HEALTHBUSS

रात्री लवकर आणि शांत झोप येण्यासाठी घरगुती उपाय | Zop yenyasathi upay

Last updated on February 17th, 2024 at 04:17 pm

झोप येण्यासाठी उपाय, झोप येण्यासाठी घरगुती उपाय, झोप येण्यासाठी मंत्र,लवकर झोप येण्यासाठी उपाय, लवकर झोप येण्यासाठी घरगुती उपाय, शांत झोप येण्यासाठी उपाय, शांत झोप येण्यासाठी मंत्र, शांत झोप लागण्यासाठी उपाय, शांत जॉप येण्यासाठी घरगुती उपाय, zop yenyasathi upay in marathi, zop yenyasathi gharguti upay, ratri lavkar zop yenyasathi upay, shant zop yenyasathi gharguti upay, shant zop yenyasathi upay, lagech zop yenaysathi upay

झोप हा घटक आपल्या शरीर आणि मनासाठी अत्यंत आवश्यक आहे. तुमचे मन आणि शरीर पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला झोपेची जेवढी गरज आहे तेवढा वेळ तुम्ही झोपलेच पाहिजे.

झोपेमुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. तसेच शांत आणि पुरेशी झोप झाल्यामुळे चिडचिड कमी होते, स्मरणशक्ती चांगली राहते, कामामध्ये लक्ष टिकून राहते.

पण बऱ्याच जणांना झोपे संबंधी अनेक तक्रारी असतात. यातील महत्वाच्या सर्वात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या समस्या आहेत निद्रानाश आणि स्लीप एपनिया (sleep apnea). झोपे संबंधी या दोन वेगवेगळ्या समस्या आहेत. या मध्ये निद्रनाश समस्या बऱ्याच जणांना आहे. निद्रनाश मध्ये रात्री लवकर झोप न येणे, लागलीच तर मध्येच जाग येणे अशा घटना घडत असतात. याला मेडिकल टर्म आहे इनसोमणिया (insomnia).

थोडक्यात

या ब्लॉग मध्ये आपण निद्रानाश या समस्येविषयी सामान्य माहिती त्याचसोबत शांत आणि लवकर झोप येण्यासाठी घरगुती उपाय याची माहिती बघणार आहोत.

निद्रानाश मध्ये ३ गोष्टी घडत असतात.

 • सुरुवातीला लवकर झोप येत नाही.
 • झोप आलीच तर मध्येच जाग येते.
 • पूर्ण वेळ झोप झालीच तर झोपेचा दर्जा (quality of sleep) खराब होतो.

वरील पैकी कोणतेही एक लक्षण किंवा तिन्ही लक्षण तुम्हाला असल्यास तुम्हाला निद्रानाश आजार आहे समजावे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार जपान नंतर भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथे झोपेपासून वंचित असणारे सर्वाधिक लोक आहेत किंवा झोपेच्या संबंधी त्यांना काहीतरी तक्रारी आहेत.

निद्रानाश किंवा अपुरी झालेली झोप ही आपल्या सोबत अनेक आरोग्य समस्या घेऊन येत असते. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ नुसार निद्रानाश किंवा इतर झोपेच्या समस्यांमुळे उच्चरक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, नैराश्य, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांचा धोका देखील लक्षणीयरीत्या वाढतो.

संबंधित वाचा-उच्च रक्तदाब (हाय बीपी) कमी करण्याचे उपाय
संबंधित वाचा- हार्ट अटॅक कशामुळे येतो ?

एवढेच नाही तर जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये २०२२ साली प्रकाशित अभ्यासात कमी झोपेमुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन (testosterone) हॉरमोन ची पातळी कमी झाल्याचे आढळते.

टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमधील सेक्स हॉरमोन आहे जे पुरुषांमधील लैंगिक घटकांचा विकास करण्यासाठी गरजेचे असते. हे कमी असल्यावर पुरुषांना लैंगिक समस्या जसे स्टॅमिना कमी होणे, ताठरता कमी होणे वगैरे समस्या आढळतात.

