पडते, पोटात आग होण्याची कारणे. sharirat ushnata, shariratil ushnata, potat aag hone karan, potat aag ka padte)

अनेक लोकांना उष्णतेचा त्रास हा सामान्य आरोग्य समस्या होऊन जाते. एवढी सामान्य की त्यांना हा दैनंदिन आयुष्याचा एक भाग वाटू लागतो. शरीरात ही उष्णता निर्माण होण्यास काही कारणे असतात आणि त्यापैकीच एक कारण, ती म्हणजे उष्णता निर्माण करणारे काही पदार्थ.

तसे शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ खूप आहेत. पण काही पदार्थ जे खूप सामान्य आहेत आणि कळत किंवा नकळत आपण ते रोज वापरतो त्यांच्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

याच पदार्थांमुळे शरीरात उष्णता निर्माण होत असते.

आता मला वाटते काही लोक शरीरात उष्णता या संकल्पनेला दोन पद्धतीने बघत असतात.

आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार उष्णता म्हणजे शरीराचे तापमान. ज्याला बॉडी टेम्परेचर म्हणूयात. ज्यामध्ये शरीराचे तापमान वाढून आपल्याला ताप आल्यासारखे वाटते.

आणि दूसरा अर्थ म्हणजे आपण सामान्यपणे जेव्हा पित्ताचा त्रास, पोटदुखी, उलटी, मळमळ किंवा डोकेदुखी होते तेव्हा उष्णता वाढली असे म्हणतो.

तेव्हा या ब्लॉग मध्ये आपण पित्ताचा त्रास वगैरे वाढवणारी उष्णता याबद्दल माहिती बघणार आहोत.

हे आहेत शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ

१. मसालेदार पदार्थ

 शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ

शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ याबद्दल माहिती बघत असताना मसालेदार पदार्थांना वगळून कसे चालेल.

शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी सर्वात जास्त कारणीभूत घटक म्हणजे मसालेदार पदार्थ. तेच मसालेदार पदार्थ जे आपल्या स्वयंपाकघरात असतात. जे आपण आपल्या जेवणामध्ये वापरतो.

यामध्ये आपण सामान्यपणे दररोज वापरत असलेळे पदार्थ म्हणजेच लाल मिरची पाऊडर, गरम मसाला, दालचीनी, लवंग तसेच हिरव्या मिरची, काश्मिरी मिरची सारख्या बरेच तिखट असणारे पदार्थ आपण वापरत असतो.

  • या सर्व मसाले मध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये एक कॅप्सिकेन (capsaicin) नावाचा घटक असतो जो तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करतो.
  • या कॅप्सिकेन मुळे या पदार्थांना तिखट आणि मसालेदार चव येते. याच मुळे पित्ताचा त्रास तसेच इतर त्वचा विकार उद्भवतात.

हा कॅप्सिकेन पदार्थ आपल्या तोंडातल्या आणि पचनसंस्था दरम्यान पसरलेल्या pain receptors शी जोडला जाऊन ते पुढे मेंदूला संकेत पोचवतात. आता यामध्ये मेंदूला चुकीची माहिती पुरवली जाते.

मेंदूला हे संकेत आपल्याला गरम पदार्थ पोळले किंवा धारधार शस्त्राने चिरले अशा प्रकारच्या अर्थाने पोचतात. त्यामुळे मेंदू याला danger signal समजून त्या अनुषंगाने शरीरात काही बदल घडवायला सुरुवात करतो. त्याच बदलांचा भाग म्हणून आपल्याला घाम येतो, ह्रदयाचे ठोके वाढतात आणि इतर बरेच बदल शरीरात त्या अनुषंगाने घडायला लागतात.

तसेच हे कॅप्सिकेन आपल्या जीभेवर असणाऱ्या Transient Receptor Potential Vanilloid 1 सोबत जोडले जाते ज्यामुळे आपल्यामध्ये तिखट आणि उष्ण संवेदना निर्माण होतात.

पण जर तुम्हाला तिखट आणि मसालेदार जेवण करायची सवय असेल पण हे त्या बाबतीत हे नुकसान ऐकून निराश झाला असाल तर थोडा थांबा. कारण तुमच्या या जेवणाचे काही फायदे देखील आहेत. पण फायदे आहेत म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात हे पदार्थ सेवन करायचे नाहीत. थोडेफार सेवन करत असाल तर हे फायदे तुम्हाला मिळतील. नाहीतर नुकसान जास्त होईल.

