HEALTHBUSS

संधीवातावर आयुर्वेदिक उपचार बद्दल संपूर्ण माहिती : संपूर्ण, कायमस्वरूपी, मूळापासून घालवा संधीवात

Last updated on April 8th, 2024 at 01:54 pm

(संधिवात, संधिवात लक्षणे, संधिवात व्यायाम, संधिवात पथ्य, संधिवात औषध, संधिवातावर घरगुती उपाय, sandhivat in marathi, sandhivat treatment in marathi, arthritis meaning in marathi, arthritis marathi)

वाढत्या वयामध्ये संधिवात हा एक गंभीर आजार आहे. अनेकांना या आजाराला सामोरे जावे लागते, ज्यामध्ये तीव्र अशा वेदना होतात. संधीवात म्हणजे काय साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जेव्हा शरीरातील हाडांच्या दोन सांध्या मध्ये तीव्र वेदना आणि सूज येते तेव्हा त्याला संधिवात म्हणतात. या ब्लॉग मध्ये तुम्हाला संधीवातावर आयुर्वेदिक उपचार याबद्दल सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे.

याहून ही अधिक सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचे झाल्यास, संधी म्हणजे सांधा, आणि आयुर्वेदनुसार जेव्हा या सांध्यामध्ये वात दोष वाढतो तेव्हा त्याला संधीवात म्हणतात. थोडं अचूक आणि तंतोतंत माहिती द्यायची झाल्यास, संधीवात खरं तर आजार नसून एक लक्षण आहे. हे लक्षण अनेक आजारांमध्ये दिसते. याच आजारांना आपण संधीवात चे प्रकार म्हणतो. आधुनिक शास्त्रात याला ‘आर्थरायटिस’ म्हणतात. असो, आपण त्यावर अधिक खोलवर मी जाणार नाही.

संधीवात हा प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये आढळणारा आजार आहे. पण अगदी लहान आणि तरुण वयांमध्ये सुद्धा संधीवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत देशात १५ टक्के म्हणजे जवळपास १८० दशलक्ष लोकांना संधीवात आजार झाल्याचे आढळले आहे. यामधे प्रामुख्याने अर्थातच वृद्ध लोकांचे प्रमाण अधिक आहे.

संधीवात आजारामध्ये तुम्हाला तुमच्या दोन सांध्या मध्ये प्रामुख्याने काही बदल झालेले दिसत असतात. कोणत्याही प्रकारच्या संधीवात मध्ये या प्रकारचे बदल हे दिसतातच, ज्यामुळे तुम्हाला संधीवात मध्ये त्रास जाणवतो.

संधीवात यामधे तुमच्या दोन सांध्या (joints) तुम्हाला खालील बदल झालेले दिसतील :

  • तुमच्या सांध्या मध्ये असणारा सायनोव्हीयल द्रव (synovial fluid) हा कमी होते.
  • सांध्या मध्ये कडकपणा येतो.
  • सांध्या मध्ये हालचाली कमी होतात.
  • सांध्या मध्ये सूज येते.
  • कूर्चा (cartilage) यांची झीज होते.

प्रामुख्याने कोणत्याही संधीवात मध्ये तुम्हाला वरील बदल झालेले बघायला मिळतील.

संधीवात कशामुळे होतो ?

संधीवात कशामुळे होतो, संधीवातची कारणे

संधीवातावर आयुर्वेदिक उपचार बद्दल माहिती जाणून घेण्यागोदर संधीवात कशामुळे होतो हे ही जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण हे समजल्यावरच तुम्हाला संधीवातावर आयुर्वेदिक उपचार आणि ते संधीवाताच्या लक्षणांवर कसे काम करते याबद्दल एक कल्पना येईल.

चला तर मग नेमका संधीवात कशामुळे होतो याबद्दल माहिती जाणून घेऊया.

सामान्यपणे संधीवात कशामुळे होतो ?

कोणत्याही प्रकारच्या संधीवातासाठी काही ठराविक आणि सामान्य कारणे कारणीभूत असतात. ती कारणे म्हणजे :

  • वजन वाढणे
  • कोणत्याही सांध्या ला मार लागणे
  • काही कारणांमुळे सांध्या ची शस्त्रक्रिया होणे
  • अतिव्यायाम
  • व्यायाम न केल्यामुळे कमकुवत झालेले सांधे आणि स्नायू

वरील सर्व कारणांमुळे मी वर सांगितलेले बदल होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे संधीवात सारखी स्थिति निर्माण होते.