संबंधित वाचा-सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी उपाय

सिडिसी नुसार १८ वर्ष किंवा त्यावर वय असलेल्या व्यक्तींना एका रात्रीत ७ तास किंवा त्याहून जास्त झोप घेणे आवश्यक आहे.

या सात किंवा त्यापेक्षा जास्त झोपेचा कालावधी हा गुणवत्ता पूर्ण असला पाहिजे. म्हणजे या कालावधीत तुम्हाला चांगली, शांत आणि निरंतर झोप आलेली पाहिजे.

असो.

जर तुम्हाला झोपेची समस्या असेल म्हणजे झोपायला गेल्यावर लवकर झोपच येत नसेल, खूप वेळ झोपायचा प्रयत्न करता पण झोपच येत नाही. तर अशा समस्यासाठी आज काही उपाय किंवा घरगुती उपाय म्हणून शकता, बघणार आहोत.

चला तर मग.

झोप येण्यासाठी घरगुती उपाय करून बघा

१. मद्य (अल्कोहोल)

झोप येण्यासाठी घरगुती उपाय

खुश होण्याचे कारण नाही. मद्य प्रेमी हे वाचल्यानंतर खुश होतील. त्याची गरज नाही.

तुम्ही जेव्हा झोपायला बेडवर जाता तेव्हा झोप येत नाही, शिवाय झोपेचा प्रयत्न देखील करता पण झोपच लागत नाही. अशा वेळी तुम्ही झोपण्यापूर्वी एक ते दीड तास अगोदर मद्य घेऊ शकता.

मद्य मध्ये महत्वाचा घटक असतो तो म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल हे मज्जासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम वर प्रभाव टाकून तेथील सिग्नलस थांबवते आणि पूर्ण सिस्टम ला शांत करते. शिवाय अल्कोहोल sedative असल्यामुळे तुमच्यामध्ये तंद्री आणते आणि संपूर्ण शरीराला एकदम रीलॅक्स करते.

महत्वाचा प्रश्न आहे की लवकर झोप येण्यासाठी मद्य प्राशन करावे की नाही.

पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही आजाराचा उपचार म्हणून मद्य घेऊ नये यासाठी मी सर्व वाचकांना प्रवृत्त करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे अशा गोष्टींचे समर्थन करत नाही. फक्त पुरावे आणि तथ्य जे आहेत त्यांचा आधार घेऊन मी माहिती देत आहे. वाचकांना त्यांना हवी असलेली माहिती पुरवणे मला योग्य वाटते. हा उपाय करून बघावा की नाही हा सर्वस्व निर्णय वाचकांचा आहे.

अल्कोहोल चा sedative म्हणजेच शामक गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला लवकर झोप ही येईल. पण हेच अनुभवणारे लोक हे पण सांगतात की सतत दारू सेवन केल्यामुळे एकंदर त्यांची झोपेची चक्र (sleep routine) खराब झाली आहे.

विले लायब्ररी मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार अल्कोहोल मुळे झोपेच्या सुरुवातीला तुम्हाला चांगली झोप येते पण झोपेच्या काही कालावधीनंतर तुमची झोप बिघडते आणि सारखी सारखी जाग येऊ शकते.

कारण सुरुवातीचा अल्कोहोल चा प्रभाव कमी झाला की त्यांनंतर च्या कालावधीत अल्कोहोल चे उलटे परिणाम बघायला भेटतात. जसे की सतत हालचाल होणे, जाग येणे, सारखे लगवीला जावे लागणे.

मेडिकल न्यूज टूडे नुसार अल्कोहोल गामा-अमीनोब्युटीरिक ऍसिड (GABA) न्यूरोट्रांसमीटरचे काम वाढवते. या न्यूरोट्रांसमीटर मुळे शरीर आणि मेंदूची क्रिया थांबते ज्यामुळे शरीर आणि मेंदू रीलॅक्स होतात आणि आपल्याला हळू हळू झोप यायला लागते.