२०१५ मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार आठवड्यातून सहा किंवा सात वेळा जर तुम्ही तिखट आहार घेत असाल तर तुमचा मृत्यू दर हा १४ टक्क्याने कमी होतो असे निष्पन्न झाले आहे

हे सुद्धा वाचा –पित्त आणि उष्णता साठी स्वागत तोडकर यांचा घरगुती उपाय

२. तेलकट पदार्थ

 शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ

आपल्या महाराष्ट्रात किंबहुना भारत देशात तेलकट पदार्थ खाणारे लोक जास्त आहेत. जसे की कोणत्याही रस्सा असणाऱ्या भाजीमध्ये त्यांना वरुण तर्ही पाहिजे असते.

असो.

पण सतत असे तेलकट जेवण केल्याने देखील तुमच्यामध्ये उष्ण ऊर्जा म्हणजेच उष्णता निर्माण होते आणि पित्त, त्वचा विकार वगैरे आजार उत्पन्न होतात.

या अनुषंगाने तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील.

आपले शरीर हे अनेक गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रियांची एक साखळी आहे. या रासायनिक प्रक्रियेतून अनेक प्रकारच्या ऊर्जा निर्माण होतात. काही प्रकारच्या ऊर्जा शरीरासाठी फायदेशीर असतात तर काही प्रकारच्या ऊर्जा शरीराला नुकसान पोचवतात.

अशीच एक रासायनिक प्रक्रिया म्हणजे अन्नातून ऊर्जा निर्माण करणे. त्याला मेटबॉलिक ऊर्जा म्हणतात.

आपण जे अन्न पदार्थ सेवन करतो, त्याचे प्रत्येक पातळीवर विघटन म्हणजेच digestion होऊन ऊर्जा निर्माण होत असते. ही ऊर्जा आपल्याला काम करायला आणि इतर जैविक प्रक्रिया जसे digestion, respiration वगैरे प्रक्रियांसाठी कामी येते.

हेच तेलकट पदार्थांच्या बाबतीत थोडे वेगळे होते.

  • तेलकट पदार्थांमध्ये fatty acids भरपूर प्रमाणात असते.
  • या fatty acids चे विघटन होऊन यातून ऊर्जा तर निर्माण होते.
  • या fatty acids च्या विघटन प्रक्रियेला lipolysis म्हणतात.
  • या lipolysis प्रक्रिये नंतर सुद्धा या fatty acid ला अनेक रासायनिक प्रक्रिये मधून जावे लागते ज्यामधून भरपूर प्रमाणात ऊर्जा तयार होत असते.

या संपूर्ण रासायनिक प्रक्रियेवेळी उष्णता निर्माण होते. ही उष्णता या प्रक्रियेचा byproduct म्हणून निर्माण होत असते.

पण ही उष्णता मानवी शरीराला हानिकारक असते. यातून आपल्याला पित्त, उलटी, मळमळ आणि अनेक प्रकारचे त्वचा विकार देखील होतात.

३. तळलेले पदार्थ

 शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ

तळलेले पदार्थ हे खायला जेवढे चविष्ट असतात तेवढेच ते आरोग्यासाठी घातक असतात.

तळलेले पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण खूप राहते. त्यामुळे त्यातील fatty acids चे विघटन होऊन उष्णता निर्माण होते.

तसेच यामध्ये पदार्थ तळल्या नंतर आपल्या शरीरात जे तेल जाते ते पचवायला म्हणजेच digestion साठी अधिक ऊर्जा खर्ची पडते. एवढ्या प्रमाणात जर ऊर्जा खर्ची पडत असेल आणि वापरली जात असेल तर त्यातून सहाजिक उष्णता निर्माण होते.

यामध्ये सामान्यता वडे, समोसे, भजे असे पदार्थ आपल्याला महाराष्ट्रात जास्त खाल्ले जाते.

४. अतिगोड पदार्थ

 शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ

यामध्ये फक्त अतिगोड असे ग्राहित न धरता फक्त गोड पदार्थ लक्षात घेतले तरी चालेल. कारण गोड कमी प्रमाणात किंवा कमी गोड असणारे पदार्थ जरी सेवन केले तर कमी अधिक प्रमाणात त्यातून उष्णता निर्माण होऊन आपल्याला त्रास देऊ शकतात.

शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ जर बघितले तर गोड पदार्थ मी म्हणेल की सर्वात जास्त उष्णता निर्माण करतात.

समजून घ्या.