संबंधित वाचा- किमान किती तास व्यायाम करावा ?

संधीवात होण्याची कारणे

वरील सांगितलेल्या परिस्थिति सोडून संधीवात होण्यासाठी इतर काही कारणे देखील महत्वाची ठरतात. ही संधीवात ची कारणे शरीरात होणाऱ्या ठराविक बदलानुसार ठरतात. पुढे याच कारणांनुसार संधीवात चे प्रकार ठरतात.

१. सांध्याची झीज होणे

कालांतराने किंवा इतर काही कारणामुळे तुमच्या एक किंवा एकापेक्षा जास्त सांध्याची झीज होते. जसे की वृद्धत्व, जास्त कठोर हालचाली, मार लागणे, शस्त्रक्रिया होणे यामुळे तुमच्या सांध्याची झीज व्हायला लागते. अशा वेळी या संधीवात ला ‘ऑस्टियोआर्थरायटिस’ (osteoarthritis) म्हणतात. ऑस्टियोआर्थरायटिस हा सर्वाधिक जास्त प्रमाणात आढळणारा संधीवात आहे.

२. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे

तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला तुमच्यावर होणाऱ्या शारीरिक जैविक आक्रमानापासून वाचवत असते. पण हीच रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा तुमच्या शरीरात तुमच्याच विरुद्ध लढते तेव्हा ‘रुमेटाईड आर्थरायटीस’ (rheumatoid arthritis) नावाचा संधीवात होतो.

३. युरीक अॅसिड चे प्रमाण वाढणे

तुमच्या शरीरात जेव्हा युरीक अॅसिड चे प्रमाण वाढते आणि ते शरीराबाहेर फेकल्या जात नाही तेव्हा ते शरीरातील छोट्या संधी मध्ये जाऊन जमा होते. अशा वेळी ‘गौट’ (gout) नावाचा संधीवात तयार होतो.

४. सोरायसिस

जर तुम्हाला सोरायसिस हा त्वचेचा आजार असेल तर तुम्हाला संधीवात चा त्रास जाणवू शकतो. किंबहुना यामधे तुम्हाला ‘सोरायटिक आर्थरायटीस’ (Psoriatic arthritis) नावाचा संधीवात होतो.

लक्षात ठेवा, ही सर्व कारणे आणि प्रकार ही सामान्यपणे आणि आणि जास्त प्रमाणात आढळणारी आहे. यापेक्षा वेगळी आणि अधिक कारणे आणि त्यानुसार प्रकार असू शकतात. त्यामुळे तुम्हाला होत असलेला त्रासाबद्दल डॉक्टरांशी चर्चा करूनच त्यावर औषधोपचार आणि इतर निर्णय घ्या.

आता संधीवातावर आयुर्वेदिक उपचार जाणून घ्या

संधीवात सारख्या आजारांवर उपचार करणे आणि सहज त्यापासून आराम मिळवणे कठीण जरी असले तरी आयुर्वेद मध्ये यासाठी प्रचंड क्षमता असणारी औषधी आणि उपचार प्रणाली सांगितलेली आहे. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये, औषधी चाचण्या आणि काही प्रायोगिक अभ्यासांमध्ये आयुर्वेदिक औषधे हे इतर उपचार पद्धती पेक्षा अनेक अंगांनी प्रभावी आणि सुरक्षित ठरत असल्याचे सिद्ध होत आहे.

अशा या संधीवातावर आयुर्वेदिक उपचार बघत असताना आयुर्वेद आणि संधीवात यांचा परस्पर संबंध तुम्हाला थोडक्यात जाणून घ्यावा लागेल.

आयुर्वेद च्या ‘त्रिदोष’ सिद्धांतानुसार कोणताही आजार हा वात, पित्त किंवा कफ दोष बिघडल्या मुळे होतो. म्हणजेच शरीरात यांचे प्रमाण बिघडून व्याधी म्हणजेच आजार निर्माण होत असतात. त्याप्रमाणे शरीरात बिघडलेला किंवा अप्राकृतपणे वाढेलेला वात दोष यामुळे संधीवात आजार निर्माण होतो.