या सर्व तथ्य नंतर ही अजून एक तथ्य आहे ते म्हणजे किती अल्कोहोल चे प्रमाण घेतल्यावर झोप येते.

याचे उत्तर आहे मध्यम प्रमाणात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर एक किंवा दोन पेग. याचे ठराविक आणि स्पष्ट उत्तर कुठेच नाही.

शेवटी अल्कोहोल व्यक्ति, वय, आजार, वेळ आणि त्याचे प्रमाण यानुसार वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळा प्रभाव दाखवू शकते.

२. वाचन

pustak vaachne Zop yenyasathi upay in marathi

रात्री झोपेच्या वेळेला तुम्ही पुस्तक घेऊन वाचत राहिलात तर त्यामुळे झोप लवकर येण्याची शक्यता असते. तज्ञ लोक सांगतात की हेच पुस्तक वाचायला पहिजे किंवा तेच वाचायला पाहिजे.

पण मी म्हणेल की झोपेच्या वेळेला तुम्हाला जी गोष्ट वाचायला बोर होईल ते वाचा. यामुळे मन त्या वाचनात ही रमत नाही आणि बाहेर च्या वातावरणात देखील रमत नाही. याचाच परिणाम म्हणून शेवटी मन आणि इंद्रिय यांचा संयोग तुटून मेंदू विश्रांती घ्यायला लागतो आणि झोप येण्यास सुरुवात होते.

ट्रायल्स जर्नल मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार वाचनाने लवकर झोप येते असेच सिद्ध होते. या अभ्यासानुसार २०२१ साली एक ऑनलाइन पद्धतीने एक प्रयोग घेण्यात आला होता. या प्रयोगात ४९६ सहभागी असलेल्या लोकांनी रात्री वाचन करून झोपण्यास सांगितले. तेवढ्याच लोकांना काहीही न वाचता झोपायला सांगितले.

प्रयोगात असे आढळून आले की ४२ टक्के वाचन करून झोपणाऱ्यांच्या झोपे मध्ये सकारात्मक बदल होऊन झोप सुधारली. त्या उलट काहीही न वाचता झोपणाऱ्या फक्त २८ टक्के लोकांमध्येच झोप सुधारल्याचे आढळून आले.

आता या विषयामद्धे सुद्धा हा प्रश्न पडेल की किती वाचावे.

याचे देखील उत्तर हेच आहे की कमी वाचा. तसे सांगायची गरज नाही कारण वाचताना झोप आल्यावर काय वाचणार तुम्ही.

झोपण्यापूर्वी कमी वेळेसाठी वाचन केले किंवा जास्त वेळेसाठी केले यामधील सुद्धा फरक आहे.

कारण डोव्हप्रेस (dove press) जर्नल मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार झोपण्यापूर्वी बराच वेळ वाचन केल्यास झोप अपुरी राहू शकते तसेच कमी वेळ वाचन केल्यानंतर जास्त वेळ झोप टिकू शकते असे स्पष्ट झाले आहे.

सायन्स डायरेक्ट मधील या अभ्यासानुसार लहान मुलांनी झोपण्यापूर्वी वाचन केल्यानंतर ते जास्त वेळ आणि चांगली झोप घेऊ शकतात असे सांगितले आहे.

वाचन केल्यानंतर नेमके झोप का लागते याबद्दल काही निरक्षण आहेत, त्याबद्दल सांगतो.