आपल्याला ऊर्जा देण्यासाठी प्रमुख घटक हा ग्लुकोस असतो. हा ग्लुकोस carbohydrate चे विघटन होऊन त्यातून तयार होते.महत्वाचे म्हणजे प्रत्येक गोड पदार्थमध्ये हे carbohydrates असतातच.

  • या carbohydrates चे विघटन होऊन यातून ग्लुकोस निर्माण होते.
  • मग ते ग्लुकोस रक्तात मिसळून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन तिथे ATP-Adenosine triphosphate (एटीपी -एडिनोसिन ट्रायफॉस्फेट) नावाची ऊर्जा निर्माण करतात.

आता या सर्व प्रक्रियामद्धे खूप रासायनिक प्रक्रिया होतात आणि यातून भरपूर प्रमाणात उष्णता देखील निर्माण होते. या सर्व प्रक्रियांमुळे शरीराची मेटबॉलिक प्रोसेस देखील वाढते ज्यामुळे देखील उष्णता निर्माण होते.

दुसरी एक प्रक्रिया यासाठी कारणीभूत ठरते ती म्हणजे इंसुलिन ची.

  • आता एवढे ग्लुकोस रक्तात मिसळल्यावर रक्तातच राहिले तर रक्तातील साखरेचे म्हणजेच ग्लुकोस चे प्रमाण वाढेल.
  • हे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून लिवर मधून इंसुलिन रीलीज होते.
  • हे इंसुलिन मग वेगवेगळ्या पेशी मध्ये रक्तातील ग्लुकोस शोषून घेण्यास प्रवृत्त करते.

ही सर्व प्रक्रिया देखील कॉम्प्लेक्स असते आणि यामुळे शरीराला स्वतःची मेटबॉलिक प्रक्रिया म्हणजेच चयापचय प्रक्रिया वाढवावी लागते.

एकदा शरीराची चयापचय प्रक्रिया वाढली की त्यातून सुद्धा अधिक प्रमाणात उष्णता निर्माण होते.

५. अल्कोहोल

 शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ

अल्कोहोल म्हणजे दारू, वाईन, व्हिस्की किंवा कोणतेही पेय ज्यामध्ये अल्कोहोल हा घटक आहे, यामुळे देखील तुमच्या शरीरात खूप प्रमाणात उष्णता निर्माण होऊ शकते.

अल्कोहोल हा घटक वासोडिलेटर (vasodilator) आहे.

  • म्हणजे तुम्ही जेव्हा दारूचे किंवा अल्कोहोल चे सेवन करता तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या फुगतात.
  • यामुळे रक्तवाहिन्यांची जाडी कमी होऊन आतमधील पोकळी वाढते.
  • आतमधील जागा वाढली की त्यामध्ये अधिक रक्तपुरवठा होतो. ही सर्व प्रक्रिया त्वचेच्या वरच्या भागावर जास्त प्रमाणात होते.
  • यामुळे त्वचेच्या वरच्या भागात जास्त प्रमाणात रक्तपुरवठा होतो. रक्तपुरवठा जास्त झाल्यामुळे तिथे उष्णता निर्माण होऊन त्या संबंधीचा त्रास होतो.

अजून एक कारण म्हणजे अल्कोहोल हे diuretic आहे.

  • म्हणजे अल्कोहोल जास्त प्रमाणात लगवी तयार करणारा घटक आहे.
  • अल्कोहोल मुळे शरीरातील पाण्याचे जलद गतीने फिल्टर होऊन त्यातून जलद आणि अधिक प्रमाणात लगवी तयार व्हायला लागते. यामुळे अल्कोहोल सेवन करणाऱ्या व्यक्तीला सारखे लगवीला जावे लागते.
  • लगवीचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण आपोआपच कमी व्हायला लागते आणि यामुळे dehydration सारखी स्थती निर्माण होते.
  • शरीरात पाणी कमी झाल्यामुळे शरीराचे तापमान वाढते ज्यामुळे उष्णता वाढण्यास सुरुवात होते.

अशा पद्धतीने अल्कोहोल सेवन ने शरीरात उष्णता वाढायला सुरुवात होते.

जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल आणि त्यामुळे पित्त, ताप, मळमळ किंवा त्वचेचे विकार होत असेल तर वरील सर्व शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ तुम्हाला बंद करायचे आहे.

वरील सर्व जे पदार्थ आपण बघितले ते शरीरात उष्णता वेगळ्या पद्धतीने निर्माण करणारे आहेत. ज्याचे विश्लेषण आपल्याला फक्त आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये आढळते.