संधीवातावर आयुर्वेदिक उपचार करत असताना तुमचा वाढलेला दोष प्राकृत करणे आणि प्रभावित झालेल्या सांध्या चे आरोग्य चांगले ठेवणे या दोन महत्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागतो.

हे दोन विचार अमलात आणण्यासाठी आयुर्वेदच्या उपचार प्रणालीचा विचार करून उपचार ठरवावे लागतात. आयुर्वेद च्या उपचार प्रणालीमध्ये महत्वाचे ३ स्तंभ ठरतात. ते म्हणजे :

  • औषधोपचार
  • पंचकर्म
  • दिनचर्या

या तीन स्तंभावर कोणत्याही आजारावर आयुर्वेदिक उपचार प्रणाली ठरवली जाते. त्यामुळे संधीवातावर आयुर्वेदिक उपचार मध्ये वात दोष आणि सांधे निरोगी राहण्याच्या दृष्टीने या तिन्ही घटकांचा विचार करावा लागणार आहे.

एवढ्यावर तुम्हाला आयुर्वेद आणि संधीवात यांचा परस्पर संबंध कळलाच असेल.

पुढे आपण संधीवातावर आयुर्वेदिक उपचार याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

१. औषधोपचार

कोणत्याही आजारात आयुर्वेदक उपचारामध्ये औषधोपचार हा अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे संधीवातावर देखील औषधांचा प्रभाव अधिक दिसून येतो.

संधीवातामध्ये औषधांचा वापर करत असताना वेगवेगळ्या सरूपात ही औषधी तुम्हाला घ्यावी लागू शकतात. जसे की :

  • तेल किंवा लेप लावणे
  • वटी म्हणजे गोळ्या
  • काढे
  • चूर्ण

संधीवातावर आयुर्वेदिक उपचार करत असताना जी औषधी वापरली जातात ती प्रामुख्याने ३ पद्धतीने काम करतात,

  • बिघडलेला वात दोष सुरळीत करतात म्हणजे वाढला असेल तर कमी करतात. सांध्यांमध्ये सूज, वेदना आणि कडकपणा कमी होण्यास मदत करतात.
  • काही संधीवात प्रकारात आमवात वाढलेला असतो जसे की ‘रुमेटाईड आर्थरायटीस’. ही औषधी ‘अग्नि’ सुधारून आमवात कमी करतात.
  • सांध्यांचे आरोग्य सुधारतात. यामुळे सांधे मजबूत आणि लवचिक होतात ज्यामुळे तेथील वेदना थांबतात.

यानंतर आपण संधीवातावर आयुर्वेदिक उपचार साठी जी औषधी बघणार आहोत, ती सर्व औषधी वरील कार्य घडवून आणून संधीवात वर आराम मिळवून देतात.

संधीवातावर आयुर्वेदिक उपचार मध्ये वापरली जाणारी औषधे कोणती आहेत त्याची माहिती आता बघूयात.

अ. गुग्गुलु

आयुर्वेद परंपरा मध्ये मोठा इतिहास असणारी गुग्गुलु ही एक आयुर्वेदिक वनस्पति आहे. कोमिफोरा मुकुल नावाच्या झाडांपासून रेसिन च्या स्वरूपात गुग्गुलु भेटत असते. संधीवात वगळून गुग्गुलु लठ्ठपणा, ह्रदयसंबंधीत काही आजार आणि वाढलेल्या कॉलेस्ट्रॉल मध्ये सुद्धा या वनस्पति चा उपयोग होतो.

संधीवात मध्ये गुग्गुलु वापरण्याचे ३ कारणे आहेत, ज्यामुळे संधीवात मध्ये गुगगूळ तुम्हाला आराम मिळवून देते.