 • वाचन करत असताना आपण आपला तणाव, प्रश्न,समस्या आणि एकंदर भोवतालचा सर्व विचार करणे थांबवतो ज्यामुळे स्ट्रेस हॉरमोन ची पातळी कमी होते.
 • आपण वाचन करत असताना साहजिकच आपण खूप आरामाच्या स्थितीत असतो. यामुळे शरीर आणि मनातील कोणता संकोच किंवा तणाव आपल्याला स्थिर करण्यापासून थांबवत नाही. परिणामी आपला मेंदू झोपेच्या दिशेने जातो.
 • तिसरे एक कारण असू शकते ते म्हणजे वाचन करत असताना मेंदू त्या वाचनात मग्न होतो. त्यावेळेस मेंदू त्या वाचनाबद्दल विचार करतो म्हणजे क्रियाशील राहतो. यामुळे मेंदू वर अधिकचा भार पडून मेंदू थकतो. ज्यामुळे आपल्याला झोप लागते.

अशी ही वाचनाची सोपी आणि प्रभावी पद्धत तुम्ही लवकर झोप येण्यासाठी उपाय म्हणून वापरू शकता.

३. मसाज

body massage Zop yenyasathi upay in marathi

हा उपाय बरेच लोक वापरत ही असतील. रात्री लवकर झोप येत नसेल तर तुम्ही तुमच्या शरीराची किंवा डोक्याची मसाज करू शकता. यामुळे तुम्हाला लवकर झोप येईल.

बऱ्याच जणांना अनुभव देखील असेल की मसाज केल्यानंतर तुम्हाला तत्काळ म्हणजे लगेचच ताण, तणाव, नैराश्य यापासून आराम मिळतो. यानंतर साहजिकच तुम्हाला हळू हळू झोपी येण्यास सुरुवात होते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार चीन मध्ये एक प्रयोग करण्यात आला होता ज्यामध्ये insomnia म्हणजेच निद्रानाश असणाऱ्या ४० लोकांना मसाज थेरपी देण्यात आली आणि ४० लोकांना औषधोपचार देण्यात आले. तेव्हा मसाज देण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये झोपेचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. त्या उलट औषधोपचार करणाऱ्या कमी लोकांमध्ये झोपेचे प्रमाण सुधारल्याचे दिसून आले.

काय होते मसाज मुळे?

 • मसाज मुळे शरीर भर पसरलेली पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था (parasympathetic nervous system) सक्रिय होते. ही नर्वस सिस्टम तुमच्या शरीरात आराम निर्माण करते. ही सिस्टम सक्रिय झाल्यानंतर तीन गोष्टी घडतात. तुमच्या ह्रदयाचे ठोके कमी होतात, श्वसन गती कमी होते आणि परिणामी स्नायूंना आराम मिळतो.
 • मसाज मुळे एंडोर्फिन (endorphins) नावाचे हॉरमोन वाढते. हे हॉरमोन ताण, तनाव, नैराश्य आणि कोणत्याही प्रकारच्या वेदना कमी करण्याचे काम करते. ज्यामुळे आपोआपच शरीराला आराम मिळतो.
 • मसाज मुळे एकंदरच शरीरात रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे शरीरातील tension कमी होऊन relaxation प्राप्त होते.
 • तसेच मसाज मुळे कॉर्टिसॉल (cortisol) हॉरमोन ची पातळी कमी होते. जे शरीरात आणि मनात नैराश्य वाढवते.

यामध्ये अधिक काही सांगायची गरज नसेल कारण बरीच मंडळी हा प्रयोग करत असतील. शांत झोप येण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर हा नक्की करून बघा.

यासाठी तुम्ही प्रोफेशनल मसाज च घ्यावी असे काही नाही. एकदम साधी मसाज जसे हातपायांना, डोक्याला, खांद्यावर केली तरी चालेल. यासाठी घरच्यांची मदत घेता येईल.

४. मंत्रोच्चार

mantrochchar Zop yenyasathi upay in marathi

कोणत्या ही मंत्राचा जप जर तुम्ही झोपण्यापूर्वी केला तर फक्त तुम्हाला फक्त झोप लवकर येणार नाही तर झोपेची गुणवत्ता सुधारून शांत झोप लागेल.