यानंतर आपण आयुर्वेद नुसार उष्णता म्हणजेच पित्त वाढवणारे तीन पदार्थ बघणार आहोत.

आयुर्वेदनुसार शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ

१. कांदा

आयुर्वेद नुसार कांदा हा उष्ण गुणांचा आहे.

  • हा कांदा शरीरात दाह म्हणजे उष्ण ऊर्जा निर्माण करतो.
  • तसेच कांदा पित्त दोष वाढवून जाठराग्नी वाढवतो.
  • या उष्ण गुणांमुळे शरीरातील पित्त दोष वाढून पित्ताचा त्रास, त्वचेचे विकार हे वारंवार होत राहतात.

२. लसूण

आयुर्वेद नुसार लसूण देखील उष्ण गुणात्मक पदार्थ आहे.

  • लसूण मुळे पंचणसंस्थेवर तीव्र दाह, आग निर्माण होते ज्याने पित्त आणि त्यामुळे उष्णता वाढते.
  • हे लसूण मंद पचन संस्था किंवा अन्नाचे व्यवस्थित पचन न होणऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे.

हे सुद्धा वाचा-पचनक्रिया कशामुळे बिघडते ?

३. अद्रक

अत्यंत उष्ण असणारा अद्रक हा शरीरात अधिक प्रमाणात उष्णता निर्माण करतो.

  • अद्रक देखील उष्ण गुणांचे असते.
  • याच कारणामुळे आपण अद्रक चे सेवन सर्दी, खोकला अशा समस्यांसाठी करत असतो.
  • अद्रक चा उपयोग पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील केला जातो.

वरील तीन पदार्थ हे आयुर्वेद मध्ये उष्णता आणि पित्त वाढवणारे सांगितलेले आहे.

शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे

शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ तुम्ही सतत सेवन केल्यास किंवा काही वेळा तात्काळ त्याचे परिणाम लगेच दिसायला लागतात. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढल्यास तुम्हाला काही लक्षणे दिसायला लागतात.

  • ताप न येता शरीर गरम वाटणे
  • घाम येतो
  • पोटात आग होणे
  • उलटी, मळमळ
  • जुलाब
  • त्वचा लाल होणे
  • चक्कर येणे
  • डोकेदुखी
  • चिडचिड होणे
  • थकवा जाणवणे

शेवटी, शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ खूप आहेत. याचे कारण ही तसेच ठरते. कोणता पदार्थ कोणत्या शरीरात जाऊन उष्णता निर्माण करेल हे त्या व्यक्तीच्या शरीराच्या response म्हणजेच प्रतिक्रियेवर अवलंबून असते. त्यामुळे आपण घेत असलेला आहार आणि त्या अनुषंगाने शरीरात उत्पन्न प्रतिक्रिया म्हणजे फायदे की नुकसान याची माहिती ठेवून आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे केव्हा ही चांगले.

दिलेली माहिती आवडली असेल तर कमेन्ट द्वारे कळवा. तसेच काही अभिप्राय असेल तर त्याची ही स्वागत. धन्यवाद.

FAQ’s

शरीरातील उष्णता वाढण्याची कारणे कोणती ?

साठी काही अंतर्गत आणि बाहयाअंतर्गत कारणे असू शकतात. अंतर्गत म्हणजे खाद्यपदार्थ जे मी वर सांगितलेली आहे. बाहयाअंतर्गत मध्ये वातावरण वगैरे कारणे असू शकतात.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावे ?

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी थंड आहार, विहार असू द्या तसेच मी वरील सांगितलेली शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ नक्की टाळा.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय खावे ?

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, ताजे फळ, शरबत, लिंबू पाणी असे पदार्थ घेऊ शकता.

शरीरात उष्णता वाढल्यास काय होते ?

शरीरात उष्णता वाढल्यास ताप,डोकेदुखी, अॅसिडिटी, मळमळ उलटी आणि काही वेळेस वेगवेगळे त्वचा विकार होऊ शकतात.

कोणत्या आजारामुळे शरीरात उष्णता येते ?

हायपरथायरॉईडीझम, टायफॉइड, मलेरिया, मधुमेह तसेच इतर आजारामुळे शरीरात उष्णता येते

2 thoughts on “शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ कोणते आहेत ? | Sharirat Ushnata Vadhavnare Padarth”

Leave a Comment