  • सूज कमी करते: बहुतेक लोकांना संधीवात मध्ये संधि च्या ठिकाणी सूज येते. तिथे त्वचा लाल होते. यामुळे त्या सांध्या मध्ये कडकपणा आणि अकार्यक्षमता येते. गुग्गुलुआलेली सूज कमी करते. अनेक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की गुग्गुलु वनपस्ती ही anti-inflammatory म्हणून काम करते.
  • उपास्थि चे संरक्षण करते: गुग्गुलु हे तुमच्या उपस्थि चे संरक्षण करते. उपस्थि या तुमच्या सांध्यातील तुमच्या हाडांमध्ये गुळगुळीत, लवचिक पॅड सारखी रचना असते. हे पॅड शॉक अब्जॉर्बर म्हणून काम करतात आणि तुमची हाडे एकमेकांवर घासण्यापासून थांबवतात. एकंदर उपास्थि वंगण म्हणून काम करतात, ज्यामुळे तुम्हाला हालचाली करत असताना वेदना होत नाहीत. गुग्गुलु तुमच्या या उपस्थि चे संरक्षण करून संधीवात चा त्रास कमी करते.
  • वजन कमी करते: वजन जास्त असणे किंवा लठ्ठपणा हे संधीवात साठी कारण ठरू शकते. यामुळे तुमच्या सांध्या वर शरीराच्या वजनाचा भार येऊन त्या ठिकाणी सांध्या ची झीज होते. गुग्गुलु वनस्पति तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत करते.

अनेक प्रकारच्या संधीवात आणि सांधे दुखीवर गुग्गुलु च्या प्रभावामागील विज्ञान आणि रिसर्च अजून बराच होणे अपेक्षित आहे. या विषय बाबतीत सध्या उपलब्ध असणाऱ्या रिसर्च नुसार तरी गुग्गुलु वनस्पति ही संधीवात वर उपयोगी ठरणारी आहे. तरी या विषयामद्धे अजून तरी नक्कीच जास्त प्रभावी आणि सविस्तर अभ्यास होणे गरजेचे आहे.

ब. गुडूची

गुडूची आयुर्वेदातील आणखी एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. गुडूची एक शक्तिशाली टॉनिक मानले जाते. गुडूची दीर्घकालीन दुर्बल आजार, अपचन, ताप आणि लघवीच्या आजारांवर प्रभावी आयुर्वेदिक औषधी ठरते.

त्याचबरोबर गुडूची ही संधीवात आजारात सुद्धा आराम मिळवून देते असे काही रिसर्च मध्ये पुरावे सांगतात.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च इन आयुर्वेद आणि फार्मसी मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार गुडूची योग ही औषधी वातरक्त व्याधी म्हणजेच ‘गौट’ या संधीवात मध्ये लक्षणांना कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर ही औषधी ‘गौट’ मध्ये वाढेलेले युरीक अॅसिड देखील कमी करायला मदत करते.

तसेच आमवात (rheumatoid arthritis) च्या संधीवात प्रकारात, ज्यामध्ये आमवात अधिक प्रमाणात वाढतो, त्यामध्ये सुद्धा गुडूची आमवात कमी करून संधीवात मध्ये आराम मिळवून देते.

इंटरनॅशनल रिसर्च जर्नल ऑफ आयुर्वेद आणि योग मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार वाढलेला आमवात याला आधुनीक वैद्यक शास्त्रानुसार फ्री रडिकल्स (free radicals) शी जोडले जाते. गुडूची या फ्री रडिकल्स ना शरीराबाहेर फेकण्याचे काम करते. त्यामुळे गुडूची ही आमवात या संधीवात प्रकारामध्ये उपयोगी ठरते असे सिद्ध होते.

गुडुची संधिवातात कशी उपयोगी ठरते ?

गुडुची संधिवातात कशी उपयोगी ठरते, यासाठी गुडूचीचे कोणते गुण उपयोगी ठरतात यावर अधिक प्रमाणात संशोधन होण्याची गरज आहे. तरी गुडूची च्या संभाव्य गुण आणि थोड्याफार झालेल्या संशोधनानुसार आपल्याला गुडूची आणि संधीवात यांचा परस्पर संबंध समजून येऊ शकतो.