हा उपाय देखील बरीच मंडळी वापरत असतील. शिवाय मंत्राचा जप करून झोपणे याचे आध्यात्मिक महत्व देखील आहे. यामुळे याचा नक्कीच मनावर परिणाम होतो.

२०१५ मध्ये झालेल्या या संशोधनात बेघर असलेल्या महिलांना दिवसभर आणि रात्री झोपताना मंत्रोच्चार करण्याचा सल्ला दिला गेला. तर ज्यांनी हा सल्ला तंतोतंत पाळला त्यांच्या मध्ये निद्रानाश समस्या कमी झाल्याचे आढळून आले.

याबद्दल अजून थोडी माहिती जाणून घेऊया.

 • यासाठी तुम्ही कोणत्याही भाषेतील किंवा धर्माचा मंत्र निवडू शकता.
 • विशेष करून तुम्हाला स्वतःला शांत आणि सकारात्मक वाटणारा मंत्र निवडा.
 • मंत्रोच्चार करत असताना तुमचे पूर्ण लक्ष मंत्र किंवा मंत्राच्या शब्दांवर आणि येणाऱ्या, जाणाऱ्या श्वासावर ठेवा.
 • लक्ष विचलित झाल्यास पुन्हा तुमचे ध्यान मंत्रोच्चारवर आणावे.
 • हे करत असताना तुम्ही बॅकग्राऊंड साठी शांत असलेले म्युझिक देखील लावू शकता.

यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणताही मंत्र हा खूप प्रभावी आणि शक्तिशाली असतो असे मी मानतो.vआधुनिक शास्त्रात सुद्धा याविषयी आता संशोधन होण्यास सुरुवात झालेली आहे.

त्यामुळे जो मंत्र निवडला आहे त्याबद्दल इतर काही नियम पाळा. तसेच मंत्रोच्चार चालू केल्यानंतर तुम्हाला इतर काही त्रास होत असल्यास मंत्रोच्चार बंद करा.

५. मॅग्नेशियम डायट

magnesium Zop yenyasathi upay in marathi

मॅग्नेशियम डायट म्हणजे असा आहार ज्यामध्ये मॅग्नेशियम चे प्रमाण भरपूर आहे. या प्रकारचा आहार तुम्हाला लवकर झोप येण्यासाठी मदत करू शकतो. असा आहार तुम्हाला रात्री च्या वेळेला घ्यायचा आहे. यामध्ये भाजी किंवा फळ काहीही असू शकते.

या दोन्ही मध्ये नाही जमले तर यासाठी मॅग्नेशियम च्या टॅब्लेट किंवा कॅप्सुल सुद्धा घेऊ शकता. पण मी टॅब्लेट आणि कॅप्सुल सूचित नाही करणार.

मॅग्नेशियम हा आपल्या शरीराला लागणारा महत्वाचा मिनरल घटक आहे. शरीरासाठी मॅग्नेशियम चे अनेक फायदे आहेत. त्याचे महत्वाचे फायदे हे ह्रदय आणि मेंदू संबंधित आहेत.

तसेच अनेक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की हे मॅग्नेशियम शरीर आणि मेंदू यांना रीलॅक्स करून झोप येण्यास मदत करते.

हिंदवी जर्नल मध्ये प्रकाशित या स्टडी नुसार मॅग्नेशियम शरीर आणि मन यांना शांत करून झोप येण्यास प्रवृत्त करते.

काही अभ्यासकांच्या मते तर मॅग्नेशियम हे शरीरातील मेलाटोनिन (melatonin) हॉरमोन चे नियंत्रण करते. मेलाटोनिन हॉरमोन हे आपल्याला झोप येण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे. मेंदुमधून हे हॉरमोन secrete झाल्यावरच आपल्याला झोप लागते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन च्या या अभ्यासानुसार शरीरात कमी मॅग्नेशियम प्रमाण हे झोप न येण्यास आणि झोपेच्या समस्या साठी कारणीभूत ठरू शकते.

तेव्हा लवकर झोप येत नसेल किंवा झोपेच्या संबंधित काही समस्या असतील तर या मॅग्नेशियम डायट चा उपयोग नक्की करून बघा.

मॅग्नेशियम कशामद्धे असते ?

तसे मॅग्नेशियम चा स्त्रोत असणारे खूप पदार्थ आहेत. पण झोपे संबंधित समस्या साठी नॅशनल स्लीप फाऊंडेशन (national sleep foundation) ने यासाठी केळी, एक ग्लास कोमात दूध आणि एक वाटी संपूर्ण तृणधान्य वापरण्यास सांगितले आहे. हे तुम्ही झोपेच्या एक तास अगोदर घ्यावे असा सल्ला ते देतात.

तसे इतर देखील जे मॅग्नेशियम चे स्त्रोत आहेत ते घेऊ शकतात. जसे की काजू, बदाम, शेंगदाणे, पालक, गहू, राजमा डार्क चॉकलेट.

६. ध्यान (मेडिटेशन)

meditation Zop yenyasathi upay in marathi

झोप येण्यासाठी ध्यान किंवा मेडिटेशन (meditation) चा उपयोग थोडा अवघड आणि क्लिष्ट आहे. हे यामुळे की एक तर हे करायला संयमी वृत्ती लागते आणि दुसर म्हणजे काही जणांना याचा फायदा तात्काळ भेटतो तर काही जणांना उशिरा याचा प्रभाव बघायला मिळेल.

ध्यान करून झोप लवकर येण्यासाठी इतर ही बरेच घटक लक्षात घ्यावे लागतील. जसे तूम्ही कोणता आहार घेऊन ध्यान करता किंवा उपाशी पोटी ध्यान करता, कोणत्या वेळेला करता, किती वेळा करता आणि किती गुणवत्तापूर्ण करता.

पण या भानगडीत जास्त न पडता विषय पुढे सुरू ठेवूया. अपेक्षा करतो की तुम्हाला ध्यान करण्याची आवड असेल आणि याची सवय देखील असेल.

संबंधित वाचा-how to do meditation at home for beginners ?

ध्यान करण्याचे तसे अनेक आणि अलौकिक असे फायदे आहे. जे अनुभवल्यावरच कळतील.

या ब्लॉग च्या अनुषंगाने आपण ध्यान आणि झोप लागणे यांचा परस्पर संबंध आणि झोप येण्यासाठी ध्यान का केले जावे या बद्दल माहिती बघणार आहोत.

यामध्ये आपण तत्काल म्हणजेच लवकर झोप येण्यासाठी ध्यान चा उपयोग आणि जीर्ण झोपेच्या समस्या साठी ध्यान चा उपयोग असे दोन्ही पैलू बघणार आहोत.

तत्काल झोप येण्यासाठी किंवा लवकर झोप येण्यासाठी ध्यान करण्याचा उपयोग संबंधी कमी संशोधन झाले आहेत. यामध्ये मी माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार याबद्दल सांगणार आहे.

पण जर तुम्हाला कोणती ही झोपेची समस्या ही खूप दिवसांपासून आहे, त्यावर मात्र meditation चा उपयोग नक्की प्रभावी आहे. आणि या अनुषंगाने अनेक संशोधन आणि प्रयोग देखील झालेले आहेत.

आता याच अभ्यासानुसार जीर्ण निद्रानाश असलेल्या प्रौढ व्यक्तींसाठी माइंडफुलनेस मेडिटेशन हा एक उत्तम उपचाराचा पर्याय म्हणून सांगितलेला आहे.

२०११ मधील या संशोधनात जीर्ण निद्रानाश ची समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये त्यांची झोप आणि झोपेचे पॅटर्न सुधारल्याचे लक्षात आले आहे.