  • दाह विरोधी गुणधर्म: गुडूची मध्ये दाह विरोधी (anti-inflammatory) असतात असे अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे. गुडूची चे दाह विरोधी गुणधर्म हे सांध्या मधील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
  • अँटिऑक्सिडंट गुणधर्म: इंटरनॅशनल रिसर्च जर्नल ऑफ आयुर्वेद आणि योग मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार गुडूची मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले आहे. गुडूची च्या या गुणामुळे तुमच्या शरीरातील फ्री रडिकल्स कमी होतात. ज्यामुळे आमवात कमी होण्यास मदत होते. कारण आधुनिक शास्त्रानुसार फ्री रडिकल्स ला आमवात अशी जोडले गेले आहे.
  • इम्युनोमोड्युलेटरी इफेक्ट्स: ‘रुमेटाईड आर्थरायटीस’ मध्ये तुमच्या रोगप्रतिकारक्षमते मध्ये बिघाड होतो. म्हणजेच तुमची स्वतःची रोगप्रतिकार क्षमता ही तुमच्याच विरुद्ध काम करायला लागते. या संधीवात ला ‘रुमेटाईड आर्थरायटीस’ असे म्हणतात. आयुर्वेद मध्ये याला आमवात असे म्हणतात. गुडूची तुमची प्रतिकारशक्ति वाढवून, प्रतिकार शक्ति योग्य रीतीने वळवून तुमच्या शरीराविरोधात काम करणे थांबवते.

गुडूची वनस्पति ही संधीवात ची लक्षणे कमी करण्यास नक्कीच मदत करते. विशेष करून आमवात या संधीवात मध्ये गुडूची चा अधिक उपयोग दिसून येतो, जे आपण वरील स्पष्टीकरण मध्ये सविस्तर जाणून घेतले आहे.

क. अश्वगंधा

अश्वगंधा वनस्पति चे भारतीय औषधी परंपरा मध्ये अलौकिक असे महत्व आहे. अनेक आजारांवर उपचार म्हणून आणि सर्वांगीण आरोग्य राखण्यासाठी अश्वगंधा एक परिपूर्ण आयुर्वेदिक औषधी मानली जाते.

काही संधिवात स्थितिमध्ये जसे की ऑस्टियोआर्थरायटिस, अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस, सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस, पॉलीआर्टेरिटिस नोडोसा अश्वगंधा अत्यंत गुणकारी ठरते असे अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित या अभ्यासात अश्वगंधा चा उपयोग हा कोणत्याही संधिवात प्रकारात आढळणाऱ्या एरिथिमिया, वेदना आणि सूज या लक्षणांना कमी करण्यास होतो असे स्पष्ट झाले आहे.

यानुसार अश्वगंधा मध्ये असणारे दाहक-विरोधी फायटोमेडिसिन्स (anti-inflammatory phytomedicines) प्रोस्टाग्लँडिन्स या हॉरमोन चे कार्य थांबवतात. प्रोस्टाग्लँडिन हा पदार्थ तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या वेदना आणि सूज निर्माण करण्यास कारणीभूत घटक ठरत असतो.

दुसऱ्या एका अभ्यासानुसार अश्वगंधा चे दैनंदिन १२ आठवड्यासाठी सेवन केल्यावर गुडघेदुखी आणि त्या संबंधित असणारे इतर लक्षणे यापासून आराम मिळतो असे सिद्ध झाले आहे.

या व्यतिरिक्त अश्वगंधा मधील इतर गुण हे संधीवात मध्ये लक्षणांना कमी करण्यास मदत करते. काही रिसर्च नुसार अश्वगंधा मध्ये खालील गुण आढळतात.

  • काही अभ्यासामध्ये अश्वगंधा मध्ये दाह विरोधी गुणधर्म निर्माण करणारे काही रासायनिक घटक आढळले आहे. यामुळे तुमच्या प्रभावित झालेल्या सांध्यातील वेदना, सूज आणि कडकपणा कमी होण्यास मदत होते.
  • अश्वगंधा मध्ये वेदनाशामक गुणधर्म देखील आढळले आहे. यामुळे तुम्हाला संधीवात मध्ये होणाऱ्या तीव्र वेदनेपासून आराम मिळतो.
  • सांधेदुखी किंवा संधिवात यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या दोन हाडांच्या मध्ये असणाऱ्या उपअस्थि. याला मेडिकल टर्म मध्ये cartilage म्हणतात. संधीवात मध्ये या cartilage चे कार्य कमकुवत होते ज्यामुळे तुम्हाला संधीवात आजाराला सामोरे जावे लागते. अश्वगंधा या cartilage चे नुकसान होण्यापासून थांबवते आणि त्यांचे संरक्षण करते.

वरील गुणांमुळे अश्वगंधा नक्कीच संधीवात आणि त्या संबंधीची लक्षणे कमी करण्यास मदत करते. पण संधीवातावर आयुर्वेदिक उपचार म्हणून जर तुम्ही अश्वगंधा वनस्पति चा विचार करत असाल तर तो डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावा. डॉक्टर तुम्हाला याविषयी अश्वगंधा चा डोस, मात्रा, प्रमाण आणि संभाव्य दुष्परिणाम विषयी योग्य मार्गदर्शन करतील.

ड. पिप्पली

संधीवात आयुर्वेदिक उपचार

वेल स्वरूपात उगणारी पिप्पली ही आयुर्वेदिक वनस्पति अनेक आजारांवर प्रभावी ठरते. संधीवात मध्ये देखील पिप्पली चे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे अनेक अभ्यासात सिद्ध झाले आहे.

पिप्पली मध्ये आढळणारे पाइपरिन (pipperine) हे कंपाऊंड संधीवात मध्ये महत्वाची भूमिका बजावते.

संधीवात मध्ये पिप्पली चा फायदा कसा होतो सांगायचे झाल्यास, त्यासाठी काही मुद्दे स्पष्ट करावे लागतील. त्यानुसार :

  • यामधे असणारे पाइपरिन (pipperine) हे कंपाऊंड anti-inflammatory म्हणजे दाह विरोधी गुणधर्म असतात. पाइपरिन (pipperine) हे तुमच्या सांध्या मधील सूज, वेदना आणि कठोरपणा कमी करण्यास मदत करते.
  • पिप्पली मध्ये वेदनाशामक गुणधर्म असल्याचे सुद्धा पुरावे सापडले आहेत. यामधील असणारे पाइपरिन हे pain receptor शी जोडले जाऊन वेदना थांबवण्याचे काम पिप्पली करते.
  • पिप्पली मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म येतात. अँटिऑक्सिडंट गुणधर्म तुमच्या शरीरातील फ्री राडीकल्स शरीराबाहेर फेकून देतात. यामुळे तुमच्या cartilages म्हणजेच उपस्थिचे होणारे नुकसान कमी होते.

अशा पद्धतीने पिप्पली ही आयुर्वेदिक वनस्पति संधीवात मध्ये आराम मिळवून देण्यास मदत करते.

ढ. इतर औषधे

वरील वनस्पति व्यतिरिक्त इतर काही आयुर्वेदिक औषधी देखील संधीवात मध्ये उपयोगी ठरतात. ही औषधे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पति एकत्र करून बनवल्या जातात, जसे की,

  • काढे
  • चूर्ण
  • तैल, घृत

संधीवातावर आयुर्वेदिक उपचार म्हणून काढे, चूर्ण, घृत किंवा तैल हे वेगवेगळी आयुर्वेदिक वनस्पति वापरुन तयार केली जाते. अशा प्रकारची कोणती कोणती आयुर्वेदिक औषधी तुम्ही संधीवातावर आयुर्वेदिक उपचार म्हणून वापरू शकता, त्याची माहिती बघूया.

  • काढे : रास्नादी काढा, दशमुळ अरिष्ठ, पुनर्नावा, पिप्पल्यादि, योगराज गुग्गुल, महायोगराज गुग्गुल
  • चूर्ण : लवणभास्कर, त्रिफळा चूर्ण, हिंगवाष्टक चूर्ण, चित्रकादी चूर्ण
  • घृत, तैल : एरंड तैल, विषगर्भ तैल, बला तैल, शतधौत घृत, शुंठी

ही सर्व काढे, चूर्ण, घृत किंवा तैल तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक मेडिकल दुकानांमध्ये मिळतील.

२. पंचकर्म

आयुर्वेद मध्ये पंचकर्म ही एक उपचार पद्धती आहे. यामधे वमन (उलटी करवणे), विरेचन (जुलाब होऊन औषध देणे), बस्ती (गुद द्वारे औषध देणे), नस्य (नाकात औषध देणे), रक्तमोक्षण (खराब रक्त शरीराबाहेर काढणे) हे पाच कर्म केले जातात. या पाच कर्मांना पंचकर्म म्हणतात.

शरीरात वाढलेले किंवा खराब झालेले विशिष्ठ दोष हे पंचकर्म करून व्यवस्थित केले जातात. मी या विषयीच्या खोलवर जाणार नाही. फक्त संधीवात आणि पंचकर्म यांचा परस्पर संबंध आणि त्याची माहिती आपण बघणार आहोत.