याच बरोबर जामा इंटरनल इंटरनल मेडिसिन मधील या आर्टिकल नुसार प्रयोगातील ४९ व्यक्तींना माइंडफुलनेस मेडिटेशनचा उपयोग त्याच्या झोपेच्या समस्या साठी झालेला आहे.

हेल्थलाइन नुसार ध्यान मुळे झोप येण्याचे काही कारणे आहेत.

 • ध्यान मुळे मेलाटोनिन हॉरमोन ची पातळी वाढते.
 • ध्यान केल्यामुळे सेरोटोनिन हॉरमोन वाढते, ज्यापासून पुढे मेलाटोनिन हॉरमोन तयार होते.
 • ध्यान मुळे ह्रदयाचे ठोके कमी होतात.
 • ध्यानामुळे मेंदुमधील झोपेस कारणीभूत अशा भागाचा जास्त विकास होतो.

अशा पद्धतीने ध्यान केल्यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होते.

लक्षात ठेवा की ध्यान पद्धत ही दीर्घ झोपेच्या समस्या साठी जास्त प्रभावी आहे. वर सांगितल्याप्रमाणे ध्यान केल्यानंतर तत्काल झोप येणे हे काही जणांच्या बाबतीत शक्य होईल. जसे की ध्यान मध्ये एकदम प्राविण्य मिळवलेले मंडळी.

शेवटी एवढेच सांगेल की झोप अत्यंत आवश्यक आहे. आपले शरीर आणि मन यांना जर जास्त काळासाठी तरुण आणि कार्यक्षम ठेवायचे असेल तर पुरेशी आणि शांत झोप ही खूप महत्वाची आहे.

झोपेच्या विषयी काही समस्या असतील तर दर वेळेस डॉक्टरांना भेटून औषधोपचार घेणे गरजेचे नाही. तत्पूर्वी काही घरगुती उपचार देखील करून बघा.

यानंतर जर काही दिवसांनी आराम नाही मिळाला तर मात्र डॉक्टरांना भेटून तुमच्या समस्या विषयी मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

शेवटी चांगली आणि लवकर झोप येण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत ज्या तुम्ही दररोज फॉलो केल्या पाहिजे. यामुळे तुमची झोप आणि झोपेची गुणवत्ता दोन्ही वाढायला मदत होईल.

झोप येण्यासाठी टिप्स

 • झोपेची एकच वेळ ठरवा.
 • रात्री झोपण्यापूर्वी शक्यतो मद्य सेवन टाळा.
 • दैनंदिन व्यायाम करण्याची सवय लावा. शक्यतो रात्री च्या वेळेस चा व्यायाम झोप येण्यासाठी चांगला आहे.
 • झोपेची जागा ही स्पेशल असायला हवी. ज्या ठिकाणी दिवसभर लोळता, खेळता, बसता अशा ठिकाणी लवकर झोप येणार नाही. झोपेचे ठिकाण फक्त झोपेसाठीच वापरा.
 • रात्रीचे चे जेवण कमी करा.
 • झोपण्यापूर्वी वाचन करण्याची सवय लावा.

FAQ’s


झोप महत्वाची का आहे?

झोप महत्वाची आहे कारण ती एकंदर शरीर आणि मनाची दुरुस्ती करते.


जेव्हा आपण झोपतो तेव्हा काय होते?

जेव्हा आपण झोपतो तेव्हा मनाची,शरीराची दुरुस्ती होते.

जास्त झोप कशामुळे येते ?

जास्त झोप  हायपरसोम्निया, न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्स आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्स या कारणांमुळे येऊ शकते.


झोपण्याची आणि जागे होण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

झोपण्याची आणि जागे होण्याची वेळ ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. झोपेची आणि जागे होण्याची वेळ कुठेही स्पष्ट नाही.

आयुर्वेदात निद्रानाशाचा उपचार कसा करावा?

आयुर्वेदात निद्रानाशाचा उपचार ब्राह्मी, अश्वगंधा, गिलोय आणि शतावरी ही वनस्पति वापरुन करतात

Leave a Comment