संधीवात हा एक वातविकार आहे. म्हणजेच संधीवात हा वातदोष बिघडल्यामुळे होणारा आजार आहे. पंचकर्म मध्ये वात दोष दुरुस्त करण्यासाठी ‘बस्ती’ हा योग्य उपक्रम मानला जातो. त्यातली त्यात संधीवात साठी बस्ती आणि रक्त मोक्षण हे दोनच पंचकर्म केली पाहिजेत.

  • बस्ती मध्ये तुमच्या गुद द्वारातून पोटामध्ये औषधी द्रव्य किंवा तैल सोडले जाते. त्यानंतर पोटात जमलेले दोष शरीराबाहेर काढले जातात.
  • रक्तमोक्षण मध्ये तुमच्या तुमच्या शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर काढल्या जाते. रक्त मोक्षण हे सहसा त्वचा विकारांमध्ये दिल्या जाते. पण काही वात विकारांमध्ये सुद्धा रक्तमोक्षण प्रभावी ठरते.

३. दिनचर्या

आयुर्वेद मध्ये दिनचर्या चे अधिक महत्व आहे. त्यामुळे संधीवातावर आयुर्वेदिक उपचार करत असताना तुम्हाला त्यासाठी पूरक अशा दिनचर्या चा अवलंब करावा लागणार आहे.

दिनचर्या मध्ये तीन गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.

  • आहार
  • विहार
  • योग (व्यायाम)

याबद्दल सविस्तर माहिती बघूयात.

आहार

आयुर्वेद मध्ये आहार आणि पथ्याचे महत्व नक्कीच आहे. आपण खात असलेले अन्न आणि आजार याचा काही संबंध असू शकतो यावर लोकांचा विश्वासच बसत नाही. आयुर्वेद मध्ये असे सांगितले जाते की जर तुम्ही पथ्य पाळले तर औषधांची गरज काय. असो.

संधीवात मध्ये सुद्धा आहार आणि पथ्य यांचा विशेष फायदा होतो. संधीवातावर आयुर्वेदिक उपचार करत असताना जर आपण आहार पाळला तर बऱ्यापैकी संधीवात मध्ये आराम मिळण्यास तुम्हाला मदत होते. यासाठी आहाराबद्दल काय काय गोष्टी पाळल्या पाहिजेत त्याची माहिती थोडक्यात बघूयात.

सर्वात महत्वाचे

  • भुकेपेक्षा नेहमी २५ टक्के कमी जेवा. म्हणजे तुमच्या पोटाचा एक चतुर्थांश भाग रिकामा ठेवा. समजा दोन पोळ्या खात असाल तर दीड खा, एक खात असाल तर पाऊण खा.
  • अधून मधून भूक लागली तर काकडी, गाजर, पोहे, लाहया खा.

संधीवात कमी करण्यासाठी काय खावे ?

  • कोणतेही कडू आणि तिखट पदार्थ खावीत
  • लसूण, अद्रक, सुंठ यांचे जेवणातील प्रमाण वाढवा
  • शेवगा, कारले, बैंगण या भाज्यांचे प्रमाण वाढवा
  • ताक, कोमट पाणी
  • प्राण्यांच्या मांसचे सूप घ्या

संधीवात कमी करण्यासाठी काय टाळावे ?

  • दूध दही
  • गोड आणि आंबट पदार्थ
  • तळलेले पदार्थ
  • लाल मांस
  • मद्य
  • चीज, लोणी

वरील सर्व पदार्थ तुम्हाला संधीवात असेल तर टाळायचे आहेत.

विहार

आयुर्वेद मध्ये विहार म्हणजे तुमच्या दैनंदिन सवयी आणि हालचाली. संधीवात मध्ये दैनंदिन दिनचर्या ठरवत असताना तुमच्या दैनंदिन हालचाली आणि सवयी यांचा देखील तुमच्या संधीवतावर परिणाम होत असतो. यासाठी तुम्हाला खालील नियमांचे पालन करायचे आहे.

  • एका जागेवर जास्त वेळ बसून राहू नका
  • भूक लागली तर लगेच जेवा (जास्त वेळ उपाशी राहू नका)
  • जड जेवण केल्यावर व्यायाम किंवा जड हालचाली करणे टाळा
  • रात्री जागरण करू नका
  • दिवसा झोपू नका

संधीवात साठी योग आणि व्यायाम

आयुर्वेद मध्ये योग उपचाराचे देखील तेवढेच महत्व आहे जेवढे औषधोपचार चे आहे. त्यामुळे संधीवातावर आयुर्वेदिक उपचार करत असताना त्यामध्ये योग किंवा व्यायाम हा घटक सोडून चालणार नाही. यामधे आपण योग व्यायाम आणि संधीवात या विषयी थोडी माहिती बघणार आहोत.

आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार सुद्धा योगा संधीवात मध्ये उपयोगी ठरतो असे सिद्ध झाले आहे. २०१५ मध्ये झालेल्या या अभ्यासात व्यायामामुळे संधीवात मध्ये होणारा शारीरिक त्रास कमी होतो असे सिद्ध झाले आहे.

  • संधीवातासाठी योगासन: विशिष्ठ आसन तुम्हाला संधीवतापासून आराम मिळवून देतात. या आसनांमुळे संधीच्या ठिकाणी लवचिकता, नरम पणा येतो. पद्मासन, भुजंगासन, वृक्षासन सारखे आसन प्रकार संधीवात पासून आराम देण्यास मदत करतात.
  • संधीवातासाठी व्यायाम प्रकार: संधीवातासाठी एरोबिक व्यायाम, स्ट्रेन्थ एक्झरसाइज, रेंज ऑफ-मोशन एक्झरसाइज हे महत्वाचे ठरतात. दैनंदिन या प्रकारचे व्यायाम केल्याने संधीवातापासून आराम मिळण्यास मदत होते.

थोडक्यात शेवट

संधीवातावर आयुर्वेदिक उपचार हा एक चांगला, प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहे. विशेषकरून आयुर्वेद मध्ये तुमच्या आजारांचे मुळ कारण शोधून त्या कारणाला शरीराबहेर फेकून देण्याची क्षमता. याच कारणामुळे आयुर्वेद उपचार आजार बरा करण्यासाठी वेळ घेतात.

संधीवातावर आयुर्वेदिक उपचार करत असताना औषधोपचार, पंचकर्म आणि तुमची दिनचर्या या महत्वाच्या ३ घटकांचा विचार करावा लागतो आणि त्या अनुषंगाने संधीवातावर आयुर्वेदिक उपचार ठरवले जातात.

संधीवातावर आयुर्वेदिक उपचार हे श्रेष्ठ जरी असले तरी त्यासाठी तुम्हाला आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण संधीवातावर आयुर्वेदिक उपचार ठरवत असताना इतर बऱ्याच गोष्टी जशा की तुमची प्रकृती, वय, व्यवसाय, दिसत असलेली लक्षणे या सर्व घटकांचा विचार करावा लागतो.

जर तुम्हाला संधीवातावर आयुर्वेदिक उपचारा बद्दल काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही अनुभव शेअर करायचे असतील तर कमेन्ट द्वारे कळवू शकता. धन्यवाद.

FAQ’s

संधिवात म्हणजे काय ?

जेव्हा तुमच्या दोन हाडांच्या मध्ये म्हणजे संधी च्या ठिकाणी वात वाढून त्या ठिकाणी वेदना, सूज आणि घर्षण निर्माण तेव्हा त्या स्थित किंवा आजाराला संधीवात असे म्हणतात.

संधिवात बरा होतो का ?

नक्की, संधीवात बरा होतो.

संधिवात साठी सर्वोत्तम उपचार काय आहे ?

संधीवात साठी ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद मध्ये प्रभावी उपचार सांगितलेले आहे. तरी यामधे सर्वोत्तम उपचार हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे ठरू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवून टे ते तुमच्यासाठी सर्वोत्तम उपचारचा निर्णय घेतील.

संधिवाता साठी लाल मांस वाईट आहे का ?

हो, संधिवाता साठी लाल मांस वाईट आहे.

संधिवाता साठी कोणते पदार्थ दाहक-विरोधी आहेत ?

संधिवाता साठी हिरव्या पालेभाज्या, फळे आणि तिखट पदार्थ हे अँटीआक्सिडेंट आणि दाह-विरोधी म्हणून काम करतात.

Leave a Comment